Marathi News, 22 June 2023 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावं अशी इच्छा पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली. त्यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच मुंबई महापालिकेतील कथित १२,००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाशी संबंधित अनेक ठिकाणांवर कार छापेमारी केली. त्यामुळे राजकीय वातावण तापलं आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत, तिथून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today Live : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर
पुणे: शाळेत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बागळणे, सेवन करण्यावर बंदी घालण्यात आली असून, असे करताना आढळल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
जीवनसत्त्वे मानवी शरीरातील चयापचयाच्या योग्य कार्यांसाठी आणि संपूर्ण आरोग्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटक होय.
गेल्या दोन वर्षात भारतीय हवाई वाहतूक बाजारपेठेतील घटना उत्साह वाढवणाऱ्या आहेत. एकेकाळी भारतात विमान प्रवास करणे म्हणजे चैनीची बाब समजली जात असे.
कल्याण: येथील पूर्व भागातील पुना लिंक रस्त्यावर एका बंदिस्त गटारातील सांडपाणी मागील काही दिवसांपासून रस्त्यावर वाहत आहे.
वाशिम: वनविभागासह विविध विभागांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. परंतु, त्यासाठीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली असून, भरती प्रक्रियेत शासन मालामाल तर बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल होत आहेत.
पिंपरी: देहू, आळंदी तीर्थक्षेत्रातून वाहणारी पवना, इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार आहे. विकास आराखडा (डीपीआर) येत्या दोन महिन्यात तयार केला जाणार आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून वर्षानुवर्षे ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात झपाट्याने विस्तारू लागलेल्या भाजपला सध्या ग्रामीण पट्ट्यात केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आणि राज्य मंत्री मंडळातील समावेशासाठी आस लावून बसलेले किसन कथोरे या दोन दिग्गज नेत्यांमधील टोकाचा विसंवाद सतावू लागला आहे.
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने एका तरुणावर बिबवेवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपक काेंढरे (रा. अंधेरी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे.
बुलढाणा : सततच्या अपघातामुळे मृत्यूमार्ग ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आता इंधन चोरट्यांची दहशत वाढली आहे. महामार्गावर रात्री बेरात्री इतर वाहनांतील डिझेल चोरणाऱ्या सुसज्ज टोळ्यांचा मुक्त संचार आहे.
कळवा, मुंब्रा, शीळफाटा भागात वीज चोरी करणाऱ्यांविरोधात टोरंट पाॅवर कंपनीने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. कल्याण-शीळ मार्गावरील देसाई गावातील ३७ लाख रुपयांहून अधिक रकमेची वीज चोरी झाली असल्याची समोर आले आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्थेने स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून मानखुर्दमधील तब्बल दीड ते दोन हजार नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
किरकोळ आणि घाऊक या दोन्ही बाजारात टोमॅटो चांगलेच महाग झाले आहेत. परराज्यातून आणि महाराष्ट्रातुन होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वधारले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
उन्हाळ्यातली सुट्टी ही शाळा-कॉलेजना मिळणारी मोठी सुट्टी असते. पूर्वी लोक आपल्या मामा-काकाच्या गावी जायचे, ते या उन्हाळ्यातल्या सुटीमध्येच.
सोलापूर : दुधाचे धोरण ठरवावे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला आषाढी पूजेला यावे. अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
मुंबई : शिवसेना आमदार अॅड. मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गट विधानपरिषद उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे अपात्रतेची याचिका सादर करणार आहे. याबाबत कायदेतज्ञांशी चर्चा सुरू असून दोन-तीन दिवसांत ही याचिका सादर होईल, असे ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
नाशिक – सर्वहारा परिवर्तन केंद्रात आदिवासी विद्यार्थिनींसोबत झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पालक मंत्री दादा भुसे यांनी दिली.त्र्यंबकेश्वरजवळी पहिने भागातील चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्रात आदिवासी मुलींसाठी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे.
डोंबिवली: मागील काही दिवसांपासून डोंबिवली शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळेत वीज प्रवाह एक ते दीड तास खंडित होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतील एका वरिष्ठ सुरक्षा रक्षकाने पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा विभागात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सुरक्षा रक्षकाला नोटीस काढली आहे.
पिंपरी: औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराला पायाभूत सुविधांची गरज आहे.
डोंबिवली: येथील एमआयडीसीतील गोळवली भागातील एका कंपनीत मागील दोन महिन्याच्या कालावधीत या कंपनीत काम करणाऱ्या दोन कामगारांनी चार लाख २० हजार रुपये किमतीच्या सामानाची चोरी केली आहे.
नंदुरबार – राज्यासह देशाच्या विविध भागात होत असलेल्या दंगली आणि नक्षली कारवायांमध्ये थेट विदेशी शक्तीचा हात असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. छत्तीसगढमध्ये पकडलेल्या नक्षलवाद्यांकडे चीनची हत्यारे मिळाली.
नागपूर : राज्यात सत्तेत येऊन वर्षभराचा काळ लोटला तरी विविध महामंडळांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नाही, मंत्रालयाशी संबंधित कामे होत नाहीत आणि दुसरीकडे संघटनेत नव्याने आलेल्यांना महत्त्वाची पदे दिली जातात. यामुळे भारतीय जनता पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून काहींनी ती वरिष्ठांकडे बोलूनही दाखवली आहे.
पुणे: महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून नऱ्हे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील २५ व्यावसायिक मिळकतींची तपासणी करण्यात आली.
वर्धा: सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करण्यास वीस जून ही मुदत होती.
भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने मुंबईतील दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या २४९ ठिकाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणाअंती २४९ पैकी ७४ ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे.
नागपूर : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी नागपूर विभागीय आयुक्तांच्या अहवालाचा आधार घेत राज्य सरकारने गरुडा ॲम्युझमेंट पार्क प्रा.लि. करीत असलेल्या उद्यान विकास, संचालन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामाला स्थगिती दिली आहे.
नागपूर : तळकोकणात रखडलेला मान्सून आता लवकरच राज्य व्यापणार असल्याची नांदी भारतीय हवामान खात्याने दिली. विदर्भातही तो लवकरच येणार, पण यंदा त्याने मार्ग बदलला. विदर्भातील प्रवेशासाठी त्याने वाघांचा जिल्हा म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्याची निवड केली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती होय. घुबड दिवसा काम करू शकत नाही, ते केवळ रात्रीच बाहेर पडते, कावळा केवळ दिवसा दिसतो आणि सरडा वेळोवेळी रंग बदलतो. सरड्याने गरूडाची साथ सोडली आणि त्याचे दिवस फिरले. अशी ही महाविकास आघाडी टिकणारी नसून येत्या दिवसात काँग्रेससह अन्य विरोधकांचा पराभव निश्चित आहे. याउलट राज्यात भाजप नव्याने गरुडझेप घेऊन नवीन कीर्तिमान स्थापित करेल.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी ‘एसआयटी’मार्फत होणार असल्याने उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत, म्हणून ते येत्या १ जुलैला ते मोर्चा काढत आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केली.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य केलं. याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. अमोल कोल्हे म्हणाले, “हा फार मोठ्या स्तरावरचा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारला आहे. अजित पवारांसारखा सक्षम नेता जेव्हा ही भूमिका मांडतो तेव्हा असं दिसतं की, संघटनेतील कामासाठी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असावी. तसं असेल तर सर्व कार्यकर्त्यांना आनंदच आहे.”