Mumbai News Today, 29 August 2023: राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार व शरद पवार गटांदरम्यान राजकीय कलगीतुरा आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. याच बैठकीमध्ये इंडिया आघाडीचं चिन्हही जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Marathi Breaking News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

19:47 (IST) 29 Aug 2023
‘गोकुळ’च्या गैर कारभाराविरोधात सभा घेणार – शौमिका महाडिक

गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सप्टेंबरच्या मध्यास होणा आहे. त्यापूर्वी तालुका निहाय सभा घेऊन गोकुळ दूध संघातील गैरकारभाराचा पाढा वाचला जाणार आहे, असे गोकुळच्या विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

सविस्तर वाचा

19:40 (IST) 29 Aug 2023
बचत गटाला स्वावलंबी बनवण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचा अभिनव प्रयोग

बचत गटात तयार केलेले गृह उपयोगी व खाद्यपदार्थांची शहरी भागात विक्री करताना इंग्रजीचा येणारा अडथळा दूर करण्यासाठी डहाणू तालुक्यातील पेठ गावातील भगिनींसाठी एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या गृहस्थाने इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत.

सविस्तर वाचा

19:23 (IST) 29 Aug 2023
“भाजपला सत्ता मिळण्याची खात्री नसल्याने पुन्हा…”, प्रणिती शिंदे यांचा सावधानतेचा इशारा

सोलापूरसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने संपूर्ण अपयशी कारभार केला असल्यामुळेच निवडणुका घ्यायला महायुती सरकार घाबरत आहे. केवळ तांत्रिक कारण पुढे केले जात आहे. खरोखर हिंमत असेल तर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे.

सविस्तर वाचा

19:22 (IST) 29 Aug 2023
इचलकरंजी शहराचे पाणी स्त्रोत, गरज याचे लेखापरीक्षण करावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

दूधगंगा काठावरील राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर, शिरोळ, चिकोडी व निपाणी तालुक्यांसह दूधगंगा काठावरील नागरिक व शेतकऱ्यांचे  इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकुड योजनेमुळे होणाऱ्या नुकसानीची सविस्तर माहिती दूधगंगा बचाव कृती समितीच्या सदस्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत एका बैठकीत दिली.

सविस्तर वाचा

17:50 (IST) 29 Aug 2023
अजित पवारांचे द्वितीय पुत्र जय पवारही राजकारणात नशीब आजमावणार? म्हणाले “अजित दादांनी…”

जय पवार मंगळवारी बारामतीत आले होते. त्यांनी बारामतीमधील शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी ‘जय दादा यांनी बारामतीमध्ये सक्रिय होण्याची प्रेमळ मागणी केली.

वाचा सविस्तर…

17:00 (IST) 29 Aug 2023
मुंबई : मोबाइल चोरणारी तरुणी अटकेत

मुंबई : गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशाच्या खिशातून मोबाइल चोरणाऱ्या तरुणीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. या तरुणीने चोरलेला मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला असून ही तरुणी सराईत मोबाइल चोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा…

16:58 (IST) 29 Aug 2023
रहिवाशांच्याा आंदोलनाने यंत्रणा हलली अन् पर्यायी रस्त्याच्या कामाला सुरुवात; वाचा नेमकं प्रकरण काय आहे ते…

उत्तर नागपुरातील उप्पलवाडी- नारी एस.आर.ए. पुनर्वसन वसाहतीला शहराशी जोडणारा रस्ता व मूलभूत नागरी सोयी -सुविधांच्यापूर्तते साठी शहर विकास मंच, उत्तर नागपूर विकास आघाडी व एस.आर.ए. संकुल विकास समितीच्या नेतृत्त्वात संतप्त रहिवाश्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढल्यांतर प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने पर्यायी रस्त्याचे काम सुरू केलेले आहे.

सविस्तर वाचा

16:53 (IST) 29 Aug 2023
नाशिक: जनावरांचे बाजार, बैल शर्यतीवर बंदी; लम्पी नियंत्रणासाठी जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित

नाशिक – लम्पी या जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव १२ तालुक्यांपर्यंत पसरल्याने निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण जिल्हा लम्पी चर्मरोग आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या निर्णयामुळे आता जनावरांची खरेदी-विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शनाच्या आयोजनास प्रतिबंध राहणार आहे. तसेच जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध आले आहेत.

