Mumbai Maharashtra News Updates, 30 August 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी झाले होते. आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि मुंबईत विविध प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. या दौऱ्यासाठी महायुतीचे नेते आज पुन्हा एकत्र येणार आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. या विधानानंतर अजित पवार गटाने सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींवर आज प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 30 August 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला काँग्रेसचा विरोध, आंदोलन करण्याचा इशारा

14:17 (IST) 30 Aug 2024
जेएनपीएतील सरोवरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांची मांदियाळी

उरण : समुद्र व निसर्गसंपन्न विभागात असलेल्या जेएनपीए बंदर परिसरातील आधुनिक इको तंत्रज्ञानाचा वापर करीत येथील पाचही जलस्राोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. यामुळे जेएनपीए बंदर परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून परिसरात येणाऱ्या विविध जातींच्या हजारो आकर्षक मुक्त पक्ष्यांचा संचारही वाढला आहे. निसर्गाने बहरलेल्या डोंगरदऱ्यात आणि मोकळ्या जागी अनेक जिवंत पाण्याचे झरे, पाणवठे, तलाव अस्तित्वात आहेत.

वाचा सविस्तर…

14:16 (IST) 30 Aug 2024
शेअर्स खरेदी-विक्रीतून चांगला परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ७६ लाखांची सायबर फसवणूक

मुंबई : शेअरमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंधेरीतील एका महिलेची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार नवी मुंबईतील एका खाजगी कंपनी उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिंबधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर…

14:14 (IST) 30 Aug 2024
पुणे : महापालिकेच्या दिव्याखाली अंधार ! नक्की काय आहे प्रकार

आवश्यक ते नियम पाळले नाही म्हणून इतरांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पुणे महापालिकेलाच कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नियमांचे पालन न केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेच्या दोन रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.

वाचा सविस्तर…

13:38 (IST) 30 Aug 2024
पुणे : दुचाकीस्वाराची मुजोरी; पोलीस हवालदाराला फरफटत नेले, पोलिसांकडून गुन्हा

पुणे : कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला दुचाकीस्वाराने फरफटत नेल्याची घटना हडपसर भागात घडली.

वाचा सविस्तर…

13:11 (IST) 30 Aug 2024
एमपीएससीच्या समाजकल्याण परीक्षेबाबत मोठी अपडेट; या तारखेपर्यंत हरकती….

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षाची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक ३ सप्टेंबर रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

वाचा सविस्तर…

12:52 (IST) 30 Aug 2024
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना न्यायालयाची तंबी, म्हणाले “उत्तर द्या, नाहीतर योग्य आदेश द्यावे लागतील”

नागपूर : नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी जबाब नोंदवला नाही तसेच मुदत वाढवून देण्यासाठी विनंतीदेखील केली नाही. त्यामुळे तीन आठवड्यात उत्तर द्या, नाहीतर योग्य आदेश द्यावे लागतील, अशा शब्दात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी यांना तंबी दिली.

वाचा सविस्तर…

12:51 (IST) 30 Aug 2024
Varsha Gaikwad News Live : वर्षा गायकवाड आंदोलनावर ठाम, छत्रपतींचा पुतळा हाती घेऊन शिवाजी पार्कवर आंदोलन करणार

“मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणी आहे. या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. जी घटना घडली, त्यामागे जे दोषी आहेत त्यांना सोडून इकडे आमच्या मागावर पोलीस फौजफाटा पाठवलाय. कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढत राहणार”, असा इशारा देत खासदार वर्षा गायकवाड आता शिवाजी पार्कवर आंदोलनासाठी रवाना झाल्या आहेत.

12:40 (IST) 30 Aug 2024
नंदुरबार जिल्ह्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

नंदुरबार नंदुरबार तालुक्यातील लोय आश्रमशाळेच्या एका आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.

सविस्तर वाचा…

12:25 (IST) 30 Aug 2024
‘करन्सी ते क्युआर कोड’, हा फिनटेक प्रगतीचा प्रवास आपण केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एक काळ असा होता जेव्हा विदेशातील लोक भारतात आल्यावर सांस्कृतिक विविधता पाहून हैराण होत असत. पण आता जेव्हा ते भारतात येतात तेव्हा फिनटेक विविधता पाहूनही हैराण होतात. विमानतळावर उतरल्यापासून ते स्ट्रीट शॉपिंग करेपर्यंत सर्व ठिकाणी फिनटेकचा बोलबाला दिसून येतो. ‘करन्सी ते क्युआर कोड’, अशी फिनटेक क्रांती भारताने केली, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टच्या कार्यक्रमात केले.

