Maharashtra Breaking News Today, 04 December 2024: राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यांचे निकाल लागले आहेत. चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर या निकालांवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्या जिंकलेल्यांचं अभिनंदन करतो असं उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा म्हटलं आहे. तसंच आता महाराष्ट्रात याच असंही म्हटलं आहे. तर असा निकाल लागणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आज संजय राऊत यांनी निकालांविषयी बोलताना भाजपाचं अभिनंदन केलं.. आणि मोदी है तो भाजपा है.. मोदींना वगळलं तर भाजपा काय आहे? असा खोचक प्रश्न विचारला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सिंधुदुर्गात आगमन होणार आहे. यासह राज्यातल्या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Latest Latest Maharashtra News Updates| "मोदी है तो भाजपा है..", निकालांवरुन संजय राऊत यांचा टोला; यासह महत्त्वाच्या बातम्या
भाजपाच्या विजयाचा देशभरात जल्लोष साजरा होत असताना मेहकर येथे भाजपाच्या दोन गटात राडा झाला.
भंडारा : निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या दोन नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्ष विरोधी हालचाली तसेच नियोजित बैठकांना नित्यची अनुपस्थिती व पक्ष श्रेष्ठींच्या आदेशांचे उल्लंघन करण्याचा ठपका ठेवून भाजपच्या या दोन प्रमुख नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे यांनी पत्र परिषदेतून याबाबत माहिती दिली. पंचायत समिती सभापती नंदु रहांगडाले तथा पंचायत समिती सदस्या पल्लवी कटरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अधिकृत पत्र प्रसार माध्यमांना देण्यात आले.
दुकानावर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेकडे पुणे व्यापारी महासंघाने काही दिवसांची मुदत मागितली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील व्यापारी महासंघाचे पदाधिकारी लवकरच भेट घेणार आहेत. मनसेचे नेते अनिल शिदोरे, मनसेचे नेते बाबू वागसकर, मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि व्यापारी महासंघ अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील,अरविंद कोठारी यांच्यात जवळपास तासभर बैठक चालली होती.
शिवसेनेच्या (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) गटात काल रविवारी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात तुफान राडा झाला.
पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने चार पिस्तूले आणि दहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. हे पिस्तूले सहा ते सात महिन्यापूर्वी मध्यप्रदेश या ठिकाणाहून आणले होते. याप्रकरणी हरीश काका भिंगारे, गणेश बाळासाहेब कोतवाल, शुभम जगन्नाथ पोखरकर आणि अरविंद अशोक कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हरीश भिंगारे हा मूळचा उरवाडे या ठिकाणचा असून त्या ठिकाणी स्थानिक व्यक्तीशी शेत जमिनीच्या हक्कावरून वाद झाला होता, म्हणून तो पिस्तूल बाळगत असल्याचं समोर आलं आहे.
नालासोपारा पूर्वेच्या तुळींज गावातील सेवालाल नगर येथे सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.
पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टर संजय मरगळे याना गुन्हे शाखेने अटक केली. ललित पाटील प्रकरणांत यापूर्वी ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह कारागृहातील रक्षकासह समुपदेशकाला गुन्हे शाखेने अटक केली होती.
मुंबई: मुलुंडमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका बांधताना कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी मुलुंडमधील भाजपच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाला पुन्हा एकदा विरोध केला आहे.
दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात या मागणीसाठी सोमवारी कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली.
पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ अवघ्या वर्षभराचा राहणार असल्याने बहुजन विकास आघाडी तसेच शिवसेना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ही पोटनिवडणूक टाळण्यासाठी प्रयत्न केले होते.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्षात राजीनामा कोणी देत नसतो, अशा शब्दांत आमदार देशमुख यांना घरचा आहेर दिला.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका कैद्याने हृदयाचा आजार असल्याची तक्रार कारागृह प्रशासनाकडे केली.
झिम्बाब्वेमधील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नालॉजी’ (एनयुएसटी – नस्ट) परिसरातील झाडेसुद्धा आता बोलायला लागली आहेत.
