Maharashtra Political Crisis Updates, 04 October 2022 : राज्यातील सत्तांतरानंतर पहिलीच पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आपली ताकद दाखवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच नवरात्रीनिमित्तही अनेक राजकीय भेटीगाठी होत आहेत. विशेष म्हणजे दसऱ्याच्या दिवशी (५ ऑक्टोबर) होत असलेल्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या मेळाव्यावरूनही दोन्ही गट एकमेकांविरोधात भिडले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आलेली कथित धमकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळल्याचा इशारा यावरही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एकूणच राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर सर्वच घटनांचा आढावा एकाच ठिकाणी…

Live Updates

Maharashtra Latest News Updates in Marathi : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

18:52 (IST) 4 Oct 2022
घराला आग लागल्याचा बनाव करत पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले, तपासात धक्कादायक कारण उघड

कौटुंबिक वादातून डोंबिवलीमध्ये आरोपी पतीने पत्नीसह स्वतःच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे आरोपीने आधी घराला आग लागल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी आरोपीचा बनाव उघडा पाडला. या घटनेत आरोपीच्या पत्नीसह दोन्ही मुलींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

सविस्तर बातमी...

18:15 (IST) 4 Oct 2022
दसरा मेळाव्यावरून शरद पवारांकडून ठाकरे-शिंदे गटाला मर्यादा पाळण्याचा सल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्यांनी..."

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झालीय. अशातच दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याची घोषणा करत जय्यत तयारी केली. त्यामुळे दसरा मेळाव्याला दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले होणार असल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनाही टीका करताना मर्यादा पाळा असा सल्ला दिला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मंगळवारी (४ ऑक्टोबर) मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर बातमी...

18:15 (IST) 4 Oct 2022
"तीन महिन्यात ५७ पैकी सर्वाधिक धोरणात्मक निर्णय भाजपाच्या मंत्र्यांचे", विरोधकांच्या टीकेवर फडणीस म्हणाले...

"मागील तीन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारने ५७ धोरणात्मक निर्णय घेतले. मात्र, यापैकी सर्वाधिक निर्णय भाजपाच्या मंत्र्यांचे आहेत. मंत्रिमंडळावर फडणवीसांचं नियंत्रण आहे," असा आरोप विरोधकांकडून होत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला असता त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "हे निर्णय भाजपा घेतंय, की शिवसेना घेतंय हे महत्त्वाचं नाही," असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (४ ऑक्टोबर) मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा...

17:32 (IST) 4 Oct 2022
स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा

पुणे : स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्डा चालविणाऱ्यासह १७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बातमी वाचा सविस्तर ...

17:20 (IST) 4 Oct 2022
‘विजय’ आणि ‘विराट’ एपीएमसीमध्ये दाखल, पार पडला लाँचिंग सोहळा

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील एपीएमसी मार्केट मध्ये ‘विजय’ आणि ‘विराज’ असे नव्याने विकसित करण्यात आलेल्या जातीची कलिंगड दाखल झाले आहेत. या दोन जातींच्या कलिंगडाचा लॉंचिंग सोहळा एपीएमसी मध्ये पार पडला. बातमी वाचा सविस्तर ...

16:44 (IST) 4 Oct 2022
गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी स्फूर्तिगीत

जळगाव : मुंबई येथील बीकेसी मैदानावर बुधवारी होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेना स्फूर्तिगीत तयार करण्यात आले आहे. मंगळवारी हे गीत मुंबई येथील कार्यक्रमात सर्वांसाठी प्रसारित करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर ...

16:20 (IST) 4 Oct 2022
समाजमाध्यमावरील ओळख महागात ,उच्चशिक्षित महिलेची तीन लाखांची फसवणूक

पुणे : समाजमाध्यमावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री एका उच्चशिक्षित महिलेला महागात पडली. परदेशात डाॅक्टर असल्याची बतावणी करणाऱ्या चोरट्याने भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेची तीन लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बातमी वाचा सविस्तर ...

