Marathi News : महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपा-शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात शाब्दिक द्वंद्व सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटल्यापासून भारतीय जनता पार्टीचे नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला खासदार संजय राऊत या सर्व नेत्यांना प्रत्युत्तरं देत आहेत. तसेच यात खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली असून त्यांनीदेखील काल उद्धव ठाकरेंवर टीका केली. राणा यांना आज ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर मिळू शकतं.

Live Updates

Maharashtra Mumbai News Live Update : महाराष्ट्रातील सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर

18:35 (IST) 7 Apr 2023
पिंपरी: मालमत्ता कराचा ३० जूनपर्यंत भरणा करा आणि २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळवा!

पिंपरी: महापालिका प्रशासनाने २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्तांवरील सामान्य करातील विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात महिलांच्या नावाने असलेल्या मालमत्तेवर सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगाना ५० टक्के, तर माजी सैनिकांना शंभर टक्के सवलत लागू आहे.

वाचा सविस्तर...

17:58 (IST) 7 Apr 2023
पैशाची उधळपट्टी करू नका, वायफळ खर्च करू नका: अजित पवार

पुणे प्रतिनिधी: ‘वर्षा’ या निवासस्थानावरील जेवणाचे बिल दोन कोटी ३८लाख रुपये आले होते. त्यावरून सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोन्यासारख्या माणसांना आम्ही चहा पाजतो, अशी भूमिका मांडत अजित पवार यांच्या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते.

वाचा सविस्तर...

17:09 (IST) 7 Apr 2023
पुणे : व्यवसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या सावकारांना बेड्या; पिस्तुलाच्या धाकाने अपहरण करून उकळले पैसे

पुणे : व्याजाने दिलेल्या पैशाची परतफेड केल्यानंतरही व्यवसायिकाचे अपहरण करून पिस्तुलाच्या धाकाने खंडणी उकळणाऱ्या दोघा सावकारांना वारजे पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा...

16:24 (IST) 7 Apr 2023
लोणावळा: सलग सुट्टयांमुळे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात वाहतूक कोंडी

लोणावळा: शनिवार व रविवारच्या सुट्टयांना जोडून गुड फ्रायडेची सुट्टी आल्याने शुक्रवारी सकाळपासून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई भागातून मोठ्या संख्येने पर्यटक खाजगी वाहनांमधून बाहेर पडल्याने खालापूर टोलनाका आणि खंडाळा घाट भागात वाहतूक कोंडी झाली होती.

वाचा सविस्तर...

16:12 (IST) 7 Apr 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वेस्थानकात दाखल, अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वेस्थानकात दाखल

अयोध्येला जाणाऱ्या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार

मुख्यमंत्री उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

९ एप्रिल रोजी शिवसेनेचे (ठाकरे गट) कार्यकर्ते अयोध्येत पोहोचतील.

शिंदे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने अयोध्येला निघाले आहेत.

15:27 (IST) 7 Apr 2023
अकोला : याला म्हणतात शिस्त! हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी महापंगत; वानरसेनेचा रांगेत बसून प्रसादावर यथेच्छ ताव..

अकोला : हनुमान जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातील कोथळी बु. येथे गुरुवारी माकडांची शिस्तबद्ध पंगत बसली होती. वानरसेनेने रांगेत बसून स्टीलच्या ताटात प्रसाद ग्रहण केला. या अनोख्या महाप्रसादाची चांगलीच चर्चा होत आहे.

सविस्तर वाचा..

14:48 (IST) 7 Apr 2023
‘यूपीआय’ सुविधेचा आणखी विस्तार; रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव

मुंबई: नव्या युगाच्या रोकडरहित, डिजिटल व्यवहारांच्या गतिमान स्वीकृतीस कारणीभूत ठरलेल्या ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’चा (यूपीआय) विस्तार करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने गुरुवारी सादर केला. बँकांकडून पूर्वमंजुरी लाभलेल्या पतसीमेशी ‘यूपीआय’ सुविधा जोडण्याचा हा प्रस्ताव आहे.

वाचा सविस्तर...

14:48 (IST) 7 Apr 2023
मुंबई: मढ परिसरातील अनधिकृत स्टुडिओवर हातोडा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी सकाळपासून मालाडमधील मढ परिसरातील अनधिकृत स्टुडिओ पाडण्याची कारवाई सुरू केली. हरित लवादाकडे हे अनधिकृत स्टुडिओ पाडून टाकण्याचा निर्णय गुरुवारी दिला होता. त्यामुळे शुक्रवारी सुट्टीचा दिवस अतानाही मुंबई महानगरपालिकेने स्टुडिओवर कारवाई सुरू केली. येथील पाच स्टुडिओ जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

वाचा सविस्तर

13:38 (IST) 7 Apr 2023
पायाला गंभीर दुखापत, तरीही बछड्यांसाठी ‘ती’ची धडपड!; ताडोबातील ‘जखमी वाघिणी’चा व्हीडिओ व्हायरल

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या भानूसखिंडी निमढेला परिसरात तीन बछड्यांसाठी जखमी असूनही धडपडणा-या वाघिणीचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

वाचा सविस्तर...

