Mumbai Maharashtra Breaking News Live Today, 05 December 2023: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. पुणे महानगरपालिकेनं हा भिडेवाडा सोमवारी रात्री पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केला. आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होणार आहे. पण यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेज आज बीड जिल्ह्यातील परळी येथे राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवाय दक्षिण भारतात धुमाकूळ घातलेलं मिचौंग चक्रीवादळ पुढे सरकलं असून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यांसह विविध महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा एकत्रित आढावा…
Today’s Breaking News Updates: राज्यातील राजकारणासह हवामान आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्दबातल केले होते.
पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष शाळांतील अपंग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पालघर येथे आज आयोजित करमुक्त आल्या होत्या. यामध्ये पालघर जिल्हयातील १६ शाळांतील २९३ अपंग विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.
१९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा परिषद पालघर अर्थसंकल्प तरतूद पाच टक्के अपंग कल्याण सेस योजने अंतर्गत या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यात सात अनुदानित व नऊ विनाअनुदानित अशा १६ शाळांमध्ये ८२६ अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अपंग दिनाचे औचित्य साधून मतिमंद, कर्णबधिर, अंध व बहुविकलांग अशा प्रवर्गानुसार धावणे, गोलाफेक, चेंडू फेक, चालणे, बादलीत चेडू फेकणे, लगोरी व बुद्धिबळ अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
पुणे : फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविणार असल्याची ग्वाही बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध गावांना खासदार सुळे भेट देत आहेत. कोपरा सभा, विकासकामांची उद्घाटन त्यांच्या हस्ते करून निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली आहे.
वर्धा: प्रश्नांकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असेल तर समस्या विविध मार्गे वेशीवर टांगण्याचे काम आंदोलक करीत असतात.
रेल्वेमधील सोयी-सुविधांबाबत प्रवाशांची ओरड सुरू असतानाच दुसरीकडे, विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची चाहुल लागली होती. मात्र, मुंबईसह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. चार – पाच दिवसांनंतर राज्यातील अवकाळी पाऊस थांबला असला तरी त्यानंतर मिचॉंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २ ते ४ डिसेंबरदरम्यान मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली. ऐन डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या. परिणामी, मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.
गोंदिया: मागील महिन्यात पारा घसरून थंडीचा जोर चढत चालला होता. आज, मंगळवारी पुन्हा आकाशात ढग जमले. पहाटे पावसाची रिपरिप देखील सुरू झाली होती.
नागपूर: राज्यात महिलांविरुद्ध गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात महिलांविरुद्ध गुन्ह्यांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर उत्तरप्रदेश तर दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो, ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जारी केलेल्या अहवालावरून समोर आली आहे.
ठाणे – अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा नवी मुंबईतील वाशी उपनगरात आयोजित करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, वाशी या दोन संस्थांच्या पुढाकाराने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत वाशी येथील साहित्य मंदिर येथे पार पडणार आहे.
अमरावती: दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या खासगी सचिवाने स्वत:च्या नावामागे सिंधुताईंचे नाव लावून त्यांचा वारस होण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आक्षेप सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरूण सपकाळ यांनी घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी अचलपूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली. ललितला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील डॉ. संजय मरसाळे यांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक करण्यात आली होती.
पुणे : बांगडीला असलेले लटकन खेळताना चुकून तीन वर्षांच्या मुलीच्या नाकातून थेट फुप्फुसात गेले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर ब्रॉन्कोस्कोपी करून श्वसननलिकेला इजा न होता ती वस्तू बाहेर काढण्यात डॉक्टरांनी यश मिळवले आहे.
नागपूर: बंगालच्या उपसागरातील “मिचॉंग” चक्रीवादळामुळे तामिळनाडू व आंध्रप्रदेशच नाही तर महाराष्ट्र देखील कमीअधिक प्रमाणात प्रभावित होणार आहे.
पुणे : शहरात कोयते, तलवारी उगारुन गुंडांकडून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. गोखलेनगर भागातील जनवाडी परिसरात तलवारी उगारुन गुंडांनी तीन दुकानांची तोडफोड केली. गुंडांनी एकावर तलवारीने एकावर वार केले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली.
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त (कार्तिक यात्रा) श्री क्षेत्र आळंदी येथे राज्यभरातून वारकरी बांधवांची दर्शनासाठी गर्दी होते. कार्तिक यात्रेनिमित्त नगर रस्त्यावरील मरकळ येथून आळंदीकडे जाणााऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
नाशिक- दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्यांवरून मनसेने आंदोलन केल्यानंतर महापालिकेने शहरातील सर्व दुकाने आणि आस्थापनाधारकांना नामफलक मराठी भाषेत करणे अनिवार्य असल्याचे सूचित केले आहे. ज्या आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत आढळून येणार नाहीत, त्यांच्यांवर न्यायालयाच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मनपाने दिला आहे. प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी महापालिका प्रशासन निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानत नसल्याची भावना राजकीय वर्तुळात उमटत आहे.
शहरात अनेक आस्थापनांचे फलक मराठीव्यतिरिक्त अन्य भाषेतही आहेत. या मुद्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन केल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली. घाईघाईत आस्थापनांवरील नामफलकाविषयी निवेदन देण्यात आले. न्यायालयीन निर्णय व उद्योग विभागाच्या राजपत्रान्वये प्रादेशिक अधिकार क्षेत्रात प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल, अशा आस्थापनांकडे मराठी देवनागरी भाषेसह इतर भाषेतील व लिपीतील नामफलक असू शकतील. परंतु, अशावेळी मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरवातीलाच लिहिणे आवश्यक राहील आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.
या अधिनियमानुसार महापालिका क्षेत्रांतील सर्व दुकाने व आस्थापनाधारकांना त्यांच्या दुकानांवरील आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत करणे अनिवार्य आहे. ज्या आस्थापनांचे फलक मराठी भाषेत नसतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. शहरातील सर्व दुकानदार, वाणिज्यिक संस्था, हॉटेल आदींनी आपापले नामफलक मराठीत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या आस्थापनांचे फलक मराठी भाषेत नसतील, अशा आस्थापनांना प्रति कर्मचारी दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर्व दुकाने व आस्थापनाधारकांनी आपले नामफलक तात्काळ मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिध्द करावेत, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर, उपायुक्त (कर) श्रीकांत पवार यांनी केले आहे.
मुंबई : पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचा म्हाडाच्या पुणे मंडळाचा मानस आहे. आतापर्यंत मंडळाला गृहनिर्मितीसाठी ७२३ हेक्टर जागा उपलब्ध झाली होती. यातील ५९२ हेक्टर जागेवर गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात आला असून उर्वरित जागेवर बांधकाम सुरू आहे. नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी ७० हेक्टर जागेचा शोध घेतला असून ही जागा म्हाडाच्या पुणे मंडळाला उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
नागपूर: मिचाँग चक्रीवादळामुळे रेल्वेने ११४ गाड्या रद्द केल्या असून नागपूरमार्गे धावणाऱ्या ३५ हून अधिक रेल्वेगाड्यांचा त्यात समावेश आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतात धडकलेल्या चक्रीवादळाने चेन्नईसह लगतच्या भागात हाहाकार उडवला आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं आहे. तर तेलंगणात काँग्रेसने विजय मिळवला. या विधानसभा निवडणूक निकालावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. लोकांच्या मनात शंका असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हवी, अशी मागणी राऊतांनी केली. राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर बातमी
भाजपाबरोबर सत्तेत जाण्याची इच्छा शरद पवारांची होती. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा, असं स्वत: शरद पवारांनीच सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. पण शरद पवारांनी अजित पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी मला पहिल्यांदाच समजत आहेत, असं पवारांनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मिचौंग चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.