Marathi News, 22 June 2023 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावं अशी इच्छा पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली. त्यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच मुंबई महापालिकेतील कथित १२,००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाशी संबंधित अनेक ठिकाणांवर कार छापेमारी केली. त्यामुळे राजकीय वातावण तापलं आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत, तिथून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today Live : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर
कल्याण – कल्याण पश्चिमेतील चिकणघरमधील होली क्राॅस रुग्णालयासमोरील सहदुय्यम निबंधक दोन दस्त नोंदणी कार्यालयात मागील दोन महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची दस्त नोंदणी होत नसल्याने वकिलांसह नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दस्त नोंदणीसाठी कार्यालयातील कारकुनाला दररोज आळीपाळीने काम दिले जाते. त्यात सुसुत्रता नसल्याने सहदुय्यम निबंधक कार्यालयातील गोंधळाला सुमार राहिलेला नाही.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती होय. घुबड दिवसा काम करू शकत नाही, ते केवळ रात्रीच बाहेर पडते, कावळा केवळ दिवसा दिसतो आणि सरडा वेळोवेळी रंग बदलतो. सरड्याने गरूडाची साथ सोडली आणि त्याचे दिवस फिरले. अशी ही महाविकास आघाडी टिकणारी नसून येत्या दिवसात काँग्रेससह अन्य विरोधकांचा पराभव निश्चित आहे. याउलट राज्यात भाजप नव्याने गरुडझेप घेऊन नवीन कीर्तिमान स्थापित करेल.
नागपूर : इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज प्रत्येकालाच इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे वेड आहे. याच्या तयारीसाठी आता सरकारकडून भरीव मदत केली जाणार आहे.
नागपूर : पूर्व विदर्भात बेरोजगारीचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे, याची कल्पना सरकारी रोजगार मेळाव्यातून तरुणांना मिळालेल्या नोकरीच्या संधीवरून येते.
नागपूर: पारंपारिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर नवरी सासरी नांदायला आली. मात्र, तिसऱ्याच दिवशी नवरी उलट्या करायला लागल्याने कुटुंबात दबक्या आवाजात चर्चा झाली.
पुणे : पुणे विभागीय आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सेवेत ठेवले, तर तपासात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, असे पत्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) विभागीय आयुक्त कार्यालयास दिले होते.
पुणे : स्वायत्त संस्थांवर विद्यापीठांकडून अनेक बंधने आणली जातात. त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण केले जातात. संपत्तीमधील काही हिस्सा द्यावा लागत असल्याची विद्यापीठांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे विद्यापीठांना यापुढे मानसिकता बदलावी लागेल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बुधवारी व्यक्त केले.
नागपूर: एका बेरोजगार युवकाने नागपूर रेल्वे स्थानकावर आंबे विक्रीचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागली.
मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांना करोना जम्बो केंद्र कथित गैरव्यवहारप्रकणी समन्स बजावले असून त्यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले आहे.
पुणे : बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ उद्देश आहे आणि हे काम ‘महारेरा’कडून अतिशय उत्तम पद्धतीने होत आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी ) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील २२ स्थानकांच्या नावाचे अधिकार खासगी कंपन्या, बँकांना देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
वर्धा: वर्धा शहरालगत बोगस बियाण्यांचा कारखाना आढळून आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कसून चौकशी होत असून विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
वर्धा: वर्धा शहरालगत बोगस बियाण्यांचा कारखाना आढळून आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कसून चौकशी होत असून विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
पुणे : शाळा सुरू झाल्या असून, शहरात रस्त्यांवर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅन दिसू लागल्या आहेत. यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) ७५ टक्के वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे तब्बल २५ टक्के स्कूल बस आणि व्हॅनकडे योग्यता प्रमाणपत्र नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अलिबाग – पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात २११ दरडप्रवण गावे आहेत. या गावातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ३०० प्रशिक्षित आपदा मित्र नेमण्यात आले असून, सर्व गावांमध्ये नोडल ऑफिसर नेमण्यात आले आहेत. प्रशासनातर्फे गावांमध्ये बैठका घेऊन माहिती देण्यात आली आहे.