13:36 (IST) 7 Apr 2023
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १७० कोटी दंड वसूल ; वर्षभरात पश्चिम रेल्वेवर २५ लाखांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि विशेष रेल्वेमध्ये प्रभावीपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत असून २०२२-२३ या वर्षात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २५ लाख ६३ हजार प्रवाशांकडून १७०.३५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

13:32 (IST) 7 Apr 2023
तब्बल चार मिनिटे ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक’ चंद्रपूरकरांना दिसले

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर आणि परिसरातून गुरुवारी असंख्य लोकांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला अगदी डोक्यावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अनुभवले. संध्याकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उत्तरेकडून दक्षिणेकडे ताशी २७००० किलोमीटर इतक्या वेगाने गेले. यावेळी त्याची उंची फक्त ४१३ किलोमीटर इतकीच होती. त्यामुळे तो शुक्रापेक्षाही जास्त तेजस्वी दिसत होता. तब्बल चार मिनिटांपर्यंत ते चंद्रपूरच्या आकाशात होते.

सविस्तर वाचा..

13:31 (IST) 7 Apr 2023
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूर मार्गे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द

नागपूर : दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडगपूर रेल्वे विभागात खेमासुली येथे रेल्वे रोको आंदोलन सुरू असल्याने नागपूर मार्गे धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सविस्तर वाचा..

13:31 (IST) 7 Apr 2023
ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’, पाहा व्हिडिओ..

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पशु पक्ष्यांचे २०० आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे. ताडोबामध्ये येणाऱ्या पर्यटकांना पशु, पक्ष्यांचे विविध आवाज काढून दाखवत असल्याने ताडोबामध्ये त्याला ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे. सुमेध वाघमारे असे त्यांचे नाव आहे. या ‘बर्डमॅन’मुळे पर्यटकांना पशु व पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळत आहे.

सविस्तर वाचा..

13:06 (IST) 7 Apr 2023
मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांची आरक्षण शुल्कातील सवलत रद्द

मुंबई: करोनाविषयक निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर रंगकर्मींना दिलासा मिळावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील नाट्यगृहांच्या आरक्षण शुल्कात सवलत जाहीर केली होती. मात्र, करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व कारभार हळूहळू पूर्ववत झाला असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नाट्यगृहांसाठी जाहीर केलेली ही सवलत मागे घेतली आणि पूर्वीप्रमाणे आरक्षण शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

वाचा सविस्तर...

12:35 (IST) 7 Apr 2023
सीमाभागात एकीकरण समितीसमोर आव्हान

कोल्हापूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीला रंग भरू लागला असताना सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकला जावा यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. सहा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी एकीकरण समितीने केली आहे. यश- अपयशाचे हिंदोळे पाहता यावेळी अधिक तयारीने निवडणूक लढवण्याची व्यूहरचना केली जात आहे.

वाचा सविस्तर...

12:13 (IST) 7 Apr 2023
पुण्यात जगणारे आणि मरणाऱ्यांनाही छळले, जन्म-मृत्यू नोंदणीचा खोळंबा!

पुणे: शहरात जन्म आणि मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी वापण्यात येणारी प्रणालीत अडथळे येत आहेत. त्यामुळे शहरातील जन्म-मृत्यू नोंदणीचा खोळंबा झाला आहे. केंद्र शासनाने विकसित केलेली सीआरएस प्रणाली (नागरी नोंदणी पद्धती) सध्या बंद पडली आहे.

वाचा सविस्तर...

12:11 (IST) 7 Apr 2023
नेमणूक पिंपरी-चिंचवड महापालिकेत; पण ‘हे’ अधिकारी काम पाहतात सातारा नगरपरिषदेचे!

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून आस्थापनेवर असलेले अभिजित बापट हे सातारा नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कामकाज करत आहेत. उपायुक्त असलेल्या बापट यांच्याकडे सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार शासनाने दिला आहे.

वाचा सविस्तर...

12:10 (IST) 7 Apr 2023
पुणे: गुरुत्वीय भिंगामुळे अदृश्य कृष्णपदार्थाचे दर्शन, अभ्यासाला एक नवी दिशा

पुणे: विश्वाचा ९५ टक्के भाग व्यापणाऱ्या कृष्णपदार्थांच्या मोठ्या रचना गुरुत्वीय भिंगाद्वारे (ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग) अभ्यासता येणे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, कृष्णपदार्थांचा विस्कळितपणा अपेक्षेपेक्षा कमी आढळल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता कृष्णपदार्थांच्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळाली आहे.