15:52 (IST) 4 Oct 2022
पुणे विद्यापीठातील शुल्कवाढ मागे घेतलीच पाहिजे

पुणे : स्वातंत्र्याच्या वेळी आम्हाला मोफत शिक्षणाचे आश्वासन दिले होते. सरकारने आईच्या दुधाप्रमाणे शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शुल्कवाढ मागे घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर मोफत शिक्षण मिळाले पाहिजे ही मागणी असायला हवी. बातमी वाचा सविस्तर ...

15:10 (IST) 4 Oct 2022
उरणमधील जलवाहिनी दुरुस्त मात्र आणखी दोन दिवस पाण्याची प्रतीक्षा

उरण : नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे जलववाहिनीला गळती लागल्याने शुक्रवार पासून मागील तीन दिवस खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह उरण – पनवेल मधील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बातमी वाचा सविस्तर ...

14:59 (IST) 4 Oct 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कुलदैवत कोनजाई देवीचे दर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवरात्रोत्सवात मंगळवारी (४ ऑक्टोबर) सपत्निक रायगडमधील कोंडजाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी खण नारळाने देवीची ओटी भरून मनोभावे आरती व पूजा करण्यात आली. सलग दोन वर्षे कोरोनाच्या महामारीत शासन निर्बंध असल्याने राज ठाकरे व कुटुंबीयांना नवरात्रोत्सवात येऊन प्रत्येक्ष दर्शन घेता आले नव्हते.

राज ठाकरे दरवर्षी आपल्या कुटुंबीयांसह सुधागड तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीने दाटलेल्या व कड्याकपारीत वसलेल्या नागशेत विभागातील श्री कोंडजाई देवीची मनोभावे पूजा करून दर्शन घेतात. . राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पालीत अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.

यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली यांच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.

14:56 (IST) 4 Oct 2022
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यातून २३० बसेसची नोंदणी

जळगाव : शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईत बुधवारी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांचा स्वतंत्र दसरा मेळावा होत आहे. जिल्ह्यातून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २३० बसगाड्यांची नोंदणी करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले. बातमी वाचा सविस्तर ...

14:49 (IST) 4 Oct 2022
ईडी प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन, न्यायालयाचा निर्णय

ईडी प्रकरणात अनिल देशमुखांना न्यायालयाने जामीन दिला आहे. मात्र, अद्यापही त्यांच्यावर सीबीआयचाही खटला आहे. त्यामुळे लगेचच त्यांची सुटका होणार नाही. आता सीबीआय प्रकरणात न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

14:00 (IST) 4 Oct 2022
पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार एनसीसीचे प्रशिक्षण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासह राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण घेता येणार आहे. विद्यापीठाला शंभर विद्यार्थ्यांच्या एनसीसी तुकडीला मान्यता मिळाली असून, या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना चार क्रेडिट श्रेयांक मिळतील. बातमी वाचा सविस्तर ...

13:33 (IST) 4 Oct 2022
पुणे जिल्ह्यात २८ जणांना नव्याने करोना संसर्ग

पुणे : सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील २८ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. बातमी वाचा सविस्तर ...

13:32 (IST) 4 Oct 2022
पुण्यातील स्वच्छ संस्थेची ‘व्ही-कलेक्ट’ मोहीम

पुणे : दिवाळीनिमित्त घरोघरी केलेल्या स्वच्छतेवेळी जुन्या, मात्र उपयुक्त वस्तूंचे पर्यावरणपूरक संकलन करण्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या वतीने ‘व्ही कलेक्ट’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या सोळा ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात राबविली जाईल. बातमी वाचा सविस्तर ...

13:24 (IST) 4 Oct 2022
CNG-PNG Price: सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ

CNG-PNG Price Today: ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली आहे. सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपयांची तर घरगुती गॅसच्या किमतीमध्ये चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत ही दरवाढ केली आहे.

सविस्तर बातमी-

12:23 (IST) 4 Oct 2022
मोठी बातमी! संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दसरा तुरुंगातच जाणार आहे. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १० ऑक्टोबरलाच त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. यामुळे शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात संजय राऊत हजर राहू शकणार नाहीत.

सविस्तर बातमी

12:16 (IST) 4 Oct 2022
दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा

शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याबाबत नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. दसरा मेळाव्यातील या भाषणांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना इशारा दिला आहे.

सविस्तर बातमी

12:04 (IST) 4 Oct 2022
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नुकसानीबाबत पीडब्ल्यूडीकडून केली जातेय टोलवाटोलवी

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या छताचे पीओपी आच्छादन शुक्रवारी (३० सप्टेंबर) झालेल्या वादळी पावसामुळे कोसळले. त्यामध्ये नेमके किती नुकसान झाले याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. बातमी वाचा सविस्तर ...

11:54 (IST) 4 Oct 2022
नंदुरबारमध्ये पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उध्वस्त

नंदुरबार : शहादा तालुक्यातील सटीपाणी गावच्या परिसरात कापसाच्या शेतात केली जाणारी गांजाची शेती पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या शेतातून गांजाची १५० झाडे जप्त करण्यात आली. बातमी वाचा सविस्तर ...

11:54 (IST) 4 Oct 2022
“गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी छोटीशी भेट”; जम्मू कारागृह महासंचालकांच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेचा इशारा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी एक मोठी घटना घडली आहे. जम्मू-काश्मीर कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता त्यांच्या हत्येची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असणाऱ्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट ( पीएएफएफ ) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

सविस्तर बातमी...

11:51 (IST) 4 Oct 2022
पुण्यात चुलीवरचा दिवाळी फराळ

पुणे : वर्षभरात केवळ पंधरा सिलिंडर देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर दिवाळीचा फराळ करत या निर्णयाचा निषेध केला. बातमी वाचा सविस्तर ...

11:50 (IST) 4 Oct 2022
चांदणी चौक पूल : बांधण्याचा खर्च २५ लाख; पाडण्याचा खर्च दीड कोटी!

पुणे : बहुचर्चित चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी तीन दशकांपूर्वी २५ लाख रुपये खर्च आला होता. मात्र, हा पूल पाडण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च आला. हा पूल उभारणाऱ्या बार्ली कंपनीचे सतीश मराठे यांनी या माहितीवर प्रकाश टाकला आहे. बातमी वाचा सविस्तर ...

11:49 (IST) 4 Oct 2022
J-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

जम्मू काश्मीर कारागृहाचे महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. जम्मूतील उदयवाला भागातील एका घरात लोहिया यांचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक तपासानुसार लोहिया यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

सविस्तर बातमी...

11:48 (IST) 4 Oct 2022
“…तेव्हा मी मरता मरता वाचलो”; गिरीश महाजनांनी फोनवरुनच अधिकाऱ्यांना झापलं! अधिकाऱ्यांना विचारलं, “अजून किती लोक मेल्यावर…”

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये फोन कॉलवरुन विविध समस्या सोडवल्याचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत होते. अशाच प्रकारे शिंदे स्टाइलमध्ये आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. इतकच नाही तर या अधिकाऱ्यांशी बोलताना महाजन यांनी आपणच या सदोष रस्त्यावरुन जाताना दोन-तीन वेळा मरता मारता वचलो आहे. किती मृत्यू झाल्यानंतर तुम्हा अधिकाऱ्यांना जाग येणार आहे असा सवाल विचारत महानज यांनी तातडीने काम सुरु करुन महिन्याभरात कामाचं टेंडर काढण्याचे आदेश दिलेत.

सविस्तर बातमी...

11:47 (IST) 4 Oct 2022
Dasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”

सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष दसरा मेळाव्यावर आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गट आणि शिवसेनेमधील संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेने दसरा मेळाव्यात विचार नाही, तर नाटकं पहायला मिळतील अशी टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांचं वस्त्रहरण करतील अशी टीका केली आहे. दोन्ही गटाला समर्थन देणाऱ्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे असंही ते म्हणाले.

सविस्तर बातमी...

11:46 (IST) 4 Oct 2022
गुजरातमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात तुफान दगडफेक, सहाजण जखमी

गुजरातमधील खेडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात झालेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाले आहेत. उंधेला गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील प्रमुखांनी हा गरबा कार्यक्रम आयोजित केला होता. येथून जवळच मंदिर आणि मशीद आहे. कार्यक्रम सुरु होण्याआधी काही लोकांनी येऊन तो बंद करण्यास सांगितलं. यानंतर केलेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाले आहेत.

सविस्तर बातमी...

Maharashtra Latest News in Marathi

Maharashtra Latest News Updates in Marathi : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट<br />