Mumbai-Pune Latest News , 18 Oct 2022 : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादहून एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. काल(सोमवारी) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थक खासदारांपैकी एक असलेल्या राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. तसेच आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असंही विचारे यांनी म्हटलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Breaking News Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा वेगवान आढावा
मुंबई : पालिकेच्या शाळेतील मुलांचा गणवेश यंदा बदलण्यात आला असून नवीन गणवेशाचा पुरवठा अखेर सुरू झाला आहे. मुलांना सोमवारपासून गणवेश देण्यास सुरुवात झाली. मोठ्या वर्गातील मुलांसाठी तपकिरी रंगाचा गणवेश व शिशुवर्गातील मुलांसाठी लाल रंगाचा गणवेश दिला जाणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
मलवाहिनीची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मलवाहिनीच्या ‘मॅनहोल’मध्ये प्रवेश न करता ते सुरक्षितपणे स्वच्छ करता यावे, यासाठी यंत्रमानवांचा वापर केला जाणार आहे.
प्रेयसीचे अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन प्रेयसीला एक लाख रुपये खंडणीची मागणी केली. बदनामी होऊ नये म्हणून प्रेयसीने चक्क आईचे जवळपास एक लाख रुपयांचे दागिने प्रियकराच्या स्वाधीन केले.
प्रियकराचा चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याने नैराश्यात असलेल्या प्रेयसीनेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रिया ऊर्फ साक्षी धीरज लाऊत्रे (पंचशीलनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. बातमी वाचा सविस्तर…
राज्य सरकारने यंदा दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो रवा, साखर, हरभरा डाळ आणि पामतेल या चार वस्तूंचा संच अवघ्या शंभर रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या संचचे वाटप करण्यात येणार आहे .
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदिप या निवासस्थान परिसरात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकरीता नितीन उड्डाणपुलाखाली विश्रामगृह तसेच स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. या संबंधीच्या कामाची निविदा ठाणे महापालिका प्रशासनाने काढली असून यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसांची होणारी गैरसोय दूर होण्याची शक्यता आहे. बातमी वाचा सविस्तर…
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील कोपर उड्डाण पुलाजवळ मंगळवारी सकाळी सात वाजता कोपर पुलावरुन भरधाव वेगाने येत असलेल्या एक मिनी बसने साऊथ इंडियन शाळेसमोर दोन धावत्या रिक्षा, दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिली. बातमी वाचा सविस्तर…
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील कोपर उड्डाण पुलाजवळ मंगळवारी सकाळी सात वाजता कोपर पुलावरुन भरधाव वेगाने येत असलेल्या एक मिनी बसने साऊथ इंडियन शाळेसमोर दोन धावत्या रिक्षा, दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन रिक्षा रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या तर दुचाकी स्वार रस्त्यावर पडले. या धडकेमध्ये तीन विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सविस्तर वाचा
samruddhi mahamarg inauguration: दिवाळीच्या एक दिवस आधीच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जनतेला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. नागपूर-मुंबई ‘समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार असून यासंदर्भातील तारीखही जवळजवळ निश्चित करण्यात आल्याचं एका खासगी वृत्तवाहिनीने दिलं आहे. येत्या २३ तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील या सर्वात मोठ्या महामार्गाचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मात्र यासंदर्भातील वेळ आणि तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित झाल्यानंतरच सरकारकडून घोषणा केली जाणार आहे. सविस्तर वाचा
पुणे शहर आणि परिसरात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस मध्यरात्री पर्यन्त सुरू होता.या मुसळधार पावसामुळे पर्वती येथील रमणा गणपतीजवळ भिंतीचा काही भाग कोसळला.तर शहरातील अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटनांमुळे वाहनांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल असून एका दुचाकीवर झाड पडल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्याच दरम्यान तब्बल १२ नागरिक पावसात अडकून पडले होते.त्या सर्वांची सुटका अग्निशामक विभागाच्या अधिकारी,कर्मचार्यांनी केली. सविस्तर वाचा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने या निवडणुकीसंदर्भातील चर्चा दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र फडणवीस यांच्या या दौऱ्याचं मुख्य कारण भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक हे आहे.