Mumbai Maharashtra Breaking News Update, 11 July 2023 : राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गट सक्रिय झाले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी आता आमने-सामने आले असून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपासोबत गेलेल्या शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांवर ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. भाजपासोबत गेलेल्या या आमदारांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. तसंच, लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावरूनही आता राज्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
Mumbai Live News Updates महाराष्ट्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर
चंद्रपूर: शेतात काम करीत असलेल्या ईश्वर कुंभारे (४७) या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले.
बुलढाणा: पृथ्वीतलावरील वैकुंठ असलेल्या पंढरपूरचा राणा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो, अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे.
नवी मुंबई: उशीराने सुरु झालेल्या पावसामुळे नागरीकांना यंदाच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता सुरु झाली. मागील अनेक दिवसापासून विभागवार एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा केला जात नाही.
नवी मुंबई: मुबंई कृषी उत्पन्न फळ बाजारात सध्या कचऱ्याचे साम्राज्य निदर्शनास येत आहे. दररोज कचरा उचला जात नसल्याने याठिकाणी कचरा आणि दुर्गंधी पसरलेली आहे.
राज्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असताना महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव के.सी.वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकांसदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिली.
"काँग्रेस एकसंघ आहे.महाराष्ट्रात काँग्रेस फुटणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष काँग्रेस असेल. काँग्रेसची सध्या लाट आहे. आज लोकांनी ते मान्य केलं आहे, त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेलच", असं नाना पटोले म्हणाले.
https://twitter.com/INCIndia/status/1678719166063296512?s=20
भंडारा : जिल्हा नियंत्रण कक्ष येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील नृसिंह मंदिरामध्ये ५ भाविक अडकल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले.
पुणे: ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी 'हिजडा' या शब्दाचा वापर केला. या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात राज्य समन्वयक शामिभा पाटील, निकिता मुखदल या सहभागी होऊन नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातानंतर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत काही त्रुटींकडे लक्ष वेधले. तसेच उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
डोंबिवली: ग्राहकांनी पुनर्भरण एटीएममध्ये भरणा केलेली रक्कम एटीएम सेवेतील कामगारांनी मोठ्या चलाखीने सेवाधारी कंपनीच्या अपरोक्षा काढून घेतली.
अमरावती : राज्यात खरीप हंगामासाठी १९.२१ लाख क्विंटल बियाण्यांच्या गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल (८७ टक्के) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांच्याकडून बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पुणेरी मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचे मागील महिन्यापासून बंद असलेले काम लवकरच सुरू होणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी गणेशखिंड रस्त्यावर बॅरिकेडिंगला परवानगी दिल्याने मेट्रोच्या कामातील अडथळा अखेर दूर झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. मोदी यांच्या लोकशाही विरोधी धोरणांविरोधात काँग्रेस सतत्याने लढा देत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्याने मोदी यांना पुरस्कार देणे योग्य नाही, असा आक्षेप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
नागपूर : उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहे असे वक्तव्य केले होते. ते योग्यच आहे. भाजपा आता कलंक या शब्दावरून आंदोलन करीत असेल तर त्यांच्या नेत्यांची यापूर्वीची वक्तव्ये तपासून घ्यावी व त्यांच्या विरोधात आंदोलन करावे, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमात मजकूर प्रसारित केला होता.
नागपूर: आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येक गृहिणीचे याकडे विशेष लक्ष असते.
नागपूर : जर तुम्ही श्वानप्रेमी असाल किंवा तुम्ही श्वान पाळत असाल, तर हा एक असा प्राणी आहे जो त्याच्या माणसांवर खूप प्रेम करतो आणि नेहमी त्यांच्याशी निष्ठावान राहतो. घरात पाळलेली श्वान हे बरेच वेळा त्याच्या मालकाच्या मागे-मागे चालताना दिसतात. कधी कधी तुम्हाला श्वानांच्या या कृती गोंडस वाटतात, तर कधी ते सतत पाहून तुम्ही त्रस्त होत असाल. पण श्वान असे का करतात हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का, श्वान नेमके असं का करतात.
शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरीची मालिका अव्याहतपणे सुरूच असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिन्नर येथे केलेल्या कारवाईवरून अधोरेखीत झाले आहे. भूखंडावर मूळ मालकाचे नाव कमी करून नव्या खरेदीदाराच्या नावाची नोंद करण्यासाठी पाच हजाराची लाच स्वीकारताना सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक प्रतिभा करंजे यांना रंगेहात पकडण्यात आले.
