Mumbai News Today, 29 August 2023: राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार व शरद पवार गटांदरम्यान राजकीय कलगीतुरा आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. याच बैठकीमध्ये इंडिया आघाडीचं चिन्हही जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Marathi Breaking News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

14:31 (IST) 29 Aug 2023
शुक्रवारपासून मोरा मुंबई जलमार्गावरील तिकीट दर २५ रुपयांनी कमी होणार, मात्र उरण ते अलिबाग जलप्रवास महागण्याची शक्यता

उरण : मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलमार्गातील तिकीट दरात शुक्रवारपासून (१ सप्टेंबर) २५ रुपयांची कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील हजारो प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मात्र उरणच्या करंजा ते अलिबागमधील रेवस दरम्यानच्या जलप्रवासाचे दर वाढविण्याची मागणी वाहतूकदारांनी केली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास महागण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

14:17 (IST) 29 Aug 2023
..अन्यथा चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणार; आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा

राज्य सरकार मार्फत कसबा विधानसभा मतदारसंघातील पायभूत सुविधा करिता १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र तो निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघामध्ये वळविण्यात आला आहे. यामागे भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी लवकरात लवकर १० कोटींचा निधी न दिल्यास चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिला.

सविस्तर वाचा…

14:04 (IST) 29 Aug 2023
Maharashtra News Live Today: अनिल देशमुखांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

14:01 (IST) 29 Aug 2023
अंधेरीमधील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आजपासून सुरु

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानतर्फे चालविण्यात येत असलेला अंधेरीमधील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३ पासून सभासदांसाठी खुला करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

13:58 (IST) 29 Aug 2023
‘यंगीस्तान’ला ‘अंमली’ विळखा!, ड्रग्स तस्करीत मुंबई राज्यात पहिल्या स्थानी; गांजा विक्रीत नागपूर ‘टॉप’वर

युवा वर्ग अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन झाल्यामुळे राज्यात अंमली पदार्थाच्या तस्करी आणि विक्रीत मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक ड्रग्स तस्करी मुंबईत होत असून १६ ऑगस्टपर्यंत ९९७ प्रकरणात ४६ कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे, तर नागपूचा राज्यात दुसरा क्रमांक आहे.

सविस्तर वाचा

13:54 (IST) 29 Aug 2023
अकोल्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव, पशुपालक चिंतेत; संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्रात जनावरांची वाहतूक बंदी

अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूरमधील पठाणपुरा परिसरातील एका गायीला ‘लम्पी’ त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले. त्याचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानुसार संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्र बाधित घोषित करण्यात आले आहे. याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विजय पाटील यांनी निर्गमित केला. ‘लम्पी’च्या प्रादुर्भावामुळे पशुपालक चिंतेत आहेत.

सविस्तर वाचा…

13:36 (IST) 29 Aug 2023
यवतमाळ : महिनाभरापूर्वी अतिवृष्टी अन् आता पावसाची ओढ; पिकांचे नुकसान, उत्पन्नात घट होण्याची भीती

जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने दोन लाख ५३ हजार ८४६ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामा अहवालातून समोर आले आहे. सध्या पावसाने ओढ दिली असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या हानीची चिंता लागली आहे. जुलैमधील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कपाशीला बसला आहे.

सविस्तर वाचा

13:36 (IST) 29 Aug 2023
रायगडमध्ये अनंत गीतेंच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या

अलिबाग – रायगड जिल्ह्यात बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या महत्त्वाकांक्षा चांगल्याच वाढल्या आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 29 Aug 2023
Maharashtra News Live Today: संजय शिरसाटांचं संजय राऊतांवर टीकास्र

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी भाविक आनंदाने जाणार आहे. त्याचं संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे. तिथे बॉम्ब ठेवण्याची भाषा करत आहेत हे? यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत. लोकांमध्ये संभ्रम का निर्माण करताय? हा देश आपला आहे की आपण पाकिस्तानात राहातोय? – संजय शिरसाट

13:19 (IST) 29 Aug 2023
गोंदिया : संतप्त शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र काढली आमदारांच्या घरासमोर; जोपर्यंत धानाचे चुकारे मिळणार नाही तोपर्यंत..

गोंदिया : येथील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजतापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गोंदिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्था मर्या. चुटिया, गोंदिया यांनी खरीप हंगामाचे धान शेतकऱ्यांकडून खरेदी केले, विक्री केलेल्या धानाचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे थक्कीत चुकारे न मिळाल्याने संतप्त शेतकरी यांनी स्थानिक आमदार अपक्ष विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 29 Aug 2023
चंद्रपूर : महिला कैद्यांनी विक्रमी ३०० बांबू राख्या बनवल्या; आत्मनिर्भर भारत अंतर्गत उपक्रम

चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या अनोख्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत चंद्रपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील ३२ महिला कैद्यांना बांबूची राखी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कारागृह अधीक्षक अनुप कुंब्रे यांची संकल्पना आणि इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला. ख्यातनाम बांबू डिझायनर आणि महिला सक्षमीकरण कार्यकर्त्या मीनाक्षी वाळके यांनी या कैद्यांना त्यांची कला शिकवली.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 29 Aug 2023
अजित पवारांच्या खेळीने पुण्यात भाजपची कोंडी

पुणे : सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याची ठिणगी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बैठकीपासून पडली आहे. त्यांनी या महापालिकेत गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांचे लेखापरीक्षण करण्याची घोषणा केल्याने एकेकाळचे साथीदार; पण भाजपवासी झालेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सविस्तर वाचा…

12:59 (IST) 29 Aug 2023
वर्धा : ५०० रक्तदात्यांची पेढी देत आहे अनेकांना जीवनदान

वर्धा : रक्तदानाचे असंख्य शिबिरे होत असूनही रक्ताची चणचण वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच भासत असते. त्यावर उपाय म्हणून येथील युवकांच्या चमूने केव्हाही हाकेला ओ देत विविध रक्तगटांची जणू बँकच स्थापन केली आहे. शहीद भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी हा अभिनव उपक्रम कोरोना संक्रमण काळात सुरू केला.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 29 Aug 2023
Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधायची कधी? मुहूर्तावरून संभ्रम

वर्धा : ३० ऑगस्टला रक्षाबंधन असल्याची तारीख दिली आहे. पण या तारखेस केवळ रात्री नऊनंतरच मुहूर्त असल्याचे सांगितल्या जात आहे. हिंदू पंचांगानुसार ३० ऑगस्टला सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी भद्रा नक्षत्र भूलोकी आहे. तो रात्री नऊपर्यंत राहणार. रात्री नऊनंतर तर ३१ ऑगस्टला सकाळी सात वाजेपर्यंत राखी बांधण्यासाठी योग्य वेळ असल्याचे अजय बरडे गार्गी हे सांगतात. हाच काळ पौर्णिमेचा आहे.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 29 Aug 2023
पुणे: मोकाट श्वानांच्या लसीकरण,नसबंदी मोहिमेत अडथळा; महापालिकेकडून कारवाईचा इशारा

पुणे : शहरातील मोकाट श्वान आणि मांजरांचे लसीकरण. नसबंदी करण्यासाठी महापालिकेने दोन संस्थांची नियुक्ती केली आहे. मात्र, या संस्थांच्या कामात नागरिकांकडून अडथळा निर्माण केला जात असल्याने मोहीम रखडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोहिमेला विरोध करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

सविस्तर वाचा

12:03 (IST) 29 Aug 2023
शिवसेनेत ‘गद्दार-खुद्दार’, राष्ट्रवादीत संभ्रमाची किनार! दोन्ही पक्षांमध्ये समान राजकीय पटमांडणी

छत्रपती संभाजीनगर : वर्ष – सव्वा वर्षापूर्वी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सभा घेत आणि नंतर मूळ पक्ष आमचाच असा दावा करीत असत. मग बंडात सहभागी असलेले आमदार मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात आणून शक्तिप्रदर्शन करीत. मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या मागे खूप साऱ्या गाड्या असत. ते कधी कारच्या दरवाज्यातून किंवा चारचाकी वाहनाच्या झरोक्यात उभे राहून जनतेला अभिवादन करीत. जेसीबीला बांधलेल्या पाच क्विंटल फुलांच्या हारासह एकनाथ शिंदे यांचा फोटो घेतला जात असे. गाडीवर फुलांच्या पाकळ्यांचा सडा पडलेला असे. ‘शिवसेना’ या चार अक्षराभोवती सुरू असणारा राजकीय प्रवास आता ‘राष्ट्रवादी’बरोबर सुरू आहे.

सविस्तर वाचा..

12:02 (IST) 29 Aug 2023
कधीकाळी राजीनामा देणारे कर्तव्यनिष्ठ ‘आयएएस’ अधिकारी वैभव वाघमारे पुन्हा चर्चेत, गडचिरोलीतील धडाकेबाज कारवाईने राज्यात खळबळ

गडचिरोली : सोमवारी अहेरी उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोकून निम्म्या कर्मचाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव दाखल केल्याने कर्तव्यनिष्ठ ‘आयएएस’ अधिकारी अशी ओळख असलेले वैभव वाघमारे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते नुकतेच जिल्ह्यातील अहेरी येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. यापूर्वी ते मेळघाट येथे आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना अचानक राजीनामा दिल्याने चर्चेत आले होते. तत्पूर्वी मेळघाटात आदिवासींसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे नागरिकांमध्ये ते बरेच लोकप्रिय आहेत.

सविस्तर वाचा..

12:02 (IST) 29 Aug 2023
कसा राहणार समृद्धीनंतरचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग? किती खर्च येणार? काय फायदा? जाणून घ्या

नागपूर: महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ एक्सप्रेसवेची घोषणा केली. नागपूर आणि गोवा यांना जोडण्यासाठी या एक्स्प्रेसवेमुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ८ तासांवर येईल, असे सांगितले जात आहे. या एक्स्प्रेसवेला शक्तीपीठ एक्सप्रेसवे असे नाव देण्यात आले आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकण हे तर जोडले जाणार आहेत, पण तिथूनही पुढे गोव्यापर्यंत हा एक्सप्रेसवे असणार आहे.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 29 Aug 2023
मुंबई: चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानात बहरणार ‘नागरी वन’; ४८ देशी प्रजातींच्‍या १० हजार २६४ रोपांची लागवड

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने चेंबूर (पूर्व) येथील म्‍हैसूर कॉलनी परिसरातील शरद नारायण आचार्य उद्यानामध्‍ये मियावाकी पद्धतीने शहरी जंगल तयार करण्याचे ठरवले आहे. दोन हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये ४८ देशी प्रजातीच्या १० हजार २६४ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. हा उपक्रम नुकताच हाती घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 29 Aug 2023
प्रसिध्द लेखक आनंद नीलकांतन यांना धमकी आणि खंडणीची मागणी

देशातील प्रसिध्द लेखक आनंद नीलकांतन यांना धमकी दिल्याचा तसेच त्यांच्याकडून १० लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 29 Aug 2023

11:38 (IST) 29 Aug 2023
रेल्वे सुसाट! पुणे-दौंडदरम्यान ताशी १३० किलोमीटर वेगाने धावण्यास सुरूवात

पुणे : पुणे ते दौंडदरम्यान रेल्वे गाड्या आता सुसाट धावू लागल्या आहेत. या मार्गावर सोमवारपासून प्रवासी गाड्या ताशी कमाल १३० किलोमीटर वेगाने धावण्यास सुरूवात झाली. या मार्गावर वाढलेल्या वेगाने धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही पहिली गाडी ठरली.

