Mumbai- Maharashtra News Updates in Marathi : राज्यात सत्तांतर झालं असलं तरी अद्याप खरी शिवसेना कोण? यासंबंधी निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकांवर निर्णय प्रलंबित असून, निवडणूक आयोगानेही अद्याप कोणता निर्णय दिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांच्यावर सतत टीका आणि आरोप होत आहेत. एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेला अनेकदा प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आलेला हा दुरावा कमी होणार का? अशी विचारणा केली असता एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेचा शिवसेनेनं सामाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निरागस आणि निष्पाप आहेत असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर हा केवळ विरोधी पक्षांविरोधात केला जात असल्याचं अधोरेखित करताना शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहीत त्यांच्यासोबत असणाऱ्या १० बंडखोर आमदारांविरोधात ईडीची कारवाई सुरु होती अशी आठवण विरोधकांवर भ्रष्टाचाराची टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदींना करुन दिली आहे. भ्रष्टाचारावरुन विरोधकांवर आरोप करणाऱ्या मोदींना लक्ष्य करत भ्रष्टाचाऱ्यांचे गट बनवून भाजपाच सरकारे पाडत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

Live Updates

Maharashtra Political Crisis Live Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

17:59 (IST) 6 Sep 2022
अलिबाग : गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासात वाहतुक कोंडीचे विघ्न

गौरी गणपतीचा सण साजराकरून गणेशभक्त मंगळवारी परतीच्या प्रवासाला लागले. मात्र माणगाव ते लोणेरे दरम्यान त्यांना वाहतुक कोंडीच्या विघ्नाला सामोरे जावे लागले. गौरीगणपतींचे सोमवारी उत्साहात विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला गणेशभक्तांनी भक्तीभावाने निरोप दिला. यानंतर मंगळवारी गणेशभक्त परतीच्या मार्गाला लागले. बातमी वाचा सविस्तर...

17:31 (IST) 6 Sep 2022
ठाणे : यंदाही पर्यावरणपुरक विसर्जन परंपरा कायम

करोना संसर्ग कमी झाल्यामुळे सण आणि उत्सवांवरील निर्बंध राज्य सरकारने हटविल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याबरोबरच ठाणेकरांनी पर्यावरणपुरक विसर्जनाची परंपरा कायम राखल्याचे दिसून येत आहे. बातमी वाचा सविस्तर...

16:43 (IST) 6 Sep 2022
मुंबई : तडीपार आरोपीने पोलिसावर केला चाकूने हल्ला

मशीद बंदर येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर तडीपार आरोपीने चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी २६ वर्षीय आरोपीला अटक केली. या आरोपीविरोधात यापूर्वी चार गुन्हे दाखल असून त्याला मुंबईतून तडीपार करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर...

16:27 (IST) 6 Sep 2022
पुणे : औंधमध्ये पादचारी ज्येष्ठाचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू

पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना ओैंध परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भीमराव कांबळे (वय ६९, रा. राजेंद्रप्रसाद शाळेजवळ, बोपोडी) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर...

16:26 (IST) 6 Sep 2022
मागील सीटवरील प्रवाशांनी सीट बेल्ट न लावण्याच्या मुद्द्यावरुन गडकरी संतापून म्हणाले, “सामान्यांचं राहू द्या मुख्यमंत्रीही…”

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर कार आणि रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यादरम्यान, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील सीट बेल्टचा मुद्दा उपस्थित केला असून, जोपर्यंत लोक सहकार्य करत नाहीत तोपर्यंत रस्ते अपघात रोखण्यासाठीचे प्रयत्नांना व्यर्थ आहेत असं सांगत खंत व्यक्त केली आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनावर यावेळी त्यांनी शोकही व्यक्त केला.

सविस्तर बातमी

16:04 (IST) 6 Sep 2022
पुणे : लोहगावमध्ये डंपरच्या धडकेत सायकलस्वार शाळकरी मुलीचा मृत्यू

शिकवणीला जात असलेल्या सायकलस्वार शाळकरी मुलीचा भरधाव डंपरच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . बातमी वाचा सविस्तर...

15:47 (IST) 6 Sep 2022
मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार ; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

पुणे : आमच्या आरपीआय पक्षाने सगळ्या पक्षांना ताकत दिली आहे. माझी पार्टी मोठी नाही. पण आम्ही दुसऱ्या पक्षाला भक्कम बनवत आहे. अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होतो. त्यांना ताकद दिली. आता भाजप सोबत आहे आता भाजपला ताकद दिली आहे. राज्यात सध्या महायुतीच सरकार आले आहे. यात आम्हाला 1 मंत्रिपद मिळावे आणि १२ आमदारांमध्ये एक जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आमची आहे. बातमी वाचा सविस्तर...

15:10 (IST) 6 Sep 2022
डोंबिवली : खंबाळपाडा भोईरवाडीतील रस्त्यासाठी २०१४ मध्ये चार कोटी मंजूर

डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा भोईरवाडी भागात नव्याने बांधण्यात आलेल्या गृहसंकुल भागातील रस्त्यांची दुदर्शा झाली आहे. बारही महिने या भागातील रहिवासी खड्डे, माती, धुळीतून येजा करतात. या भागातील खराब रस्त्यांमुळे रिक्षा चालक प्रवासी वाहतुकीसाठी भोईरवाडी भागात येत नाही, अशा या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. बातमी वाचा सविस्तर...

15:00 (IST) 6 Sep 2022
चंद्रपूर : जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट

सावली तालुक्यातील गायडोंगरी येथील दोन भावांमध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट झाला. जमिनीवरून उद्भवलेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केला. मनोहर निंबाजी गुरुनुले (६२), शारदा मनोहर गुरुनुले (५०), अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. बातमी वाचा सविस्तर...

14:08 (IST) 6 Sep 2022
पुणे : चांदणी चौक परिसरातील सेवा वाहिन्यांच्या स्थलांतराला गती

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एनडीए-मुळशी रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याने या भागातील विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या काढून घेण्याच्या कामाला गती मिळाली आहे. येत्या काही दिवसांत सेवा वाहिन्या स्थलांतरित केल्या जाणार आहेत. बातमी वाचा सविस्तर...

13:41 (IST) 6 Sep 2022
उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात ऐन गणेशोत्सवात वीज चोरी विरोधात मोहीम

नागपूर : महावितरणने ऐन गणेशोत्सवात उपराजधानीतील इंदोरा, लष्करीबाग, जरीपटका, नारा, कामठी इत्यादी भागात सोमवारी वीज चोरी विरोधात मोहिम राबवली. त्यात तब्बल ६१ जणांना चोरी करतांना पकडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बातमी वाचा सविस्तर...

13:18 (IST) 6 Sep 2022
विदर्भात करोनाच्या बीए २.७५ उपप्रकाराचे रुग्ण अधिक

नागपूर : नागपूरसह विदर्भात आता करोनाच्या ‘ओमायक्राॅन’मधील ‘बीए’ २.७५ उपप्रकारातील रुग्ण वाढल्याची माहिती आरोग्य विभागाच्या निरीक्षणात पुढे येत आहे. पूर्वी येथे बीए – ४ आणि बीए – ५ उपप्रकाराचे रुग्ण आढळत होते. बातमी वाचा सविस्तर...

13:03 (IST) 6 Sep 2022
मालमत्ता करातील चाळीस टक्के सवलत पुनर्स्थापित न केल्यास निवडणुकीत ‘नोटा’ अस्त्राचा वापर

पुणे : मालमत्ता करातील चाळीस टक्के सवलत पुनर्स्थापित करण्याचा शासन निर्णय महापालिका निवडणुकांआधी झाला नाही तर, नागरिकांना आगामी महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ अस्त्राचा वापर करावा लागेल, असा इशारा सजग नागरिक मंचाच्या सभेत देण्यात आला. बातमी वाचा सविस्तर...

