Maharashtra Politics Today : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची घडी, लोकप्रतिनिधींवरील हल्ले आणि हत्यांमुळे विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. तसंच, सत्ताधाऱ्यांकडून जातीय आणि धार्मिक राजकारण केलं जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. तसंच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले असून आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे. तर, सरकारने काढलेल्या अधिसूचनेचा कायदा बनवण्यासाठी राज्यात लवकरच विशेष अधिवेशन घेतले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते आता कोणत्या पक्षात जातात हे पाहावं लागणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, हवामान अंदाज याबाबतचे वृत्त पाहुयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today 12 February 2024 : महाराष्ट्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर
मुंबई : दुचाकीचा धक्का लागल्यामुळे जाब विचारला असता तिघांनी २२ वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी तपास करून सहा तासांत आरोपींना अटक केली.
सांगली : व्यक्तीगत राजकीय जीवनात पलूस-कडेगाव मतदारसंघातील मतदारांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलेही पाऊल टाकणार नाही. मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नसून मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत आहे, असा खुलासा माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सोमवारी दुपारी केला.
अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षात मी त्यांचं स्वागत करेन. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांच्या पक्षात तुम्ही यावं – रामदास आठवले</p>
ठाणे : भिवंडी येथील ठाणगेआळी भागात एअर गनने (बनावट बंदूक) परिसरात दहशत माजविल्याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुषार खारेकर (२४), कृष्णा चव्हाण (२९) आणि विशाल भोईर (२८) या तिघांना ठाणे पोलिसांनी अटक केली.
डोंबिवली – भाडे देण्याच्या वादातून रविवारी रात्री येथील एमआयडीसीतील विको नाका भागात एका ओला कार चालकाला एका प्रवाशाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. सुनीलकुमार राजदेव यादेव (४५) असे ओला कार चालकाचे नाव आहे. तो दावडी गावात राहतो. रफिक शेख असे प्रवाशाचे नाव आहे. तो सोनारपाडा भागात राहतो.
मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबईवाहिनीवर साखळी क्रमांक कि.मी १५.७५० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हाती घेणार आहे. या कामादरम्यान मंगळवारी द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.
नवी मुंबई : नवी मुंबईतील सिवूड्स येथे मनपाच्या स्थापत्य विभागाच्या कामाच्या आढाव्यादरम्यान कनिष्ठ अभियंत्याला अर्वाच्च शिवीगाळ करणे, अरेरावीचे बोलणे मनसे अध्यक्ष गजानन काळे यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई लगत आलेल्या एमआयडीसी भागातील एका कंपनी मार्फत विदेशात खाद्यमाल पाठवला जातो. मात्र हे करत असताना लिहिण्यात आलेल्या कालमर्यादा खोडण्यात येत होत्या, अशी माहिती समोर येताच नवी मुंबई मनसेच्या सहकार सेनेने ही बाब अन्न आणि औषध प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सदर प्रशासनाने या कंपनीवर धाड टाकली असता सहकार सेनेने केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण – कल्याणमधील गौरीपाडा येथील एक लाख २१ हजार ६०० चौरस मीटर जागेत कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने सीटी पार्क विकसित केले आहे. मनोरंजन, विरंगुळ्याचे प्रशस्त ठिकाण यानिमित्ताने कल्याण शहराच्या वेशीवर उपलब्ध झाले आहे. मनोरंजनासाठी फिरायला कुठे जायाचे ही कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांची अडचण सीटी पार्कमुळे दूर झा्ली आहे.
चंद्रपूर: माझ्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार काँग्रेसशी निष्ठावान आहेत. आम्ही काँग्रेस सोबत राहू. जिल्ह्यात लोकसभा तथा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला वातावरण अतिशय पोषक आहे. आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावान सैनिक आहोत, अफवांवर विश्वास ठेवू नका, आम्ही काँग्रेसमध्येच आहोत, असे मत राजुराचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
अमरावती : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ‘ब्लॅकमेलिंग’ करून भाजपाने फोडल्याचा आरोप केला आहे.
आता काँग्रेसव्याप्त भाजपा असं म्हणावं लागेल. भविष्यात भाजपाचा अध्यक्ष काँग्रेसची एखादी व्यक्ती असणार. तुम्ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही, मतदारांसोबत केली आहे.
मुंबई : खार येथील एका कुटुंबात काम करणाऱ्या दोन नोकरांनी जेवणातून गुंगीचे औषध मिसळून घरातील ५० लाख रुपयांच्या मौलवान दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
अशोकराव चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाणसुद्धा मुख्यमंत्री होते. कुठल्याही पस्थितीत काँग्रेसला विजय मिळवून देणं आमचं काम आहे. अधिक उत्साहाने काँग्रेस जोमाने पुढे जाईल, अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडणं हे दुर्दैवी आहे. भाजपाचं दबावतंत्र सुरू आहे. ज्या पक्षाचं देशाच्या चळवळीत काही योगदान नाही, देशाचं संविधान त्यांना मान्य नाहीत, विकासात्मक विचारावर मतदान होण्याची क्षमता नाही, अशोक चव्हाण यांनी असा निर्णय घेणं अंत्यत दुर्दैवी असून, कोणताही कार्यकर्ता त्यांच्यासोबत जाणार नसल्याची माहिती काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली.
अशोक चव्हाण राजीनामा देतील अशी अनेक वर्षांपासून ही चर्चा होती, तसे प्रयत्नही सुरू होते. त्यांनी आज पक्ष पदाचा आणि आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिल्याचं पाहिलं. जर ते भाजप शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांच्यासोबतच्या काही सहकाऱ्यांचे नियोजन असेल तर त्यांचेही स्वागत आहे – संजय गायकवाड, आमदार, शिंदे गट
Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांनंतर अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. तसेच काही वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की, अशोक चव्हाण हे १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. तसेच भाजपा अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं असताना चव्हाण यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येत या सर्व अफवांचं खंडण केलं, तसेच पक्ष सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं.
नागपूर : नेपाळमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय खुल्या कबड्डी स्पर्धेत नागपूर शहर पोलीस दलातील महिला संघाने सहभाग घेत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या नागपूर पोलीस महिला संघाचे नेतृत्व पोलीस कर्मचारी अनिता रेडी आणि अलका ठेंगरे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात एकदा नव्हेतर दोनदा होतो. त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
माझ्या आमदारकीच्या राजीनाम्यासंदर्भातील वृत्त गैरसमज पसरवणारे…@INCIndia @INCMaharashtra pic.twitter.com/JYiokt2P7T
— Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) February 12, 2024
काँग्रेस पक्ष जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे. हे कशामुळे घडतंय हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. भाजपाला निवडणुकीला सामोरे जाण्याचं धाडस नाही. त्यामुळे फाटाफूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यांना मतदान करणारे मतदार आणि सर्वसामान्य जनता भाजपाबरोबर जाणार नाही. निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर चित्र समोर येईल. अशोक चव्हाणांच्या या निर्णयावर मी खंत व्यक्त करतो.
पुणे : शहरानजीकच्या गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक आहे असे मत अजित पवार यांनी मांडले. तसेच पुण्यात नवीन महानगरपालिका विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आज सोमवारची सकाळ पर्यटकांसाठी मोठी मेजवानी देणारी ठरली.
अशोक चव्हाणांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यानंतर लागलीच विधानपरिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही राजीनामा दिला.
नागपूर: वीज दरामधील मासिक सवलत ४० लाख रुपयांपर्यंत मर्यादित केली गेल्यामुळे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन व सहा वस्त्रोद्योग कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. हा निर्णय अवैध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात अधिवेशन काळ, मोर्चा, सामाजिक आंदोलन किंवा राजकीय आंदोलनादरम्यान कितीही पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसांचे नियोजन असल्यानंतरही शहरात हमखास वाहतूक कोंडी निर्माण होते.
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची खलबतं, बाळासाहेब थोरातांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट
After former CM Ashok Chavan resigns from the Congress, CLP leader Balasaheb Thorat meets Prithviraj Chavan.
— ANI (@ANI) February 12, 2024
Source: Prithviraj Chavan's Office pic.twitter.com/1j21cQnfkG
मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्याचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांना भेटून दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केले नाही. कोणाबद्दल तक्रार करायची नाही, व्यक्तीगत भावना नाही, पुढची राजकीय भावना काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. पुढची राजकीय दिशा ठरवलेली नाही. मला काही अवधी लागेल. दोन दिवसांत मी माझ्या राजकीय दिशेाबत माहिती देईन – अशोक चव्हाण</p>
प्रशिक्षकाने टँकमध्ये उडी मारत पाण्याखाली पाहताच धोपटे हे बुडालेले दिसले. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २ फेब्रुवारीला नागपुरात सोन्याचे दर ६३ हजार ५०० रुपये नोंदवले गेले होते.
नागपूर : ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली ताडोबा प्रशासनाची १२ कोटी १५ लाखांची फसवणूक केलेल्या अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन्ही भावंडांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.