वाचा सविस्तर...

12:09 (IST) 7 Apr 2023
पुणे : ‘आरटीओ’ची कारवाई वायुवेगाने; २० हजार वाहनांवर दंडुका

पुणे : पुण्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारला आहे.

सविस्तर वाचा...

12:03 (IST) 7 Apr 2023
राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीने नागपूरकरांसाठी एप्रिल ‘ताप’दायक

नागपूर : एप्रिल महिन्यात एकापाठोपाठ होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांमुळे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईतून नागपूरमध्ये स्थानांतरित होण्याची शक्यता आहे. भाजपच्या सावरकर गौरव यात्रेने याची सुरुवात झाली असून १६ तारखेला महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यानंतर राहुल, प्रियंका गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. २७ एप्रिला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संभाव्य दौरा आहे.

वाचा सविस्तर...

11:42 (IST) 7 Apr 2023
सावधान! टायर घासलेल्या चारचाकी वाहनांना ‘समृद्धी’वर प्रतिबंध; अपघातांवर नियंत्रणासाठी दंडात्मक कारवाई सुरू

नागपूर : टायर घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावरून जाऊ इच्छिणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गुरुवारी प्रतिबंध घातला. या तिन्ही वाहनांवर प्रत्येकी २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

सविस्तर वाचा..

11:41 (IST) 7 Apr 2023
उपराजधानीत पाच दिवसांच्या बाळाची पाच लाख रुपयांत परराज्यात विक्री

नागपूर : विधवेला अनैतिक संबंधातून झालेल्या पाच दिवसांच्या बाळाची पाच लाख रुपयांत परराज्यात विक्री केल्याचे आणखी एक प्रकरण उपराजधानीत उघडकीस आले. या बाळाची विक्री रेखा पुजारी या टोळीने केली असून, आतापर्यंत रेखाने २० पेक्षा नवजात बाळ विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा..

11:40 (IST) 7 Apr 2023
मुलीचे पोट वाढत असल्याचे पाहून आईने चौकशी केली, पुढे आले धक्कादायक..

नागपूर : प्रेम असल्याचे सांगून एका युवकाने प्रेयसीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती चार महिन्यांची गर्भवती झाली. मात्र, प्रियकराने ‘तो मी नव्हेच,’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे चिडलेल्या तरुणीने कन्हान पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली.

सविस्तर वाचा..

11:39 (IST) 7 Apr 2023
राणा दाम्‍पत्‍य उभारणार १११ फुटांची विशाल हनुमान मूर्ती

अमरावती : हनुमान जयंतीच्‍या पर्वावर स्‍वत:च्‍या वाढदिवशी सामूहिक हनुमान चालिसाचे पठण केल्‍यानंतर आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमानाची १११ फूट उंचीची मूर्ती उभारण्‍याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

सविस्तर वाचा..

11:15 (IST) 7 Apr 2023
अयोध्येत एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ यांची भेट होणार : केसरकर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये अयोध्येतील महाराष्ट्र भवनाबद्दल सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षा केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

10:39 (IST) 7 Apr 2023
“ठाकरे बघून गेल्यावर अर्ध्या तासात आनंद दिघेंचा मृत्यू”, शिंदे गटाच्या दाव्यावर केदार दिघे म्हणाले, “राज ठाकरे, एकनाथ शिंदे, राणे…”

केदार दिघे म्हणाले, “आनंद दिघेंचा मृत्यू झाला तेव्हा अनेक नेते त्यांना भेटून गेले. त्यात उद्धव ठाकरे, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अनेक स्थानिक नेत्यांचा समावेश होता. हे धर्मवीर चित्रपटातही आपण पाहिलं. मिनाक्षी शिंदेंना संशय निर्माण करायचा असेल तर भेटून गेलेल्या प्रत्येकाकडे संशयाची सुई जाईल.”

10:39 (IST) 7 Apr 2023
मढमधील अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा पडणार, सोमय्यांची अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले…

मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी मड मार्वेमध्ये अनधिृकत स्टुडिओ बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर आजपासून ( ७ एप्रिल ) अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आमदार अस्लम शेख आणि आमदार आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.

 

Manisha and nacneet

अमरावतीत गुरूवारी ( ६ एप्रिल ) हनुमान जयंती निमित्त सामूहिक हनुमान चालीस पठणाचे आयोजन करण्यात आलं होते. तेव्हा बोलताना खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. ‘उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो,’ असा हल्लाबोल राणांनी केला होता.

 

Story img Loader