Maharashtra Political Crisis , 12 September 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर दीड ते पावणे दोन तास शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी परिसरात ठाकरे व शिंदे गटात झालेल्या वादावर या वेळी चर्चा झाल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या रखडलेल्या बदल्यांचा विषयावरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज दुपारी औरंगाबाद विमानतळावर त्यांचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. पैठणमध्ये त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातातील वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीच्या खटल्याबाबत आज वाराणसी जिल्हा आणि सत्र न्यायालय निकाल देणार आहे. या सुनावणीपूर्वी वाराणसीत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या याचिकेवरील निकाल जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी गेल्या महिन्यात राखून ठेवला होता.
Maharashtra News Updates Today: राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
नवी मुंबई : खारघर येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कुल बसला आग लागली. घटनेचे गांभीर्य वेळीच लक्षात आल्याने चालक आणि मदतनीस यांनीं विद्यार्थ्यांना बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना खारघर सेक्टर १५ येथे साडेबाराच्या सुमारास घडली. बातमी वाचा सविस्तर…
ओळखीतील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. या प्रकरणी निलेश श्रीधर ताटे (वय ३५, रा. कर्वेनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास सुनील कांबळे (वय ३३) याने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मध्य रेल्वे प्रशासन मुंबई ते बदलापूर दरम्यान रद्द झालेल्या वातानुकूलित लोकल पुन्हा सुरू करण्यास इच्छुक आहे. याबाबत प्रवाशांना कोणतीही हरकत किंवा सूचना असल्यास त्यांनी स्थानक व्यस्थापक कार्यालयाशी २० सप्टेंबर पर्यंत संपर्क साधावा. असा सूचना फलक बदलापूर रेल्वे स्थानकात लावण्यात आला आहे.
कल्याण : गणेशोत्सवाच्या अकरा दिवसाच्या कालावधीत रेवदंड्याचे नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि कल्याण डोंबिवली पालिकेने यांनी १७५ टन निर्माल्य कल्याण, डोंबिवलीतील गणपती विसर्जन ठिकाणे, गणेश घाटावरुन जमा केले आहे. बातमी वाचा सविस्तर…
सहाव्या वर्गात शिकत असलेल्या मुलाला पहिल्या शैक्षणिक सत्रात कमी गुण मिळाल्याने पती-पत्नी दोघेही तणावात होते. पतीने पत्नीला मुलाच्या प्रगतीपुस्तक बघून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. बातमी वाचा सविस्तर…
ठाणे/अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील सहा जनावरांना याची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील तीन, अंबरनाथ तालुक्यातील एक आणि भिवंडी तालुक्यातील दोन जनावरांचा समावेश आहे. बातमी वाचा सविस्तर…
मुंबईतील टॅक्सी चालक संघटनांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून टॅक्सी चालक संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. टॅक्सीचे किमान प्रवासी भाडे १० रुपयांनी वाढवावे, अशी टॅक्सी चालकांची प्रमुख मागणी आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात स्थिर, फीरते किंवा तात्पुरत्या स्वरुपात फेरीवाला व्यवसाय करायचा असल्यास पालिकेकडे नोंद करुन अधिकृत फेरीवाला प्रमाणपत्र मिळवून परवानगी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. बातमी वाचा सविस्तर…
गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर पुनर्विकास (पत्राचाळ) प्रकल्पात घर खरेदी करणारे ग्राहक अखेर आता आक्रमक झाले आहेत. गेली आठ वर्षे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या या ग्राहकांनी आपल्या इमारतींना म्हाडाने त्वरित निवासी दाखला द्यावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी या ग्राहकांनी बुधवारी मोर्चाची हाक दिली आहे . बातमी वाचा सविस्तर…
पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम रेल्वे स्थानकात चालत्या लोकलमधील प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्यास मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन बारा तासात अटक केली. बातमी वाचा सविस्तर…
एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोलापुरात जोरदार टोलेबाजी केली आहे. आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे. चकवा योग्य बसला तर अंगावर गुलाल पडतो. मात्र, चकवा हुकला तर पाच वर्षे घरी बसावं लागतं, हे आमचं दु:ख आहे, असं विधान शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. ते सोलापुरात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. सविस्तर बातमी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी कोकणातील राजापूर दौऱ्यावर होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिली आहे. नाना पटोले यांच्यासमोरच संबंधित नेत्यानं प्रक्षोभक भाषण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर बातमी
मागील ४८ तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने गडचिरोली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयपासून पुन्हा एकदा संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून ८ मार्ग बंद झाले आहेत.
कायदा-सुव्यवस्था तसेच गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण विचारात घेता पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित ठरले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालात पुणे शहर ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिलांसाठी सुरक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विदर्भातील शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक व्याप्ती असलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीत ‘शिवपरिवारा’ने अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हाती पुन्हा एकदा संस्थेची धुरा सोपवली आहे. हर्षवर्धन देशमुख यांच्या प्रगती पॅनेलने नऊ पैकी आठ जागा जिंकून कार्यकारिणीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बातमी वाचा सविस्तर…
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोमवारी भाज्यांची नेहेमीपेक्षा आवक जास्त झाली आहे. मात्र टोमॅटोची पावसामुळे उत्पादन खराब होत असल्याने आवक घटली असून दरात ८ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. गणेशोत्सव आणि मागील आठवड्यात सलग सुट्ट्यांमुळे बाजारात आवक कमी होती. बातमी वाचा सविस्तर…
मच्छीमारांसाठी बोटी दुरुस्तीसाठी करंजा बंदरात उभारण्यात येत असलेले साडे नऊ कोटी खर्चाचे ड्रायडॉक आठ वर्षांपासून अपुर्ण अवस्थेत पडून असून ड्राय डॉकच नसल्याने नौका दुरुस्तीच्या कामासाठी येथील शेकडो मच्छीमारांची गैरसोय होत आहे. बातमी वाचा सविस्तर…
पनवेलमध्ये नव्याने पक्षबांधणी करणा-या शिवसेनेच्या शिंदे गटाने पनवेलच्या शहरीवस्तीमध्ये स्वताच्या पक्षाची मोट बांधण्याचे धोरण आखून महाविकास आघाडीतील शेकाप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांना गळीस लावले आहे. बातमी वाचा सविस्तर…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. नितीन गडकरी यांची जर भाजपमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, अशी ऑफर पटोले यांनी दिली होती. आता पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते संजय कुटे यांनी जोरदार टीका केली आहे.
अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.