सविस्तर वाचा

16:48 (IST) 29 Aug 2023
बाप रे बाप! घरात आढळला दुर्मिळ मांजऱ्या साप

मांजऱ्या प्रजातीचा हा साप तुमसर शहरात पहिल्यांदाच आढळून आला. सर्पमित्राने या दुर्मिळ मांजऱ्या सापाला सुरक्षितरित्या वनविभागाच्या स्वाधीन केले. यानंतर या दुर्मिळ सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

सविस्तर वाचा

16:47 (IST) 29 Aug 2023
शासन आपल्या दारीऐवजी पिके वाचविण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, आमदार खडसेंचा सरकारला सल्ला

जळगाव – राज्यभरातील जिल्ह्यांत शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांत जेवढा खर्च होतो, तेवढाच खर्च कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागतो, असा राज्य सरकारला टोला लगावत गुळाला मुंग्या जशा चिकटून बसतात, तसे काही लोकं सत्तेला चिकटून असतात, अशी खोचक टीका अजित पवार गटावर माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली.

सविस्तर वाचा…

16:43 (IST) 29 Aug 2023
जगातील अत्याधुनिक बंदरातील रस्ते चिलखमाती आणि खड्डेमय; प्रवासी वाहने, नागरिक आणि मालवाहतूकदारही त्रस्त

जगातील अत्याधुनिक बंदर म्हणून बिरूद मिरवणाऱ्या जेएनपीटीला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ते पाण्यानी भरले असून या रस्त्यावर झालेल्या खड्डे आणि त्यातील चिखलामुळे नागरिकांनी त्रास सहन करावा लागत आहे.

सविस्तर वाचा…

16:06 (IST) 29 Aug 2023
सहा महिन्यात दुप्पट पैसे… आमिषाला बळी पडून सव्वादोन लाखांची फसवणूक

पैसे गुंतवणूक केल्यास याच पैशांची गुंतवणूक आम्ही फिशिंग पॉन्ड व्यवसायात करतो व त्यातून सहा महिन्यात दुप्पट परतावा देणार आहोत, असे खान यांना सांगण्यात आले.

सविस्तर वाचा…

15:45 (IST) 29 Aug 2023
समुद्राच्या उधाणाने नादुरुस्त बंदिस्तीच्या कामाला सुरुवात, नोव्हेंबरमध्ये होणार कायमस्वरूपी मजबुतीचे काम

शेकडो एकर पिकलेल्या भात शेतीत खारे पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले आहे. या बांधाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम खारलँड विभागाने सुरू केले आहे.

सविस्तर वाचा…

15:45 (IST) 29 Aug 2023
गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत मीटरमधूनच वीज जोडणी घ्यावी, ठाणे महापालिका आयुक्तांच्या गणेशोत्सव मंडळांना सूचना

ठाणे : गणेशोत्सवाच्या रोषणाईसाठी रस्त्यावरील खांबामधून वीज जोडणी घेतली जात असल्याने एखादी दुर्घटना होण्याची भिती असते. अशा घटना घडू नयेत यासाठी गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावरील खांबातून रोषणाईसाठी वीजपुरवठा घेऊ नये. मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात घेतलेल्या वीज मीटरमधून विद्युत रोषणाईसाठी वीजपुरवठा घ्यावा, अशा स्पष्ट सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

सविस्तर वाचा…

15:35 (IST) 29 Aug 2023
गिरगावातील इमारत धोकादायक घोषित न करण्यासाठी दबाव? आयआयटीच्या अहवालाकडे काणाडोळा

गिरगावमधील तेरा मजली व्यावसायिक इमारत धोकादायक असल्याचा स्पष्ट अहवाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (आयआयटी) दिलेला असतानाही, राजकीय दबावामुळे महापालिका निर्णय घेण्यास तयार नसल्याची बाब समोर आली आहे.

सविस्तर वाचा

15:24 (IST) 29 Aug 2023
Maharashtra News Live Today: शीतल म्हात्रे, अयोध्या पोळ यांच्यात ट्विटर वॉर!

उद्धव ठाकरेंच्या हिंगोलीतील भाषणावरून शीतल म्हात्रे व अयोध्या पोळ यांच्यात कलगीतुरा…

टोमणे सम्राटांनी त्यांची तीच तीच रटाळ भाषणं आता थांबवावीत… खूपच सहन न होणारे दुःखं असेल तर एक आत्मचरित्र लिहावं!!! पण तीच तीच कॅसेट परत परत वाजवू नये… पूर्ण भाषणात लोकांच्या कामाचा एकही शब्द नाही… नुसतं रडगाणं, टोमणे आणि टिका!! अहो, कधीतरी टिका-टोमण्यापलिकडे जाऊन मा.एकनाथ शिंदे साहेबांकडून जनतेची कामं कशी करावीत? हे शिकण्याचे मनावर घेतलेत तर उरलेला पक्ष तरी वाचेल!!! – शीतल म्हात्रे

आमच्या ांडा_पप्पी_फेम शितलूताईला कालची सभा खूपच झोंबलेली दिसत आहे. बरनाॅल लाव शितलूताई जरा म्हणजे थंडावा मिळेल – अयोध्या पोळ

15:22 (IST) 29 Aug 2023
मुंबईः केवायसीच्या निमित्ताने २८ व्यवहारांद्वारे फसवणूक; पण तक्रारदाराला एकही संदेश मिळाला नाही

मुंबईः विक्रोळी परिसरातील ६४ वर्षीय व्यक्तीची केवायसीच्या नावाखाली सायबर भामट्यांनी साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी २८ व्यवहारांद्वारे तक्रारदाराची फसवणूक केली असून त्याबाबत तक्रारदाराला एकही संदेश आला नाही. त्यामुळे याप्रकरणी आता पोलिसही तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा

15:22 (IST) 29 Aug 2023
नागपूर : प्रेमप्रकरणातून १७ वर्षीय तरुणाची हत्या, डोंगरगावात थरार

प्रेमाच्या प्रकरणातून पाच ते सहा मित्रांनी वर्गमित्र  १७ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजता हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरगावात घडली. शशांक तिनकर (शिरुड, बुटीबोरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वाचा

15:18 (IST) 29 Aug 2023
Samruddhi Highway: ‘समृद्धी’वर जबरी चोरी टोळी जेरबंद, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

मागील २४ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील बाबुराव फुके( उमरखेड ता. भोकरदन) हे आपल्या वाहनाने संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान त्यांचा पाठलाग करणाऱ्या टोळीने स्विफ्ट डिझायर वाहन आडवे टाकून त्यांना अडविले.

सविस्तर वाचा

15:18 (IST) 29 Aug 2023
कांदा कोंडीत भाजप एकाकी, शिंदे आणि पवार गट अलिप्त

नाशिक : कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे उफाळलेला रोष कमी करण्यात भाजपला शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळाली नसल्याचे अधोरेखीत झाले आहे. भाजपचे केंद्र आणि राज्यातील मंत्री व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मात्र नाशिकमध्ये असूनही अलिप्त राहणे पसंत केले.

सविस्तर वाचा…

15:16 (IST) 29 Aug 2023
Maharashtra News Live Today: सुषमा अंधारेंचं सूचक ट्वीट

माझ्या काही भावांच्या हातून चुका घडल्या आहेत, पण त्या दुरुस्त होऊ शकतात – सुषमा अंधारे

15:07 (IST) 29 Aug 2023
Maharashtra News Live Today: मंत्रालयात धरणग्रस्तांचं आंदोलन

अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयात आंदोलन केलं असून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर काही आंदोलकांनी उड्या घेतल्यामुळे सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनीही जाळ्यांवर उड्या घेत आंदोलकांना बाहेर काढलं.

15:02 (IST) 29 Aug 2023
कल्याण येथील बंद एनआरसी कंपनीतील रोहित्रामध्ये स्फोट होऊन दोन जण जखमी

कल्याण- येथील मोहने भागातील मागील अनेक वर्षापासून बंद असलेल्या नॅशनल रेयाॅन कंपनीच्या (एनआरसी) आवारात एका कंत्राटदाराचे वीज तंत्रज्ञ कंपनी आवारातील वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी रोहित्राजवळ आगीचा भडका उडून मोठा स्फोट झाला.

