Marathi News, 22 June 2023 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावं अशी इच्छा पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली. त्यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच मुंबई महापालिकेतील कथित १२,००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाशी संबंधित अनेक ठिकाणांवर कार छापेमारी केली. त्यामुळे राजकीय वातावण तापलं आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत, तिथून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra News Today Live : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर

19:45 (IST) 22 Jun 2023
शाळेत तंबाखू, मद्यसेवन केल्याचे आढळल्यास थेट कारवाई; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे: शाळेत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बागळणे, सेवन करण्यावर बंदी घालण्यात आली असून, असे करताना आढळल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

19:15 (IST) 22 Jun 2023
Health Special: आपल्या आतड्यांतील जीवाणू पचनाला मदत कशी करतात?

जीवनसत्त्वे मानवी शरीरातील चयापचयाच्या योग्य कार्यांसाठी आणि संपूर्ण आरोग्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटक होय.

सविस्तर वाचा…

19:00 (IST) 22 Jun 2023
Money Mantra: विमान उद्योग बाजारपेठेत गुंतवणूक करावी की, नाही?

गेल्या दोन वर्षात भारतीय हवाई वाहतूक बाजारपेठेतील घटना उत्साह वाढवणाऱ्या आहेत. एकेकाळी भारतात विमान प्रवास करणे म्हणजे चैनीची बाब समजली जात असे.

सविस्तर वाचा…

18:43 (IST) 22 Jun 2023
कल्याण पूर्वेत पुना लिंक रस्त्यावर गटाराचे सांडपाणी रस्त्यावर

कल्याण: येथील पूर्व भागातील पुना लिंक रस्त्यावर एका बंदिस्त गटारातील सांडपाणी मागील काही दिवसांपासून रस्त्यावर वाहत आहे.

सविस्तर वाचा…

18:23 (IST) 22 Jun 2023
भरती प्रक्रियेत शासन मालामाल तर बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल; वाढीव शुल्क रद्द करण्याची मागणी

वाशिम: वनविभागासह विविध विभागांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. परंतु, त्यासाठीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली असून, भरती प्रक्रियेत शासन मालामाल तर बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल होत आहेत.

सविस्तर वाचा…

17:41 (IST) 22 Jun 2023
वारकऱ्यांची मागणी पूर्ण होणार! उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, पवना, इंद्रायणी नदी..

पिंपरी: देहू, आळंदी तीर्थक्षेत्रातून वाहणारी पवना, इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार आहे. विकास आराखडा (डीपीआर) येत्या दोन महिन्यात तयार केला जाणार आहे.

सविस्तर वाचा…

17:18 (IST) 22 Jun 2023
ठाणे भाजपमधील सुंदोपसंदी वाढली

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून वर्षानुवर्षे ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात झपाट्याने विस्तारू लागलेल्या भाजपला सध्या ग्रामीण पट्ट्यात केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आणि राज्य मंत्री मंडळातील समावेशासाठी आस लावून बसलेले किसन कथोरे या दोन दिग्गज नेत्यांमधील टोकाचा विसंवाद सतावू लागला आहे.

सविस्तर वाचा…

17:13 (IST) 22 Jun 2023
प्रकाश आंबेडकर यांचाविषयी अपशब्द वापरल्याने तरुणावर गुन्हा

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने एका तरुणावर बिबवेवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपक काेंढरे (रा. अंधेरी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा

16:56 (IST) 22 Jun 2023
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघातापाठोपाठ आता इंधन चोरीचे सत्र!

बुलढाणा : सततच्या अपघातामुळे मृत्यूमार्ग ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आता इंधन चोरट्यांची दहशत वाढली आहे. महामार्गावर रात्री बेरात्री इतर वाहनांतील डिझेल चोरणाऱ्या सुसज्ज टोळ्यांचा मुक्त संचार आहे.

सविस्तर वाचा…

16:55 (IST) 22 Jun 2023
३७ लाख रुपयांच्या वीज चोरी प्रकरणी टोरंट पाॅवर कंपनीकडून गुन्हे दाखल

कळवा, मुंब्रा, शीळफाटा भागात वीज चोरी करणाऱ्यांविरोधात टोरंट पाॅवर कंपनीने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. कल्याण-शीळ मार्गावरील देसाई गावातील ३७ लाख रुपयांहून अधिक रकमेची वीज चोरी झाली असल्याची समोर आले आहे.

वाचा सविस्तर…

16:52 (IST) 22 Jun 2023
पैसे भरूनही हक्काचे घर न मिळाल्याने नागरिकांचा समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा

मुंबई: राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्थेने स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून मानखुर्दमधील तब्बल दीड ते दोन हजार नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

सविस्तर वाचा…

16:44 (IST) 22 Jun 2023
नवी मुंबई: टोमॅटो महागले, किरकोळीत प्रतिकिलो ६० रुपये; घाऊक बाजारात १० ते १२ रुपयांची दरवाढ

किरकोळ आणि घाऊक या दोन्ही बाजारात टोमॅटो चांगलेच महाग झाले आहेत. परराज्यातून आणि महाराष्ट्रातुन होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वधारले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

सविस्तर वाचा

16:42 (IST) 22 Jun 2023
Health Special: Stress Test घ्यायची आहे, तर ‘हे’ करू शकता, तेही विनामूल्य!

उन्हाळ्यातली सुट्टी ही शाळा-कॉलेजना मिळणारी मोठी सुट्टी असते. पूर्वी लोक आपल्या मामा-काकाच्या गावी जायचे, ते या उन्हाळ्यातल्या सुटीमध्येच.

सविस्तर वाचा…

16:42 (IST) 22 Jun 2023
शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पूजेला यावे ; अन्यथा ठाकरे गटाचे आंदोलन

सोलापूर : दुधाचे धोरण ठरवावे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला आषाढी पूजेला यावे. अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

वाचा सविस्तर…

16:29 (IST) 22 Jun 2023
मनीषा कायंदेंविरोधात ठाकरे गटाची अपात्रतेची याचिका?

मुंबई : शिवसेना आमदार अ‍ॅड. मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गट विधानपरिषद उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे अपात्रतेची याचिका सादर करणार आहे. याबाबत कायदेतज्ञांशी चर्चा सुरू असून दोन-तीन दिवसांत ही याचिका सादर होईल, असे ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. 

सविस्तर वाचा…

16:27 (IST) 22 Jun 2023
अजितदादांची विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, वज्रमूठ किती मजबूत…

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा

16:22 (IST) 22 Jun 2023
सर्वहारा केंद्रातील प्रकाराची चौकशी करणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन

नाशिक – सर्वहारा परिवर्तन केंद्रात आदिवासी विद्यार्थिनींसोबत झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पालक मंत्री दादा भुसे यांनी दिली.त्र्यंबकेश्वरजवळी पहिने भागातील चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्रात आदिवासी मुलींसाठी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

16:21 (IST) 22 Jun 2023
डोंबिवलीत विजेचा लपंडाव

डोंबिवली: मागील काही दिवसांपासून डोंबिवली शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळेत वीज प्रवाह एक ते दीड तास खंडित होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा…

16:02 (IST) 22 Jun 2023
कल्याण डोंबिवली पालिकेच्या सुरक्षा रक्षकाला अनधिकृत बांधकामप्रकरणी नोटीस

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतील एका वरिष्ठ सुरक्षा रक्षकाने पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा विभागात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सुरक्षा रक्षकाला नोटीस काढली आहे.

सविस्तर वाचा…

16:01 (IST) 22 Jun 2023
पिंपरी: औद्योगिकनगरीच्या विकासासाठी आता ‘शाश्वत विकास कक्ष’!

पिंपरी: औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराला पायाभूत सुविधांची गरज आहे.

सविस्तर वाचा…

15:52 (IST) 22 Jun 2023
डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत कामगारांकडून चोरी

डोंबिवली: येथील एमआयडीसीतील गोळवली भागातील एका कंपनीत मागील दोन महिन्याच्या कालावधीत या कंपनीत काम करणाऱ्या दोन कामगारांनी चार लाख २० हजार रुपये किमतीच्या सामानाची चोरी केली आहे.

सविस्तर वाचा…

15:48 (IST) 22 Jun 2023
दंगली, नक्षली कारवायांमागे विदेशी शक्ती; कैलाश विजयवर्गीय यांचा दावा

नंदुरबार – राज्यासह देशाच्या विविध भागात होत असलेल्या दंगली आणि नक्षली कारवायांमध्ये थेट विदेशी शक्तीचा हात असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. छत्तीसगढमध्ये पकडलेल्या नक्षलवाद्यांकडे चीनची हत्यारे मिळाली.

