Maharashtra Political Crisis Updates, 05 December 2022 : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे-उद्धव ठाकरे गटातील नेतेदेखील एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या घडामोडींची सर्व माहिती एका क्लिकवर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Live News, 05 December 2022 : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अर्थसंकल्पातून पाच टक्के निधी दिव्यांंगांच्या विकासासाठी खर्च करण्याचे कायदेशीर बंधन असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात स्मशानभूमीत सुरू असलेल्या चक्री उपोषणात कुटुंबीयांसह सहभागी झालेल्या एका दहा वर्षाच्या दिव्यांग मुलाचा अचानकपणे मृत्यू झाला.
अभिनेता शाहरूख खानचा पुत्र आर्यन खानच्या अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, ॲड सुबोध पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आर्यन खान घटनास्थळी रंगेहात पकडला गेला होता, तपास अधिकाऱ्यांसमोर त्याने गुन्हा मान्य केला होता, त्या आधारे न्यायालयाने दोन वेळा त्याला जामीन नाकारला होता. सविस्तर वाचा…
कळवण तालुक्यातील वेरूळे येथील वृध्द दाम्पत्याच्या खूनाचा उलगडा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या तीन तासात केला. आजी, आजोबांकडून खर्चाला पैसे दिले जात नाही, नातवंडांमध्ये भेदभाव केला जातो, याचा राग मनात ठेवत नातवानेच आजी, आजोबांचा खून केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी २७ वर्षाच्या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत आता चुरशीचा रंग भरत आहे. ग्रामविकासमंत्री महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल यांच्यात टोकाची चुरस निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा…
मध्य आणि पश्चिम रेल्वेला एमयूटीपी अंतर्गत मिळणाऱ्या २३८ वातानूकुलीत लोकल गाड्यांसाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हिसी) घेण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागारची नियुक्ती करण्यात आली असून एका वर्षात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सविस्तर वाचा…
सामान्य रसिकांच्या स्वेच्छा निधीतील व्याजातून देण्यात येणारा यंदाचा चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार दुर्ग संशोधक, इतिहास अभ्यासक बाळकृष्ण तथा आप्पा परब (८३) यांना जाहीर झाला आहे. १८ डिसेंबर रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात होणाऱ्या चतुरंगच्या ३२ व्या रंगसंमेलनात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
मलेशियामध्ये नोकरी देतो असे सांगून दोन भामट्यांनी चार जणांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंब्रा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांचा पुत्र आणि टीम ओमी कलानी गटाचा प्रमुख ओमी कलानी यांच्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक आणि एकेकाळी कलानी कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेल्या राजेश वधारिया यांच्या मुलाच्या तक्रारीवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. सविस्तर वाचा…
धारावी पुनर्विकास प्रकल्पात माहीम निसर्ग उद्यानाचा समावेश करणार का ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाकडे केली. तसेच त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठीचे सीमांकन आणि माहीम निसर्ग उद्यान संरक्षित वन असूनही त्याचा या प्रकल्पात समावेश करण्याला वनशक्ती या संस्थेने जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. सविस्तर वाचा…
दहिसर येथे भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सलीम शेख असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी विशाल जयंती गोरसिया या दुचाकीस्वाराला दहिसर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात दहिसर येथील एस. व्ही रोड, परबत नगर, त्रिमूती स्टुडिओसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर वाचा…
करोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: करोना प्रतिबंधक लसीकरण आणि करोनाच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवत होते. केंद्राकडून भरपूर मदत मिळत असतानाही राज्यात अनेक भागात अनियमितता होती. अशी टिका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केली. सविस्तर वाचा…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना काळजी घेऊन बोललं पाहिजे. कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल त्यांनी ती चूक सुधारायला हवी. गरज पडल्यास माफी ही मागितली पाहिजे अस मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे. ते लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमय्या यांनी अप्रत्येक्षपणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर भाष्य केले आहे. सविस्तर वाचा…
दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण होत असतानाच महाराष्ट्रातील रात्रीच्या किमान तापमानात अचानक मोठी वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी वाढले आहे. दिवसा निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे उन्हाच्या चटक्यातही वाढ झाली आहे. सविस्तर वाचा…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुणे-सातारा रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. सेवा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली. महामार्गावरील खेड-शिवापूर ते वेळू या तीन किलोमीटर अंतराच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली असून दीडशे किऑक्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. सविस्तर वाचा…
दाट लोकवस्ती भागात सर्वेक्षण करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांना भेट देऊन गोवर आजाराच्या रुग्णांची माहिती घ्यावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी रविवारी शहरातील आरोग्य व्यवस्था आणि सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला. सविस्तर वाचा…
