Maharashtra Political Crisis Updates, 05 December 2022 : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे-उद्धव ठाकरे गटातील नेतेदेखील एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या घडामोडींची सर्व माहिती एका क्लिकवर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Live News, 05 December 2022 : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

12:48 (IST) 5 Dec 2022
नवी मुंबई: वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहण्यासाठी महापालिकेने लढवली अनोखी शक्कल

नवी मुंबईत द्रुतगतीच्या तोडीस तोड असलेल्या पाम बीच मार्गावरून जाताना उंचावर ठेवण्यात आलेल्या कारकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. सध्या ही कार झाकलेली असली तर लवकरच तिचे अनावरण होणार आहे. बातमी वाचा सविस्तर…

12:34 (IST) 5 Dec 2022
शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ आल्यानंतर रावसाहेब दानवेंनी मागितली माफी, म्हणाले

केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचादेखील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओनंतर दानवे यांच्यावरदेखील टीका केली जात होती. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे. वाचा सविस्तर

12:32 (IST) 5 Dec 2022
नालासापोऱ्यात घरफोडी करणार्‍या चोराला रंगेहाथ अटक, नागरिकांनी केलेल्या मारहाणीची चित्रफित व्हायरल

वसई- नालासापोरा येथे घरफोडीचा प्रयत्न करणार्‍या एका सराईत चोराला नागरिकांना रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली आहे. २९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेची चित्रफित सोमवारी व्हायरल झाली. पेल्हार पोलिसांनी या चोराला मारहाण करणार्‍या ५ जणांना अटक केली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या चोरावर १२ गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वाचा सविस्तर

महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट