Marathi News Updates : मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना देण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार मराठा आणि ओबीसी समाज आपली बाजू मांडण्यासाठी प्रयत्नशील आहे. मनोज जरांगे पाटील आज रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहील, असे सुतोवाच त्यांनी केले आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील घटकपक्षांची आज बैठक होणार आहे. या बैठकीतून काही तोडगा निघतो का? हे पाहावे लागेल. प्रकास आंबेडकर हे आघाडीत सामील होतात की, २०१९ प्रमाणे ते स्वबळाचा नारा देतात? याकडेही लक्ष असणार आहे. या आणि अशा सर्व घडामोडी याठिकाणी वाचायला मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Live News Update, 30 January 2024 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

15:00 (IST) 30 Jan 2024
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा मराठीचा गजर

नवी मुंबई : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारी, कर्मचारी वृंदासाठी मराठी भाषा विषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले असून या स्पर्धात्मक उपक्रमांना महापालिका कर्मचाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून मराठी भाषा प्रेमाची महती दर्शविणारी असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केले असून पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनात असलेले मराठी भाषा प्रेम व अभिमान यामुळेच प्रत्येक कार्यक्रमाला व स्पर्धात्मक उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे असे कर्मचारीवृंदाचे कौतुक केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धात्मक उपक्रमांचा पारितोषिक वितरण सोहळा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी विविध अधिकारी उपस्थित होते.

14:58 (IST) 30 Jan 2024
नवी मुंबई : मराठा मोर्चाबाबत पोलिसांचे ढिसाळ नियोजन

सार्वजनिक वाहतूकमध्ये वाहतूक बदल, वाहतूक बंद आदींबाबत कुठल्याही सूचना न दिल्या जाणे आणि अचानक एखादा रस्ता बंद केल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते.

सविस्तर वाचा…

14:41 (IST) 30 Jan 2024
तलाठी भरती : माजी आमदाराची मुलगी एका जिल्ह्यातून तिसरी ‘टॉपर’, स्पर्धा परीक्षेचा काडीमात्र सबंध नाही

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यांच्या ट्विटरवर तलाठी भरतीवर नवा खुलासा केला आहे. एका माजी आमदाराची मुलगी, एका जिल्ह्यामधून तलाठी भरतीत तिसरी ‘टॉपर’ आहे. त्या मुलीचा आणि स्पर्धा परीक्षेचा काडीमात्र सबंध नसल्याचा आरोप केला आहे.

सविस्तर वाचा…

14:35 (IST) 30 Jan 2024
मराठा आरक्षण आंदोलनाचा जेएनपीए बंदराला फटका, कंटेनर न आल्याने निर्यातीची जहाजे बंदरात अडकली

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईसह सर्व मार्गांवरील कंटेनर वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने बंदरातून निर्यातीसाठी जाणारी आठ मालवाहू जहाजे बारा तास अडकली होती.

सविस्तर वाचा…

14:24 (IST) 30 Jan 2024
कळंबोलीत रायगड जिल्ह्याचे विज्ञान प्रदर्शन

पनवेल : रायगड जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांचे तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन कळंबोली वसाहतीमधील सुधागड एज्युकेशन सोसायटी विद्यालयाच्या प्रांगणात सोमवारपासून सुरू झाले. या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील अडीचशे विद्यार्थ्यांनी १०१ प्रकल्पांचे सादरीकरण केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आणि प्रयोगशाळा परिचरांनी ३९ प्रकल्पांचे सादरीकरण केले.

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याला सर्वाधिक महामार्ग, राष्ट्रीय मार्ग, द्रतगती महामार्गांचे जाळे पसरले असल्याने जिल्ह्यात अपघाती मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याने वाहतूक व दळणवळण या विषयावर लक्षवेधक प्रकल्पाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये पहाटेच्या सूमारास वाहनचालकांना झोप लागते त्यामुळे अनेक अपघात होतात. जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांनी वाहनचालकाने गाडी चालविताना एक चष्मा (गॉगल) लावल्यास वाहनचालकाच्या पापण्या मिटताच क्षणी घंटी (सेंसरने बजर वाजेल) वाजून चालकाला जाग येईल असा एक चष्मा तयार केला आहे.