नवी मुंबई: स्वच्छतेमध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेली नवी मुंबई महानगरपालिका केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच अभियानांमध्ये पुढाकार घेऊन काम करताना दिसते. अशाच प्रकारे केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 'स्वच्छ शौचालय अभियान' कार्यक्रमातही महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका उत्साहाने सहभागी झालेली आहे.
१९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिवसापासून अभियानाला प्रारंभ झाला असून २५ डिसेंबर या सुशासन दिनापर्यंत अभियान कालावधी असणार आहे. या पाच आठवड्यांच्या कालावधीत सर्व शौचालयांमध्ये स्वच्छता व देखभाल विशेष मोहीम राबवली जाणार असून शौचालयांमध्ये 'कार्यान्वित, प्रवेशयोग्य, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित' अशा बाबींनुसार शौचालय तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिला बचत गटांद्वारे शौचालयांची तपासणी करण्यात येणार असून त्याची वर्गवारी केली जाणार आहे. या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरणही केले जाणार आहे. यासाठी महिला बचत गटांची नियुक्ती करण्यात येत असून त्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला बचत गटांचे हे तपासणी समूह शौचालयांना भेटी देऊन त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत दिलेल्या निकषानुसार त्यांचे मूल्यांकन करून शौचालयांना श्रेणी देतील. याप्रमाणेच 'स्वच्छ शौचालय चॅलेंज' जाहीर करण्यात आले असून ५ डिसेंबर ते १५ डिसेंबर हा या अभियानाचा कालावधी आहे. या अंतर्गत स्वच्छ शौचालयांना 'स्वच्छ भारत सार्वजनिक शौचालय' असा गुणवत्तेचा दर्जात्मक शिक्का प्राप्त होणार आहे.
अभियानाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी विविध शौचालयांना भेटी देत तेथील देखभाल करणाऱ्यांना अधिक गुणात्मक काम करण्याच्या सूचना दिल्या व शौचालयातील स्वच्छतेची आणि सुविधांची पाहणी केली.
स्वच्छता विषयक नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी नवी मुंबई महानगरपालिका या स्वच्छ शौचालय अभियानाच्या अनुषंगाने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय, माहिती शिक्षण व प्रसारासाठी वॉल स्ट्रक्चर उभारणी, स्वच्छतागृहातील वर्तनाविषयी जागरूकता, प्रभागातील शौचालयांच्या स्थितीविषयी चर्चा तसेच शौचालयांची देखभाल करणाऱ्या केअरटेकरला बेस्ट केअर टेकर पुरस्कार देऊन गौरविणे असे नानाविध उपक्रम राबविणार आहे.
नवी मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व नवी मुंबईला विविध कारणांमुळे भेटी देणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाची शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असून महानगरपालिकेची सर्व शौचालय गुगल मॅप वर सहजपणे उपलब्ध आहेत व नागरिकांच्या वापरासाठी त्यांचा गुणात्मक दर्जा कायम राहील याच्याकडेही लक्ष दिले जात आहे.
शहरातून सोनसाखळी चोरी करणाऱ्या नोंदीवरील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे सोनसाखळी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेच्या वतीने शहर परिसरातील सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी काम सुरू आहे.
पोलीसांनी सापळा रचत महेश जाधव (२४, रा.चेहडी पंपिंग स्टेशन), भारत उर्फ सोनु चावरे (३१, रा. लाखलगाव) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक देशी बंदूक, पाच जिवंत काडतुस, चाकू, दुचाकी असा ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी मु्देमाल आडगाव पोलिसांच्या ताब्यात दिला असून संशयित महेशने सोनसाखळी चोरीची कबुली दिली.
शहर परिसरातील उपनगरमध्ये सहा, नाशिकरोड परिसरात दोन, म्हसरूळ परिसरात दोन, पंचवटी परिसरात एक, मुंबई नाका येथे एक याप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली. सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागातील राहुल नगर मध्ये भूमाफियांनी तीन बेकायदा इमारती उभारल्या आहेत. या इमारतींना ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी दोन महिन्यापूर्वी कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा पाठविल्या होत्या.
