Maharashtra Politics : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड आणि खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तसंच वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई आणि नवी मुंबईत येत आहेत. त्याआधी धनंजय मुंडे हे परळीला का गेले? याचीही चर्चा होते आहे. दरम्यान संजय राऊत यांनी वाल्मिक कराड प्रकरणावरुन सरकारवर टीका केली आहे. परळीमध्ये वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आंदोलन झालं, त्यावर सरकार शांत का बसलं आहे? लोकांचा आक्षेप आकाच्या आकावर आहे म्हणजेच धनंजय मुंडेंवर आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत सरकार दाखवणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Maharashtra Live News Update Today | धनंजय मुंडेंचा राजीनामा हे सरकार घेणार का? संजय राऊत यांचा सवाल, यासह महत्त्वाच्या बातम्या
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
आम्हाला केवळ मुंबईला निसर्गाने दिलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त हवे आहे. त्यामुळे, ते अतिक्रमणमुक्त करण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले.
कराडच्या रोजगार मेळाव्यात सहाशे जणांना थेट नियुक्तीपत्रे
कराड : कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या (BOAT) विद्यमाने महाविद्यालयाच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच घेतलेला रोजगार मेळावा ऐतिहासिक ठरला. कला, वाणिज्य, शास्त्र, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कौशल्य विकास आदी शाखांच्या पदवी, पदविका प्राप्त सहाशेहून अधिक उमेदवारांना मेळाव्यातच थेट नियुक्तीपत्रे मिळाली. तर एक हजारावर उमेदवारांना नोकरीच्या संधीसाठी सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आश्वस्त केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
पुणे : पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या या ॲपचे दोन हजार युनिट खरेदी केले जाणार असून, यासाठी कंपन्यांनी दिलेल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
धार्मिकस्थळांवरील २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची गृह विभागासह पोलीस महासंचालकांना विचारणा
मुंबई : राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपक लावण्यात आल्याचा तपशील सरकारी यंत्रणांनीच माहिती अधिकारांत याचिकाकर्त्यांना उपलब्ध केला होता. त्यामुळे, या बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह पोलीस महासंचालकांना केली. तसेच, कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
कल्याण येथील पत्रीपुलाजवळील कचोरे गाव हद्दीत कोडीनयुक्त प्रतिबंधित औषधांच्या १९२ बाटल्या टिळकनगर पोलिसांनी दोन जणांकडून जप्त केल्या आहेत. या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवड्यात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करून कोडीनच्या ४० बाटल्या जप्त केल्या होत्या.
खरा चोर कोण….? एका विचित्र चोरीचा नाट्यमय तपास
वसई- मध्यरात्री पार्टी करून घरी परतणारा एक तरुण… तो मद्यधुंद अवस्थेत असताना त्याच्यावर हल्ला करून लुटण्यात आले. तरुण नशेत असताना त्याला काही आठवत नव्हतं. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून ज्यांना ज्यांना पकडलं ते चोर नव्हते. मग खरा चोर कोण होता…?
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
ठाणे – नवी मुंबई, मुंबई तसेच ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून सोनेरी कोल्ह्यांचे (गोल्डन जॅकल) वारंवार दर्शन होऊ लागले आहे. मानवी वस्तीत दिसणाऱ्या या दुर्मिळ प्राण्याला पाहून नागरिकांमध्ये कुतुहलाचे वातावरण असले, तरी पर्यावरण अभ्यासक, संस्था तसेच प्राणी मित्रांच्या म्हणण्यानुसार ठाणे, नवी मुंबई येथील कांदळवन क्षेत्र हे सोनेरी कोल्ह्याचे पुर्वीपासूनचे निवासस्थान असल्याचे सांगितले जात आहे.
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात: महाविद्यालयांची टाळाटाळ अन्…
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे साडेतीन हजारावर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात येऊ शकते. कोणीही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना तंबी दिली.
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
चंद्रपूर : जगाच्या पाठीवर पर्यावरणात झपाट्याने होणारे बदल आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी चंद्रपुरात १६, १७ व १८ जानेवारीला ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-२०२५’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
चंद्रपूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या सांचातून मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे. या प्रदूषणाचा स्थानिक ग्रामस्थांना त्रास होत आहे. प्रदूषण शून्यावर आणणे प्रथम कर्तव्य आहे. अन्यथा वीज केंद्रातील दोन संच बंद करावे लागतील, असा स्पष्ट इशारा माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
मुंबई नाशिक महामार्गावर अपघात, तीन जण जागीच ठार
मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा अत्यंत भीषण आणि विचित्र म्हणता येईल असा अपघात झाला. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला अशी माहिती समोर आली आहे.
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिककराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज याप्रकरणी बीड जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, त्याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर परळीत आंदोलन करण्यात आले.याप्रकरणी वाल्मिक कराडची आई पारूबाई कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर काल (१४ जानेवारी) ठिय्या आंदोलन केले.
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार; सात वर्षांनंतर धरणाच्या बांधणीसाठी हालचालींना वेग
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण आणि आसपासच्या शहरांलगत वेगाने होत असलेले नागरीकरण लक्षात घेत राज्य सरकारने सात वर्षांपूर्वी सिडकोकडे सोपविलेल्या कोंढाणे धरण प्रकल्पाच्या उभारणीला लवकरच मुहूर्त मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
ठाणे : घोडबंदर परिसरात रुंदीकरण केलेल्या रस्त्यांवर ठाण मांडणारे फेरिवाले, तिथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी, उघड्यावर असलेल्या वीज वाहिन्या, चालण्यासाठी पदपथ नाहीत, विविध कार्यक्रमांमुळे मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत, कचरा उचलला जात नाही, अशा विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा मंगळवारी घोडबंदरवासियांनी पालिका प्रशासनापुढे मांडला.
ठाणे: वाहनाच्या धडकेत श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू
ठाणे – भिवंडी येथील शांतीनगर परिसरात वाहनाच्या धडकेत एका सहा महिन्याच्या श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ११ जानेवारी रोजी हा प्रकार घडला असून याप्रकरणी मंगळवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतीनगर परिसरात असलेल्या पद्मदिशा पॅराडॉईज या सोसायटीच्या समोर भटके श्वान त्याच्या पिल्लांसह बसले होते.
त्यावेळी सोसायटीच्या प्रवेशव्दारातून एक वाहनचालक चारचाकी वाहन घेऊन बाहेर येत असताना, त्या वाहनाची धडक श्वानाच्या पिल्लाला बसली. या धडकेत श्वान पिल्लाचा जागीच मृत्यु झाला. ही सर्व घटना त्या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या एका प्राणीप्रेमीने पाहिली आणि त्याने या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर काय म्हणाले अजित पवार? (फोटो-लोकसत्ता ऑनलाईन)
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड आणि खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तसंच वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई आणि नवी मुंबईत येत आहेत. त्याआधी धनंजय मुंडे हे परळीला का गेले? याचीही चर्चा होते आहे.