Marathi News Updates : मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना देण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार मराठा आणि ओबीसी समाज आपली बाजू मांडण्यासाठी प्रयत्नशील आहे. मनोज जरांगे पाटील आज रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहील, असे सुतोवाच त्यांनी केले आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील घटकपक्षांची आज बैठक होणार आहे. या बैठकीतून काही तोडगा निघतो का? हे पाहावे लागेल. प्रकास आंबेडकर हे आघाडीत सामील होतात की, २०१९ प्रमाणे ते स्वबळाचा नारा देतात? याकडेही लक्ष असणार आहे. या आणि अशा सर्व घडामोडी याठिकाणी वाचायला मिळतील.

Live Updates

Mumbai Live News Update, 30 January 2024 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

20:47 (IST) 30 Jan 2024
पनवेल : शांतिवन संस्थेच्या विश्वस्त मिरा लाड यांचे निधन

या धक्यातून त्या खंबीरपणे सावरल्यानंतर लाड यांनी मुलांच्या आठवणीसाठी ‘राजीव-रजन लाड ट्रस्ट’ची स्थापना केली.

सविस्तर वाचा...

20:33 (IST) 30 Jan 2024
प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन

मुंबईहून संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर कुलकर्णी यांनी १९८२ मध्ये वेरूळ येथे ‘रॉक आर्ट गॅलरी’ सुरू केली.

सविस्तर वाचा...

20:06 (IST) 30 Jan 2024
ठाणे : खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची लाचेची मागणी

साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार असे या अधिकाऱ्याचे नाव असून पोलीस ठाण्यात सापळा रचून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा...

20:05 (IST) 30 Jan 2024
गृहमंत्री फडणवीस यांच्या जिल्ह्यात एटीएम फोडून १० लाख रुपये पळवले

घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. तातडीने उपस्थितांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांनाही माहिती दिली.

सविस्तर वाचा...

19:31 (IST) 30 Jan 2024
महिलेच्या पोटातून एक किलो वजनाचा मासाचा गोळा काढला, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया

आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन पोटाची तपासणी करणे तिला व तिच्या कुटूंबाला शक्य नव्हते.

सविस्तर वाचा...

19:12 (IST) 30 Jan 2024
स्नेहसंमेलनात अफझल खानाच्या वधाचे दृश्य दाखवल्याने विद्यार्थ्यांना माफी मागायला लावली, हिंदुत्ववादी संघटनांकडून रोष व्यक्त

अफझल खानाच्या वधाचे दृश्य दाखवल्याने भावना दुखावल्या म्हणून विद्यार्थ्यांना माफी मागायला लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

सविस्तर वाचा...

18:58 (IST) 30 Jan 2024
लोणावळ्यात अन्नातून विषबाधा झाल्याने १४६ बकऱ्यांचा मृत्यू

गावात कळवल्यानंतर गावातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी मावळ तालुका पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले.

सविस्तर वाचा...

18:57 (IST) 30 Jan 2024
“आमच्या नेत्यांचा अपमान झाला तरीही…”, प्रकाश आंबडेकर यांचे आघाडीबाबत मोठं विधान

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील झाल्याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीत आम्हाला बैठकीत बसू दिले नाही, असा आरोप वंचितचे नेते धैर्यशील पुंडकर यांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून आम्ही महाविकास आघाडीत जाणार असल्याचे म्हटले आहे. आमच्या नेत्यांचा अपमान झाला, तसेच नाना पटोले यांना अधिकार आहेत की नाही? याबाबत काँग्रेसने कल्पना दिली नसली तरी आम्ही आघाडीत जाऊ, असे त्यांनी म्हटले.

https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1752318874174005481

18:43 (IST) 30 Jan 2024
सांगली : नियोजन मंडळाच्या यादीवरुन महायुतीच्या घटक पक्षातील नाराजीनंतर पाच जणांचा समावेश

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने ही यादी रखडली होती.

सविस्तर वाचा...

