Maharashtra Political Crisis Updates : राज्यात एकीकडे विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप होत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाकडून हे आरोप फेटाळत विरोधकांवर आरोप केले जात आहेत. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपाच्या केंद्रिय नेत्यांचंही या निवडणुकीवर विशेष लक्ष आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यापर्यंत अनेक नेते मुंबईला भेट देताना दिसत आहे. याशिवाय शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निकाल काय निकाल देतो याकडे अनेकांचं लक्ष आहे. या घडामोडींसह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील लाईव्ह अपडेट्सचा आढावा…

Live Updates

Maharashtra Political Updates : राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील लाईव्ह अपडेट्सचा आढावा...

20:21 (IST) 20 Jan 2023
शिवसेना कुणाची याचा मुख्य निकाल कधी लागणार? खासदार राहुल शेवाळेंनी दिलं उत्तर, म्हणाले...

शिवसेना कुणाची याचा मुख्य निकाल कधी लागणार? असा प्रश्न शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंना विचारण्यात आला. ते म्हणाले, "शिवसेना कोणाची यावरील मुख्य निकाल ३० जानेवारीला येईल, अशी आशा आहे. कारण ३० जानेवारीला उत्तर दाखल करायचं आहे. त्यानंतर निवडणूक आयोग कदाचित आणखी एक तारीखही घेऊ शकतो. कारण दाखल उत्तरंही आयोग तपासून बघेल. त्यानंतरच निर्णय दिला जाईल." ते शुक्रवारी (२० जानेवारी) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

19:57 (IST) 20 Jan 2023
नाशिक : ठाकरे – शिंदे गट वाद; गोळीबार प्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

देवळाली गावात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या वादात हवेत गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील लवटेला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. संशयित हा शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या, तर माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा मुलगा आहे.

सविस्तर वाचा...

19:57 (IST) 20 Jan 2023
शिवसेना कोणाची यावर आजही निर्णय नाही, निवडणूक आयोगाकडून सुनावणीसाठी पुढील तारीख

शिवसेना कोणाची यावर आजही निर्णय नाही, निवडणूक आयोगाकडून सुनावणीसाठी पुढील तारीख, ३० जानेवारीला पुन्हा सुनावणी, ठाकरे आणि शिंदे गटाला सोमवारी लेखी उत्तर देण्याचे निर्देश

19:04 (IST) 20 Jan 2023
नाथूरामला खलनायक दाखवल्यास.. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाबाबत अमर हुतात्मा हिंदू महासभेचा गंभीर इशारा

नागपूर : २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या निमित्ताने नवा वाद निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहेत. या चित्रपटात नाथूरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा अमर हुतात्मा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सविस्तर वाचा -

18:55 (IST) 20 Jan 2023
प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? शिंदे गटाचा ठाकरे गटाला सवाल

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू, प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? जेठमलानी यांचा ठाकरे गटाचे वकील कामत यांना सवाल

18:51 (IST) 20 Jan 2023
अडीच तासाने ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद संपला, आता शिंदे गटाकडून युक्तिवाद

अडीच तासाने ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपला, आता शिंदे गटाकडून आयोगासमोर युक्तिवाद होणार

18:43 (IST) 20 Jan 2023
महाराष्ट्रात शिंदे गटाने घटनाबाह्य विभागप्रमुख नेमले, ठाकरे गटाचा आरोप

महाराष्ट्रात शिंदे गटाने घटनाबाह्य विभागप्रमुख नेमले, मात्र मुंबईत घटनेप्रमाणे विभागप्रमुख नेमले, ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद

18:42 (IST) 20 Jan 2023
पुणे : शरद पवार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या एकाच व्यासपीठावर?

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी एकाच व्यासपीठावर असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत दोघे नेते एकत्र येणार असल्याने ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा...

18:37 (IST) 20 Jan 2023
"याचिकेत जे आहे तेच बोला", शिंदे गटाच्या वकिलाचा ठाकरे गटाच्या वकिलाला सल्ला

याचिकेत जे आहे तेच बोला, जेठमलानी यांचा कामत यांना सल्ला, मी माझ्या पद्धतीनेच बोलणार, कामत यांचं जेठमलानी यांना उत्तर

18:20 (IST) 20 Jan 2023
“मला ‘पाणीवाला बाबा’ व्हायचेय!” पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या (आयवा) तीन दिवसीय ५५ व्या अखिल भारतीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात झाले. हे अधिवेशन पुण्यातील हडपसर येथील मेस्से ग्लोबल सेंटर (लक्ष्मी लॉन्स) येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी नेहमीच्या शैलीत भाषण केले.

