Maharashtra Politics LIVE Updates : दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे १८ जानेवारी राजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहेत. या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत अनेकांना सहपालकमंत्रीपदही मिळालं. तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मंत्र्यांना संधी देण्यात आली नव्हती. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य सरकारने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात काही धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत आहे. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील घडामोडी घडत आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहाणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi Live News Update Today : आजच्या सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर..

14:23 (IST) 20 Jan 2025

नंदुरबारमध्ये पोलिसांवर दगडफेकप्रकरणी १८ जण ताब्यात

नाशिक – नंदुरबार शहरात रविवारी किरकोळ अपघातामुळे निर्माण झालेल्या तणावाचा फायदा घेत एका गटातील काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले असून त्यातील सात जण हे अल्पवयीन आहेत.

सविस्तर वाचा….

14:02 (IST) 20 Jan 2025

सैफ हल्ला प्रकरणः सैफची सदनिका, इमारतीतून आरोपीचे १९ फिंगरप्रींट सापडले

मुंबईः अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास (३०) याला अटक केल्यानंतर आरोपीचे घटनास्थळावरून आरोपीच्या बोटांचे ठसे १९ ठिकाणी सापडले आहेत.

सविस्तर वाचा….

14:01 (IST) 20 Jan 2025

मुंबई मॅरेथॉनमध्ये २७ जण रुग्णालयात दाखल, एका रुग्णावर अँजिओप्लास्टी

मुंबई : रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना २७ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर जवळपास २०१८ स्पर्धकांना वैद्यकीय मदतीची गरज भासली. त्यात पायात गोळे येणे, निर्जलीकरण आणि लहानसहान दुखापतींचा समावेश आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी एका रुग्णाला हृदयाचा त्रास सुरू झाल्याने त्याच्यावर बॉम्बे रुग्णालयात तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.

सविस्तर वाचा….

14:00 (IST) 20 Jan 2025

नाशिक : लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

नाशिक – गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून यातील १० हजार रुपये स्वीकारताना देवळा पोलीस ठाण्याच्या सहायक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

सविस्तर वाचा….

13:59 (IST) 20 Jan 2025

मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला

मुंबईः मरीनड्राईव्ह येथील पंचतारांकित हाॅटेलमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. विनती मेहतानी असे या महिलेचे नाव आहे. हाॅटेलच्या २७ व्या माळ्यावरील खोलीत ही महिला होती. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांंनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर वाचा….

13:27 (IST) 20 Jan 2025

६० पैकी एकही आमदार शिंदेंच्या आदेशाशिवाय काम करत नाही – संजय शिरसाट

संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्याबद्दल केल्याल्या दाव्यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून उदय सामंत यांच्यावर वारंवार जास्त जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. महत्त्वाच्या चार-पाच जणांवर वेगवेगळी जबाबदारी शिंदेंमार्फत टाकली जात आहे. ६० पैकी एकही आमदारा शिंदेंच्या आदेशाशिवाय काम करत नाही हे मी स्पष्ट सांगतो. उदय सामंत आणि आम्ही सर्वजण एक आहोत. आमच्यात मतभेद नाहीत. आमच्यात दरार टाकण्याच प्रयत्न करू नये, असे मत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत.

13:22 (IST) 20 Jan 2025

प्रियकराला भेटायला आलेल्या अल्पवयीन प्रेयसीची ‘अधुरी प्रेम कहाणी’

नागपूर : पटन्यात( बिहार )राहणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थिनीचे नागपुरातील अकरावीच्या विद्यार्थ्यासह सूत जुळले. दोघांनीही घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. ती पाटणन्यावरुन रेल्वेने नागपुरात पोहचली तर तो रेल्वेस्थानकावर तिची वाट बघत उभा होता. मात्र, यादरम्यान, तरुणीच्या आईने मुलगी पळाल्याची तक्रार केली. पोलिसांनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. प्रियकर आणि प्रेयसीची भेट होण्यापूर्वीच पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि आईवडिलांच्या ताब्यात दिले. अशाप्रकारे ‘एक अधुरी प्रेम कहाणी’ रेल्वेस्थानकावर बघायला मिळाली.