12:21 (IST) 30 Aug 2024
मुंबई : पालिकेच्या एकाच शाळेत दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या काही शाळा मुख्याध्यापकांविनाच चालवल्या जात आहेत. मात्र मुलुंड येथील गव्हाणपाडा माध्यमिक मराठी शाळेत शिक्षण विभागाने दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती केली. या दोन्ही मुख्याध्यापकांपैकी कोणी कोणती जबाबदारी पार पाडायची याबाबतही शिक्षण विभागाने कोणतेही स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. प्रशासनाच्या या कारभारामुळे शिक्षकांची मात्र कोंडी झाली आहे.

वाचा सविस्तर…

12:14 (IST) 30 Aug 2024
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : चेतन पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत; कोल्हापूर पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर बेपत्ता झालेले पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत सापडले. कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा घरात जावून त्यांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. मालवण पोलीस ठाण्यात चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.

वाचा सविस्तर…

11:53 (IST) 30 Aug 2024
मध्य रेल्वे मार्गावर आज ‘वातानुकूलित’ऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल, प्रवाशांच्या गोंधळात भर

तांत्रिक कारणास्तव ३० ऑगस्ट रोजी मध्य रेल्वे मार्गावरील काही ‘वातानुकूलित’ लोकलच्या जागी ‘विनावातानुकूलित’ लोकल चालविण्यात येणार आहेत. याबाबत कोणतीच कल्पना नसलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडाला.

वाचा सविस्तर…

11:34 (IST) 30 Aug 2024
Maharashtra News Live: अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ नांदेडमधील काँग्रेसचा आणखी एक आमदार होणार भाजपावासी

काँग्रेस पक्षाचे देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर काँग्रेसने जितेश अंतापूरकर आणि वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी यांची हकालपट्टी केल्याचे सांगितले जात आहे. सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता.

11:09 (IST) 30 Aug 2024
पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेची मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या,पतीला दहा वर्षे सक्तमजूरी

पुणे : त्रासाला कंटाळून विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरामल्ली यांनी पतीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 30 Aug 2024
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…

Ajit Pawar : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकार अॅक्शनमोडमध्ये आलं आहे. या घटनेची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि सरकार मिळून संयुक्त तांत्रिक समितीची स्थापन करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभारलं जाईल, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

सविस्तर वाचा –

11:05 (IST) 30 Aug 2024
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”

Amol Mitkari On Tanaji Sawant : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासंदर्भात एक विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यभर पटलं नसून आता त्यांच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसावं लागतं त्यामुळे बैठकीतून बाहेर पडलो की उलट्या होतात, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही मंत्री तानाजी सावंत यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

सविस्तर वाचा –

11:04 (IST) 30 Aug 2024
Pune News : दहशतवाद विरोधी पथकाचा पुण्यातील अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा; सात सीमबॉक्स, तीन हजार सीमकार्डसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Pune News : राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने पुण्याच्या कोंढवा येथील अवैध टेलिफोन एक्सचेंवर छापा टाकला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी नौशाद अहमद सिद्दीकी (३२) नामक व्यक्तीला अटक केली असून तो भिवंडी येथील नागरिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे टेलिफोन एक्सचेंज सुरू असून याद्वारे राष्ट्रविरोधी काम होत असल्याचा संशय दहशतवाद विरोधी पथकाने व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा –

11:01 (IST) 30 Aug 2024
अलिबाग : फसवणूकीसाठी इंटरनेट कॉलिंग अँपचा वापर,बोगस कॉल सेंटर प्रकरणातील तपासात माहिती आली समोर

अलिबाग : अमेरिकेतील ग्राहकांना प्रतिबंधित कामोत्तेजक गोळ्या विकण्याच्या बहाण्याने फसवणूकीसाठी इंटरनेट कॉलिंग अँपचा वापर केला जात होता.

सविस्तर वाचा…

10:55 (IST) 30 Aug 2024
अन्न व औषध प्रशासन खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत भीती दाखवून व्यावसायिकांकडून वसुली

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून व अन्नपदार्थ उत्पादकांना परवाना निलंबनाची भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याची धक्कादायक माहिती पीडित व्यावसायिकांकडून प्राप्त झाली आहे.

वाचा सविस्तर…

10:49 (IST) 30 Aug 2024
Maharashtra News Live: “जेरबंद केले तरी..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला वर्षा गायकवाड यांचा विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्याची हाक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी केले होते. मात्र आंदोलनाची घोषणा केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली असून वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जेरबंद केले तरी आंदोलन करणारच, अशी भूमिका खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे.

वाढवण बंदराचे आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, मोठ्या रोजगार संधी निर्माण करणारा प्रकल्प (संग्रहित छायाचित्र)