Maharashtra Politics Today : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची घडी, लोकप्रतिनिधींवरील हल्ले आणि हत्यांमुळे विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. तसंच, सत्ताधाऱ्यांकडून जातीय आणि धार्मिक राजकारण केलं जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. तसंच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले असून आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे. तर, सरकारने काढलेल्या अधिसूचनेचा कायदा बनवण्यासाठी राज्यात लवकरच विशेष अधिवेशन घेतले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते आता कोणत्या पक्षात जातात हे पाहावं लागणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, हवामान अंदाज याबाबतचे वृत्त पाहुयात.
Maharashtra News Today 12 February 2024 : महाराष्ट्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर
१९८५ साली अशोक चव्हाण युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आले. काँग्रेस पक्षाशी त्यांचा चार दशके संबंध राहिला. वयाच्या पासष्टीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचा ‘हात’ सोडून देत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
गडचिरोली : येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय शिखरदीप बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर : फेसबुकवरून ओळखी झालेल्या युवकाने १६ वर्षीय मुलीचे घरातून अपहरण केले. तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवले. तिची सोडवणूक करण्यासाठी घरी आलेल्या तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीयूष करण निलपाल (२१, लष्करीबाग, पाचपावली) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती आणि काँग्रेस कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष होते. ही माहिती त्यांच्या प्रोफाईलला जोडण्यात आली होती. परंतु, आता काँग्रेसचा राजीनामा दिल्याने त्यांनी काँग्रेसचा उल्लेख काढला आहे.
आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 12, 2024
Today i.e. on Monday, February 12, 2024, I have tendered my resignation as Member of Legislative Assembly (MLA) from 85-Bhokar…

नंदुरबार : सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्स्प्रेसवर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची तक्रार काही प्रवाश्यांनी केली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे.
Former Maharashtra Chief Minister Ashok Chavan quits Congress
— Press Trust of India (@PTI_News) February 12, 2024
नागपूर : शिवसेनेशी गद्दरी करून भाजपच्या मदतीने संपूर्ण पक्ष आणि चिन्ह पळवणारे एकनाथ शिंदे कायम उद्धव ठाकरेंवर टीका करीत असतात. त्याला ठाकरे गटाकडून प्रतिउत्तर दिले जाते. शिंदे विरूद्ध ठाकरे वाद हा मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये रविवारी झालेल्या मेळाव्यात ठाकरे यांना लक्ष्य केले.
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत, असे खोटे व असत्य आरोप करणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली.
काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पक्ष वाटचाल करतोय त्यातून जनतेचे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गदमरण होत आहे. जनतेचे लोक भाजपात प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भाजपात येतील, हा मला विश्वास आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आगे आगे देखिए होता है क्या – देवेंद्र फडणवीस</p>
वाशिम : मृत्यू कोणाला कुठे गाठेल, याचा काही नेम नाही. भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या. मात्र, ट्रकचे टायर निखळून ते रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली आहे.
काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक जगदीश आण्णा कुट्टी आणि राजेंद्र दत्तात्रय नरवणकर यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली.
LIVE |?मुंबई देवेंद्र फडणवीस जी , अँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश आणि पत्रकार परिषद
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 12, 2024
https://t.co/7RT7hEsHJM
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीला जोर आला असून पश्चिम विदर्भातील मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह १५ फेब्रुवारीला अकोला शहरात डेरेदाखल दाखल होणार आहेत. भाजपसह शिंदे गटाचे खासदार असलेल्या पाच मतदारसंघाचा ते आढावा घेणार असल्याची माहिती आहे.
वर्धा : प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांना बघण्यास व ऐकण्यास वर्धेकर रसिकांनी चांगलीच गर्दी केली होती. पण पावसाने या उत्साहावार विरजण टाकल्याने खेर यांच्या गायनाची काही खैर राहली नाही. शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे स्वावलंबी शाळेच्या मैदानावर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे : वैद्यकीयचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृहाची सुविधा पुरेशी नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) नुकताच संप पुकारला होता. त्यावेळी मार्डच्या शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चर्चा केली होती.