14:23 (IST) 30 Jan 2024
कल्याण मधील आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प, कर्मचारी मराठा नोंदी सर्वेक्षणाच्या कर्तव्यावर

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील २७ पैकी १९ कर्मचारी मराठा, खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी महसूल विभागाने वेगवेगळ्या भागात नियुक्त केले आहेत.

सविस्तर वाचा…

13:58 (IST) 30 Jan 2024
बातमी खास हापूस आंबा खवय्यांसाठी, जानेवारीत हापूसची विक्रमी आवक मात्र एप्रिलमध्ये पडेल तुटवडा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जानेवारीत दुसऱ्यांदा हापूसची आवक झाली आहे . जानेवारीतील ही विक्रमी आवक असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. जानेवारीत आतापर्यंत केवळ २५ ते ३० पेटी हापूस आवक होत होती. यंदा ३६० पेट्या आवक झाल्याने त्यामुळे ही विक्रमी आवक असल्याची चर्चा एपीएमसी फळ बाजारात आहे..

वाचा सविस्तर…

13:55 (IST) 30 Jan 2024
उरणमध्ये एनएमएमटीच्या ब्रेक डाऊन होणाऱ्या बसची संख्या वाढली, भर रस्त्यात बस बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त

बसेस ऐनवेळी रस्त्यात बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. नवी मुंबईत जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस बंद पडत आहेत.

सविस्तर वाचा…

13:43 (IST) 30 Jan 2024
जिल्ह्यांची प्रगती मोजणाऱ्या निर्देशांकाचे दुसरे पर्व

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून प्रगती साधणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यात येईल. जिल्ह्यांची निवड करण्यासाठी सांख्यिकी विश्लेषणाचे काम तज्ज्ञ समिती करणार आहे.

सविस्तर वाचा…

13:21 (IST) 30 Jan 2024
वसई : सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसचा अपघात, भावाला सोडायला आलेल्या तरुणीचा मृत्यू

सर्व मुले बसमध्ये बसली आणि पालक आपल्या मुलांना निरोप देत होते. यावेळी चालक बस मागे घेत असताना सिद्धीला बसची धडक लागली.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 30 Jan 2024
पनवेल : उलवेतील घरे सहा लाखांनी स्वस्त सदनिकाधारकांना दिलासा, किमंत २७ लाख रुपये

बहुप्रतिक्षेत असणाऱ्या सिडको मंडळाच्या बामनडोंगरी येथील २०२२ साली सिडको मंडळाच्या घरांच्या किमती राज्य सरकारने ६ लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने ४,८६९ अर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

सविस्तर वाचा…

13:02 (IST) 30 Jan 2024
शासन सेवेतील साहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी उचलबांगडी, बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयशी

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी शासन सेवेतून आलेल्या तीन महिला साहाय्यक आयुक्तांच्या प्रभागातून तडकाफडकी बदल्या केल्या.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 30 Jan 2024
पिंपरी : व्हिडीओ कॉल अन् महिलेच्या नावावर १९ लाखांचे कर्ज

पिंपरी : तैवानला पाठविलेले पार्सल मुंबईत नार्कोटिक्स विभागाने पकडले आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाला फोन जोडल्याचे सांगून महिलेला स्काईपवरून व्हिडीओ कॉल करण्यात आला. महिलेला बँकेचे उपयोजन चालू करण्यास सांगितले. त्याद्वारे महिलेच्या नकळत १९ लाखाचे कर्ज मंजूर करून ती रक्कम वळती करून घेत फसवणूक केली.

वाचा सविस्तर…

12:48 (IST) 30 Jan 2024
वातावरणातील वाढत्या गारव्याने मासळी गारठली

वातावरणातील गारठ्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 30 Jan 2024
उरण : वहाळ येथील डेब्रिज व्यवस्थापनासाठी समिती

डेब्रिजमध्ये मृत पशुपक्षी, प्राण्यांचे अवयव मिश्रित कचऱ्याच्या तयार झालेल्या डोंगरामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

12:30 (IST) 30 Jan 2024
नाशिक : उपनगरात दोन गावठी बंदुका, तीन जिवंत काडतुसे जप्त, तिघांना अटक

नाशिक : दोन गावठी बंदुका आणि तीन जिवंत काडतुसे बाळगल्याच्या प्रकरणात उपनगर परिसरातील समता नगरातील तिघांना पोलिसांनी अटक केली. नाशिक-पुणे मार्गावरील इच्छामणी लॉन्स भागातील मैदानावर ही कारवाई करण्यात आली. यातील एक सराईत गुन्हेगार आहे.

