Maharashtra Political Crisis , 12 September 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर दीड ते पावणे दोन तास शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी परिसरात ठाकरे व शिंदे गटात झालेल्या वादावर या वेळी चर्चा झाल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या रखडलेल्या बदल्यांचा विषयावरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज दुपारी औरंगाबाद विमानतळावर त्यांचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. पैठणमध्ये त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातातील वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीच्या खटल्याबाबत आज वाराणसी जिल्हा आणि सत्र न्यायालय निकाल देणार आहे. या सुनावणीपूर्वी वाराणसीत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या याचिकेवरील निकाल जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी गेल्या महिन्यात राखून ठेवला होता.
Maharashtra News Updates Today: राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
दौलताबाद येथील दर्ग्याच्या देखभालीपोटी मिळणाऱ्या चिरागीच्या (दान) पैशांवरुन झालेल्या वादातून वृध्दाचा चाकू भोसकून खून करणाऱ्या पुतण्यासह त्याच्या मित्राला जन्मठेप आणि विविध कलमांखाली प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. ओझा यांनी सोमवारी सुनावली.
स्मार्ट सिटी शहरांमध्ये समाविष्ट असलेल्या कल्याण डोंबिवली शहरातील रस्ते, खड्डे, जागोजागी पडलेला कचरा पाहून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शहरातील बकालपणा पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. या बकालपणावरुन आयुक्तांना सोमवारी खडेबोल सुनावले.
गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यासंबंधी केलेले वक्तव्य आणि शिक्षक व पदवीधर मतदार संघच रद्द करण्याविषयी मांडलेल्या भूमिकेने राज्यभर वादळ उठवून दिले आहे. त्यावर शिक्षक संघटना आणि शिक्षक, पदवीधर मतदारसंघाचे आमदार आक्रमक झाले असून औरंगाबाादेत त्याचे पडसाद माेर्चाच्या माध्यमातून उमटले.
मराठा आरक्षणाबाबतच्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे असलेल्या सर्व सुनावण्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पुनर्विचार याचिकेच्या निकालानंतरच घेतल्या जातील, असा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद येथील सभेत म्हणाले की, शिंदे गटाला बुडबुड्यांचं प्रमाण दिले गेले, पण याच बुडबुड्यांनी तुमची धुलाई केली. या वक्तव्याचा समाचार पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतला. “आमच्या शिवसेनेकडे कपडे धुण्यासाठी जो धोटा वापरला जातो तो आमच्याकडे असून त्यामुळे आम्ही कशाचीही चांगली पद्धतीने कोणत्याही पद्धतीचा त्रास न देता चांगल्या प्रकारे साफसफाई करू शकतो, आमच्याकडे विचारांची ताकद आहे.ती पवित्र आणि चांगली आहे ” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीका गोऱ्हे यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी मंचावर भाजपा आणि शिंदे गटाचे मंत्री, आमदार यांच्यासह नेतेमंडळींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण होण्या अगोदर भाजपाचे केंद्रीयमंत्री आणि जालना जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचे भाषण झाले. या भाषणात दानवेंनी एक विधान केलं, ज्याची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर बातमी…
अननुभवी खेळाडू, देशातील यादवीचे संकट, पहिल्या सामन्यात झालेला पराभव अशा सगळ्या मानसिक दडपणातून जाणाऱ्या श्रीलंका संघाने तमाम क्रिकेट पंडितांचे अंदाज चुकवले. सरस सांघिक कामगिरी आणि प्रत्येक खेळाडूने विजयासाठी दाखवलेले मनोधैर्य यामुळे श्रीलंकेने थेट आशियाई विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पाकिस्तानला निष्प्रभ केले. त्यांच्या या यशाचा घेतलेला आढावा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. “राजकारणात मी एकदा शब्द दिला की तो पाळतो,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. तसेच मी एकदा शब्द दिला की स्वतःचंही ऐकत नाही, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी मंत्री संदीपान भुमरेदेखील दिलेला शब्द पाळतात, असं सांगितलं. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) औरंगाबादमधील पैठणच्या सभेत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी स्थानिक आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला. याबाबत एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. यावर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “ही जबरदस्तीने पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही. ही सर्व प्रेमाने आलेली माणसं आहेत,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) पैठणमध्ये आयोजित सभेत बोलत होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मेळावे, सभा यांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी पेलताना भाजपचे आमदार बावनकुळे हे सध्यातरी भलतेच उत्साहित दिसत आहेत. किंबहुना भाषण आणि देहबोलीतून तसे दाखविण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
काँग्रेसला दुय्यम स्थान देऊन वा वगळून बिगरभाजप विरोधकांची एकजूट करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना काँग्रेसने चपराक दिली आहे. ‘भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचा हत्ती जागा झालेला आहे. काँग्रेस हाच भाजपविरोधी ऐक्याचा प्रमुख स्तंभ आहे, हे भाजपेतर पक्षांनी लक्षात घ्यावे’, असे काँग्रेसने ‘यूपीए’तील घटक पक्ष तेच अन्य प्रादेशिक पक्षांना ठणकावले आहे.
लष्कर जलकेंद्र अखत्यारीत वानवडी टाकी, पर्वती जलकेंद्रअंतर्गत पर्वती आणि एसएनडीटी टाकी येथे फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या गुरुवारी (१५ सप्टेंबर) करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी (१४ सप्टेंबर) रात्री दहा वाजल्यापासून गुरुवारी शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (१६ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज(सोमवार) मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या याच बैठकीत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याबाबत देखील मान्यता देण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे दौऱ्यावर आले असता, त्यांनी पक्षाची संघटनात्मक बैठक या कार्यक्रमांतर्गत कार्यकर्त्यांशी भाषणातून संवाद साधला. यावेळी बावनकुळे यांनी धुळे जिल्ह्यात ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एकही कार्यकर्ता उमेदवारीसाठी शिल्लक ठेवू नका, असेच थेट आवाहन उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना केले. वाचा सविस्तर बातमी…
अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी. उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवावी. खुली व्यायामशाळा उभारावी. पथदिवे झाकणाऱ्या फांद्यांची छाटणी करावी. खड्डयात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. रस्त्यांची व ड्रेनेज वाहिन्यांची दुरुस्ती करावी. शौचालयांची नियमितपणे स्वच्छता करावी.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आ. रवींद्र चव्हाण यांचा तीन दिवस डोंबिवली, कल्याण परिसरात दौरा असल्याने या मंत्र्यांना गाठून कोणा नागरिकाने आपली तक्रार करायला नको पालिका अधिकाऱ्यांच्या सूचनेवरुन डोंबिवलीतील ग आणि फ प्रभागातील फेरीवाले गेल्या दोन दिवसांपासून गायब आहेत.
घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली. बातमी वाचा सविस्तर…
विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात असलेले पालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय गेल्या पाच वर्षांपासून पुनर्विकासाच्या नावाखाली बंद करण्यात आले आहे. परिणामी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने पालिकेने तात्काळ रुग्णालयाचे काम सुरू करावे अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यासाठी सोमवारपासून विक्रोळीतील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यानी साखळी उपोषण सुरू केले आहे.
गुन्हेगारांना समाजात परत आणणे किंवा आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केला. तसेच जामीन मिळाल्यानंतरही जामिनाची रक्कम भरण्यास असमर्थ ठरल्याने तुरुंगातच असलेल्या कैद्यांची सुटका करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.
नाडियादवाला यांना मुख्य पारपत्र आणि व्हिसा कार्यालयातील एका अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात येईल व तो त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना याप्रकरणी आवश्यक ती मदत करेल, असे आश्वासन केंद्र सरकारने मागील सुनावणीच्यावेळी दिले होते. मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकारतर्फे नाडियादवाला यांना काहीच सहकार्य करण्यात आले नसल्याची न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने दखल घेतली.
ठाणे ते सीएसएमटी ते ठाणे अप आणि डाउन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या चालवण्यात आल्या. सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात वातानुकूलित लोकल सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. बदलापूरमधील प्रवाशांनी रेल्वेच्या निर्णयाला तीव्र विरोध केला.
मुंबईतील जागेला सोन्याहुन अधिक भाव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वरळीतील दोन सदनिकांची विक्री तब्बल ९५ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने झाली आहे. एकूण १६०७२ चौ फुटच्या या दोन घरांची किंमत १५१ कोटी झाली. वरळीत अल्ट्रा-लक्झरी प्रकल्प ३६० (थ्री सिक्स्टी) नावाची इमारत असून यात आलिशान अशी घरे आहेत.
मी स्टेट बँकेतून बोलतो. तुम्ही आमच्या बँकेचे खातेदार आहात हे निश्चित करण्यासाठी (केवायसी) तुमची आवश्यक कागदपत्र पाठवून द्या. ती कागदपत्र ऑनलाईन स्थापित केल्यानंतर तुम्हाला येणारा गुप्त संकेतांक मला कळवा. असे कल्याण मधील एका ज्येष्ठ नागरिकाला मोबाईलवरुन सांगून त्यांच्या आणि पत्नीच्या खात्यामधील एकूण दोन लाख २४ हजार ९८७ रुपयांची रक्कम भामट्याने स्वताच्या नावे वळती करुन ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली आहे.
जमीन व्यवहारातील ठरलेली तीन कोटी १० लाख रूपयांची रक्कम न देता विकसकाने फसवणूक केल्याची तक्रार नेरे येथील शेतकऱ्याने हिंजवडी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम दत्तात्रय कुदळे (वय-६१, व्यवसाय-शेती, रा. गणेशनगर, नेरे) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली.
मुसळधारांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात २५ ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे दहा ठिकाणी झाडे पडली; तसेच दोन ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. शहरात रविवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या पावसामुळे पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. आंबीलओढा परिसरातील वसाहतीत पाणी शिरले. हडपसर, आंबीलओढा वसाहत, चंदननगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते.
मुसळधारांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात २५ ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे दहा ठिकाणी झाडे पडली; तसेच दोन ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. शहरात रविवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या पावसामुळे पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.
सीएनजी इंधनात झालेली दरवाढ आणि त्याचबरोबर गेल्या काही महिन्यात वाढलेली महागाई या सर्वाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा प्रवासी भाडे दरात चार रुपयांनी वाढ करण्याची मागणी ठाणे ऑटो रिक्षा मेन्स युनियनने राज्य शासनाकडे केली आहे. पुणे शहरात रिक्षा भाड्यात चार रुपयांची वाढ करण्यात आली असून त्याच धर्तीवर महागाईच्या काळात ठाणेसह महाराष्ट्रातील इतर रिक्षा चालक मालकांना दिलासा द्यावा, असे युनियनने म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात खाडीत होणाऱे गणपती विसर्जन भाविकांना दूरवरुन पाहता यावे म्हणून देवीचापाडा येथील खाडी किनारी असलेली जुनाट खारफुटीची झाडे काही अज्ञात व्यक्तिंनी तोडल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खाडी किनारच्या गणपती विसर्जन व्यवस्थेचे नियोजन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनावर होते.
अपुऱ्या सोयीसुविधा मिळत असल्याच्या निषेधार्थ पिंपरीतील महिंद्रा अँथिया सोसायटीतील रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मोर्चा काढला. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अनेक समस्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.
बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलींना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून त्यांचा पाठलाग करणाऱ्या एकाच्या विरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल लहू कदम (वय ५३, रा. पीएमसी काॅलनी, संभाजीनगर, वाकडेवाडी, मुंबई-पुणे रस्ता) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका मुलीच्या वडिलांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.