सविस्तर वाचा

14:53 (IST) 29 Aug 2023
Maharashtra News Live Today: आशिष शेलार यांचं खोचक ट्वीट

मराठीत गाजलेल्या ” अशी ही बनवाबनवी” सिनेमातील ते दृश्य… स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरु… “न होणाऱ्या” बाळासाठी खोटी खोटी सजावट… सत्य सगळ्याना माहिती असतानाही केवळ आपले “घर' टिकवता यावे म्हणून धडपड… नटूनथटून बाकी मित्र नाचत आहेत… “कोणी तरी येणार येणार गं..पाहुणा घरी येणारं गं .. हे गाणं गात आहेत..! उबाठा गटाकडून मुंबईत तथाकथित इंडिया नावाच्या आघाडीच्या स्वागताची जी लगबग सुरु आहे ती पाहताना… वरिल दृश्य पटकन आठवते! काय ती होर्डिंग लावत आहेत…केवढे ते फोटो… कोण कुणाकडे पाहतोय आणि कोण कुणाला हसतोय काही कळत नाही… भाजपा सोबत होते तेव्हा भलेमोठे फोटो होर्डिंगवर झळकत होते आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा! – आशिष शेलार https://twitter.com/ShelarAshish/status/1696402713322324461

14:47 (IST) 29 Aug 2023
धनादेश न वटल्याने मुंबईच्या व्यापाऱ्यांना कैद

कापड खरेदीसाठी मालेगाव येथील व्यापाऱ्यास दिलेले धनादेश बँकेत न वटल्याने येथील न्यायालयाने मुंबईच्या दोन व्यापाऱ्यांना दोन वर्षे कैद, धनादेश रकमेच्या दुप्पट दंड ठोठावला आहे.

सविस्तर वाचा…

14:46 (IST) 29 Aug 2023
तुम्हाला कर्ज मिळाले आहे… असा फोन आला तर सतर्क व्हा, अन्यथा फसवणूक

वाहन चालकाची नोकरी करणारे चांद मोहम्मद यांनी २४ मे रोजी दुपारी सहज म्हणून फेसबुक बघत असताना त्यातील एका जाहिरातीवर क्लिक केले.

सविस्तर वाचा…

14:44 (IST) 29 Aug 2023
नाशिक दुष्काळाच्या छायेत, पिके करपली; धरणसाठा केवळ पिण्यासाठीच, सिंचनासाठी पाणी मिळणे धूसर

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या माहितीतून दुष्काळाची स्थिती समोर आली.

सविस्तर वाचा…

14:43 (IST) 29 Aug 2023
बहुचर्चित १५ खाणपट्टाधारकांचे वाहतूक परवाने बंद, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

खाणपट्टेधारकांनी खाणपट्टा आदेशातील अटी व शर्तींचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. खाण पट्ट्यात किती उत्खनन झाले, याची बहुतेकांनी दैनंदिन नोंद ठेवलेली नव्हती.

सविस्तर वाचा…

14:42 (IST) 29 Aug 2023
पनवेल रेल्वेस्थानकात भव्य रांगोळी

पनवेल : पनवेल रेल्वेस्थानकाच्या आवारात मंगळवारी सकाळी पहाटे प्रवाशांना भव्य फुलांच्या रांगोळीचे दर्शन झाले. ओनम सणानिमित्त केरळ कल्चरल असोसिएशनच्या सदस्यांनी एकत्र येऊन सोमवारी मध्यरात्रीपासून ही भव्य रांगोळी काढली होती. असोशिएशनचे सदस्य दरवर्षी हा रांगोळीचा उपक्रम हाती घेतात. 60 फुट व्यास असलेल्या भव्य आकारामुळे ही रांगोळी प्रवाशांचे लक्ष वेधत आहे.

14:36 (IST) 29 Aug 2023
गोंदिया : बिबट शिकारप्रकरणी चार आरोपींना अटक

रानडुकरांची शिकार करण्याकरिता लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहात अडकून तीन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या शिकारप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी चार आरोपींना अटक केली आहे.

सविस्तर वाचा

शरद पवार व अजित पवार (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi Breaking News Live: जाणून घ्या महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व हवामानविषयक अपडेट्स!