वाचा सविस्तर…

12:27 (IST) 30 Jan 2024
महारेराचे नवीन संकेतस्थळ फेब्रुवारी अखेर कार्यान्वित

मुंबई : महारेराच्या स्थापनेच्या वेळी कार्यान्वित करण्यात आलेल्या संकेतस्थळात काळानुरूप बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन संकेतस्थळ तयार करण्याचे काम वेगात सुरू असून हे संकेतस्थळ फेब्रुवारीच्या अखेरीस कार्यान्वित करण्याचे महारेराचे नियोजन आहे.

वाचा सविस्तर…

12:23 (IST) 30 Jan 2024
राज्य मागासवर्गाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे पाटील यांना आव्हान

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा आरक्षणाला ओबीसींनी आव्हान दिल्यास आम्हीही ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान देऊ आणि ते आरक्षण रद्द करण्याची मागणी करू. या भूमिकेनंतर आता राज्य मागासवर्गाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना प्रतिआव्हान दिले आहे. जरांगे यांना गोरगरिब मराठ्यांचे काहीही पडले नाही. हजारो वर्षांपासून दबलेल्या-पिचलेल्या लोकांना जे आरक्षण मिळाले, ते जरांगे यांना संपवायचे आहे. एका बाजूला ओबीसीतून आरक्षण मागायचे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या आरक्षणालाच विरोध करायचा, ही जरांगे पाटील यांची विसंगती आहे, अशी टीका हाके यांनी केली.

12:14 (IST) 30 Jan 2024
शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला अटकपूर्व जामीन मिळणार का?

मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणात आतापर्यंत मारणेचा साथीदार विठ्ठल शेलार याच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली आहे. मारणेने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

वाचा सविस्तर…

12:12 (IST) 30 Jan 2024
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ

मुंबई : शासकीय दंत महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांचे मानधन आता एक लाखाहून अधिक होणार आहे.

वाचा सविस्तर…

12:11 (IST) 30 Jan 2024
पुणे : ‘तो’ जाताना तिघांना जीवनदान अन् एकाला दृष्टी देऊन गेला…

पुणे : एका रुग्णाच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत घोषित केले. या रुग्णाचे अवयवदान केल्यास इतर रुग्णांचे जीव वाचू शकतील, असे आवाहन त्याच्या नातेवाइकांना डॉक्टरांनी केले. अखेर कुटुंबीयांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे या व्यक्तीची दोन्ही मूत्रपिंडे, यकृत आणि नेत्रपटलाचे दान करण्यात आले.

वाचा सविस्तर…

11:44 (IST) 30 Jan 2024
पुणे : पर्वती दर्शन भागात टोळक्याची दहशत; वाहनांची तोडफोड

पुणे : पर्वती दर्शन परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटातील बाराजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

11:12 (IST) 30 Jan 2024
ठाण्यात शुद्ध पाण्याच्या गुणवत्तेत घसरण पाणी गुणवत्ता प्रमाणात दोन टक्क्यांनी घट

ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या वितरण प्रणालीमधील पाण्याचे नमुने घेऊन त्याची गुणवत्ता तपासण्यात आली असून यामध्ये पाण्याचे ९३ टक्के नमुने पिण्यायोग्य तर, ७ टक्के नमुने पिण्याअयोग्य आढळून आलेले आहेत. २०२२ मध्ये केलेल्या तपासणीत पिण्यायोग्य पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण ९५ टक्के इतके होते.

वाचा सविस्तर…

11:01 (IST) 30 Jan 2024
पुणे महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरण : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

11:01 (IST) 30 Jan 2024
आज मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक ब्लॉक

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) मंगळवारी (३० जानेवारी) करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर…

10:46 (IST) 30 Jan 2024
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर इतर प्रश्न हाती घेणार – मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील असलेले मनोज जरांगे पाटील आज रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमची लढाई आता निर्णायक टप्प्यात आली असून लवकरच आरक्षण मिळेल, असे त्यांनी म्हटले. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर इतर प्रश्नांकडे वळू, असे सुतोवाच त्यांनी केले. धनगर आणि मुस्लीम समाजाने मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Live News Today 30 January 2024

महाराष्ट्र न्यूज टुडे लाइव्ह