Mumbai- Maharashtra News Updates, 08 September 2022 : महाराष्ट्रात दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवरील सजावटीवरून राजकारण तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याशिवाय राज्यात पावसाचीही जोरदार हजेरी आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Updates 08 September 2022 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

21:50 (IST) 8 Sep 2022
घरफोडीचे १०० गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याकडून २४ लाखांचा ऐवज जप्त

घरफोडीचे १०० गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याकडून ४२ तोळे सोन्याचे दागिने, चार किलो चांदीचे दागिने असा २४ लाख ६४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. राजेश उर्फ चोर राजा राम पपुल (वय ३८, रा. सच्चाई माता मंदिर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राजेश पपुल याच्या विरोधात घरफोडीचे १०० गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वाचा

21:28 (IST) 8 Sep 2022
तळोजात मोदी केम फार्मा कंपनीत सायंकाळी भीषण आग

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मोदी केम फार्मा कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. अमोनिया रसायन निगडीत ज्वलनशील पदार्थ हाताळणी या कंपनीत होत असल्याने औद्योगिक विकास मंडळाच्या अग्निशमन दलाने सतर्कता बाळगत आगीच्या घटनास्थळी धाव घेतली.

सविस्तर वाचा

19:49 (IST) 8 Sep 2022
प्रथम श्रेणी पासधारकांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणार; प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकल पासातील फरक भरून प्रवास करता येणार

उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलकडे सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी प्रवाशांचाही ओढा आहे. हे प्रवासी वातानुकूलित लोकलकडे वळावेत यासाठी सामान्य लोकलचा प्रथम श्रेणी पास आणि वातानुकूलित लोकल पासातील फरक भरून प्रवाशांना नवीन पास मिळणार आहे. या आठवड्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

19:31 (IST) 8 Sep 2022
Yakub Memon : “दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून…” ; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका!

Mumbai Blast Terrorist Yakub Memon Grave Renovation : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…

19:28 (IST) 8 Sep 2022
मुंबई : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे सलग दुसऱ्या दिवशी हाल

मुसळधार पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना फटका बसला आहे. आज संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली आहे. लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार कळवा आणि मुंब्रा दरम्यान जलद मार्गावर पाणी साचलेल्याने त्या मार्गावरील लोकल वाहतुक ठप्प आहे. तर धीम्या मार्गावरही लोकल वाहतुक रखडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचले आहे. वाचा सविस्तर बातमी…

19:17 (IST) 8 Sep 2022
पुणे : पाच दिवसांत पीएमपीला ८ कोटी २७ लाखांचे उत्पन्न

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असलेल्या पीएमपीला गणेशोत्सवातील पाच दिवसात ८ कोटी २७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबरच विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

19:00 (IST) 8 Sep 2022
भाजप नेत्याचा वाढदिवस ठाणेदाराच्या अंगलट; चौकशी सुरू

बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हरीश शर्मा यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करण्याचा नवोपक्रम राबवणारे ठाणेदार उमेश पाटील यांची पोलीस खात्यामार्फत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

18:52 (IST) 8 Sep 2022
भाजपमध्ये इतके लोकं येतील की, मविआला उमेदवार मिळणार नाही – बावनकुळे यांचा दावा

येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये एवढे प्रवेश होईल की २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना उमेदवार मिळणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला.

सविस्तर वाचा

18:46 (IST) 8 Sep 2022
सांगलीत विद्युत खांबाला धडकून जीपचा अपघात, दोघांचा मृत्यू

चालकाचा जीपवरील ताबा सुटल्यानंतर विद्युत खांबाला धडकून झालेल्या अपघातात दोन तरूण ठार झाले तर सहा तरूण जखमी झाले. सांगलीजवळील नांद्रे या गावी मध्यरात्री हा अपघात घडला असून या भीषण अपघातामध्ये जीपचे छत एकीकडे तर इंजिनसह  अन्य भाग एकीकडे पडला  होता.

सविस्तर वाचा

18:22 (IST) 8 Sep 2022
अमरावतीत आंतरधर्मीय विवाह प्रकरणाचा आरोप ; तरुणी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात

अमरावतीतून एका तरुणीचे अपहरण तसेच धमकावून आंतरधर्मीय विवाह करण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित तरुणीला लोहमार्ग पोलिसांनी सातारा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. खासदार नवनीत राणा यांनी या आंतरधर्मीय विवाह प्रकरणावरुन अमरावतीतील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भातील आपले संभाषण ध्वनिमुद्रित केल्याचा जाब विचारुन गोंधळ घातला होता.

