Mumbai Maharashtra Breaking News Update, 11 July 2023 : राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गट सक्रिय झाले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी आता आमने-सामने आले असून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपासोबत गेलेल्या शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांवर ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. भाजपासोबत गेलेल्या या आमदारांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. तसंच, लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावरूनही आता राज्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Live News Updates महाराष्ट्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत त्यांना नागपूरचा कलंक म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले.
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेले दीक्षाभूमीचे शहर आंतरजातीय विवाहासाठी राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
महावितरणने तंत्रज्ञांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या नियमबाह्य असल्याने कामगारांनी प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांनी चर्चेला बोलावल्यानंतर संवाद करण्यात आला. मात्र, त्यातून काहीही सकारात्मक निष्पन्न न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगार महासंघातर्फे करण्यात आला आहे.
चंद्रपूर: अतिशय दुर्मिळ असलेल्या ॲशिएटीक सॉफ्ट शेल टुरटेल या कासवाची २५ हजार रूपयात विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ हे दोन दिवसांच्या पुणे दौर्यावर आहेत. त्याचदरम्यान छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रशांत दशरथ पाटील या आरोपीला पुणे पोलिसांनी रायगड येथील महाडमधून अटक केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले.
पवार साहेबांसंदर्भात बोलत असताना मला हे बोलायचं होतं की त्यांच्या सोबतचे सरदार चारही दिशांना धावायला लागले आहेत. आणि सेनापती आसऱ्यासाठी गावगाड्याच्या दिशेने यायला लागले आहेत. असं वक्तव्य मला करायचं होतं. परंतु, अनावधानाने सैतान हा शब्द माझ्या मुखातून गेला, असं स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी दिलं.
नागपूर : कोकण विभागात मुसळधार पावसाने ठाण मांडले असतानाच मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरू आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत असतानाच काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
चंद्रपूर : दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि खासदार मुकूल वासनिक यांनी तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याने काँग्रेसच्या वर्तुळात राजकीय चर्चा रंगली आहे. या भेटीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
पुणे : पुण्यात गृहनिर्माण क्षेत्रात मागील काही वर्षांत वाढ होताना दिसत आहे. मात्र, मागील वर्षभरात शहरात घरांच्या किमती ११ टक्क्याने वाढल्या आहेत. याचवेळी घरांच्या विक्रीत ७.९६ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
चंद्रपूर : राज्यातील राजकारण झपाट्याने बदलत असताना आता राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी दुसऱ्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. स्वतः वडेट्टीवार यांनी फेसबुक पेजवर आनंदाची बातमी विरोधी पक्षनेता होणार, अशी पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
नागपूर : राज्य शासनाच्या अखत्यारित देशातील पहिले ‘रोबोटिक सर्जरी युनिट’ नागपुरातील मेडिकल रुग्णालयात मंजूर आहे. त्याची निविदा प्रक्रिया ‘हाफकिन’ने पूर्ण केल्यावर तांत्रिक कारणाने ती रद्द करण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेली या प्रकल्पाची मुदत उलटल्याने न्यायालयात शासन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा टी पॉईंटवर मंगळवारी पहाटे एका अज्ञात वाहनाने शेकडो मेंढ्या चिरडल्या. या घटनेनंतर ट्रक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
नागपूर: गेल्या आठवडाभरापूर्वी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झाल्यात. शहर पोलीस दलातून १२ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी बदलून गेले तर ८ पोलीस निरीक्षक शहरात रुजू झाले.
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोलारपिंपरी खुल्या कोळसा खाणीच्या ‘कोलस्टॉक’मधील कोळसा मागील १० दिवसांपासून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे. या आगीमुळे वेकोलिचे नुकसान होत असतानाही आगीकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पत्नीशी अश्लील वर्तन केल्याने तरुणाचा खून करणाऱ्या तरुणास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. पुणे स्टेशन परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. कोणतेही धागेदोरे नसताना बंडगार्डन पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला.
शाळा सुरू झाल्यावरही ७६२ स्कूलबस, स्कूलव्हॅनची योग्यता तपासणी झाली नसल्याचे जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पुढे आले होते. त्यामुळे सोमवारपासून या नियमबाह्य वाहनांवर कारवाई सुरू झाली. पहिल्याच दिवशी ११२ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने आता सर्वांचेच डोळे उघडत आहे. खबरदारी आवश्यक ठरते आहे. या पार्श्वभूमीवर संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन खासदार रामदास तडस यांच्या सूचनेनुसार झाले.
डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी दाेन महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या दोषाराेपपत्रात माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. प्रशांत पाटील (मूळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भुजबळ यांच्या कार्यालयात पाटील याने संपर्क साधला होता.
शहरात गस्त घालणाऱ्या महिला पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात येणार आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस दलात प्रत्येकाला पिस्तूल, बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
नागपूर: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) कुलगुरू पदासाठी कुलपती व राज्यपाल रमेश बैस यांनी पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक परवाना रद्द करण्याचा बडगा वाहतूक पोलिसांनी उगारला आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत ८८ चालकांचे वाहतूक परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाला सादर करण्यात आले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वी राजकीय भाष्य केलं होतं. “देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते”, असं ती म्हणाली होती. परंतु तिच्या या वाक्यावरून तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. इतकं ट्रोल केलं गेलं की तिला तिच्या वक्तव्याबाबत नंतर स्पष्टीकरणही द्यावं लागलं. या प्रकरणावरून ठाकेर गटाने केंद्र सरकारवर आणि भाजपा समर्थकांवर टीका केली आहे.
महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित आहे.PMLA कायद्यानुसार आरोपी कडील कलंकित धन दुसऱ्याच्या खात्यावर गेले की तो सुध्दा गुन्हेगार ठरतो. राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडील सर्व कलंकित खाती" खातेदारांसह भाजपा सरकार मध्ये सामील झाली..mony laundring चे हे सरळ प्रकरण आहे.ED ने संपुर्ण… pic.twitter.com/rUAVhxPRbX
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 11, 2023