Mumbai Maharashtra News Updates, 30 August 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी झाले होते. आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि मुंबईत विविध प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. या दौऱ्यासाठी महायुतीचे नेते आज पुन्हा एकत्र येणार आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. या विधानानंतर अजित पवार गटाने सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींवर आज प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra News Today, 30 August 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला काँग्रेसचा विरोध, आंदोलन करण्याचा इशारा

20:35 (IST) 30 Aug 2024
एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे दोन जण ताब्यात

नाशिक - एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चार दिवसांपूर्वी नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजी नगरातील स्टेट बँकेचे एटीएम यंत्र फोडून पैसे काढण्यासाठी दोन युवक गेले. एटीएम केंद्रात शिरल्यावर कोणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने ते पळून गेले. सीसीटीव्हीतील चित्रणाआधारे बँकेच्या वतीने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून बँक परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या विवेक कुमार आणि अनिल कुमार (१८) यांना ताब्यात घेतले.

18:43 (IST) 30 Aug 2024
पुणे : फलक लावताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

पुणे : फलक (फ्लेक्स) लावताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा...

18:38 (IST) 30 Aug 2024
छत्रपती संभाजीनंगर : पुंडलिकनगर ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह अंमलदार सापळ्यात; ५० हजारांची लाच स्वीकारली

छत्रपती संभाजीनगर - तक्रारदाराच्या २४ हजार चौरस फूट जागेवरील अतिक्रमण काढण्याच्यावेळी पोलीस बंदोबस्त पुरवणे व नंतर जागेचा ताबा मिळवण्यासाठी एकूण दीड लाखांची मागणी करून ५० हजार स्वीकारल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश सुदाम यादव व अंमलदार सुरेश बाबू सिंग पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सापळ्यात पकडले.

18:07 (IST) 30 Aug 2024
सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला अश्लील चित्रीकरण दाखविल्याप्रकरणी शिक्षक अटकेत

ठाणे : भिवंडी महापालिकेच्या शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीला मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत दाखवून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर...

18:01 (IST) 30 Aug 2024
“त्‍या आमदाराला लोक कंटाळले, त्‍याच्‍या भ्रष्‍टाचाराची दहीहंडी लवकरच”...आमदार रवी राणांची जाहीर व्यासपीठावरून....

नवरात्रौत्‍सव, गणेशोत्‍सवाप्रमाणेच दहीहंडी उत्‍सवातून विशेषत: तरूणाईला संघटित करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. गावागावांत तरूण खांद्याला खांदा लावून दहीहंडी उत्‍सव साजरा करताना दिसतात. मात्र, कालौघात उत्‍सवांच्‍या आयोजनामागील उद्दिष्‍टे बदलली असून त्‍याला राजकीय स्‍वरूप आले आहे. सविस्तर वाचा

18:00 (IST) 30 Aug 2024
शंभर रुपये आणि मोबाईलसाठी १३ वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या

भिवंडी येथे अवघ्या १०० रुपये आणि मोबाईलसाठी विनोद पागे या १३ वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नितीन वाघे (४०), पद्माकर भोईर (२०) आणि अजय मांजे (२१) यांना अटक केली आहे. सविस्तर वाचा

17:36 (IST) 30 Aug 2024
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे नदीपात्रात अडकलेले दोघे बचावले; भिडे पूल, कर्वेनगर परिसरातील घटना

पुणे : अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे नदीपात्रात बुडालेल्या दोघांची अग्निशमन दलाने सुटका केली. भिडे पूल आणि कर्वेनगर परिसरात या घटना घडल्या.

सविस्तर वाचा...

17:26 (IST) 30 Aug 2024
Maharashtra News Live: पंतप्रधान मोदींनी सुजाता सौनिक यांचे कौतुक करताच आदित्य ठाकरेंची खळबळजनक पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर येथे वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या भाषणात बोलताना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इतर महिला अधिकाऱ्यांचा उल्लेख करत नारीशक्तीला सलाम केला. पण त्यानंतर काही वेळातच शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक पोस्ट केली. महायुती सरकार सुजाता सौनिक यांना निवृत्त होण्यासाठी दबाव टाकत असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले. "पुढच्या वर्षी निवृत्त होणार असतानाही एका सक्षम अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती घेण्याची सक्ती का करावी?", असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

https://twitter.com/AUThackeray/status/1829463561124327441

16:48 (IST) 30 Aug 2024
गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करण्यावरून तरुणावर कोयत्याने वार; कुठे घडली घटना?

पिंपरी : आमच्या भागात गणपतीची वर्गणी का गोळा करता, असे म्हणत तरुणाला टोळक्याने कोयत्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना चिखलीत घडली

सविस्तर वाचा...

16:14 (IST) 30 Aug 2024
दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध गुन्हा

पुणे : दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा...