नागपूर : असंघटित कामगार म्हटले की कृषी, बांधकाम, कारखान्यात काम करणारे कामगार डोळ्यापुढे येतात. मात्र राज्य शासनाने ६ जुलै रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, ३४० व्यवसायांतील असंघटित कामगारांचे विविध क्षेत्रात वर्गीकरण करून त्याची ३९ गटांत विभागणी करण्यात आली आहे.
विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी मंत्री संजय देशमुख यांची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, खासदार भावना गवळी यांच्याविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार कोण, यावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी एकामागोमाग एक असे साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घटनेला सोमवारी १७ वर्षे पूर्ण झाली. या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा कनिष्ठ न्यायालयाने निकाल देऊन आठ वर्षांचा काळ उलटला आहे.
"कलंक शब्द वापरला तर तळपायाची आग मस्तकाला जाण्याची गरज काय? तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताना भ्रष्टाचाराचा कलंक नाही का लावत तुम्ही? हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर उतरून (सरकारविरोधात) आक्रोश केला होता. तेच हसन मुश्रीफ त्यांच्या (सरकारच्या) मांडीला मांडी लावून बसलेत. मला आज कळलं यांनाही मांडी आहे. तेही दुसऱ्यांच्या मांडीला मांडी लावत आहेत. तुम्ही म्हणाल तर तो भ्रष्ट आहे, आणि मग त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान देता. तुम्ही म्हणाल तर तो भ्रष्ट, नाहीतर तो देव", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. "तुमचं मन थोडंतरी जागं आहे, त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करताना भान ठेवा. नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. कोणाच्या हस्ते देणार आहेत? मग आता ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे. 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' असा लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा? हा प्रश्न विचारणार कोण, कोणाला? ज्यांच्यावर ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला ते तुमच्यासोबत आले. निदान माणुसकी म्हणून आरोप करताना जबाबदारीने वागा. घाबरून त्यांना पक्षात घेतलं, मग त्याच्या चौकशीचं पुढे काय झालं? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
गोंदिया : जिल्ह्यातील हिराटोला गावातील मुकुल देवेंद्र बोपचे (२१) आणि खैरबोडी ता. तिरोडा गावातील भार्गव साहेबराव भगत (२१), हे २ शौर्यवीर १४ जुलैला फ्रान्समध्ये होणाऱ्या बॅस्टिल परेडमध्ये सहभागी होणार आहे.
कोल्हापूर : निष्ठावंत शिवसैनिकांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याच्या मागणीने कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना गटाच्या मेळाव्यात शिवसैनिकांत उत्साह संचारला.
गोंदिया : अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आज, ११ जुलैपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस हेल्मेट न वापरणाऱ्यांचे समुपदेशन केले जाणार असून त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल.
वर्धा: जीवनाचा आनंद घेत मनासारखे जीवन जगण्याचा संदेश देणारे हे गीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुलांशी संवाद साधताना म्हणतात.
नागपूर: परवडत नसल्याने मध्य भारतातील बऱ्याच कोळसा खाणी २० वर्षांपूर्वी बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि) देशाची कोळशाची गरज बघून या बंद खाणी महसूल वाटप तत्त्वावर देणे सुरू केले आहे.
"नागपूरमध्येही आम्हाला व्यक्तिगत आंदोलन करता आलं असतं. आम्हालाही पन्नास प्रकार करता आले असते. नागपुरातही कधीही करता आले असते. कोणत्याही गावात जाऊन करता आले असते. मुंबईच्या कलानगरमध्येही जाऊन करता आले असते. परंतु, महाराष्ट्र अशांत करायचा काय? पण तुमची वारंवार भूमिका असेल की फडणवीस, मोदींचा अपमान करायचा तर महाराष्ट्र अशांत झाला तर आम्ही जबाबदार नाही", अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत ते नागपूरचे कलंक असल्याचं म्हटलं होतं. यावरून बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी मुंबई ग्राहक पंचायतीला लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आहे. गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा महारेराला अधिकार नाही, असा निर्णय घेण्यापूर्वी महारेराने देशाच्या अॅटर्नी जनरल यांचे कायदेशीर मत अजमावणे आवश्यक आहे, अशी मुभा ही विकासकांसाठी पळवाट असल्याची जोरदार टीका मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.
अकोला : जिल्ह्यातील माना ते मूर्तिजापूर दरम्यान मध्य रेल्वे मार्गाच्या रुळाखालील भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने सोमवारी सायंकाळपासून मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली होती. युद्ध पातळीवर दुरुस्तीचे कार्य केल्यानंतर अखेर मध्य रेल्वेची सेवा मंगळवारी सकाळी पूर्वपदावर आली.
Mumbai Live News Updates महाराष्ट्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर