Maharashtra Weather Update Today, 1 August 2023 : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी राज्यात मोठा अपघात झाला आहे. शहापूर येथे समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना क्रेन कोसळल्याने १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बचावकार्य सुरू झाले आहे. तर, दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने अवघ्या राज्याचं लक्ष आज पुण्याकडे लागलेलं आहे. हा कार्यक्रम अराजकीय असला तरीही अेनक राजकीय नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय. दरम्यान, शहापूर येथे मोठा अपघात झाल्याने मोदी आज तिथे भेट देतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Maharashtra Breaking News Live : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
नाशिक: वेगवेगळ्या कारणांमुळे गच्छंती झालेले नाशिक विभागाचे तत्कालीन उपसंचालक तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबई: ऐरोली येथे परिचित व्यक्तीने मद्य प्राशन करण्यास पैसे दिले नाहीत म्हणून दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून फिर्यादीवर उपचार सुरु आहेत.
नागपूर: दोन दिवसांपूर्वी दोन व्यापाऱ्यांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच शहरात आणखी एक खुनाची घटना उघडकीस आली.
नागपूर : भाजपाच्या गुजरात विकास मॉडेलची टिंगल करताना मागील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी ‘विकास गांडो थयो छे’ (विकास वेडा झाला आहे) असे विडंबन केले होते. त्यावेळी ते समाजमाध्यमात खूप व्हायरलं झाले होते. आता तेच वाक्य नागपुरातील काँग्रेस नेते वापरताना दिसत आहेत. त्याचे नेमके कारण काय जाणून घेऊया.
डोंबिवली: ग्राहक म्हणून जवाहिऱ्याच्या दुकानात येऊन दुकान मालकाची नजर चुकवून लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या दोन महिलांना रामनगर पोलिसांनी कळवा येथील खारेगाव भागातून सोमवारी अटक केली आहे.
नाशिक – शहरातील गंगापूर रोड परिसरात बेंडकोळी नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. सातपूर परिमंडळातील बेंडकोळी नगरात बिबट्याचा वावर असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले होते. या परिसरात बिबट्याने पाळीव व भटक्या कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना फस्त केले होते.
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काँग्रेसकडून पत्र. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याकडून अधिकृत घोषणा.
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आ. विजय वडेट्टीवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे. त्याबाबतचे पत्र आज विधानसभाध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना सोपवण्यात आले.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 1, 2023
नव्या जबाबदारीसाठी आ. विजय वडेट्टीवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. pic.twitter.com/Wbp0hSCPw1
हिंगोली – भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर मंगळवारी दुपारी तीन गोळ्या झाडल्या. हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात ही घटना घडली. त्यांना तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलवण्यात आले आहे. पप्पू चव्हाण यांच्यावर अज्ञातांकडून तीन गोळ्या झाडल्या गेल्या. त्यातील एक गोळी पाठीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
नागपूरः नागपूरात सोमवारी सोन्याचे दर ५९ हजार ९०० रुपयांवरून रात्री ८ वाजता ६० हजार २०० रुपये प्रति दहा ग्रामवर गेले होते.
बालक, अबाल वृद्ध, तरुण-तरुणी, माता भगिनी साऱ्यांनी मोठ्या उत्साहात मा. पंतप्रधान मोदीजींचे पुण्यात स्वागत केले. गगनाला भिडलेला पुणेकरांचा हा आनंद, उत्साह मोदीजींनी केलेल्या कामाची पोचपावती आहे.#ModiInPune @BJP4India @narendramodi @JPNadda @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra… pic.twitter.com/EsSpwRSu7r
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 1, 2023
#WATCH | Prime Minister Narendra Modi held a roadshow in Pune, Maharashtra earlier today. pic.twitter.com/701CzsgLju
— ANI (@ANI) August 1, 2023
यवतमाळ : पुराने जीवन कसे उद्ध्वस्त होते, याचा अंगावर शहरा आणणारी घटना यवतमाळला उघडकीस आली. पुरामुळे गर्भातच डोळे मिटलेल्या बाळाचे मृत्यूपश्चात श्वानांनी लचके तोडल्याची संतापजनक घटना यवतमाळच्या दत्त चौक परिसरात घडली.
पश्चिम रेल्वेवरील जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी गोळीबारात ठार झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबायांना मंगळवारी पश्चिम रेल्वेने १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
भंडारा : शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते असून या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र देखभालीअभावी आणि विशेषतः याच मार्गाने रात्रंदिवस सुरू असलेल्या रेती तस्करीमुळे मोहाडी तालुक्यातील निलज बु. गावातील पांदण रस्त्याची दुरवस्था झाली असून या जीवघेण्या रस्त्यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.
डोंबिवली पूर्व भागातील पिसवली गावात पती-पत्नीने एका महिलेला १८ लाख रुपयांना घर विकले. तेच घर तिने इतर ग्राहकाला विकून स्वताचा लाभ करुन मूळ घर खरेदीदाराची फसवणूक केली. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण- ठाणे जिल्ह्याचा भूभाग डोंगराळ आणि भूस्तर माती, खडकाचा आहे. या भागात रस्ते, खोदकाम, आव्हानात्मक उंच डोंगराळ भागात करताना पहिले माती, त्यानंतर अखंड पाषाण लागतात. उन्हाळ्यात अशा आव्हानात्मक भागात काम करणे अवघड नसते. पावसाळ्यात डोंगराची माती भुसभुशीत, चिकट झालेली असते. सविस्तर वाचा…
आपल्याला भारतातील शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवनस्तर उंचवायचं आहे, आपल्याला त्याला मोठ्या उंचीवर न्यायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधुनिक बनवावी लागेल. भारतातील अनेक शहरांत मेट्रोचा विस्तार होत आहे. नवनवे फ्लायओव्हर बनवले जात आहेत. रेड लाईट्सची संख्या कमी केली जात आहे. २०१४ पर्यंत भारतात २५० किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं. यापेक्षा अधिक दिल्ली एनसीआरमध्ये होतं. आता मेट्रो नेटवर्क वाढून ८०० किमी पेक्षाही जास्त झालं आहे. याशिवाय १ किमी नव्या मेट्रो लाईनसाठी काम सुरू आहे. आज देशातील वीस शहरांत मेट्रो कार्यान्वित आहेत. महाराष्ट्रातही पुणेशिवाय, मुंबई आणि नागपूरमध्ये मेट्रोचा विस्तार होत आहे. मेट्रो नेटवर्क आधुनिक भारताच्या शहरांची नवी लाईफलाईन बनत जात आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तर भारताचा विकास होईल. भारताचा विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होईल – नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मेट्रो रेल्वे रवाना
मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचा शुभारंभ व विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यातून लाईव्ह https://t.co/r7OnqMmZpr
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2023
ते जेव्हा जेव्हा येतात, तेव्हा प्रेरणा मिळते, उर्जा मिळते काम करण्याचं बळ मिळतं. गेल्या वर्षभरात आपल्या सरकारने महायुती सरकारने केलेलं काम आपल्यासमोर आहे. सरकार स्थापन झाल्यानतंर वर्षभरामध्ये केंद्र सरकारने पाठबळ दिलं, मदत दिली त्यामुळे आपलं राज्य सर्वांगिण विकासाकडे जातंय. खऱ्या अर्थाने हे डबल इंजिनचं सरकार आहे – एकनाथ शिंदे
PM Shri Narendra Modi Ji lays the foundation stone and inaugurates various projects in Pune https://t.co/L0qPijp03Z
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 1, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. दगडू शेठ गणपतीचे दर्शन घेऊन, अभिषेक आणि महाआरती करून मोदी आता कार्यक्रम स्थळी पोहोचे असून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हा पुरस्कार मोदींना का देण्यात येतोय, याबाबतची माहिती लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांनी प्रस्तावात नमूद केली.
PM Modi Pune Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज पुण्यात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी समस्त पुणेकरांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी पुणे आणि काशी यांच्यातील एक साम्यही आपल्या भाषणात स्पष्ट केले.
वर्धा: प्रसार भारतीच्या केंद्रीय परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या भावगीत गायन श्रेणीत डॉ.भैरवी काळे मोहदुरे यांना 'अ' दर्जा बहाल करण्यात आला आहे.
PM Modi Pune Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा आणि अभिषेक, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आणि विविध विकासकामांचे भूमीपूजन, लोकार्पण असा पंतप्रधान मोदी यांचा दौरा आहे. याशिवाय दौऱ्याच्या अखेरीस दिल्लीला प्रयाण करण्यापूर्वी निमंत्रित सहा मोठ्या उद्योगपतींशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. त्याकरिता खास वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
पुणे : बंडगार्डन येथील शासकीय विश्रामगृहाच्या (व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस) छतावरील हेलिपॅड लाखोंचा खर्च करून वापराविना धूळखात पडले आहे. हे हेलिपॅड वापरण्याची परवानगी संरक्षण विभागाकडून देण्यात येत नाही. त्यामुळे आज पुणे दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कृषी महाविद्यालयात तात्पुरत्या हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे : देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरू व्हावा’ असा महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात पंतप्रधानांचे स्वागत झाले.
मी येथे येऊन जितका उत्साहित आहे, तितकाच भावूक आहे – नरेंद्र मोदी
हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांसाठी समर्पित करतो – नरेंद्र मोदी
जळगाव: एरंडोल तालुक्यातील खडके येथील (कै.) य. ब. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले असून, मोदी यांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन पूजा केली.
लोकमान्य टिळक पुरस्कार २०२३ | पुणे https://t.co/VIGbIlX0sc