नागपूर : मेडिकलमधील शुल्क घोटाळ्याचा अहवाल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना बुधवारी सादर झाला. त्यानंतर सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करत एका स्थायी कर्मचाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. या प्रकरणात एकूण १५ कर्मचाऱ्यांची चौकशी झाली होती, हे विशेष.
नागपूर : मंत्रालयातील ग्राहक संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेने गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र ग्राहक आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रकडून शासनाला करण्यात आली आहे.
अमरावती: वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल मंजूर करून देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लाचखोर वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली.
“विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा”,अजित पवारांच्या वक्तव्यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या दादाची सर्व इच्छा पूर्ण व्हावी हीच माझीही इच्छा आहे. “
नंदुरबार – इयत्ता दहावी, बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.
नागपूर : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून काही भागांत उन्हाचा तडाखा, तर काही भागांत ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून म्हणजेच २३ जूनपासून राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यात खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कर्यकर्त्यांसह समोरासमोर आले. उदयनराजे समर्थकांनी भूमीपूजनाचा कार्यक्रमच उधळून लावला. यामुळे तणावाचे वातावरण झाले. दोन्ही गटांनी जागेवर दावा केला. यामुळे दोन्ही राजेंमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन्ही राजेंची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की, अशा गोष्टी कधीकधी होत असतात. परंतु तिथे काहीतरी गंभीर घडतंय असं काही नाहीये. तिथे काही अडचणीची स्थिती नाही.
नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेबाहेर गुरुवारी सकाळी शिक्षक मागणीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. शाळेच्या प्रवेशद्वारावरच पालक व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश न करता आम्हाला शिकवण्यासाठी शिक्षक द्या असा घोषणा देत विद्यार्थ्यांनी व पालकांनी आंदोलन केले.
नाशिक: देशाची राजधानी दिल्ली हे भूकंपीय वर्गीकरणात चौथ्या क्षेत्रात येते. नव्या संसद भवनची बांधणी पाचव्या भूकंपीय क्षेत्राचा विचार करून झालेली आहे. या अद्वितीय इमारतीत अतिशय मजबूत लोखंड आणि साधनांचा वापर झाला आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हत्येपासून फरार असलेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तो मुंबईहून पुण्याला जात असताना त्याला अटक करण्यात आली. पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. खासदार सुप्रिया सुळेंना पक्षाचं कार्याध्यक्ष केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याचीही चर्चा केली जाते. याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.
मुलाच्या उपचारासाठी एक गरीब विधवा महिला एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात पायपीट करीत होती. जवळ पैसे पुरेसे नसल्याने उपचार होत नव्हता, कागदपत्रे नसल्याने मोफत उपचाराच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. ती हतबल झाली होती.
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भ विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा तसेच ओबीसी समाजाप्रती उदासीन भूमिका असल्याचा आरोप करीत ओबीसी व विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत रविवार, २५ जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले.
सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांच्याकडे महाराष्ट्राची पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली असताना, अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले जाईल का, अशा प्रश्न पक्षातील नेत्यांना पडला आहे. पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करीत अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे पेच मात्र निर्माण केला आहे.
नागपूर : हल्ली नागपूरसह राज्यातील बऱ्याच भागांत उकाडा वाढला असून वीज वापर वाढले आहे. वीज देयक जास्त आल्याने हे देयक बरोबर की अवास्तव हे आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकून आपल्याला कळू शकते.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य केलं. याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. अमोल कोल्हे म्हणाले, “हा फार मोठ्या स्तरावरचा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारला आहे. अजित पवारांसारखा सक्षम नेता जेव्हा ही भूमिका मांडतो तेव्हा असं दिसतं की, संघटनेतील कामासाठी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असावी. तसं असेल तर सर्व कार्यकर्त्यांना आनंदच आहे.”