Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते त्यांच्या सातारा येथील गावी गेले आहेत. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पार पडलेल्या गुप्त बैठकीनंतर महाराष्ट्र म्हणजे गंमत जंमत नाही असं म्हणत सामनातून अग्रलेख लिहित टीका करण्यात आली आहे. तर शिंदे गटातले दहा आमदार नाराज असून ते ठाकरे गटात परतू शकतात असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसंच त्यांना परत आपल्या गटात घ्यायचं की नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंचा असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण २०१९ पासून निरनिराळ्या वळणांवर गेलं आहे. अगदी मागच्याच महिन्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. तिथपर्यंत ही वळणं येतच होती. अशात आता पुढे आणखी काही घडामोडी घडणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच राज्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Maharashtra Live Today, 14 August 2023 | शिंदे गटाचे १० नाराज आमदार ठाकरे गटात परतण्याच्या तयारीत! रोहित पवारांचा दावा आणि महत्त्वाच्या घडामोडी

19:10 (IST) 14 Aug 2023
कोल्हापूरातील चार खेळाडूंची प्रो-कबड्डीसाठी निवड; प्रत्येकी २० लाख

कोल्हापूर: येथील चार खेळाडूंची प्रो-कबड्डीच्या आगामी दहाव्या सिझनसाठी विविध संघातून निवड झाली आहे. कबड्डी राव’ज अकडमीमध्ये प्रशिक्षण घेणारे तेजस मारुती पाटील, ओंकार नारायण पाटील, आदित्य शंकर पोवार व दादासो शिवाजी पूजारी अशी त्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा...

18:24 (IST) 14 Aug 2023
गडचिरोली पोलीस दलातील ३३ जवानांना ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य’ पदक

गडचिरोली: नक्षल्यांशी मुकाबला करताना उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ३३ गडचिरोली पोलीस जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

17:50 (IST) 14 Aug 2023
हिंदी विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू रजनीश कुमार यांचा अखेर राजीनामा….

वर्धा: येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी चार वर्ष हे पद भूषविले.

सविस्तर वाचा...

17:39 (IST) 14 Aug 2023
नागपूर: पत्नीची हत्या करून तासभर मोबाईल बघितला, मृतदेहाशेजारीच झोपला…

नागपूर: पतीने पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून खून केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास हुडकेश्वरमध्ये उघडकीस आली. नायरा शफी खान (वय ३५, टेक ऑफ गार्डन सीटी, हुडकेश्वर) असे मृत महिलेचे तर समीर मोहम्मद हनीफ अन्सारी (वय ४८) असे आरोपी पतीचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

16:44 (IST) 14 Aug 2023
५ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज पुन्हा मूळ मालकांच्या ताब्यात; ‘या’ गोष्टींचा समावेश

नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध गुन्हयात जप्त केलेल्या मुद्देमालाचे हस्तांतरण समारंभ आज पार पडला. सिडको ऑडीटोरियम मध्ये पार पडलेल्या कार्यक्रम वेळी आमदार मंदा म्हात्रे, गणेश नाईक, महेश मालदी, प्रशांत ठाकूर, पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्या सह सर्व उच्च पदस्थ पोलीस अधिकारी व फिर्यादी उपस्थित होते.

सविस्तर वाचा...

16:43 (IST) 14 Aug 2023
नाल्‍यातला कचरा महापालिकेच्‍या दारात; शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

अमरावती: शहरात जागोजागी कचरा साचला आहे, स्वच्छता नाही, ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. या अडचणीच्या वेळोवेळी तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्‍या वतीने ‘कचरा फेको’ आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 14 Aug 2023
जिल्हा परिषद आरोग्य पद भरतीत सावळा गोंधळ; कंपनीकडून आधी गुपचूप जाहिरात नंतर शुद्धिपत्रक!

जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्याचा कंत्राट पुण्यातील एका खासगी कंपनीला दिला. त्या कंपनीने लपून छपून मुलाखती घेण्याचा घाट घातला होता. मात्र काही राजकीय  व सामाजिक संघटनांनी हा गंभीर प्रकार उजेडात आणल्यानंतर कंपनीने सारवासारव करीत शुद्धिपत्रक काढून मुलाखती स्थगित केल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा

15:42 (IST) 14 Aug 2023
जुहू चौपाटीवर सहा जणांना जेलीफिशचा दंश

रविवारी सायंकाळी जुहू चौपाटी येथे सहा पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्यामुळे सहा जणांना रुग्णालयात दाखल करावे करावे लागले. त्यात तीन बालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. सविस्तर वाचा

15:42 (IST) 14 Aug 2023
महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार, पण मुहूर्त कधी..?

जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसला. ऑगस्ट महिन्यात बऱ्याच भागातून पावसाने उसंत घेतली. राज्यात आता काही ठिकाणी हलक्या सरी कोसळताहेत, पण जोरदार पावसाची अजूनही प्रतिक्षाच आहे.

सविस्तर वाचा

15:41 (IST) 14 Aug 2023
मुंबई : महारेरा दलालांच्या दुसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर ; ३०१० पैकी २८१२ उमेदवार यशस्वी

महारेराच्या प्रशिक्षणांतर्गत स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांच्या ६ ऑगस्टला झालेल्या दुसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून  ३०१०  पैकी २८१२ उमेदवार यशस्वी झाले आहेत. दुसऱ्या परीक्षेचा निकाल ९४ टक्के लागला आहे. पहिल्या परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला होता. सविस्तर वाचा

15:36 (IST) 14 Aug 2023
मुंबई : नवाब मलिक यांच्या कार्यकर्त्यांकडून कुर्ल्यात शक्तिप्रदर्शन

सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सोमवारी नवाब मलिक यांची सुटका होणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुर्ल्यातील रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.

सविस्तर वाचा

15:34 (IST) 14 Aug 2023
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. उत्कृष्ठ सेवेसाठी हे पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करण्यात येतात.

सविस्तर वाचा

15:33 (IST) 14 Aug 2023
पुणे: सडक सख्याहरीच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न;ओैंध भागातील घटना

सडक सख्याहरी तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक घटना ओैध भागात घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा

13:09 (IST) 14 Aug 2023
पुण्यात भाजप आणि काॅंग्रेसला गटबाजी व नाराजीचा फटका

राजकारणामध्ये सहनशीलता संपली की, त्यातून होणारा स्फोट हा राजकारणाची दिशा बदलणारा ठरत आला आहे. पुण्यात सध्या शिस्तप्रिय भाजप आणि शिस्तीच्या नियमांमध्ये अडकलेली काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस उफाळून आल्याने दोन्ही पक्षांची पांघरलेली शिस्तप्रियता पडद्यावर आली आहे.

सविस्तर वाचा

13:01 (IST) 14 Aug 2023
“एकनाथ शिंदे आजारी असल्याचा बनाव रचून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हाचलाची सुरु”, वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा

राज्यातील सरकार सैरभैर झाले असून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपचा डाव असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. म्हणूनच शिंदे आजारी असल्याचा बनाव करण्यात येत आहे. असेही वडेट्टीवार म्हणाले. ते गडचिरोली येथे आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा

12:55 (IST) 14 Aug 2023
जुहू चौपाटीवर सहा जणांना जेलीफिशचा दंश

रविवारी सायंकाळी जुहू चौपाटी येथे सहा पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्यामुळे सहा जणांना रुग्णालयात दाखल करावे करावे लागले. त्यात तीन बालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. सविस्तर वाचा…

12:54 (IST) 14 Aug 2023
धुळ्याजवळ वैद्यकीय व्यावसायिकास बंदुकीच्या धाकाने लूट

तालुक्यातील चाळीसगाव-धुळे मार्गावरील तिखी फाट्याजवळ वैद्यकीय व्यावसायिकास अडवून बंदुकीचा धाक दाखवित तिघांनी त्याची मोटार सायकल, भ्रमणध्वनी आणि आठ हजार रुपये याप्रमाणे २८ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट केली. सविस्तर वाचा…

12:45 (IST) 14 Aug 2023
पुणे: शिकवणी चालकाकडून शाळकरी मुलीवर बलात्कार

पुणे: शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर शिकवणी चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा...

12:21 (IST) 14 Aug 2023
एकीकडे ‘घरघर मोदी’चा प्रचार, दुसरीकडे ‘नमो सन्मान’ वर सवाल

राज्यात एकूण लार्भार्थी संख्या ९७ लाख, अनुदान वाटप झालेले ८५ लाख, अनुदानापासून वंचित १२ लाख. हे सरकारी आकडे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने राज्य शासनाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे. यातून योजनेपासून वंचित शेतकऱ्यांची संख्या कळते.

सविस्तर वाचा

11:49 (IST) 14 Aug 2023
भाजपची उत्तर भारतीयांसाठी शिवआराधना आणि महिलांसाठी मंगळागौरीची धूम

भाजपकडून उत्तर भारतीयांसाठी आता अधिक श्रावणमासानिमित्ताने शिवआराधना केली जाणार आहे. चुनाभट्टी येथील पुरातन शिवमंदिरात सोमवारी शिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुंबई भाजप अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांच्यासह अनेक आमदार त्यास उपस्थित होते. सविस्तर वाचा…

11:41 (IST) 14 Aug 2023
पिंपरी : इंद्रायणी नदीत दोन जण बुडाले, गेल्या ४८ तासांपासून शोध मोहीम सुरूच…

पिंपरी- चिंचवडमध्ये इंद्रायणी नदीत दोन तरुण बुडाले असून गेल्या ४८ तासांपासून त्यांचा शोध सुरू आहे. अद्याप ते मिळून न आल्याने भीती व्यक्त केली जात आहे. शक्तिमान कुमार आणि सोनू कुमार (दोघांचे वय- २० वर्ष) असं इंद्रायणी नदीत बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

11:37 (IST) 14 Aug 2023
१२ वी पास आणि पदवीधरांना MIDC मध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ८०२ पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने २ सप्टेंबर, २०२३ पासून ते २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा

11:27 (IST) 14 Aug 2023
अकोल्याच्या नशिबी ध्वजारोहणालाही मंत्री नाहीच; उपमुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्याला वेळ देतील का?

अकोला: अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा पदभार असल्याने ते अकोल्याला वेळ देऊ शकत नसल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा...

10:52 (IST) 14 Aug 2023
भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक; भीषण अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू

राजुरा शहरालगत असलेल्या धोपटाला पेट्रोल पंप जवळ रात्री रविवारी ८ वाजता राजुराकडून सास्तिकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने मोटारसायकलने आपल्या पत्नी व मुलीला घेऊन येणाऱ्या निलेश वैद्य (३२ वर्ष) रुपाली वैद्य (२६ वर्ष), मधू वैद्य (३ वर्ष) यांचा जोरदार धडक दिली. 

सविस्तर वाचा

10:48 (IST) 14 Aug 2023
कांदा यंदाही करणार वांदा!; कोणाला रडवणार अन सरकारी धोरण काय जाणून घ्या…

टोमॅटोने काही कालावधीसाठी दरांमध्ये चमक दाखवून अनेक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना लाभ मिळवून दिला. आता टोमॅटोचे भाव स्थिरावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आगामी काळात कांद्याच्या दरात मोठी वाढ होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा

10:47 (IST) 14 Aug 2023
यवतमाळ : हातावर गोंदलेल्या नावामुळे खुनाचा उलगडा…

कौटुंबिक वादात जावयाने एका मित्राच्या मदतीने दारुड्या मेहुण्याला संपविले. दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मोझर शिवारात १५ दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले. खूनप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

10:47 (IST) 14 Aug 2023
नागपूर : पतीने पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; पाणी भरण्यास सांगितल्याचा राग

घरात पाणी भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. ही घटना रविवारी सकाळी आठ वाजता शंभूनगरात उघडकीस आली. मुकुल कुमारी सिन्हा (६३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर पुरुषोत्तम कुमार सिंह (६५) असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा

10:43 (IST) 14 Aug 2023
स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची होणार सुटका

कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या राज्यातील १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी (१५ ऑगस्ट) विशेष माफी देण्यात आलेल्या कैद्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…

10:43 (IST) 14 Aug 2023
मेट्रोचा प्रवास सहजसोपा! ‘एक पुणे कार्ड’चा पुण्यासह देशभरात कुठेही वापर शक्य

महामेट्रोच्या ‘एक पुणे कार्ड’ या बहुउद्देशीय कार्डचे लोकार्पण करण्यात आले आहे. पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे प्रीपेड कार्ड असून, ते बहुउद्देशीय आहे. हे कार्ड पुणे मेट्रोच्या प्रवासाबरोबरच देशात कुठेही किरकोळ ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरता येऊ शकते. सविस्तर वाचा…

10:42 (IST) 14 Aug 2023
सावधान! राज्यात डोळ्यांच्या साथीचे आठ दिवसांत दोन लाख रुग्ण

राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरात ११ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या सुमारे चार लाखांवर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर पुणे, जळगाव, नांदेड आणि चंद्रपूरमध्ये प्रमाण जास्त आहे.

सविस्तर वाचा…

maharashtra political crisis

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट स्थापन केला. परिणामी राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या १०५ आमदारांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता स्थापन केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते त्यांच्या सातारा येथील गावी गेले आहेत. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पार पडलेल्या गुप्त बैठकीनंतर महाराष्ट्र म्हणजे गंमत जंमत नाही असं म्हणत सामनातून अग्रलेख लिहित टीका करण्यात आली आहे. तर शिंदे गटातले दहा आमदार नाराज असून ते ठाकरे गटात परतू शकतात असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसंच त्यांना परत आपल्या गटात घ्यायचं की नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंचा असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

Story img Loader