18:42 (IST) 30 Jan 2024
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर; आशुतोष गोवारीकर, विवेक सावंत, प्रमोद कांबळे यांसह सहा जणांचा समावेश

नाशिक : प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते आशुतोष गोवारीकर, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन अर्थात एमकेसीएलची स्थापना करणारे विवेक सावंत, भरतनाट्यम क्षेत्रातील गुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर, शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्यासह सहा जणांना येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय स्तरावरील ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

18:31 (IST) 30 Jan 2024
वसई विरार महापालिकेतील १ हजार ६०० ठेका कर्मचार्‍यांसाठी निविदा, कायम सेवेतील भरती प्रक्रिया लांबणीवरच

वसई विरार महापालिकेतर्फे कायम सेवेतील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील १ हजार २८ जागांसाठी भरती केली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

18:16 (IST) 30 Jan 2024
मनोज जरांगे पाटील यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा, या तारखेपासून उपोषण सुरू करणार

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज रायगड किल्ल्याला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहून आल्यानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. सरकारने अध्यादेश काढला असला तरी त्याची अंमलबजवाणी धीम्यागतीने सुरू आहे. आम्हाला जे आश्वासने दिली आहेत, ती तात्काळ पूर्ण करावीत, अन्यथा मी १० फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

18:12 (IST) 30 Jan 2024
VIDEO : अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बेदरकार एटीव्हीचा अपघात व्हायरल, बेकायदेशीर एटीव्हीचा प्रश्न चव्हाट्यावर

रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ज्यात एका एटीव्हीवरचा (ऑल टरेन व्हेईकल) चालकाचा ताबा सुटतो.

सविस्तर वाचा...

18:09 (IST) 30 Jan 2024
मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांची ७५० पदे रिक्त, तत्काळ भरण्याची संघटनेची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांची तब्बल साडेसातशे पदे रिक्त असून ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी अभियंत्यांच्या संघटनेने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. पालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची सुमारे ४००, तर दुय्यम अभियंत्यांची सुमारे ३५० अशी एकूण ७५० पदे रिक्त असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा...

18:00 (IST) 30 Jan 2024
इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू

नाशिक : इगतपुरी तालुक्यात बिबट्यांचा वावर कायम असून मंगळवारी निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथे ३१ वर्षाच्या तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा संचार, पशुधनावर होणारे हल्ले, यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. मंगळवारी पहाटे इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील मीनाक्षी शिवराम झुगरे (३१) ही घराबाहेर काही कामानिमित्त पडली असता अचानक आलेल्या बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात मीनाक्षीचा मृत्यू झाला. वन विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्रिंगलवाडीसह तालुक्यात जिथे बिबट्याचा वावर आढळून येतो, अशा सर्व भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते सिताराम गावंडा यांनी केली आहे.

17:44 (IST) 30 Jan 2024
सांगली : चिडवल्याच्या कारणाने वर्गमित्रावर शाळेत कोयत्याने हल्ला

शाळेत चिडवू नकोस असे सांगितल्याच्या रागातून नववीच्या वर्गातील मुलाने वर्गमित्राच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतील आरवाडे हायस्कूलमध्ये सोमवारी सायंकाळी घडला.

सविस्तर वाचा...

17:33 (IST) 30 Jan 2024
परळीजवळ बोअरचे वाहन विद्युत तारांना चिकटले; दोन मजूर मृत्यूमुखी, दोन जखमी

बोअर खोदून परत येणाऱ्या वाहनाचा प्रवाहित वीजवाहिनीला स्पर्श होऊन उतरलेल्या विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले.

सविस्तर वाचा...

17:13 (IST) 30 Jan 2024
बैठकीला बोलवून आमचा अपमान केला; वंचितचा महाविकास आघाडीवर आरोप

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची बैठक मुंबईत सुरू आहे. आजच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीसाठी वंचितकडून प्रवक्ते धैर्यशील पुंडकर उपस्थित होते. पुडंकर यांनी आरोप केला की, आम्ही बैठकीसाठी पोहोचल्यानंतरही आम्हाला तासाहून अधिक काळ बाहेरच बसून ठेवण्यात आले. त्यामुळे पुंडकर यांनी बैठक अर्धवट सोडली आणि ते बाहेर आले. महाविकास आघाडीतील पक्षांचेच आपापसात काही ठरलेले नाही, त्यांच्यात ताळेमळ नाही, असा आरोप पुंडकर यांनी केला.

15:46 (IST) 30 Jan 2024
नागपूरकर विंग कमांडर विनित विजय मारवाडकर यांना युद्ध सेवा पदक

विंग कमांडर विनित विजय मारवाडकर यांना प्रजासत्ताक दिनी प्रतिष्ठित राष्ट्रपती पुरस्कार, युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 30 Jan 2024
भाजप नेत्या सना खान हत्याकांडाला नवे वळण, मुख्य आरोपी अमित साहू चालवायचा खंडणीचे रॅकेट! भ्रमणध्वनीमध्ये…

नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांडाचा मुख्य आरोपी अमित साहूचा भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केला होता. यातून अनेक गुपित बाहेर येत असून मुख्य आरोपी साहू हा खंडणीचे रॅकेट चालवत असल्याचेही प्राथमिकदृष्ट्या पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 30 Jan 2024
मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रात कोळ्याच्या तब्बल ४६ प्रजाती

नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पापासून तर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पापर्यंत सर्वात श्रीमंत जैवविविधतेसह वन्यजीव कॉरिडॉरमध्ये मुनिया संवर्धन राखीव क्षेत्र आहे. या राखीव क्षेत्रात तब्बल ४६ कोळ्याच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. विभागीय वनाधिकारी नरेंद्र चांदेवार यांचे हे संशोधन ‘जर्नल ऑफ एन्टॉमॉलाजी अँड झुआलॉजी स्टडिज’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. मध्य भारतातील नागपूर जिल्ह्यातील मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रातील कोळ्यांची प्रारंभिक विविधता आणि वितरणाचा हा पहिला संशोधन अहवाल आहे.

सविस्तर वाचा...

15:43 (IST) 30 Jan 2024
राज्यात थंडीचा मुक्काम वाढला

नागपूर : महाराष्ट्रात जानेवारी अखेरपर्यंतच थंडी राहील आणि त्यानंतर मात्र तापमानात वाढ होऊन थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, असा अंदाज होता. आता मात्र थंडीने आपला मुक्काम वाढवला आहे आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी कायम असणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे.

सविस्तर वाचा...

15:43 (IST) 30 Jan 2024
अमरावती-पुणे विशेष रेल्वे मार्चअखेरपर्यंत धावणार

अमरावती : मध्य रेल्वेने अमरावती पुणे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम विदर्भातून पुणे येथे नोकरी-व्‍यवसायाच्‍या निमित्‍ताने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्‍या मोठी असून त्‍यांची मोठी सोय झाली आहे.

सविस्तर वाचा..

15:42 (IST) 30 Jan 2024
जनतेमध्ये बोलण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये बोला; संजय शिरसाट यांचा छगन भुजबळांवर निशाणा

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारवर नाराज आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जाते. या नाराजीवर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरशाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी जनतेमध्ये जाऊन बोलण्यापेक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलावे, असा सल्ला शिरसाट यांनी दिला.

15:42 (IST) 30 Jan 2024
अकोला : थकबाकीचा डोंगर! पाणीपुरवठा योजनांची केवळ नऊ टक्के वसुली

अकोला : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची केवळ नऊ टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे थकबाकीचा डोंगर झाला असून पाटबंधारे विभागाकडे २५.६२ कोटी रुपयांचे वसुलीचे आव्हान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास पुरवठा बंद होण्याची टांगती तलवार आहे.

सविस्तर वाचा...

15:41 (IST) 30 Jan 2024
“भाजपा कधीच वेगळा विदर्भ करणार नाही,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा; म्हणाले…

वाशिम : स्वतंत्र विदर्भाची मागणी जुनी आहे. वेगळा विदर्भ व्हावा, यासाठी अणे, धोटे, शरद जोशींपासून लढा सुरु आहे. आम्ही त्यांच्या सोबत होतो आणि भविष्यातही राहू, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचितला निवडून आणा, वेगळा विदर्भ बनवू. भाजपा नेते वेगळ्या विदर्भाच्या बाजूने नव्हतेच, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

सविस्तर वाचा...

15:41 (IST) 30 Jan 2024
खारघरमध्ये राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह, देशभरातून हजारो वारकऱ्यांचा सहभाग

संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

15:30 (IST) 30 Jan 2024
पनवेल : व्काॅरीच्या स्फोटात एका कामगाराने प्राण गमावले, दोन जखमी

एका पोकलेन चालकाच्या पाठीवर स्फोटानंतर उडालेल्या मोठ्या दगडांचा मारा अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार जखमी झाले.

सविस्तर वाचा...

15:12 (IST) 30 Jan 2024
डोंबिवलीत प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची मित्राच्या मदतीने हत्या, आडिवलीतील विहिरीतील मृतदेहाची ओळख पटली

रिता आणि सुमित यांचे लहानपणापासून प्रेमसंबंध होते. या प्रेमात चंद्रप्रकाशचा अडथळा येत होता.

सविस्तर वाचा...

15:11 (IST) 30 Jan 2024
२२ हजारहून अधिक दहशवाद्यांची माहिती संकलित! ‘एनआयए’चा नवा डेटाबेस कार्यान्वित

मुंबई : देशभरात तसेच परदेशात सक्रिय असलेल्या २२ हजारहून अधिक दहशतवाद्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) संकलित केली आहे. दहशतवाद्यांविरुद्ध देशात दाखल झालेल्या हजारो गुन्ह्यांची माहितीही एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Today 30 January 2024

Maharashtra Live News Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज टुडे लाइव्ह

Story img Loader