सविस्तर वाचा

18:10 (IST) 8 Sep 2022
अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला

पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता दुसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येणार असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर होईल.

सविस्तर वाचा

18:07 (IST) 8 Sep 2022
“मुंबई आयुक्तांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी आणि…”, याकुब मेमन प्रकरणात किरीट सोमय्यांची मोठी मागणी

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटप्रकरणी जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. याशिवाय बीएमसीचा इंजिनियर आणि विश्वस्तांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. ते गुरुवारी (८ सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी…

18:01 (IST) 8 Sep 2022
पुणे : विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्याचा पोलिसांचा प्रयत्न ; मिरवणूक रेंगाळल्यास पोलीस आयुक्तांचे कारवाईचे आदेश

वैभवशाली परंपरा असलेली विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर आटोपण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत खंड पडणे किंवा रेंगाळल्यास पोलिसांकडून मिरवणूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

17:40 (IST) 8 Sep 2022
गणेश विसर्जनासाठी वाहतूक पोलीस सज्ज

करोनाविषयक कडक निर्बंध हटविल्यानंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियमनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांसह सुमारे १० हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा

16:41 (IST) 8 Sep 2022
पुणे : एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न

एटीएमची तोडफोड करुन चोरट्यांनी रोकड चोरीचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा भागातील कडनगर परिसरात घडली.याबाबत आयसीआयसीआय बँकेच्या कडनगर शाखेचे व्यवस्थापक अन्वर तांबोळी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा

16:05 (IST) 8 Sep 2022
लव्‍ह जिहादवर प्रश्‍नचिन्‍ह; ‘ती’ युवती एकटीच होती प्रवासात; पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली माहिती

शहरातील हमालपुरा परिसरातून बेपत्‍ता झालेल्‍या १९ वर्षीय युवतीचा शोध लागला असून त्या युवतीला सातारा पोलिसांच्या मदतीने रेल्वे गाडीतून ताब्यात घेण्‍यात आले आहे. सातारापर्यंतच्‍या प्रवासात ती एकटीच होती, रागाच्‍या भरात ती घरून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा

15:51 (IST) 8 Sep 2022
ठाण्यात तडीपारीच्या कारवाईला वेग ; जिल्ह्यातून नऊ महिन्यात २७१ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव

ठाणे पोलिसांनी गुंडाच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते ६ सप्टेंबर या कालावधीत २७२ जणांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. २७२ पैकी १६३ जणांना ठाणे, पालघर, मुंबई आणि उपनगरातून एक महिना ते दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत तडीपार केले आहे.

सविस्तर वाचा

15:40 (IST) 8 Sep 2022
अमरावती : पोलिसांवर राग, मग सुरक्षा का घेता?; खा. नवनीत राणांना पोलीस कुटुंबीयांचा सवाल

पोलिसांवर तुमचा राग असेल, तर पोलिसांकडून सुरक्षा का घेता. केंद्रात, राज्‍यात तुमचे सरकार आहे, पोलिसांची सुरक्षा काढून का टाकत नाही, असा सवाल करीत पोलिसांच्‍या कुटुंबीयांनी खासदार नवनीत राणा यांच्‍यावर कारवाई व्‍हावी, अशी मागणी केली आहे.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 8 Sep 2022
बुलढाणा : याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणावरून आ. संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप; संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे अलीकडच्या काळातील सर्वात लज्जास्पद बाब आहे. यावरून विरोधी पक्ष दहशतवादाचे समर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे, असा गंभीर आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. याप्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 8 Sep 2022
ठाणे : पारसिक नगर ते वाशी रेल्वे स्थानक टीएमटीची बससेवा सुरू

महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसेच क्षेत्राबाहेरील मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार ठाणे परिवहन उपक्रमाची (टिएमटी) बससेवा सुरु करण्यात येत असतानाच, त्यापाठोपाठ अशाचप्रकारे प्रवाशांच्या मागणीनुसार परिवहन प्रशासनाने पारसिकनगर ते वाशी रेल्वे स्थानक अशी बससेवा सुरू केली आहे.

सविस्तर वाचा

15:26 (IST) 8 Sep 2022
… मग याकुबचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात का दिला?; उगाच शेपट्या आपटत बसू नका – अरविंद सावंत

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं कोविड काळात सुशोभीकरण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या. तर भाजपा नेत्यांकडून या मुद्य्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:25 (IST) 8 Sep 2022
Yakub Memon Tomb : …तर ही कोणती मताची लाचारी होती? हे सर्व जनतेसमोर आलं पाहिजे – सुधीर मुनगंटीवार

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं कोविड काळात सुशोभीकरण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या आहेत. तर भाजपा नेत्यांकडून या मुद्य्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:13 (IST) 8 Sep 2022
विमानतळ बस सेवेचे आगाऊ तिकीट काढता येणार; बेस्ट उपक्रमाची उद्यापासून नवी सेवा

विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा इच्छित स्थळी जाण्यासाठी वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना आता या बसचे आगाऊ तिकीट काढून आसन आरक्षित करता येणार आहे. त्यासाठी बेस्टच्या चलो अपद्वारे आगाऊ तिकीट काढता येईल, अशी माहीती बेस्ट उपक्रमाने दिली.

सविस्तर वाचा

14:41 (IST) 8 Sep 2022
काटई-बदलापूर रोडवर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत रहिवाशाचा मृत्यू

काटई-बदलापूर रोडवर मोर्या ढाब्या समोर बुधवारी रात्री साडे अकरा वाजता पंक्चर झालेल्या मोटारीचे चाक बदलण्याचे काम सुरू असताना त्या मोटारीला पाठीमागून आलेल्या एका वाहनाने जोराने धडक दिली. या धडकेत मोटारी जवळील उभे असलेले एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या दोघांवर डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्यापैकी पतीचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

14:34 (IST) 8 Sep 2022
मुखपट्टी नियम उल्लंघनाप्रकरणी दाखल खटल्यांचे काय करणार ? ; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

जानेवारी २०२१ पासून सुरू झालेली करोनाची साथ आणि त्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध आता अस्तित्वात नाहीत. ही स्थिती लक्षात घेऊन मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांचे काय करणार ? हे स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.आपल्या या आदेशाची प्रत गृह सचिवांकडे विचारार्थ पाठवण्याचे आदेशही न्यायमूर्ती नितीन जामदार आणि नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने दिले.

सविस्तर वाचा

14:32 (IST) 8 Sep 2022
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरला सुनावणी ? ; ईडीला अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश

पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले. १६ सप्टेंबर रोजीच राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

14:22 (IST) 8 Sep 2022
वर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ललित वाघमारे; डॉ. गौरव वेदप्रकाश मिश्रा प्र-कुलगुरू

सावंगीच्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ललित वाघमारे यांची तर प्र-कुलगुरूपदी डॉ. गौरव वेदप्रकाश मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. मिश्रा कुटुंबात चार सर्वोच्च पदे येण्याचा विक्रम यानिमित्ताने घडला आहे.

सविस्तर वाचा

14:16 (IST) 8 Sep 2022
आंबिवली रेल्वे स्थानकात थेट फलाटावर रिक्षा आणणाऱ्या चालकाला अटक

रेल्वे स्थानकातील फलाटावर रिक्षा चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे हे माहिती असुनही आंबिवलीतील एका बेशिस्त रिक्षा चालकाने सोमवारी रेल्वे सुरक्षा जवानांच्या नकळत थेट फलाटावर रिक्षा आणून प्रवासी वाहतूक केली होती. या रिक्षा चालकाच्या या कृती बद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या बेशिस्त रिक्षा चालकाला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेऊन मंगळवारी अटक केली.

सविस्तर वाचा

14:15 (IST) 8 Sep 2022
किरीट सोमय्यांचा शिवसेनेच्या आणखी एका मोठ्या नेत्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा तिसरा हात…”

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता त्यांनी शिवसेनेच्या आणखी एका नेत्यावर गंभीर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. “उद्धव ठाकरे यांचा तिसरा हात असलेल्या रविंद्र वायकर यांनी जोगेश्वरीच्या २००० वर्षांपूर्वीच्या महाकाली गुफा आणि रस्त्यांच्या कामात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला,” असा आरोप सोमय्यांनी केला. ते गुरुवारी (८ सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी…

14:11 (IST) 8 Sep 2022
प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला टोला

प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो, लोकांच्या मनात जावे लागते, धर्मवीर आनंद दिघे असतानाही या विभागातून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर कधीच निवडणूक हरले नव्हते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ठाकूर यांच्या पश्चात जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे हे त्यांचा वारसा पुढे चालवत असून त्याचबरोबर नागरिकांना अपेक्षित असणारे काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा

मुंबई महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अपडेट, महाराष्ट्र न्यूज अपडेट