सविस्तर वाचा

15:26 (IST) 22 Jun 2023
नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांत अस्वस्थता

नागपूर : राज्यात सत्तेत येऊन वर्षभराचा काळ लोटला तरी विविध महामंडळांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नाही, मंत्रालयाशी संबंधित कामे होत नाहीत आणि दुसरीकडे संघटनेत नव्याने आलेल्यांना महत्त्वाची पदे दिली जातात. यामुळे भारतीय जनता पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून काहींनी ती वरिष्ठांकडे बोलूनही दाखवली आहे.

सविस्तर वाचा…

15:20 (IST) 22 Jun 2023
पुणे: दुकानांपुढे बेकायदा बांधकाम केल्यास आता व्यावसायिकांना भरावा लागणार अधिक मालमत्ताकर

पुणे: महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून नऱ्हे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील २५ व्यावसायिक मिळकतींची तपासणी करण्यात आली.

सविस्तर वाचा…

14:55 (IST) 22 Jun 2023
विदेशात संशोधन कार्यासाठी मिळणार शिष्यवृत्ती, ‘‘या” योजनेस मुदतवाढ

वर्धा: सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करण्यास वीस जून ही मुदत होती.

सविस्तर वाचा…

14:48 (IST) 22 Jun 2023
मुंबईत दरड कोसळण्याची ७४ अतिधोकादायक ठिकाणे; निकटच्या परिसरातील रहिवाशांना महानगरपालिकेकडून प्रशिक्षण

भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने मुंबईतील दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या २४९ ठिकाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणाअंती २४९ पैकी ७४ ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा

14:45 (IST) 22 Jun 2023
नागपूर : अंबाझरी उद्यान विकास कामाला अखेर स्थगिती! आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनाला मोठे यश

नागपूर : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी नागपूर विभागीय आयुक्तांच्या अहवालाचा आधार घेत राज्य सरकारने गरुडा ॲम्युझमेंट पार्क प्रा.लि. करीत असलेल्या उद्यान विकास, संचालन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामाला स्थगिती दिली आहे.

सविस्तर वाचा…

14:44 (IST) 22 Jun 2023
मान्सूनने यंदा त्याचा मार्ग बदलला, विदर्भात प्रवेशासाठी निवडला वाघांचा जिल्हा

नागपूर : तळकोकणात रखडलेला मान्सून आता लवकरच राज्य व्यापणार असल्याची नांदी भारतीय हवामान खात्याने दिली. विदर्भातही तो लवकरच येणार, पण यंदा त्याने मार्ग बदलला. विदर्भातील प्रवेशासाठी त्याने वाघांचा जिल्हा म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्याची निवड केली आहे.

सविस्तर वाचा…

14:43 (IST) 22 Jun 2023
“सरड्याने गरुडाची साथ सोडली अन्…”, चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे गटावर टीका

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती होय. घुबड दिवसा काम करू शकत नाही, ते केवळ रात्रीच बाहेर पडते, कावळा केवळ दिवसा दिसतो आणि सरडा वेळोवेळी रंग बदलतो. सरड्याने गरूडाची साथ सोडली आणि त्‍याचे दिवस फिरले. अशी ही महाविकास आघाडी टिकणारी नसून येत्या दिवसात काँग्रेससह अन्य विरोधकांचा पराभव निश्चित आहे. याउलट राज्‍यात भाजप नव्याने गरुडझेप घेऊन नवीन कीर्तिमान स्थापित करेल.

14:43 (IST) 22 Jun 2023
अमरावती : उद्धव ठाकरेंनी २५ वर्षे मुंबईला लुटले, प्रवीण दरेकर यांची टीका

मुंबई महापालिकेतील भ्रष्‍टाचाराची चौकशी ‘एसआयटी’मार्फत होणार असल्‍याने उद्धव ठाकरे अस्‍वस्‍थ झाले आहेत, म्‍हणून ते येत्‍या १ जुलैला ते मोर्चा काढत आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केली.

सविस्तर वाचा…

विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य केलं. याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. अमोल कोल्हे म्हणाले, “हा फार मोठ्या स्तरावरचा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारला आहे. अजित पवारांसारखा सक्षम नेता जेव्हा ही भूमिका मांडतो तेव्हा असं दिसतं की, संघटनेतील कामासाठी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असावी. तसं असेल तर सर्व कार्यकर्त्यांना आनंदच आहे.”