सविस्तर वाचा...

18:12 (IST) 20 Jan 2023
जेठमलानी आणि कामत यांच्यात शाब्दिक चकमक

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात शाब्दिक चकमक, प्रतिनिधी सभेवरून वाद, जेठमलानी-कामत वादात आयोगाची मध्यस्थी

17:48 (IST) 20 Jan 2023
शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद

शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य, प्रतिनिधी सभा ठाकरे गटाकडेच, मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद

17:45 (IST) 20 Jan 2023
विदर्भात गुंतवणूक करण्यासाठी दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच

नागपूर : स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत ज्या कंपन्यांनी विदर्भात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार केले त्यापैकी तीन कंपन्या या महाराष्ट्रातील चंद्रपूर, जालना व औरंगाबाद येथील असल्याची माहिती उघड झाली आहे. या कंपन्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गुंतवणूक करणार आहेत हे येथे उल्लेखनीय.

सविस्तर वाचा...

17:28 (IST) 20 Jan 2023
निवडणूक आयोगासमोरील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगासमोरील युक्तिवाद संपला, सिब्बलांनी शिंदे गटाचे दावे खोडले, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू, शिंदे गटाकडूनही युक्तिवाद होणार

17:06 (IST) 20 Jan 2023
पुणे : बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न

बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मुंढवा भागात घडली. या घटनेत महिला बचावली असून पसार आराेपीचा शोध घेण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

17:00 (IST) 20 Jan 2023
पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही, ठाकरे गटाचा आयोगासमोर दावा

प्रतिनिधी सभाच पक्ष चालवतो, पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद

16:51 (IST) 20 Jan 2023
विधीमंडळ आणि संसदेत आमचीच संख्या अधिक, ठाकरे गटाचा दावा

आमदार-खासदार मोजायचे असतील तर विधानसभा-विधान परिषद, लोकसभा-राज्यसभा असे मोजा, विधीमंडळ आणि संसदेत आमचीच संख्या अधिक, ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत दावा

16:42 (IST) 20 Jan 2023
राष्ट्रीय कार्यकारणीला मुदतवाढ द्या किंवा निवडणूक घ्या, ठाकरे गटाची मागणी

राष्ट्रीय कार्यकारणीला मुदतवाढ द्या किंवा निवडणूक घ्या, ठाकरे गटाची मागणी, २३ जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपणार

16:35 (IST) 20 Jan 2023
बंडखोर आदेश काढूनही शिवसेनेच्या दोन बैठकांना उपस्थित राहिले नाही - ठाकरे गट

बंडानंतर झालेल्या शिवसेनेच्या दोन बैठकांना उपस्थित राहण्याचे आदेश काढूनही बंडखोर हजर राहिले नाही, ठाकरे गटाचा आयोगासमोर युक्तिवाद, निवडणूक आयोगात येण्याचं ठरल्यानंतर एक दिवस आधी प्रतिनिधी सभा घेतल्याचाही आरोप

16:32 (IST) 20 Jan 2023
कपिल सिब्बल यांनी खोडला शिंदे गटाचा संख्याबळाचा दावा

कपिल सिब्बल यांनी खोडला शिंदे गटाचा संख्याबळाचा दावा, २० जूनला शिवसेनेत बंड झालं असताना १९ जुलैला शिंदे गट निवडणूक आयोगात का आला? असा सिब्बल यांचा सवाल, बंडानंतर एक महिना शिंदे गट शांत का बसला असाही प्रश्न उपस्थित

16:29 (IST) 20 Jan 2023
ठाकरे गटाने शिंदे गटाचे सर्व दावे फेटाळले, आयोगासमोर युक्तिवाद

ठाकरे गटाने शिंदे गटाचे सर्व दावे फेटाळले, तसेच बंडानंतर महिनाभर शिंदे गट शांत का होता? असा सवाल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विचारला, आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद सुरू आहे.