सविस्तर वाचा…

13:21 (IST) 20 Jan 2025

‘मोक्का’ कारवाई केलेल्या गुंडाकडून हाॅटेलची तोडफोड, धानोरीतील हाॅटेल चालकाकडे खंडणीची मागणी

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आलेल्या गुंडाकडून धानोरी जकात नाका भागातील हाॅटेलची तोडफोड केली. गुंडाने हाॅटेल चालकाला धमकावून दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. हाॅटेल व्यवस्थापकाासह मालकाला मारहाण केली. याप्रकरणी गुंडासह आठ जणांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

13:20 (IST) 20 Jan 2025

सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराकडून मनोरुग्ण महिलेवर बलात्कार

पुणे : सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराकडून मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून कामगाराला अटक करण्यात आली.याबाबत एका पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुश्रुषेसाठी ठेवलेल्या ३४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय पीडित महिला मनोरुग्ण आहे.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 20 Jan 2025

डोंबिवलीत दत्तनगरमध्ये महारेरामधील, बेकायदा इमारतीचे विकासकाकडून तोडकाम

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील ६५ महारेरा प्रकरणातील एका बेकायदा इमारत विकासकाने स्वताहून पाडण्यास सुरूवात केली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाने गेल्या वर्षी या बेकायदा इमारतीला इमारत स्वताहून रिकामी करणे आणि तोडून घेण्याची नोटीस बजावली होती.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 20 Jan 2025

भाजप सदस्य नोंदणी! आधीच घायकुतीस, त्यात पुन्हा टार्गेट वाढले; आता दिमतीस तंत्रज्ञ…

वर्धा : भाजपचे सदस्यता नोंदणी अभियान जोरात सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात सदस्य नोंदणीचे टार्गेट पाऊन ते एक लाखाचे देण्यात आले आहे. हा आकडा पार करण्याची बाब जिल्हा पदाधिकाऱ्यांना अवघड ठरत असल्याचे चित्र उमटले होते. जिल्ह्यात दहा हजार पार देखील होत नसल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले. परिणामी १ ते १५ जानेवारी ही मुदत आता वाढविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:33 (IST) 20 Jan 2025

वडेट्टीवार महायुतीवर मसंतापले,”हा काय सावळा गोंधळ सुरू आहे?

नागपूर : दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीला दिलेली तडकाफडकी स्थगिती महायुतीसाठी नामुष्कीचे कारण ठरली आहे. आज पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल.. त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना टीका केली आहे.

सविस्तर वाचा…

12:18 (IST) 20 Jan 2025

सप्ताहभर सुंदर व मनोवेधक आकाश नजाऱ्याचे दर्शन; सर्व ग्रह सूर्याच्या…

अकोला : नव्या वर्षात पहिल्या महिन्याच्या उत्तरार्धात दिवसा फक्त सूर्य आणि रात्री सर्व ग्रह एका बाजूला येणार आहेत. रात्रीच्या प्रारंभी व कृष्ण पक्षातील अंधाऱ्या वेळी हा अनोखा आकाश नजारा खूपच सुंदर व मनोवेधक असेल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.आकाशातील ग्रह ताऱ्यांचा नजारा प्रत्येक मानवी जीवाला भुरळ घालतो.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 20 Jan 2025
“… ट्रम्प यांनी भारताचा अवमान केला”, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथविधीला आमंत्रित न करून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा अपमान केला आहे. रुपया घसरत असताना भारताचीही घसरण होत आहे, असे त्यांना वाटते का?”, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
10:30 (IST) 20 Jan 2025
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा लोकांच्या मानसिक परिणाम झाला – पंकजा मुंडे

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर भाजपाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “…आम्ही पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करू नये. एवढ्या मोठ्या सेलिब्रेटीवर झालेल्या हल्ला अंतर्मुख करणारा आहे. याचा लोकांवर मानसिक परिणाम झाला आहे. ज्या भागात आपण राहतो तो भाग सुरक्षित आहे असा आपण विचार करतो.पण आम्ही आपल्याच घरात आपली खोली लॉक करत नव्हते. पण आता खोली लॉक करून झोपावं असं वाटतंय. ही मानसिकता झाली आहे. याची चौकशी करून कठोर कारवाई व्हायला हवी.”

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स