Maharashtra Political Update Today :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात करतात पण ते कधीही जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसंच महापालिकांच्या निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतं आहे? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे. दुसरीकडे राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली ती अजून समोर आलेली नाही. राहुल गांधी जे अमेरिकेत बोलले त्याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे. राज्यातले नेते राहुल गांधींवर टीका करु शकतात. तसंच काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासह महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडी जाणून घ्या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Mumbai Maharashtra News Today| महापालिका निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतंय? संजय राऊत यांचा सवाल आणि इतर घडामोडी
वर्धा : मानव प्राण्यांप्रमाणेच पशूंनाही उन्हाची काहिली त्रस्त करू लागली आहे. उष्माघाताचा फटका प्राण्यांनाही बसण्याच्या पशुपालक शेतकरी तक्रारी करीत आहे. त्यासाठी पशुपालन विभाग तयारीला लागला आहे. सर्वाधिक काळजी म्हशींची घेणे आवश्यक ठरत आहे. कारण एकच, म्हशींना असणाऱ्या घामग्रंथी पुरेशा प्रमाणात सक्रिय नसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहत नाही.
डोंबिवली – येथील पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर दोन फेरीवाल्यांनी एका पादचाऱ्याला लाथाबुक्की, बांबूने काल रात्री बेदम मारहाण केली. पूर्व भागातील फेरीवाले रस्ते, पदपथांवरून हटत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. जितलाल रामआश्रय वर्मा (२३), श्रीपाल रामआश्रय वर्मा (२५) अशी आरोपी फेरीवाल्यांची नावे आहेत. ते दोघे भाऊ आहेत.
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत शासनाची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या १० प्राथमिक शाळा कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत म्हणून मंगळवारी घोषित केल्या.
पिंपरी: अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या दोन परवाना निरीक्षकांना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.
नागपूर : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असताना काँग्रेसचे विदर्भातील नेते मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध मोर्चेबांधणीत व्यस्त आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे यांनी पटोले यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी नुकतीच दिल्लीवारी केली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्रातले खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीत मंगळवारी पहाटे निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बाळू धानोरकर यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
नाशिक: इगतपुरी प्रकरणात मुलीचे प्रियकरासोबत पलायन सहन न झाल्याने आई- वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मध्यरात्री मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली तर दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपाने मनसेला खिंडार पाडत या पक्षाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला.
वादग्रस्त मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत बंडगार्डन येथील ३०० मीटर लांबीच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत पदपथ, घाट आणि घाटांच्या सुशोभीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा…
अमरावती : स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या छोट्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. तथापि, जिल्ह्याचे वैभव असलेली ही विहीर अजूनही दुर्लक्षितच आहे.
आयएएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एकास अटक केली आहे. औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोतया उपस्थित होता. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली . सविस्तर वाचा…
कात्रज-कोंढवा रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी भूसंपादन करावे लागणार असून त्यासाठी जागा मालकांची यादी महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेले २०० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्यानंतर ऑक्टोबरपासून भूसंपादनाची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे.
गडचिरोली : पाच महिन्यांपूर्वी हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा धरणग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार मोबदला देणार, असे जाहीर केले होते. परंतु अद्याप कोणताही मोबदला न मिळाल्याने पीडित शेतकरी मागील ३४ दिवसांपासून पुन्हा साखळी उपोषणाला बसले आहे.
सांगली : लोकसभा, विधानसभा या निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपले महत्त्व वाढावे यासाठी भाजपमधील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.
नागपूर : राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदवी व पदव्युतर पदवी महाविद्यालयांत तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात प्राध्यापकांची १०५ पदे निर्मिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे आता अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील पदभरतीला गती येणार आहे. यामुळे हजारो इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
नागपूर : राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, खर्रासह तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध आहे. त्यानंतरही नागपूरसह मध्य भारतात उच्चभ्रू घरातील तरुणींमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत असल्याचे निरीक्षण इंडियन डेंटल असोसिएशनने नोंदवले आहे. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.
अलिबाग- किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून दरम्यान ३५० वा शिवाराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. शिवभक्तांनी प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी केले. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतंय? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती दिवस मन की बात करत राहणार? कधीतरी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं द्या असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
नागपूर : कोराडीत प्रस्तावित वीज प्रकल्पाच्या जनसुनावणीत काँग्रेस-भाजपा समर्थक समोरासमोर आल्यावर गोंधळ उडाला. सुनावणीत कुणीही विरोधात मत मांडताच उपस्थित जमाव दबावतंत्राचा वापर करत होता. त्यामुळे प्रकल्पाला समर्थन दर्शवणारे खरच स्थानिक नागरिक होते की भाजपा कार्यकर्ते होते, हा प्रश्न आता चर्चिला जात होता.
पिंपरी- चिंचवडमध्ये पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. दिलीप प्रेमनारायण तिवारी, चंदनकुमार राय आणि सुगन कुमार राय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सविस्तर वाचा
रेल्वेत विनातिकीट अथवा वैध तिकीट नसलेल्या प्रवाशांवर सातत्याने कारवाई केली जाते. पुणे विभागात महिला तिकीट तपासनीस मनीषा चाकणे यांनी मागील आर्थिक वर्षात तब्बल ९७ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यांनी या कालावधीत रेल्वेला दिवसाला सरासरी ३३ हजार ६४१ रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. सविस्तर वाचा
शिवराज्याभिषेक लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. या सोहळ्यात राज्य सरकारही यावेळी सहभागी होणार आहे. सोहळ्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र, या पारंपरिक सोहळ्यात कोणताही नाटकीपणा असू नये, अशी अपेक्षा स्वराज संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. सविस्तर वाचा
वादग्रस्त मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत बंडगार्डन येथील ३०० मीटर लांबीच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत पदपथ, घाट आणि घाटांच्या सुशोभीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा
राज्यात विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील वाद वाढत असून दररोज राजकीय आरोपाच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमिवर शहरात शांतता कायम राहावी, यासाठी मंगळवारपासून १३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. सविस्तर वाचा
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन तयारीला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत नेहमीप्रमाणे असुरक्षित, मोडकळीस आलेल्या तब्बल ११९२ वाडे, इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. दरवर्षी नोटीसचा सोपस्कार पार पाडला जातो. यावेळी त्यापेक्षा वेगळे काही घडले नाही. सविस्तर वाचा
शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित शोभयात्रे उदयनराजेंनी सहभाग नोंदवत स्वतः दुचाकी चालविली.उदयनराजे वर प्रेम करणाऱ्या सातारकरांनी व शिवभक्तांनी राजांची ही छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली ही शोभायात्रा पाण्यासाठी राजपथावर दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली. सविस्तर वाचा
महाराष्ट्रातल्या राजकीय आणि इतर घडामोडींवर एक नजर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.