नवी मुंबई: माथाडी कामगार कायद्याची पायमल्ली होत असल्याने १४ डिसेंबरला राज्यव्यापी एकदिवासिय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या संपात प्रथमच भाजी पाला , फळ मार्केट तसेच खाजगी कंपनीतील कामगारही संपावर जाणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मुंबई: बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या बस आगारांमधील उपहारगृहांची दुर्दशा झाली असून बस वाहक आणि चालकांना बसगाडीतच बसून जेवणाचा डबा खावा लागत आहे. सविस्तर वाचा...
मालवण आणि तार्कर्लीचा हा सुंदर समुद्र किनारा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आणि इथलं वातावरण हे भारतात नवा जोश निर्माण करतं आहे. झुकू नका, थांबू नका पुढे चाला हा मंत्र नौदलाने दिला आहे. आज मी नौदलाच्या अधिकाऱ्यांना नेव्ही दिवसाच्या शुभेच्छा देतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.
कल्याण: कल्याण येथील रामबाग परिसरात राहणाऱ्या अश्विनी गायकवाड आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा आदिराज या दोघांच्या हत्येचे नवे कारण आता समोर आले आहे.
शिवस्पर्शाने पावन झालेल्या भूमित मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करतो. नौदलाचे सगळे अधिकारी आणि बंधू भगिनी या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणा मोदी मॅजिक सगळ्यांनीच पाहिलं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आहे. जो विजय भाजपाला मिळालं आहे त्यामुळे देशात गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे हे लोकांनी दाखवून दिलं आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मेट्रो खांबांवर नेत्यांचे स्वागत फलक, पोस्टर लावण्याचे प्रयत्न अधिवेशन काळात केले जातात.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा परिसर पाहिला आणि हिरोजी इंदुलकरांना हा किल्ला बांधायला सांगितला. रायगडही हिरोजी इंदुलकरांनी बांधला आहे. किल्ल्यांचं काम पाहिल्यानंतर छत्रपती शिवराय हिरोजींनी म्हणाले तुम्हाला काय देऊ? त्यावर हिरोजी म्हणाले मला काही नको. परत छत्रपती शिवराय म्हणाले काय हवं ते मागा. त्यावर हिरोजी म्हणाले जरेश्वर मंदिराच्या शेवटच्या पायरीवर माझं नाव लिहिण्याची संमती द्या. मला तुमच्या पायाशी असू द्या असे त्यावेळचे मावळे होते असं नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं.
मुंबई: म्हाडातर्फे गिरणी कामगारांना घरे देण्यात येणार असून त्यासाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत. घराच्या पात्रतेसाठी १९८२ मध्ये कामावर हजर असल्याचा पुरावा सादर करण्याची अट गिरणी कामगारांना घालण्यात आली असून ही अट जाचक ठरू लागली आहे.
मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून नागपुरातील मेडिकलची ख्याती आहे.
विधानसभेतील २८८ आमदार मराठा आरक्षणाची मागणी करतील असा आशावाद गायकवाड यांनी बोलून दाखविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने नारायण राणेंनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो आहे. याचा विशेष आनंद आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा होतो आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांचीही उपस्थिती होती. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.
पुणे: राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी तिसऱ्या सदस्याने राजीनामा दिला आहे. आयोगाचे योगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यामुळे महिनाभरात आयोगातील तीनजणांनी राजीनामा दिला आहे.
डोंंबिवली: कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचरा वाहनावरील एका वाहन चालकावर गेल्या आठवड्यात पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर हल्ला झाला होता. धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला होता.
राऊत यांनी निकालांविषयी बोलताना भाजपाचं अभिनंदन केलं.. आणि मोदी है तो भाजपा है.. मोदींना वगळलं तर भाजपा काय आहे? असा खोचक प्रश्न विचारला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सिंधुदुर्गात आगमन होणार आहे. यासह राज्यातल्या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.