Marathi News, 23 June 2023 : बिपरजॉय चक्रीवादळामुळे लांबलेल्या पावसाने अखेर महाराष्ट्रात आगमन केले आहे. विदर्भात मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला. तर, मुंबईतही आज पावसाच्या हलकी सरी कोसळल्या. हवामान खात्याने २३ जूनपासून कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला होता. तसेच २४ ते २५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. आज संयुक्त विरोधी पक्षांची बिहारच्या पाटण्यात बैठक होत असून या बैठकीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत काय ठरतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.

Live Updates

Maharashtra News Today Live : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

19:29 (IST) 23 Jun 2023
मावशीच्याच घरी घरफोडी करणाऱ्याला अटक; कपाट उघडण्यासाठी थेट किल्ली तयार करणाऱ्यालाही आणले होते घरी

ठाणे: मावशीच्या घरी दागिने आणि पैसे अधिक असल्याने त्या हव्यासापोटी आरफीन अन्वर सय्यद (२६) याने तिच्या घरातील सुमारे साडे पाच लाख रुपयांचे दागिन चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा...

19:06 (IST) 23 Jun 2023
ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती अभियान; ठाणे महापालिका आणि कॉज फाऊंडेशनचा उपक्रम

ठाणे: ठाणे महापालिका आणि कॉज फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिनाचे औचित्य साधून २६ जूनपासून ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती अभियान राबविले जाणार आहे.

सविस्तर वाचा...

19:00 (IST) 23 Jun 2023
"पाटण्यातून चळवळी सुरू झाल्या आणि देशाच्या इतिहासात...", विरोधकांच्या बैठकीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली येथून एक संदेश दिल्याचे मला आठवते. त्यामुळे संपूर्ण देशात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. येथून अनेक चळवळी सुरू झाल्या आणि देशाच्या इतिहासात त्याचा स्वीकार झाला. आजच्या परिस्थितीत नितीशजींनी ही बैठक बोलावली आणि सगळे मित्र इथे आले. बैठकीत झालेल्या चर्चेत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून आमची नवी वाट दाखवण्याचे काम सुरू झाले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देशातील जनता त्याला साथ देईल, असं शरद पवार म्हणाले.

17:32 (IST) 23 Jun 2023
महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पाऊस; काय आहे हवामान खात्याचा अंदाज

नागपूर: महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीम या राज्यात आजपासून वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

सविस्तर वाचा...

17:12 (IST) 23 Jun 2023
पुणे: राज्य सरकारकडून आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा… घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

पुणे : राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्‍के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही सवलत संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यापासून अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील.

सविस्तर वाचा

17:10 (IST) 23 Jun 2023
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा प्रशासनाकडून सोलापूर प्रशासनाकडे, साताऱ्याकडून निरोप

बरड : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा साताऱ्यातील पाच दिवसांचा प्रवास आटोपून सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हरी नामाचा गजर करीत हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी सातारा व सोलापूर हद्दीवर वारकरी भाविकांनी माउली माउलीचा गजर केला. यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी राजुरीपासून ते सोलापूर जिल्ह्यच्या सीमेपर्यंत माउलींच्या रथाचे सारथ्य केले.

सविस्तर वाचा..

17:07 (IST) 23 Jun 2023
केंद्र प्रमुख भरती परीक्षा प्रशासकीय कारणास्तव लांबणीवर

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्र प्रमुख पदाच्या भरतीसाठी जून अखेरीला घेण्यात येणारी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. काही शिक्षक व संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे परीक्षेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

सविस्तर वाचा

16:48 (IST) 23 Jun 2023
पुणे: विदर्भात मोसमी पाऊस दाखल

पुणे : हवामान विभागाने विदर्भात मोसमी पाऊस दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारी विदर्भासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्यात मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली आहे.हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, शुक्रवारी विदर्भात मोसमी वारे दाखल झाले आहे.

सविस्तर वाचा

16:46 (IST) 23 Jun 2023
तलाठी पदाच्या ४६४४ पदांची जाहिरात आली, जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप व इतर माहिती

नागपूर : राज्यात ४६४४ तलाठी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही पदभरती ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून होणार असून कुठल्याही शाखेतील पदवीधराला यासाठी २६ जून ते १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सविस्तर वाचा...

16:32 (IST) 23 Jun 2023
“एकत्र निवडणुका लढवण्यासाठी सर्वांचे समर्थन”, विरोधकांच्या बैठकीनंतर नितीश कुमारांची घोषणा
  • एकत्र चालण्याची समर्थन झाले आहे. पुढची बैठक काहीच दिवसांत होणार आहे. यामध्ये पुढच रणनीती ठरवले जाईल. एकत्र निवडणुका लढवण्यावर समर्थन. जे आता शासनात आहेते ते देशहिताचे काम करत नाहीत. ते इतिहास बदलत आहेत - नितीश कुमार
  • जागा वाटपावर पुढच्या बैठकीत निर्णय होणार, पुढची बैठक शिमल्यात होणार. १२ जुलैला होणार पुढची बैठक होण्याची शक्यता - मल्लिकार्जु खरगे
  • 16:13 (IST) 23 Jun 2023
    कल्याणमध्ये दोन बहिणींची ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण

    कल्याण- येथील पश्चिम भागातील वन विभागाच्या वसाहती मधील ओम सिध्दी विनायक सुंकलमध्ये राहत असलेल्या एका सेवानिवृत्त ६५ वर्षाच्या रहिवाशाला त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन बहिणींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. सविस्तर वाचा…

    16:12 (IST) 23 Jun 2023
    डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमी जलमय; पार्थिव नेताना नागरिकांचे हाल

    डोंबिवली शहरातील मध्यवर्ति ठिकाणी असलेल्या शिवमंदिर स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावर ठेकेदाराने उंचवटा करुन नियमबाह्य पध्दतीने गटाराची बांधणी केली आहे. स्मशानभूमी अंतर्गत भागातून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावर पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. सविस्तर वाचा…

    15:58 (IST) 23 Jun 2023
    म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ :सोडतपूर्व प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर

    मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला, म्हणजेच अर्ज विक्री - स्वीकृती प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज विक्री - स्वीकृतीस कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असून शुक्रवारी मंडळाने सोडतपूर्व प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले.

    सविस्तर वाचा

    15:58 (IST) 23 Jun 2023
    “त्यांना देशाची नाही, मुलाबाळांची चिंता,” बावनकुळे असे का म्हणाले?

    नागपूर : विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना त्यांच्या पुढच्या पिढीची चिंता आहे, देशाची नाही, त्यामुळे पाटणामध्ये भाजपा विरोधात सर्व विरोधी पक्षातील नेते एकत्र आले आहेत. देशातील जनतेला सर्व माहिती असल्यामुळे तेच आगामी निवडणुकीत त्यांची वज्रमुठ सैल करणार, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

    सविस्तर वाचा..

    15:51 (IST) 23 Jun 2023
    कुलाबा सांडपाणी प्रकल्पात पिण्यायोग्य पाणी निर्मिती; तृतीय स्तरीय प्रक्रिया करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती

    मुंबई : भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचे नवनवीन स्त्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुलाबा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्यावर तृतीय स्तरावरील प्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी महानगरपालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे.

    सविस्तर वाचा

    15:39 (IST) 23 Jun 2023
    Metro 3: श्री सिटीवरून आणखी दोन मेट्रो गाड्या मुंबईत दाखल; आता पहिल्या टप्प्यासाठी पाच गाड्या सज्ज

    मुंबई: भविष्यात ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवर धावणारी चौथी आणि पाचवी मेट्रो गाडी गुरुवारी आंध्र प्रदेशातील श्री सिटीतून मुंबईमधील आरे कारशेडमध्ये दाखल असून मुंबईत दाखल झालेल्या मेट्रो गाड्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

    सविस्तर वाचा...

    15:23 (IST) 23 Jun 2023
    मुंबई : दहिसरमधील नव्या जलतरण तलावाच्या दुरुस्तीची नामुष्की, अवघ्या तीन महिन्यांतच तलाव जलतरणासाठी बंद

    मुंबई : दहिसर पश्चिम येथे एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या नव्या जलतरण तलावाच्या टाईल्स निखळू लागल्या असून त्याच्या आजूबाजूच्या टाईल्सही कमकुवत होत आहेत. परिणामी, मुंबई महानगरपालिकेने हा तलाव जलतरणासाठी बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त दहा – बारा दिवस हा जलतरण तलाव बंद ठेवावा लागणार आहे.

    सविस्तर वाचा...

    14:59 (IST) 23 Jun 2023
    मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी; अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    मुंबईसह पुण्यातील अनेक भागांमध्ये शनिवारी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा संदेश पोलिसांना प्राप्त झाला असून आरोपीने बॉम्बस्फोट रोखण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वाचा…

    14:44 (IST) 23 Jun 2023
    अरुंद नाला आणि गटारांअभावी डोंबिवलीतील रागाई मंदिर परिसर पाण्याखाली

    डोंबिवली- येथील पश्चिमेतील गणेशनगर भागातील रागाई मंदिर, आशीर्वाद बंगल्या जवळील काही भागात रस्त्याच्याकडेला गटारे नाहीत. या भागातील काही रस्त्यांवर अरुंद जुना नाला आहे. वाढत्या वस्तीमुळे त्याची रुंदी पालिकेकडून वाढविण्यात येत नाही.

    सविस्तर वाचा

    14:38 (IST) 23 Jun 2023
    “पाटण्यात मोदी हटाव नाही, परिवार बचाव बैठक सुरू”; फडणवीसांचा विरोधकांना टोला

    "पाटण्याला जी बैठक आहे ती मोदी हटाव बैठक नाही. ती परिवार बचाव बैठक आहे. सर्व परिवार वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. आपल्याच कुटुंबाकडे सत्ता कशी राहील याकरता हे एकत्र आले आहेत. राज्य चालवणं हा त्यांचा धंदा आहे. पण मोदींकरता ती सेवा आहे. मागच्याही काळात २०१९ ला त्यांनी एकत्र येऊन पाहिलं, पण जनता मोदींच्याच पाठिशी आहे. पण आता तर २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षा जास्त तादकीने जनता उभी राहील. यांनी कितीही बैठका केल्या तरी काही फरक पडणार नाही. मेहबुबा मुफ्तींच्या नावाने भाजपाला टोमणे मारणारे उद्धवजी आता त्यांच्याच बाजूला बसले आहेत. परिवारवादी पक्ष वाचवण्याकरता ही तडजोड सुरू आहे", अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षांवर केली.

    https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1672162902479114240?s=20

    14:17 (IST) 23 Jun 2023
    विदर्भात पावसाची जोरदार सलामी, अनेक जिल्ह्यांत रात्रीपासूनच मान्सून सक्रिय, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा

    नागपूर : जून महिना संपत आला असताना अखेर मान्सूनने विदर्भात सलामी दिली. विदर्भात मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

    सविस्तर वाचा...

    14:17 (IST) 23 Jun 2023
    पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट; महापालिका प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

    पिंपरी : मागील साडेतीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांवर आणखी पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. पावसाने ओढ दिल्याने पवना धरणातील पाणीसाठा १८.७६ टक्यांवर आला असून ३० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास पाणी कपात करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

    सविस्तर वाचा...

    14:16 (IST) 23 Jun 2023
    खुशखबर! तुमच्या वस्तीतील स्वस्त धान्य दुकानांमधून लवकरच बँक सेवाही

    नागपूर: लवकरच रास्त भाव दुकानांमध्ये नागरिकांना बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकांसह सूचीबद्ध खासगी बँकांच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे .

    सविस्तर वाचा...

    14:15 (IST) 23 Jun 2023
    राज्यात भाज्यांचे दर कडाडणार?

    पुणे : लांबलेला मोसमी पाऊस, सिंचनासाठीच्या पाण्याचा तुटवडा आणि वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. खरिपातील सरासरी लागवडीच्या वीस टक्केही लागवड झालेली नाही. त्यामुळे जुलै, ऑगस्ट महिन्यांत भाज्यांचा तुटवडा निर्माण होऊन दर कडाडण्याची शक्यता आहे.

    सविस्तर वाचा...

    14:13 (IST) 23 Jun 2023
    वर्धा : सावधान ! सोशल मीडियावर वाहन खरेदी विक्री करीत असाल तर तुमच्याही बाबतीत असे घडू शकते..

    वर्धा : सोशल मीडिया आता मनोरंजन, माहिती, मालाची जाहिरात करणारे स्वस्त व सुलभ माध्यम म्हणून चांगलेच लोकप्रिय ठरू लागले आहे. त्याचा फायदाही होतो. मात्र हे माध्यम दुधारी तलवार ठरत असल्याचे फसवणुकीच्या अनेक घटनांतून दिसू लागले आहे. या माध्यमाच्या आधारे खरेदी विक्री करण्याचे प्रकार आहेत. या ठिकाणी मात्र वाहन विक्रीत गंडा घातला गेल्याचे दिसून आले.

    सविस्तर वाचा..

    14:13 (IST) 23 Jun 2023
    अकोला : पत्नीने शेतीवर कामासाठी जाण्यास दिला नकार, पतीने संतापून…

    अकोला : पती, सासू-सासऱ्याने मिळून पत्नीची हत्या केल्याची घटना तेल्हारा तालुक्यात उघडकीस आली. आरोपींनी प्रथम हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे भासवले होते. पोलीस तपासात हत्या झाल्याचे समोर आले. जया गोपाल पातोंड (३२, रा.दहीगांव अवताडे, ता. तेल्हारा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

    सविस्तर वाचा...

    14:12 (IST) 23 Jun 2023
    मुंबई: डॉक्टरचा दूरध्वनी शोधणे पडले महागात; आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक, मुख्य आरोपीकडून आतापर्यंत १८ कोटींची फसणूक

    डॉक्टरचा दूरध्वनी क्रमांक सर्च इंजिनवर शोधणे ३० वर्षीय तरूणाला भलतेच महागात पडले. सायबर भामट्यांनी त्याच्या खात्यावरील पैसे इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केले.

    सविस्तर वाचा…

    14:07 (IST) 23 Jun 2023
    पुण्यानंतर आता आळंदीत कोयता गॅंग

    पिंपरी: आम्ही कोयता गँगची माणसे असून धंदा करायचा असेल तर २०० रुपयांच्या हप्त्याची मागणी करत चौघांनी फळ विक्रेत्याला धमकी दिली.

    सविस्तर वाचा...

    13:53 (IST) 23 Jun 2023
    गंगापूर धरणात चर खोदण्याच्या नावाखाली उधळपट्टीचा डाव; दशरथ पाटील यांचा आरोप

    नाशिक - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी खोलवर चर खोदलेला आहे. असे असताना टंचाईच्या सावटात पुन्हा एकदा चर खोदण्याच्या नावाखाली उधळपट्टीचा डाव रचण्यात आल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे.

    सविस्तर वाचा

    Maharashtra News Live

    महाराष्ट् न्यूज लाइव्ह

    Maharashtra News Today Live : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा