Maharashtra Political Update Today :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात करतात पण ते कधीही जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसंच महापालिकांच्या निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतं आहे? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे. दुसरीकडे राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली ती अजून समोर आलेली नाही. राहुल गांधी जे अमेरिकेत बोलले त्याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे. राज्यातले नेते राहुल गांधींवर टीका करु शकतात. तसंच काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासह महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडी जाणून घ्या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Mumbai Maharashtra News Today| महापालिका निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतंय? संजय राऊत यांचा सवाल आणि इतर घडामोडी

19:52 (IST) 31 May 2023
ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये उद्या पाणी नाही; एमआयडीसीकडून पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे: बारवी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी तसेच दुरुस्ती कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्या, शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

19:45 (IST) 31 May 2023
ठाणे जिल्ह्यात भाजीपाल्याचे मुबलक उत्पादन; यंदा ४४६ मेट्रिक टॅन भाजीपाल्याची निर्यात

ठाणे: भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मक्तेदारी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बरोबरच ठाणे जिल्ह्यातही मागील काही वर्षांपासून भाजीपाल्याचे मुबलक उत्पादन होत आहे. यावर्षीही जिल्ह्यात भाजी पिकांचे चांगले उत्पादन झाल्याने जिल्ह्यातून सुमारे ४६६ मेट्रिक टन भाजीपाल्याची परदेशात निर्यात करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

19:01 (IST) 31 May 2023
उल्हास नदीवर जलपर्णीची चादर; जलपर्णी मोहिम थंडावली, नदी प्रदुषण सुरूच

बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील सुमारे एक कोटी नागरिकांची तहाण भागवणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदुषणात दिवसेंदिवस भर पडत असून परिणामी उल्हास नदीवर पुन्हा जलपर्णीचा चादर पहायला मिळते आहे.

सविस्तर वाचा...

18:54 (IST) 31 May 2023
मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने गृह विभागाचे आदेश

किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई गोवा महामार्ग आणि वाकण खोपोली मार्गावरील अवजड वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

वाचा सविस्तर...

18:31 (IST) 31 May 2023
खांडबारा बाजारपेठेत पेटत्या ट्रॅक्टरचा थरार; चालकाची समयसुचकता

नंदुरबार: नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात बुधवारी बाजारपेठेत पेटत्या ट्रँक्टरचा थरार अनुभवयास मिळाला. चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला.

सविस्तर वाचा...

18:29 (IST) 31 May 2023
…. तर महाविद्यालयांची संलग्नता रद्द ! काय आहे उच्च शिक्षण विभागाचा निर्णय?

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाळकर यांनी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार नॅक मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची विद्यापीठ संलग्नता रद्द करण्याचे आदेश विद्यापीठांच्या कुलसचिवांना परिपत्रकाद्वारे दिले.

सविस्तर वाचा...

18:11 (IST) 31 May 2023
संचेती पुलावर आंदोलन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

पुणे : तहसीलदारांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी संचेती पुलावर आंदोलन करणाऱ्या तरुणाविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणे, अधिकाऱ्याला धमकाविणे आदी कलमाअंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजाविण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

18:05 (IST) 31 May 2023
बिहारमधून महाराष्ट्रात बालकांची तस्करी; दानापूर – पुणे एक्स्प्रेसमधून ५९ बालकांसह पाच संशयित ताब्यात

नाशिक: जळगाव, मनमाड – भुसावळ विभाग रेल्वे पोलीस, सुरक्षा दल आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त कारवाईमुळे दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून होणारी ५९ बालकांची तस्करी रोखण्यात यश आले आहे.

सविस्तर वाचा...

17:57 (IST) 31 May 2023
नवी मुंबई : एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या भूखंडांना रस्ता रुंदीच्या शुल्कात सूट

नवी मुंबई : एमआयडीसी वसविताना शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून या जमिनीच्या मोबदल्यात संबंधित भूधारकांना प्रकल्पग्रस्त सदराखाली भूखंड देण्यात आले होते. मात्र भूखंडांसमोरील रस्ता रुंदीचे शुल्क एमआयडीसी आकारात होती. पंरतु आता हे शुल्क लागू न करण्याचा निर्णय एमआयडीसीकडून घेण्यात आलेला आहे.

सविस्तर वाचा..

17:14 (IST) 31 May 2023
मुंबईत मे महिन्यात साडेनऊ हजारांहून अधिक घरांची विक्री

मुंबईत मे महिन्यात ९,६६१ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रुपात ८२० कोटी रुपये महसूल मिळाला आहे. एप्रिलमध्ये साडेदहा हजारांहून अधिक घरांची विक्री झाली होती. मेमध्ये घर विक्रीत काहीशी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा...

17:01 (IST) 31 May 2023
मुक्त विद्यापीठाचा महापुरूषांच्या विचारांवर अभ्यासक्रमाचा मानस

नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारीत स्वतंत्र पदव्युत्तर (एम.ए) अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस असल्याचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

16:52 (IST) 31 May 2023
विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत अखेर राज्य शासनाकडून आदेश… जाणून घ्या काय होणार?

राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश देण्याबाबत आतापर्यंत केवळ चर्चा झाल्या होत्या. मात्र आता त्या बाबतचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

16:51 (IST) 31 May 2023
‘एमपीएससी’चे शुद्धीपत्रक जाहीर, या पदवीधरांनाच करता येणार अर्ज

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक समाज कल्याण अधिकारी गट- अ व ब या पदाकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये समाजकार्याच्या पदवीधारकांनाच डावलण्यात आले होते. याला राज्यभरातील विद्यार्थी आणि संघटनांच्या विरोधातनंतर ‘एमपीएससी’ने शुद्धीपत्रक जाहीर करत गट-अ साठी आता केवळ समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येणार आहे.

सविस्तर वाचा...

16:41 (IST) 31 May 2023
अंबरनाथमध्ये डायलेसिस सुविधा; रोटरीचा पुढाकार, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांसाठी विनामूल्य

अंबरनाथ: अंबरनाथच्या अतिरिक्त अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक वसाहतीत आता डायलेसिस केंद्र सुरू होणार आहे. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विजय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हे केंद्र सुरू केले जाणार असून शनिवार, ३ जूनला याचे लोकार्पण होईल.

सविस्तर वाचा...

16:22 (IST) 31 May 2023
ताडोबात ‘विरा’ वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म; पर्यटकांना वाघिणीसह बछड्यांचे दर्शन

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बाब असून चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोन अंतर्गत बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या विरा नामक वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे.

सविस्तर वाचा...

16:02 (IST) 31 May 2023
वाशीम : युवाशक्ती करीअर शिबीर केवळ फार्स; पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी फिरकलेच नाहीत

वाशीम : कुशल व रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात येत आहे. आज ३१ मे रोजी शहरातील राज्यस्थान आर्य कॉलेज येथे आयोजित केलेल्या शिबिराला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी पाठ फिरवली. त्यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी फिरकलेच नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

सविस्तर वाचा...

15:57 (IST) 31 May 2023
अश्लील चित्रफित प्रसारित करणाऱ्या बहिणीच्या प्रियकराचा खून

नागपूर : बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने वस्तीतील व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित केली. वस्तीत बदनामी झाल्यामुळे युवतीच्या भावाने तिच्या प्रियकराचा लाकडी दांडा आणि दगडाने ठेचून खून केला.

वाचा सविस्तर...

15:55 (IST) 31 May 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीला विमानतळावरून अटक

नागपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटची सट्टेबाजी खेळणाऱ्या क्रिकेट बुकीला सोनेगाव पोलिसांनी विमानतळाजवळ सापळा रचून अटक केली. कुणाल सचदेव असे नाव असून त्याचे विदेशातील मोठमोठ्या क्रिकेट बुकींसोबत व्यावसायिक संबंध आहेत.

सविस्तर वाचा...

15:33 (IST) 31 May 2023
महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; पाहा कोणत्या जिल्ह्यात मुसळधार…

नागपूर : मान्सूनचा भारतातील प्रवेश अवघ्या काही दिवसांवर आला असताना भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 31 May 2023
कस्टम विभागाची मोठी कारवाई: आराेपींचा सातारा ते लाेणावळा दरम्यान पाठलाग करून पाच काेटी रुपयांचे ‘मेथामाफेटामीन’ अमली पदार्थ जप्त

पुणे: कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विराेधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे मेथामाफेटामीन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चारजणांना जेरबंद करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

15:21 (IST) 31 May 2023
विकृतीचा कळस! भिलाईतील नराधमाचा गायीवर लैंगिक अत्याचार; गोंदिया आरपीएफने आवळल्या मुसक्या

गोंदिया : छत्तीसगड राज्यातील भिलाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जामूल येथील एका गायीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला गोंदिया आरपीएफने मंगळवार, ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर आलेल्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून अटक केली. दरम्यान, आरोपीला आज, बुधवारी भिलाई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सविस्तार वाचा...

15:04 (IST) 31 May 2023
भंडाऱ्यातले एक माकड लय भारी, त्याची हॉटेलिंगची तऱ्हाच न्यारी; दर मंगळवार आणि शनिवारी बुक असतो टेबल, जिलेबी आणि समोसासह…

भंडारा : सध्या अन्नपाण्याच्या शोधात माकडांच्या टोळ्या गावात आणि शहराकडे स्थलांतर करीत आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी गावात किंवा शहरी वस्तीत जाऊन माकडांच्या टोळ्या धुमाकूळ घालतात. मात्र, भंडाऱ्यात एक असे माकड आहे जे कुणाच्या घरी जात नाही तर थेट हॉटेलमध्ये जाऊन, टेबलवर बसून शांतपणे त्याच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारते. तहान भूक भागली की शांतपणे निघूनही जाते.

सविस्तर वाचा...

14:10 (IST) 31 May 2023
उद्धव ठाकरेंचा गट राष्ट्रवादीत विलीन होणार-नितेश राणे

उद्धव ठाकरेंचा गट अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. याची घोषणा उद्धव ठाकरे १९ जून रोजी करणार आहेत. हे खरं आहे की खोटं? संजय राऊतांनी सांगावं. १९ जूनला उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. उद्धव ठाकरे शिवसेना गट या स्थापनेची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे. कारण त्यादिवशी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि पक्षचिन्ह मशाल मिळालं आहे. १९ जूनला षण्मुखानंद हॉलमध्ये होणारा उद्धव ठाकरेंचा मेळावा हा अनधिकृत आणि नियमबाह्य आहे असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

14:01 (IST) 31 May 2023
भंडाऱ्यात ‘दृश्यम स्टाईल’ हत्या! आरोपीही सापडले, मृतदेह पुरल्याचे ठिकाणही कळले मात्र ‘अर्चना’चा मृतदेह मिळेना…

भंडारा: दृश्यम चित्रपटात ज्याप्रमाणे हत्या करणारा कोण हे पोलिसांना कळते, त्याला ताब्यात घेवून कसून चौकशीही केली जाते, हत्या करणाऱ्याने प्रेत कुठे पुरले हे ही कळते मात्र शेवट पर्यंत पोलिसांना मृतदेहाचा शोध घेता येत नाही .

सविस्तर वाचा...

13:48 (IST) 31 May 2023
प्रस्थापितांच्या राजकीय संघर्षाच्या नष्टचर्यात अडकला निळवंडे प्रकल्प, विखे-पाटील व थोरातसंघर्षाची झळ

अकोले : भूमिपूजनानंतर तब्बल ३१ वर्षांनी निळवंडे धरणाच्या कालव्यात प्रथमच चाचणीसाठी पाणी सोडण्यात आले. प्रस्थापितांचे राजकारण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, बांधकामासाठी वेळोवेळी केली गेलेली अपुरी आर्थिक तरतूद, प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांसाठी अनेकवेळा बंद पाडलेले काम, राजकारणी, ठेकेदार, अधिकारी यांचे हितसंबंध त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले. अद्यापि प्रकल्पाचे नष्टचर्य पूर्णपणे संपलेले नाही.

सविस्तर वाचा...

13:33 (IST) 31 May 2023
भंडारा: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या शास्त्रीनगर येथील बुकीला अटक

भंडारा: सध्या स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्याच्या मुसक्या आवळत धाडसत्र सुरू केले आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आणखी एका बुकीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून हितेश प्रकाश हरधनिया ( ३३) रा. शास्त्रीनगर, भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

13:31 (IST) 31 May 2023
रायगड : उलवे नोडमधील पोलीस चौकीची डंपरने धडक देत नासधूस, संरक्षणार्थ पोलिसांकडून गोळीबार

उरण : उलवे नोडमधील सेक्टर १० (बी) मधील पोलीस चौकीवर बुधवारी रात्री १२ साडेबारा वाजता एका इसमाने डंपरची जोरदार धडक देत नासधूस केली आहे. तसेच चौकीत उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनासह व येथील खाजगी वाहनांचीही नासधूस केली आहे.

सविस्तर वाचा...

13:28 (IST) 31 May 2023
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे भरण्याची कामे आठ दिवसात पूर्ण करा, आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

येत्या आठ दिवसाच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे पूर्ण करा. खराब रस्ते सुस्थितीत करा, असे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी मान्सुनपूर्व आढावा बैठकीत दिले.

वाचा सविस्तर...

13:17 (IST) 31 May 2023
नागपूर, मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; जाणून घ्या कोणती गाडी रद्द

नागपूर: तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने जळगाव ते मनमाड दरम्यान नॉन-इंटरलॉकिंगचे आणि यार्ड रिमॉडलिंग कामे सुरू आहे त. त्यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यान दररोज धावणारी गाडी बुधवारी रद्द करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा...

13:01 (IST) 31 May 2023
भाजपा हा शेतकऱ्यांमधून संपलेला पक्ष ठरला आहे-नाना पटोले

शिंदे फडणवीस सरकाराने कुठलाही अध्यादेश काढला तर त्याचा परिणाम होणार नाही, भाजपा हा शेतकऱ्यांमधून संपलेला पक्ष झाला आहे, त्यांना जिंकण्यासाठी होणार नाही असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली आहे.

devendra fadnavi on eknath shinde resign

(फोटो-इंडियन एक्स्प्रेस/नरेंद्र वसकर)

महाराष्ट्रातल्या राजकीय आणि इतर घडामोडींवर एक नजर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Story img Loader