15:42 (IST) 30 Aug 2024
PM Narendra Modi Live: नारी सशक्तीकरणात महाराष्ट्राने देशाला दिशा दिली - पंतप्रधान मोदी

नारी सशक्तीकरणाच्या विषयात महाराष्ट्र देशाला दिशा देत आहे. राज्यात पहिल्यांदा मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक या महिला काम करत आहेत. पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला काम करत आहेत. राज्याच्या वन दलाचे नेतृत्व शोमिता विश्वास करत आहेत. सर्व महिला पदाधिकारी चांगले काम करत आहेत. नारीशक्ती आपली ताकद दाखवून देत आहे.

https://youtube.com/live/FAjuQLuy0G0?feature=share

15:37 (IST) 30 Aug 2024
PM Narendra Modi Live: वाढवण बंदराचे काम विरोधकांनी मुद्दामहून रोखून ठेवले, पंतप्रधान मोदींचा आरोप

२०१४ आधी वाढवण बंदराचे काम रोखून धरण्यात आले होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पावर काम सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली. मात्र २०१९ साली आमची सत्ता गेली, तेव्हा अडीच वर्ष पुन्हा प्रकल्पाचे काम रखडले. या एकाच प्रकल्पामुळे १२ लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. एवढी मोठी गुंतवणूक कुणी रोखून धरली, हे जनतेने विसरू नये.

https://youtube.com/live/FAjuQLuy0G0?feature=share

15:36 (IST) 30 Aug 2024
PM Narendra Modi Live: पंतप्रधान मोदींचा मच्छिमारांशी मराठीत संवाद

महाराष्ट्रातील ५१६ कोळीवाडे, १५ लाख मच्छिमारांच्या लोकसंख्येसह महाराष्ट्राचे मत्समासेमारी क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. मासेमारी व्यवसायातून आणि केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी मच्छिमारांचे जीवन बदलत आहे.

https://youtube.com/live/FAjuQLuy0G0?feature=share

15:14 (IST) 30 Aug 2024
PM Narendra Modi Live: “सिंधुदुर्गात जे झालं ते…”, पंतप्रधान मोदींची मालवणच्या घटनेवर म्हणाले…

"छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी केवळ राजे नाहीत. तर ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. मालवणमध्ये जी घटना घडली, त्याबाबत मी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची डोकं झुकवून माफी मागतो. आम्ही राजकारणासाठी महापुरुषांचा वापर करत नाही", अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी दिली.

https://youtube.com/live/FAjuQLuy0G0?feature=share

15:04 (IST) 30 Aug 2024
Maharashtra News Live: मरेपर्यंत लढा देणार, वाढवण बंदराविरोधात स्थानिक मच्छिमार, शेतकरी रस्त्यावर

वाढवण बंदराला मच्छिमार आणि स्थानिकांनी विरोध दर्शविला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंदराचे भूमिपूजन होत आहे. मात्र स्थानिकांनी या सोहळ्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. आमच्या जीवात जीव असेपर्यंत लढत राहू, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली असून सरकारची प्रेतयात्राही त्यांनी काढली. हा प्रकल्प निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी करणारा आहे, असा आरोप मच्छिमार, शेतकरी यांनी केला आहे.

https://twitter.com/aviuv/status/1829418887286276409

14:59 (IST) 30 Aug 2024
धारावीतील ११ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पात झोपडीवासीयांचे सर्वेक्षण करण्यास राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला असला तरी धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीमार्फत आतापर्यंत ११ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. धारावीत मागील सर्वेक्षणानुसार साधारणत: ६१ हजार तळमजल्यावरील झोपड्या असून त्यावरील दोन मजली झोपड्या गृहित धरल्या तर साधारणत: सव्वा लाख झोपड्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.

वाचा सविस्तर...

14:59 (IST) 30 Aug 2024
मुंबई शिक्षक मतदारसंघातील निकालाला न्यायालयात आव्हान

मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन प्रतिवाद्यांना नोटीस बजावली. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार सुभाष किसन मोरे यांनी या निकालाला आव्हान देणारी याचिका केली आहे.

वाचा सविस्तर...

14:58 (IST) 30 Aug 2024
“भिरा प्रकल्पाचे पाणी आणा”, मोरबे धरणाच्या जलपूजनानंतर नाईक यांचे वाढीव पाणी नियोजनाचे सूतोवाच

नवी मुंबई : मोरबे धरण हे नवी मुंबई शहराचा व नवी मुंबईकरांचा सन्मान आहे. परंतु आगामी काळात ४० लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करता येण्यासाठी भिरा प्रकल्पाचे पाणी आणण्याचे नियोजन करून सर्व नागरिकांना समप्रमाणात पाणीपुरवठा मिळालाच पाहिजे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांना केली.

वाचा सविस्तर...

14:54 (IST) 30 Aug 2024
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धुळ्यातील सर्व ठाण्यांमध्ये आता पोलीस दादा, पोलीस दीदी

धुळे – देशासह राज्यात वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, धुळे जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे

सविस्तर वाचा...