सविस्तर वाचा

11:29 (IST) 29 Aug 2023
डोंबिवली रेल्वे स्थानकात दुचाकींचे बेकायदा वाहनतळ; प्रवाशांना स्थानकात येजा करताना अडथळे

डोंबिवली- डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकातील विष्णुनगर आणि पंडित दिनदयाळ चौकासमोरील रेल्वे तिकीट खिडक्यांच्या समोरील मोकळ्या जागेत रेल्वे कर्मचारी, पोलीस यांची दुचाकी वाहने उभी करुन ठेवण्यात येतात. गर्दीच्या वेळेत या तिकीट खिडक्यांसमोरुन जाताना प्रवाशांना वळणे घेऊन जावे लागते.

सविस्तर वाचा

11:21 (IST) 29 Aug 2023
Maharashtra News Live Today: हे छगन भुजबळ आहेत – जितेंद्र आव्हाड

हे छगन भुजबळ आहेत जे साहेबान वर शब्द रुपी फुल उधळत आहेत … नक्की ऐका…. आताच काय झाले कळत नाही …. – जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

11:19 (IST) 29 Aug 2023
पुणे: रक्षाबंधनानिमित्त पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन

पुणे : रक्षाबंधन सणानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी पीएमपीकडून बुधवारी (३० ऑगस्ट) जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दैनंदिन गाड्यांपेक्षा ९६ अधिक गाड्या मार्गांवर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

11:17 (IST) 29 Aug 2023
Maharashtra News Live Today: केशव उपाध्येंचा संजय राऊतांना टोला!

शिल्लक सेनेचा हताश विश्वप्रवक्ता हा अशा प्रकारच्या पुड्या सोडण्यात तरबेज झाला आहे. जनतेला संभ्रमात टाकणे, लोकांची माथी भडकवणे आणि बिनबुडाचे आरोप करणे, हा या माथेफिरूचा रोजचा धंदा आहे. श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या वेळी हल्ला होईल, हे भाकीत त्याने कशाच्या आधारे केले, त्याचा पुरावा काय ? याची चौकशी करण्यासाठी या भंपक विश्वप्रवक्त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे – केशव उपाध्ये

10:59 (IST) 29 Aug 2023
पुणे: प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून; पाचजणांना जन्मठेप

पुणे : प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून करणाऱ्या पाचजणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.प्रवीण दत्तात्रेय चौगुले (वय २५), यशवंत रामचंद्र खामकर (वय २४), अनिल बहिरू अजगेकर (वय २१), गोट्या ऊर्फ देवेंद्र अशोक माने (वय २०), रमेश रंगल्या देवदुर्ग (वय २०, सर्व रा. कोल्हापूर) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

10:58 (IST) 29 Aug 2023
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक

पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर नोकरीच्या आमिषाने चोरट्यांनी एकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी होते.

सविस्तर वाचा

10:57 (IST) 29 Aug 2023
पुणे: सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा खांब ‘चुकला’

पुणे : वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या एका खांबाचे (पिलर) नियोजन चुकल्याचे गुणवत्ता तपासणी निकषातून पुढे आले आहे. त्यामुळे संतोष हाॅल परिसरातील उड्डाणपुलाच्या एका खांबाचा काही भाग पाडण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली आहे.

सविस्तर वाचा

10:57 (IST) 29 Aug 2023
मुंबई: आणखी मोठ्या घरासाठी बीडीडीतील रहिवाशांचा आज ‘वर्षा’वर मोर्चा

मुंबई : बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत ५०० ऐवजी ७०० चौरस फुटांचे घर मिळावे, २५ हजार रुपयांऐवजी ३५ हजार रुपये घरभाडे मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी बीडीडीमधील रहिवाशांनी मोर्चाची हाक दिली आहे. बीडीडीतील जंबोरी मैदानातून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगल्यावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

शरद पवार व अजित पवार (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi Breaking News Live: जाणून घ्या महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व हवामानविषयक अपडेट्स!