12:58 (IST) 6 Sep 2022
डोंबिवली : विद्यार्थ्याला बस चालकाने २५ मीटर फरफटत नेले

कल्याण शिळफाटा रस्त्याने भरधाव वेगाने बस चालवित चालेल्या एका बस चालकाने बस समोरील दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकी बसच्या पुढील भागात अडकून दुचाकी स्वारांसह बस २५ मीटर पुढे नेऊन दुचाकी वरील मुलांना फरफटत नेले. बातमी वाचा सविस्तर...

12:24 (IST) 6 Sep 2022
मुंबई : गौरी-गणेशाला निरोप ; ४८ हजारांहून अधिक गौरी-गणपतींचे विसर्जन

दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असून गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालेल्या गणपतीची आणि त्यानंतर आलेल्या गौरीची षोडशोपचार पूजा केल्यानंतर सोमवारी भाविकांनी त्यांना निरोप दिला. मंगळवारी पहाटेपर्यंत गौरी-गणपतीचा विसर्जन सोहळा सुरू होता. बातमी वाचा सविस्तर...

12:24 (IST) 6 Sep 2022
डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्दुल्ल्यांचा प्रवाशांना उपद्रव

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर दररोज मद्यपी, गर्दुल्ले जागोजागी बसले असल्याने त्यांच्यातून वाट काढून स्थानकात जाणे प्रवाशांना जिकरीचे होत आहे. रात्रीपासून ते दिवसभर गर्दुल्ले खाण्याचे साहित्य, दुर्गंधी येत असलेले कपडे जवळ घेऊन पादचारी पुलावर काही बसलेले, काही झोपलेले असतात. बातमी वाचा सविस्तर...

12:15 (IST) 6 Sep 2022
वर्धा : एसटी चालकांना आततायीपणा नडला; पुराच्या पाण्यातून बस चालवणारे सहा चालक निलंबित

आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी वाहत असतांना परिवहन मंडळाच्या काही चालकांनी पुरात बस चालविण्याचा धोका पत्करला. ते सुखरूप दुसऱ्या तिरावर पोहचले. मात्र, चालकांचे हे धाडस पाहून गावकऱ्यांनी आरडाओरड केली. त्याची तक्रार प्रशासनाकडे झाली.

सविस्तर वाचा...

11:51 (IST) 6 Sep 2022
पुणे जिल्हा बँकेच्या कायम कर्मचाऱ्यांना ; सरसकट दहा टक्के पगारवाढ

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सेवेतील कायम कर्मचाऱ्यांना सरसकट दहा टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. ही पगारवाढ १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:49 (IST) 6 Sep 2022
जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली ‘पल्याड’ची दखल

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘पल्याड’ या मराठी चित्रपटाची दखल अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली आहे. ‘फोर्ब्स’ने दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांची घेतलेली संपूर्ण मुलाखत आणि चित्रपटाविषयीची माहिती त्यांच्या मासिकात व ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे.

सविस्तर वाचा...

11:35 (IST) 6 Sep 2022
मध्य रेल्वेच्या मार्गावर सामान्य लोकल रद्द करून वातानुकूलित लोकल सुरू

ठाणे : मध्य रेल्वेच्या मार्गावर गर्दीच्या वेळेत चालविण्यात येत असलेल्या वातानुकूलित लोकल प्रवाशांकडून विरोध होत असतानाच, रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी सामान्य लोकल रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित लोकल सुरू केल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट द्वारे केला आहे. ही लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी करत हे प्रकरण हाताच्या बाहेर जाण्याच्या आधी निर्णय घ्या, असा सूचक इशाराही त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:12 (IST) 6 Sep 2022
मुंबई : ताडदेव आरटीओच्या हेल्पलाईनवर १५ टॅक्सीचालकांविरोधात तक्रार

काळी-पिवळी आणि मोबाइल ॲपआधारित टॅक्सीच्या चालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी ताडदेव आरटीओने एक पाऊल पुढे टाकले असून दक्षिण मुंबईतील प्रवाशांनी हेल्पलाईनवर केलेल्या तक्रारींची दखल घेत ताडदेव आरटीओने १५ पैकी पाच टॅक्सीचालकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:10 (IST) 6 Sep 2022
“मी काय अंगठाछाप मंत्री, वेडा वाटलो का?,” हाफकिनसंबंधी ‘त्या’ वक्तव्याबाबत विचारताच तानाजी सावंत संतापले

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर तानाजी सावंत यांच्या नावे एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये तानाजी सावंत यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बद करा असा सल्ला दिल्याचा दावा आहे. तसंच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यावरुन तानाजी संताप संतापले असून टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. तुम्हाला अंगठाछाप मंत्री दिसतो का? असा प्रश्न त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला आहे.

सविस्तर बातमी

11:08 (IST) 6 Sep 2022
दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

शिवसेना पक्षसंघटनेवरील नियंत्रणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची राजकीय ओळख असलेला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचे प्रस्थापित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने घेतला आहे. त्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबरच भाजपकडून रसद मिळावी, यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेही उपस्थित असतील यासंबंधी तर्क-वितर्क लढवले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

11:07 (IST) 6 Sep 2022
उद्धव ठाकरे आणि तुम्ही पुन्हा एकत्र येणार का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

राज्यात सत्तांतर झालं असलं तरी अद्याप खरी शिवसेना कोण? यासंबंधी निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकांवर निर्णय प्रलंबित असून, निवडणूक आयोगानेही अद्याप कोणता निर्णय दिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांच्यावर सतत टीका आणि आरोप होत आहेत. एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेला अनेकदा प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आलेला हा दुरावा कमी होणार का? अशी विचारणा केली असता एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी

11:06 (IST) 6 Sep 2022
Sunil Gavaskar on Virat Kohli: धोनीबद्दलचं विराट कोहलीचं ‘ते’ विधान सुनील गावसकरांना जिव्हारी लागलं

‘आशिया कप’मधील सुपर ४ मध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने भावूक होत अनेक खुलासे केले. यावेळी त्याने मी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर केवळ महेंद्रसिंह धोनीने मला संदेश पाठवला, असा खुलासा केला. विराट कोहलीच्या या खुलाशानंतर त्याचा इशारा नेमका कोणाकडे आहे यासंदर्भात चर्चा सुरु असताना, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोहलीने कोणाचंही नावे घेतले नसलं, तरी तो भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्याविषयी बोलत असल्याची शक्यता आहे. मला २० मिनिटं कोहलीला मार्गदर्शन करता आलं, तर फलंदाजीत कोणते बदल करावेत हे मी त्याला सांगू शकेन, असं गावस्कर एका मुलाखतीत म्हणाले होते.

सविस्तर बातमी

10:54 (IST) 6 Sep 2022
उल्हासनगर : जेवण वाढण्यास नकार दिल्याने पत्नीला मारहाण ; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

जेवण वाढण्यास नकार दिल्याने राग येऊन पतीने आपल्या पत्नीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे. त्यावेळी मुलालाही दुखापत झाली असून दुखापतग्रस्त बहिणीला दवाखान्यात नेणाऱ्या मेव्हण्यालाही या महिलेच्या पतीने मारहाण केली. बातमी वाचा सविस्तर...

10:39 (IST) 6 Sep 2022
“तू ठाकरे है, तो मैं भी….”; नवनीत राणांची एकेरी भाषेत उद्धव ठाकरेंवर टीका

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि उद्धव ठाकरेंमध्ये हनुमान चालीसावरुन सुरु झालेला वाढ दिवसेंदिवस वाढत आहे. जळगावात नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर ऐकेरी भाषा वापरत टीका केली आहे.

सविस्तर बातमी

 

 

maharashtra-live

अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Story img Loader