मुंबई : धारावीतील ७ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना माटुंगा येथील सिटी ऑफ लॉस एंजल्स या महापालिकेच्या शाळेने प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास कुंचन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
मुंबई, शिवडीवरून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३०-३५ मिनिटांत पोहचता यावे यासाठी हाती घेण्यात आलेल्या चिर्ले ते कोन जोडरस्त्याच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनेक आठवणी श्रीमती कमलाबाई आंबेकर या नेहमीच सांगत असत.
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या चौथ्या टप्प्यातील उपोषणाला आंतरावाली सराटीत महाराष्ट्रभरातून मराठा समाज एकवटला आहे. त्यामुळे आता आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर काय होईल, हे येणारा काळच सांगेल, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून आंदोलन केले. आंदोलकांनी खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
चंद्रपूर : कापसासाठी ७,२०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला असला तरी खुल्या बाजारात तब्बल ९०० रुपये कमी म्हणजे ६,३०० रुपयेच दर मिळत आहे. हमी भाव मिळणार तरी कसा? कापूस पणन महासंघाचे केंद्र अजूनही सुरू झालेले नाहीत. सीसीआयने मोजकी केंद्रे सुरू केली. शेतकरी या केंद्रांवर गेले तर अटींची यादी दाखवली जाते.
पुणे : कौटुंबिक वादातून सराइताने वहिनीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पाचर्णे गावातील डोंगराजवळ पुरला. मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपीने घरी येऊन मटण पार्टी केली. अखेर या गुन्ह्याला वाचा फुटली असून, याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका सराइताला अटक केली.
मोटरमनने ‘असहकार चळवळ’ आंदोलन मागे घेतले आहे. अतिरिक्त तास (ओव्हरटाइम) न करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला.
रात्री साडे बाराच्या सुमारास मनीषकुमार कार घेऊन प्रथमेशनगर भागातून जात होते. त्यांना अचानक आरोपी अरबाज आणि त्याच्या साथीदाराने अडविले.
पनवेल शीव महामार्गावरील खारघर येथील ‘हायवे ब्रेक’ या हॉटेलला रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.
मला उठता, बसता येत नाही. बोलताही येत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तर, आज माध्यमांशी संवाद साधताना तिथे उपस्थित असलेल्या पीएचडीधारक तरुणांवरही संताप व्यक्त केला. शिकलेले असूनही त्यांनी आरक्षणाची मागणी लावून न धरता केवळ स्वतःपुरता पीएचडी धारकांच्या समस्यांवर आंदोलन पुकारल्याने मनोज जरांगे पाटलांनी कॅमेऱ्यासमोरच त्यांना झापले.
या देशातील मुसलमान, ख्रिश्चन सर्व धर्मांना घाबवरलं जात आहे. हिंदू आणि अन्य धर्मांमध्ये वाद निर्माण केला जातोय. याचा देशाला धोका असून यामुळे देश तुटेल. पण महाराष्ट्रात मुस्लीम समाज आपल्याबरोबर आहे कारण, खूप मुसलमान नेता, कार्यकर्ता, गरीब-सामान्य मुसलमान आमच्याकडे येतात आणि सांगतात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमचं हिंदुत्त्व आमच्या घरात चूल पेटवण्याचं हिंदूत्त्व आहे. पण भाजपाचं हिंदुत्त्व आमचं घर जाळण्याचं हिंदूत्व आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे. देशात-घराघरात जात, धर्माच्या आधारावर नाही तर मानवतेच्या आधारावर रोजगार मिळाला पाहिजे हे आमचं हिंदुत्त्व आहे. रामाबरोबर कामही झालं पाहिजे. या देशात हिंदुंचा पाकिस्तान किंवा इराण होऊ देणार नाही. हा देश खूप मोठा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.