Mumbai- Maharashtra News Today, 22 September 2022 : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता दोन्ही बाजूंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकद लावली जात आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेची मोठी निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आमनेसामने आले आहेत. दुसरीकडे राज्यात पावसानेही जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. एकूणच राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Updates : राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.
मुंबई : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाकडून मुंबईतील ट्रृॉम्बे चिता कॅम्प येथेही छापा टाकण्यात आला. यावेळी पीएफआयच्या कार्यालयातून अहमद अबिब्बुलाला नावाच्या व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतले आहे. बातमी वाचा सविस्तर …
पिंपरी-चिंचवड : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेवटची धरपड सुरू असून अस्तित्व दाखवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. ते प्रक्षोभक भाषण करत आहेत. ४० आमदार आणि १२ खासदार त्यांच्या पक्षातून निघून गेले आहेत. उरलेली शिवसेना देखील त्यांच्या हातातून निसटत चालली आहे. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने लोक दिसत आहेत. बातमी वाचा सविस्तर …
शहरातील रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेत गेलेल्या स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासोबत गेलेल्या काही माजी नगरसेवकांनी रखडलेल्या कामांवरून पालिका कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. बातमी वाचा सविस्तर …
मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने मागितलेली परवानगी महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेनेची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली. आधीच्या याचिकेत मुंबई महानगरपालिकेला परवानगीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. बातमी वाचा सविस्तर …
दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असेल? आगामी काळात आंदोलने, निदर्शने यांच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढवली जाणार का? याबाबत उद्धव ठाकरे गटातील नेते तथा आमदार अनिल परब यांनी सविस्तर भाष्य केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही आमची पुढची रणनीती ठरवू असे अनिल परब म्हणाले आहेत. वाचा सविस्तर
पाकिस्तानी गुप्तर यंत्रणेचा एजंट म्हणून काम करणाऱ्याला नेपाळमध्ये ठार करण्यात आलं आहे. १९ सप्टेंबरला काठमांडूमध्ये आश्रय घेतलेल्या ठिकाणाबाहेर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, तो भारतात आयएसआयच्या बनावट नोटांचा सर्वात मोठा पुरवठादार होता.
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील वादविवाद कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांबाबत (द्वेषोक्ती) सर्वोच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली आहे. आपला देश नेमका कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी माध्यमांसाठी नियमावली हवी असंही मत व्यक्त केलं. तसंच क्षुल्लक मुद्दा म्हणत सरकार मूक दर्शक का झाले आहे? असा सवाल न्यायालयाने केला.
नागपूर : लोकशाही वाचवण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर येत्या ६ ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. आधी बेझनबाग मैदानावर सभा होईल. त्यानंतर बामसेफ व भारत मुक्ती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती बामसेफचे नेते प्रा. विलास खरात यांनी दिली. ते आज रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. बातमी वाचा सविस्तर …
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या कंत्राटी प्राध्यापक भरतीमध्ये पात्रताधारकांना डावलून मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. राहुल हळदे हे नेट, पीएच.डी. उत्तीर्ण असून त्यांना वीस वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. असे असतानाही विद्यापीठाच्या फाईन आर्ट विभागामध्ये त्यांना डावलून तुलनेने कमी शिकलेल्यांची नियुक्ती करण्यात आल्याची तक्रार डॉ. हळदे यांनी कुलगुरूंकडे केली आहे. बातमी वाचा सविस्तर …
दसरा मेळावा प्रकरण- पालिकेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सुधारित याचिका करू देण्याची उद्धव गटाकडून न्यायालयाकडे मागणी. पालिकेने परवानगी नाकारल्याने मागणी, उद्या होणार सुनावणी.
२००२च्या गुजरात दंगल प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्यासह तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हे दोषारोपपत्र दाखल केलं असून तिस्ता सेटलवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गुजरात सरकारची बदनामी करण्याचा कट आखल्याचा तसंच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर कल्याण मधील दुर्गाडी येथे शिवसेनापक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थकांनी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी नवरात्रोत्सव साजरा करायचा अशी चढाओढ गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. बातमी वाचा सविस्तर …
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी १५ दिवसांत निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. यापूर्वी या प्रकल्पासाठी तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. बातमी वाचा सविस्तर …
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा एकीकडे थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली असताना दुसरीकडे मुंबई पालिकेनंच यासंदर्भात मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगर पालिकेनं एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारण्यात आल्याचं पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रातून दिसून येत आहे. या पार्श्वभूमवीर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून आता शिवसेनेनं उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेऊन शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच होईल, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही लक्ष्य करत त्यांचे फोडाफोडीचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असा इशारा दिला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपा नेत्यांकडूनही उत्तरं दिली जात आहेत.
मुंबईत झालेल्या शिवसेना गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाषणात उद्धव ठाकरेंनी सर्वच मुद्द्यांवर भाष्य करताना शिंदे गटालाही लक्ष्य केलं. “सगळे मिंधे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढत आहेत. या लढाईत ते आमच्यासोबत असून हातात तलवार घेऊन आघाडीवर लढत आहेत”, असं उद्धव ठाकरे या भाषणात म्हणाले. यासंदर्भात बोलताना आता मनसेनं उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली आहे. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) १०० सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. देशभरातील १० राज्यांत एनआयए आणि ईडीने संयुक्तरित्या ही छापेमारी केली आहे.
उद्योगपती गौतम अदानी बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले होते. जवळपास एक तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची भेट घेतली. या बैठकीचं कारण किंवा त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.