16:27 (IST) 20 Jan 2023
“धर्मवीर शब्दावरून राजकारण होतंय”, संभाजी राजेंची भूमिका, मोदींना म्हणाले, “तुम्ही छत्रपतींचे..”

मागील महिन्याभरापासून छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की, स्वराज्य रक्षक यावरून सध्या वाद सुरू आहे. त्याबाबत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे यांना विचारले असता ते म्हणाले की, आता आपण त्याच्यापलीकडे जाण्याची गरज आहे. या काही जुन्या पदव्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूळ उपाध्या वेगळ्या आहेत.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 20 Jan 2023
नागपुरातील आंबेडकर भवन पाडण्याचा मुद्दा पेटला, एकाच दिवशी दोन ठिकाणी आंदोलन

नागपूर : अंबाझरी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्याचा मुद्दा पेटला असून, शुक्रवारी दोन ठिकाणी आंदोलने झाली. डॉ आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीने उद्यान परिसरात, तर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली.

सविस्तर वाचा...

15:43 (IST) 20 Jan 2023
मोठी बातमी! एमपीएससीची २०२३ मधील मेगा भरती, ८ हजार १६९ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांसाठी ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ची जाहिरात एमपीएससीने शुक्रवारी प्रसिद्ध केली.

सविस्तर वाचा

15:29 (IST) 20 Jan 2023
शिवसेना कोणाची? थोड्याच वेळात निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होणार

ठाकरे गट की शिंदे गट, शिवसेना कोणाची? पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा? थोड्याच वेळात निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होणार

15:05 (IST) 20 Jan 2023
पुणे : हडपसरमध्ये सोसायटीच्या परिसरात भटक्या श्वानांना खायला दिल्याने महिलेला मारहाण

भटक्या श्वानांचे संगोपन करणाऱ्या महिलेला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:04 (IST) 20 Jan 2023
राज्यात मॅक्सीकॅबला परवाना देण्यासंदर्भात हालचाली, पाच सदस्यीय समितीची फेरस्थापना

राज्यात मॅक्सीकॅबसारख्या अनधिकृत प्रवासी वाहतुकदारांना परवाना द्यायचा की नाही, यासाठी राज्य शासनाने पाच सदस्यीय समितीची फेरस्थापना केली आहे. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मॅक्सीकॅबला परवाना देण्याचे नियोजन, त्यासंदर्भात धोरण, यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होणारा परिणाम आदींचा अभ्यास करून ही समिती अहवाल सादर करणार आहे.

सविस्तर वाचा...

13:45 (IST) 20 Jan 2023
डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून वृध्द हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

मारहाण सुरू असताना बाजुचे दोन व्यापारी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले तर फेरीवाल्यांनी त्यांनाही मारहाण केली आहे. मारहाण सुरू असताना हॉटेल मालकाचा मुलगा चिंतन देढिया यांनी रामनगर पोलीस ठाण्यात संपर्क करुन तात्काळ पोलीस हॉटेलमध्ये पाठविण्यास सांगितले.

सविस्तर वाचा

13:20 (IST) 20 Jan 2023
"विरोधी पक्षाला विनंती केली आहे की, टोमणे मारण्यापेक्षा...", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "जे पाहिजे ते काम डबल इंजिन सरकारकडून करुन घ्या. विरोधी पक्षाला विनंती केली आहे की, टोमणे मारण्यापेक्षा देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा त्यांच्याकडे मागणी करायची असते. विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी पक्षाने मिळून काम केल्यास राज्य पुढे जाईल. विधायक भूमिका घ्या. पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, तर देशाचे आहेत. मात्र, विरोधकांनी राज्यासाठी काही मागितले नाही."

13:09 (IST) 20 Jan 2023
डोंबिवलीत टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मकरोत्सव

करोना महासाथीमुळे दोन वर्ष खंड पडलेला टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मकरोत्सव हा वैविध्यपूर्ण कार्यक्रम २६ ते २९ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आहे. जागतिक भान, अध्यात्म, गायन अशी भरगच्च मेजवानी या तीन दिवसांच्या कार्यक्रमात रसिकांना घेता येणार आहे.

सविस्तर बातमी

Mumbai Maharashtra News Live Updates

राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील लाईव्ह अपडेट्सचा आढावा...