Marathi News : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे एका महिन्यांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्त जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, महायुतीतील घटक पक्षांमध्ये या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून मतभेद असल्याचे समोर आले. त्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला सरकारने स्थगिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे राज्यात गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निवटकवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही करत आहेत. यावरून त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहाणार आहोत.
नाशिक: पंचवटीत पुन्हा एक हत्या
नाशिक – पंचवटीसह परिसरात पुन्हा एकदा किरकोळ वादातून एकाची हत्या झाली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे. हिरावाडीत बुध्दन विश्वकर्मा (४७, रा. केशव अपार्टमेंट) यांचे वाहनतळावर गाडी लावण्यावरुन इमारतीतील लोकांशी भांडण सुरू होते. ल एकाने विश्वकर्मा यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाणीचा प्रयत्न केल्यावर अल्पवयीन मुलाने मध्यस्थी केली. संशयितांनी सळईने विश्वकर्मा यांच्या डोक्यात प्रहार केले. मध्यस्थी करणाऱ्या मुलालाही मारहाण करण्यात आली. जखमी विश्वकर्मा यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत असता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच मृत्यू झाला.
दरम्यान, विश्वकर्मा यांच्या मृत्युमुळे संतप्त नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित वसंत घोडे (४७), कल्पना घोडे (४६), विशाल घोडे (२४), गणेश घोडे (२७) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
वसईत ‘भू प्रणाम केंद्र’ सुरू, आर्थिक लुटीला चाप; भूप्रणाम केंद्रांतर्गत ऑनलाइन सुविधा सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा
वसई: सध्या वसई, विरार जमीन व्यवहारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या कामांसाठी नागरिकांची लूट होत होती. या लुटीला आता चाप बसणार आहे. भूमीअभिलेख विभागात मोजणी व विविध प्रकारची कामे जलदगतीने मार्गी लागावी यासाठी वसईत ‘भूप्रणाम केंद्र’ सुरू केले आहे. नागरिकांची कामे ऑनलाइन स्वरूपात मार्गी लागणार आहेत.
समृद्धी महामार्ग: दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे; महिला ठार, पाच जखमी
नागपूर : नागपुरात असलेला लग्नसोहळा आटोपून मूर्तीजापूरला जाण्याकरिता कारने निघालेल्या कुटुंबीयांची कार अनियंत्रित झाल्यामुळे रस्ते दुभाजकाला धडकली. भीषण अपघातात कारचे चक्क दोन तुकडेच झाल्याने कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला.
नागपूर: पतीला झोपेच्या गोळ्या देऊन पत्नी हॉटेलमध्ये युवकासोबत “नको त्या अवस्थेत”
नागपूर : महिलांच्या किटी पार्टीत आयोजक महिलांनी काही ‘जिगोलो’ युवकांना बोलावले. तेथून संपर्कात आलेल्या एका जिगोलोला एक महिला वारंवार नागपुरात बोलवत होती. पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ती थेट मोठ्या हॉटेलमध्ये त्या युवकासोबत रात्र घालवत होती. मात्र, पतीला संशय आल्यामुळे पत्नीचे बींग फुटले.
दोन हेल्मेट कसे सांभाळावे याची चिंता मिटली…आता चक्क हेल्मेटची घडी घालून….
नागपूर : वाहनासोबत दोन हेल्मेट सांभाळणे प्रचंड अडचणी असल्याने यावर नागपूर दोन जागतिक दर्जाच्या संशोधकांनी महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. यामुळे हेल्मेटची घडी करून तो सहज हाताळता येणार आहे. हे संशोधन काय आहे? आणि कसा राहणार ‘फोल्डिंग हेल्मेट’ ते बघुया.
रेल्वे डिजीटल प्रणालीत रेल्वे अद्याप मागे, दंडाची रक्कम त्रयस्थ व्यक्तीच्या नावे स्वीकारण्याची रेल्वे प्रशासनावर वेळ
पालघर : देशातील आर्थिक व्यवहार डिजिटल करण्यावर केंद्र व राज्य सरकारने भर दिला आहे. मात्र देशभरात धावणारी रेल्वे डिजीटल प्रणालीत अद्याप काहीशी मागे आहे. तिकीट बुकींग प्रणाली डिजीटल झाली असली तरी विनातिकीट प्रवाशांकडून दंडांची रक्कम वसुली करण्यासाठी अद्यावत प्रणाली अद्यााप कार्यरत न झाल्याने त्रयस्थ व्यक्तीच्या नावे ही रक्कम जमा करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली आहे.
मुंबई : बीकेसी येथे वाहतुकीत बदल, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतुकीत बदल
मुंबईः वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे.
रत्नागिरीत राजकीय घडामोडीना वेग; शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचा राजीनामा
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील राजकीय घडामोडीना वेग येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी राजीनामा देत ठाकरेच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हटले आहे.
तेजस एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन रत्नागिरी करबुडे दरम्यान बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वहातूक विस्कळीत झाली. मात्र या एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्याने एका तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर नवीन वाद?….हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर…
नागपूर: कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा भाग म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांची शाळा सोडून अन्य शाळांमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे लागणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
पुणे : मोटारीची काच फोडून साडेदहा लाखांची रोकड चोरी, विमाननगर भागातील घटना
पुणे : व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुणे : मोटारीची काच फोडून साडेदहा लाखांची रोकड चोरी, विमाननगर भागातील घटना
पुणे : व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
एसटीच्या मोकळ्या जागा विकासकाच्या घशात… संघटना म्हणते धर्मादाय संस्था…
नागपूर: एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागा इतक्या सहजतेने विकासकाच्या घशात घालायला एसटी ही धर्मादाय संस्था वाटली का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. या व्यवहारातील घोटाळ्याच्या संशयाबाबतही त्यांनी महत्वाची माहिती दिली.
नक्षलवाद्यांच्या आणखी एका मोठ्या नेत्याला कंठस्नान, मिलिंद तेलतुंबडेनंतर…
गडचिरोली : छत्तीसगड-ओडिशा सीमेवर मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले. मृत नक्षलवाद्यांमध्ये ओडिशा राज्याचा प्रभारी, केंद्रीय समिती सदस्य जयराम उर्फ चलपती याचा समावेश असून त्याच्यावर विविध राज्यांमध्ये दोन कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते.
शक्तिपीठ महामार्गाला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे समर्थन; भूसंपादन प्रक्रिया तत्काळ…
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन राज्य सरकारने नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना रद्द केली होती. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर नव्याने अधिसूचना काढून या महामार्गासाठी भूसंपदनाची प्रक्रिया सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली.
पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या निर्णयाची चौकशी करा-वडेट्टीवार
नागपूर : मकोकातील आरोपी वाल्मीक कराड यांच्याशी संबंध असल्यावरून आधीच विरोधकांच्या रडावर असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय पुन्हा खोलात जात आहे. एक रुपयात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांची चौकशी करण्याची मागणी माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज
अभिनेता सैफ अली खानला नुकताच लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी घरी चोरीसाठी घुसलेल्या हल्लेखोराने चाकूने वार केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाकू हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सैफवर लीलावती रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
“आम्ही सरकारमागे खंबीरपणे उभे”, पोलीस-नक्षलवाद्यांच्या चकमकीनंतर सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
छत्तीसगड-ओडिशा सीमेवर छत्तीसगड पोलिसांशी झालेल्या चकमकीत १४ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “दहशतवादाविरुद्धच्या अशा कोणत्याही कारवाईत, आम्ही सर्वजण सरकारच्या मागे एकजूट आणि खंबीरपणे उभे आहोत. कारण जेव्हा राष्ट्रीय मुद्दे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्न येतो तेव्हा आम्ही सर्वजण सरकारसोबत आसतो यात शंका नाही.”
कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्पास अर्थसंकल्पात मंजुरीची मागणी, मध्य रेल्वे वरिष्ठ प्रबंधकांकडे निवेदन
कराड : पश्चिम महाराष्ट्र व कोकणास जोडणारा आणि दीर्घकाळ रखडलेला कराड- चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लागल्यास शेती, उद्योग, पर्यटन, दळणवळणास चालना मिळेल. तरी त्यास मार्चमधील केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी द्यावी, यासह अन्य मागण्या नागरिक व प्रवाशांतर्फे रेल्वे कृती समितीने ओगलेवाडी-कराड रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेचे मंडळ वरिष्ठ प्रबंधक राजेशकुमार वर्मा यांच्याकडे निवेदनाने केल्या.
राज्य निवडणूक आयुक्तांचे नागपूर कनेक्शन काय आहे?
नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देवेंद्र फडणवीस हे नागपूरकर आहेत आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह इतर सार्वत्रिक निवडणुकांचे व्यवस्थापन करणाऱ्या राज निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदीही नागपूरमध्ये शिक्षण घेणारे आणि त्या अर्थाने नागपूरकर असणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे. एका अर्थाने हा नागपूरचा बहुमानच ठरावा.
पुण्यात बांगलादेशींवर घुसखोरांवर कारवाईचे आदेश
पुणे : शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
पर्यटकांच्या हुल्लडबाजीतून पाचगणीत रानगव्याचा हल्ला
सातारा: पांचगणी टेबल लँड परिसरात एका पर्यटकाने रानगव्यांसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी रानगव्याशी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न या पर्यटकांनी केला. रानगवा खवळल्याचे दिसताच पर्यटक पळून गेला.
नवी मुंबईतून महिनाभरात ११८ बांगलादेशी नागरिकांना अटक
नवी मुंबई</strong> : नवी मुंबईतील विविध २० पोलीस ठाण्यांमध्ये मागील महिन्याभरात ११८ बांगलादेशी नागरिकांना पोलीसांनी अटक केली आहे. यामध्ये ५६ महिला आणि ५७ पुरुष आणि पाच बालके आहेत. संशयित बांगलादेशी नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी पोलीस अद्यापही संबंधित विभागाकडून करत आहेत.
एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध, शेतकऱ्यांच्या गावोगावीच्या जनजागृतीला सुरुवात
उरण : मुंबईतील बिकेसीच्या धर्तीवर कर्नाळा-साई-चिरनेर (केएससी) संकुलाच्या उभारणीसाठी उरण,पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांत एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबई विरोधातील संघर्षाच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे. चिरनेर येथील ऐतिहासिक जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करून जनजागृती मोहिमेला सुरूवात करण्यात आली.
सैफ अली खानला थोड्याच वेळात रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
अभिनेता सैफ अली खानला थोड्याच वेळात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या गुरुवारी वांद्रे येथील त्याच्या घरी चोरीसाठी आलेल्या घुसखोराने सैफवर सुमारे सहा वेळा चाकूने वार केले. हल्ल्यानंतर, त्याला पहाटे २:३० च्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
चिरनेरमध्ये बर्डफ्लूची साथ, ९ फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी
उरण : तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. चिरनेरमध्ये कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून बर्डफ्ल्यू आढळल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत
पुणे : सराइताने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. नागेश आनंदा वांजळे (वय ३४, रा. देवगिरी कॉलनी, गणपती माथा, एनडीए रस्ता, वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
निवडणुकीतील विजयाचे अंतर मतदारांच्या सहभागावर अवलंबून; ‘आयसर पुणे’ने विकसित केले मॉडेल
पुणे : भारतासह जगभरात होणाऱ्या निवडणुकांमध्ये एक समान गुणधर्म संशोधनात आढळून आला आहे. निवडणुकीत मतदारांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी ही विजयी अंतराच्या सांख्यिकीय वितरणाच्या अंदाजासाठी पुरेशी असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून स्पष्ट झाला असून, या संशोधनासाठी पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) शास्त्रज्ञांनी खास प्रारूप (मॉडेल ) विकसित केले.
भाजप मोर्चेबांधणीत व्यस्त, काँग्रेस सुस्तच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारी
चंद्रपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन आमदारांना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीन ते चार महिन्यात पालिका निवडणुका होतील, कामाला लागा, असा मंत्र दिला.
रायगड, रेवदंडा येथे डिझेल तस्करीचा पर्दाफाश
अलिबाग : अलिबागजवळच्या रेवदंडा येथील कुंडलिका खाडीत आज पहाटे सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम ) पथकाने मोठी कारवाई करत डिझेल तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यात ५ टँकर आणि२ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणात ५ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे.