Marathi News, 22 June 2023 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावं अशी इच्छा पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली. त्यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच मुंबई महापालिकेतील कथित १२,००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाशी संबंधित अनेक ठिकाणांवर कार छापेमारी केली. त्यामुळे राजकीय वातावण तापलं आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत, तिथून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra News Today Live : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर

11:03 (IST) 22 Jun 2023
मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी वाढलीय; ठाकरे गटाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हरयाणात महिलांची उंची वाढली आहे. अलीकडच्या काळात आपल्या बहिणींची उंचीदेखील दोन-दोन इंचांनी वाढली आहे, असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केला आहे. धनखड बोलत असताना त्या मंचावर गृहमंत्री अमित शहा, हरयाणाचे मुख्यमंत्री मनहर खट्टर वगैरे तालेवार मंडळी उपस्थित होती. भारतीय जनता पक्षाने ‘अंधभक्त’ नावाची एक मानवी जमात नव्याने निर्माण केली आहे. त्यांचा विज्ञान, संशोधन, आधुनिकता वगैरेंशी काहीच संबंध नाही. मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी वगैरे गोष्टींना महत्त्व मिळाले आहे”, अशी टीका ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य केलं. याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. अमोल कोल्हे म्हणाले, “हा फार मोठ्या स्तरावरचा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारला आहे. अजित पवारांसारखा सक्षम नेता जेव्हा ही भूमिका मांडतो तेव्हा असं दिसतं की, संघटनेतील कामासाठी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असावी. तसं असेल तर सर्व कार्यकर्त्यांना आनंदच आहे.”