14:52 (IST) 30 Aug 2024
School Girl Molestation In Pune : रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना पर्वती परिसरातील जनता वसाहतीत घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सविस्तर वाचा…

14:43 (IST) 30 Aug 2024
जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून उभारलेल्या बेकायदा इमारतीला नोटीस, इमारतीत प्रवेशासाठी रस्ता नसल्याने गाळ्यामधून प्रवेशव्दार

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीत अग्निदेव मंदिराजवळ पायवाट बंद करून सात माळ्याची बेकायदा इमारत उभारणाऱ्या भूमाफियांना पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावली आहे. या नोटिसीला भूमाफियांनी उत्तर दिले नाहीतर पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून ही बेकायदा इमारत भुईसपाट केली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

14:22 (IST) 30 Aug 2024
चंद्रपूर : वजन काट्यात चीप लावून गैरप्रकार, वेकोलीच्या चार जणांविरूध्द गुन्हा

चंद्रपूर : वेकोली चंद्रपूर परिसरातील डीआरसी ३ व ४ अंतर्गत ५० टन इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी व वेकोलीच्या दोन कर्मचाऱ्यांनी मिळून इलेक्ट्रॉनिक वजनकाटा चीपच्या माध्यमातून हेराफेरी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

सविस्तर वाचा...

14:21 (IST) 30 Aug 2024
राज्यातील वैद्यकीय संशोधनाचे ‘चक्र’ गतिमान होणार

नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे लवकरच एक कंपनी स्थापन करून राज्यातील वैद्यकीय संशोधनाला गती देण्यासाठी ‘चक्र’ प्रकल्पावर काम सुरू केले जाणार आहे. १०० कोटींच्या या प्रकल्पाचे मुख्यालय नाशिकला असेल. सोबतच इतरत्र १० उपकेंद्र असतील.

सविस्तर वाचा...

14:20 (IST) 30 Aug 2024
बुलढाणा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला वीस वर्षांची शिक्षा

बुलढाणा : राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्याने समाज मन सुन्न झाले आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेत बलात्कार करणाऱ्या नराधम युवकास बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने तब्बल वीस वर्षांची कठोर शिक्षा ठोठावली आहे.

सविस्तर वाचा...

14:20 (IST) 30 Aug 2024
जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून उभारलेल्या बेकायदा इमारतीला नोटीस; इमारतीत प्रवेशासाठी रस्ता नसल्याने गाळ्यामधून प्रवेशव्दार

डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीत अग्निदेव मंदिराजवळ पायवाट बंद करून सात माळ्याची बेकायदा इमारत उभारणाऱ्या भूमाफियांना पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावली आहे. सविस्तर वाचा…

14:19 (IST) 30 Aug 2024
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला

कल्याण ते कोल्हापूर या प्रवासासाठी कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा सोन्याचा दोन लाख ७५ हजार रूपयांचा ऐवज बसमधून चोरीला गेला आहे. प्रवासात ही चोरी झाल्याने बसमधील कोणा इसमानेच ही चोरी केली असण्याचा संशय तक्रारदाराला आहे.

सविस्तर वाचा…

14:19 (IST) 30 Aug 2024
माफ करा… राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी…काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष असे का म्हणाल्या ?…

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथे डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील गुन्ह्यांबाबत वक्तव्य केले. राष्ट्रपती यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशात महिलांवरील अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली. ‘आता पुरे झाले’, असा संताप व्यक्त करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताने महिलांवरील गुन्ह्यांच्या विकृतीबद्दल जागृत होण्याची आणि महिलांना कमी सामर्थ्यवान, कमी सक्षम, कमी हुशार समजणाऱ्या मानसिकतेचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे विधान केले होते. काँग्रेसने या वक्तव्याचे स्वागत केले आहे.

सविस्तर वाचा...

14:18 (IST) 30 Aug 2024
नवी मुंबई : दोन दलालांच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळलेल्या दोन दलालांच्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले असून यातील एक मृत दलाल सुमित जैन यानेच हा कट रचल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या दलालाच्या हत्येनंतर सुपारीच्या पैशांवरून वाद झाल्याने जैन याचीही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

वाचा सविस्तर...

14:18 (IST) 30 Aug 2024
कल्याणमध्ये घटस्फोटीत महिलेची इमारतीच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या

घटस्फोट झाल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या एका ३७ वर्षाच्या महिलेने बुधवारी दुपारी राहत्या घराच्या इमारतीच्या गॅलरीमधून तळ मजल्याला उडी मारून आत्महत्या केली. जमिनीवर जोरात आदळल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सविस्तर वाचा…

14:18 (IST) 30 Aug 2024
Maharashtra News Live: तानाजी सावंत तुम्हाला म्हशीचे इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर पाठवते – रुपाली ठोंबरे पाटील

खेकड्यामुळे धरण फुटले आणि हाफकिन हा माणूस असल्याचे म्हणणाऱ्या तानाजी सावंत यांच्या बुद्धीची कीव येते. तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राहायला लायक नाही. तुम्हाला एवढी मळमळ, उलटी होत असेल तर म्हशीला मोठं इंजेक्शन देतात, त्या डॉक्टरला पाठवू का? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी लगावला.

PM Narendra Modi in palghar marathi news

वाढवण बंदराचे आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, मोठ्या रोजगार संधी निर्माण करणारा प्रकल्प (संग्रहित छायाचित्र)