प्रस्तावित ‘डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयका’च्या आधारे माहितीचा अधिकार कायद्यामध्ये घातक बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सार्वभौमत्वावर हल्ला होणार असून, गोपनीयतेचा नवा कायदा देशावर लादला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे,’ अशी टीका माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक प्रल्हाद कचरे यांनी रविवारी केली. सविस्तर वाचा…
लालचुटूक स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरात आला असून फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. आवक वाढल्याने स्ट्रॉबेरीचे दर आवाक्यात आले आहेत. वाई, महाबळेश्वरसह यंदा नाशिक जिल्ह्यातूनही स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…
कल्याण ते भिवंडी दरम्यान दळणवळण आणि वाहतुकीचे केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या कल्याण ते पडघा दरम्यानच्या पूल, रस्ते विकास कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ४०० कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. या कामांचा सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने सल्लागार नियुक्त केले आहेत. या अहवालानंतर निविदा आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सविस्तर वाचा…
निसर्गाने विदर्भाला भरभरून दिले. इथल्या जमिनीत कोळशापासून ते मँगनीजपर्यंत मोठी खनिजसंपत्ती आढळते. मात्र आता याच जमिनीत सोन्याचा साठाही दडल्याचा दावा जीएसआय अर्थात भुवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडियाने केला आहे. विदर्भाच्या जमिनीत काय दडलंय याचा शोध लावलाय. सोन्याचे हे गूढ नक्की आहे तरी काय? खरंच विदर्भाच्या जमिनीत खजिना दडलाय का? तर याचे उत्तर होय असे आहे. सविस्तर वाचा…
समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ( ४ नोव्हेंबर ) समृद्धी महामार्गावर गाडीने प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. , फडणवीसांनी चालवलेली गाडी बांधकाम व्यावसायिक विक्की कुकरजा यांची आहे. सविस्तर वाचा…
प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाला जबाबदार असणाऱ्या सूर्य नदीवरील पुलाच्या कठड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धक्का शोषण करणार यंत्रणा (क्रॅश अटेन्यूअटर)कार्यान्वित केली आहे. एकीकडे या अपघाताला वाहनाचा मर्यादेपेक्षा अधिक वेग जबाबदार असल्यानेपोलिसात गुन्हा नोंदवला गेला असताना दुसरीकडे महामार्गावरील रचनेत दोष असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. सविस्तर वाचा…
नागपूर: समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाची घटिका आता जवळ आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी रविवारी त्याची पाहणी देखील केली. पण त्यांच्याच बरोबर या वन्यप्राण्यांसाठी जे भुयारी मार्ग व उड्डाणपूल तयार करण्यात आले, त्याची पाहणी देखील वन्यप्राण्यांनी केली. रविवारी या महामार्गावर चक्क अजगराने त्याच्या मार्गाची पाहणी केली. बातमी वाचा सविस्तर…
नागपूर: नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घघाटनासाठी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत आहेत. त्यांच्या कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर…
पालघर: लोकसभा निवडणुकीला सव्वा वर्षाचा कालावधी असला तरीही या जागेसाठी प्रमुख दावेदार असणाऱ्या पक्षांनी या निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी हाती घेतली आहे. पालघरची जागा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांना सोडण्यास भाजप तयार नसून त्याचे पडसाद आता जाहीर कार्यक्रमात उमटू लागले आहेत. बातमी वाचा सविस्तर…
वाशीम : सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एकाच वाहनातून नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या मार्गाची प्रत्यक्ष वाहनाद्वारे पाहणी केली. बातमी वाचा सविस्तर…
नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर भागात भर रस्त्यात एका उच्च दाब विद्युत खांबांवर मृतदेह लटकलेला पाहून एकच खळबळ उडाली. या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. बातमी वाचा सविस्तर…
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ९ सप्टेंबर २००१ या दिवसाची नोंद आहे. अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्राच्या (वर्ल्ड ट्रेड सेंटर) दोन इमारतींवर दहशतवादी हल्ला केला असे सांगण्यात येते. मात्र, हा हल्ला नसून अमेरिकेचा एक कट होता. बातमी वाचा सविस्तर…
मुंबई : उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली आणि गेल्या २२ वर्षांतील राजकारणातील अनुभव पाठीशी असलेल्या ॲड. राहुल नार्वेकर यांना सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांची जुलै २०२२ मध्ये अध्यक्षपदी निवड झाली, त्या वेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक-निंबाळकर हे विधान परिषद सभापतीपदी होते. बातमी वाचा सविस्तर…
नागपूर : बाळ विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख राजश्री सेन हिने एका विद्यार्थिनीच्या गर्भातील बाळाचा सौदा केला. त्या बाळाची हैदराबाद येथील एका व्यापारी दाम्पत्याला विक्री केली. या प्रकरणी बाळ विक्री केल्याचा आणखी गुन्हा राजश्रीवर दाखल करण्यात आला. बातमी वाचा सविस्तर…
पोलीस विभागात कर्तव्य बजावताना दोघांची नजरानजर झाली. दोघांत प्रेमांकुर फुलला आणि लगेच विवाह बंधनात अडकले. मात्र, एका क्षुल्लक कारणावरून दोघांत वाद झाल्याने दुरावा निर्माण झाला. तो वाद भरोसा सेलपर्यंत पोहचला. भरोसा सेलने दुभंगलेल्या वर्दीतील दोन्ही मने जुळवून त्यांच्या जीवनात आनंद पेरला.संजय आणि संजना ( काल्पनिक नाव) हे दोघेही पोलीस दलात भरती झाले . बातमी वाचा सविस्तर…