Maharashtra Political Crisis Updates : राज्यात एकीकडे विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप होत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाकडून हे आरोप फेटाळत विरोधकांवर आरोप केले जात आहेत. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपाच्या केंद्रिय नेत्यांचंही या निवडणुकीवर विशेष लक्ष आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यापर्यंत अनेक नेते मुंबईला भेट देताना दिसत आहे. याशिवाय शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निकाल काय निकाल देतो याकडे अनेकांचं लक्ष आहे. या घडामोडींसह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील लाईव्ह अपडेट्सचा आढावा…
Maharashtra Political Updates : राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील लाईव्ह अपडेट्सचा आढावा…
गुरुवारची मध्यरात्री रोहीच्या रूपाने त्यांना घेऊन जाणाऱ्या ‘टिप्पर’समोर मृत्यूच आडवा आला. यामुळे भरधाव वाहन उलटून दोघे जण घटनास्थळीच दगावले तर पाच जण जायबंदी झाले. मोताळा तालुक्यातील वडगाव मार्गावरील चांदखेड नाल्याजवळ गुरुवारी( दि. १९) मध्यरात्री हा भीषण अपघात झाला.
एखाद्या विषयाच्या जनजागृतीसाठी देश-विदेशात विविध प्राणी, मानवी अवयवांशी संबंधित विशेष दिवस साजरे होतात. परंतु देहदान दिवस साजरा होत नाही. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असल्याने जगभरात नागरिकांना देहदान करण्यासाठी आवाहन केले जाते.
जळगाव जिल्ह्यासाठी २०२३ मध्ये ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक आदींच्या वापराबाबत मर्यादा राखून व केंद्र शासनाच्या अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनिमर्यादेचे व तरतुदीचे पालन करून सकाळी सहा ते रात्री १२ या वेळेत सवलत देण्याचे १५ दिवस जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी जाहीर केले आहेत.
मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी माझी चौकशी करायचे, ईडी चौकशीबाबत आम्ही आमचे अनुभव एकमेकांना सांगितले, संजय राऊतांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया
शेतात कापूस वेचत असलेल्या शेतकरी महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. महिलेने प्रतिकार केला असता तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवानी गावात घडली.
जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील १७ हजार ५७७ जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता १३२ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून आतापर्यंत ६१८३ निविदा काढण्यात आल्या आहेत. ही सर्व कामे ३१ जानेवारी २०२३ पर्यंत कार्यारंभ आदेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्ड तयार करणे आणि वाटप करण्यात पुणे जिल्हा पिछाडीवर आहे. योजनेतील पाच लाख ५७ हजार ८१ लाभार्थ्यांपैकी केवळ एक लाख ५५ हजार ६८२ जणांना कार्ड वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण केवळ २७.९५ टक्के एवढे आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
निसर्गाचे चक्र पुन्हा एकदा पालटले असून वातावरणात मोठा बदल होत आहेत. येत्या २२ जानेवारीनंतर हवामानात बदल होणार असून ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे २३ ते २५ जानेवारीदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
छत्रपती नगर येथील मैदानावर खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत सुरू असलेल्या क्रिक्रेट सामन्यात भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक असलेल्या मुन्ना यादव यांच्या मुलांनी पंच आणि स्पर्धेचे आयोजन करणाऱ्याला मारहाण करत अक्षरश: हैदोस घातला.
पंतप्रधानांनी लोकार्पण केलेला समृद्धी महामार्ग अपघात मार्ग ठरत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. दुर्घटनांचा सापळा ठरलेल्या महामार्गावरील अपघातांची मालिका कायमच आहे. आज शुक्रवारी पहाटे असोला( ता. देऊळगाव राजा) नजीक खाजगी बस उलटून किमान २० प्रवासी जखमी झाले.
१४७ प्रकारच्या प्रजातीचे पक्षी… हिवाळ्यात ३७ प्रकारच्या प्रजातीचे स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर असलेला कर्नाळा पक्षी अभयारण्य आता आणखी फुलणार आहे. निसर्गाचे देणे लाभलेल्या या अभयारण्याने पक्षीप्रेमींनाही ओढ लावली आहे. त्याच पक्षीप्रेमी पर्यटकांसाठी वनखाते सरसावले असून निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा तयार होत आहे.
वेणूगोपाळ धूत यांनाही उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन, धूत यांच्याकडून सीबीआयने बेकायदेशीरपणे अटक केल्याचा आरोप
Bombay High Court Grants Interim Bail To Videocon Group Chairman Venugopal Dhoot @CourtUnquote https://t.co/Uw8E4B0uW0
— Live Law (@LiveLawIndia) January 20, 2023