Marathi Batmya Today: शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे पक्षाच्या नव्या अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांपासून अजित पवारांसह राष्ट्रवादीतला मोठा गट भाजपाबरोबर जाणार असल्याचेही दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार निर्णय मागे घेणार की ठाम राहणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Live Updates

Mumbai News Update Today: शरद पवारांचा राजीनामा ते सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदाची चर्चा! सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

19:21 (IST) 4 May 2023
पुणे: मैत्रिणीच्या नावावर कर्ज घेऊन ६९ लाखांची फसवणूक

पुणे: मैत्रिणीला कर्ज काढण्यास भाग पाडून कर्जाचे हप्ते न फेडता ६९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा...

19:01 (IST) 4 May 2023
कल्याणमध्ये महिला हवालदाराच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारा सराईत चोरटा अटक

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एक महिला हवालदाराच्या गळ्यातील मंगळसूत्र बुधवारी सकाळी एका सराईत चोरट्याने हिसकावून पळ काढला.

सविस्तर वाचा...

18:31 (IST) 4 May 2023
निर्मल लाईफ स्टाईलप्रकरणात २१ साक्षीदारांची पडताळणी

मुंबईः आर्थिक गुन्हे शाखेने निर्मल लाईफ स्टाईलच्या दोन संचालकांना ३४ सदनिका खरेदीदारांकडून ११ कोटी रुपये घेतल्याप्रकरणी नुकतीच अटक केली. या प्रकरणी २१ साक्षीदारांची पडताळणी करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

17:32 (IST) 4 May 2023
वाघांच्या अधिवासाने समृद्ध ‘अंबाबरवा’ मध्ये आज प्राणिगणना, वन्य विभागाची जय्यत तयारी

बुलढाणा: जिल्ह्याच्या सीमावर्ती व सातपुडा पर्वतरांगातील आणि मेळघाट प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या वाघांच्या अधिवासाने समृद्ध अंबाबरवा अभयारण्यात उद्या ५ मे रोजी प्राणिगणना करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

17:23 (IST) 4 May 2023
कार्यकारिणी सदस्यपद देऊन यवतमाळची बोळवण; भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत एकही पदाधिकारी नाही

यवतमाळ : भाजपाने बुधवारी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत यवतमाळ जिल्ह्यातून एकही पदाधिकारी नियुक्त झाला नाही. कार्यकारिणीत जिल्ह्यातील केवळ दोघांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.

सविस्तर वाचा..

16:59 (IST) 4 May 2023
धक्कादायक! चार वर्षांपूर्वी मृत व्यक्तीच्या नावावर पाणीपुरवठा योजनेचे ‘व्हाउचर’

वाशीम : शासकीय कार्यालयात आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय कुठलेच काम होत नाही याची अनेक उदाहरणे ताजी असताना रिसोड तालुक्यातील पेनबोरी ग्रामपंचायतमध्ये २०१७ मध्ये मृत मधुकर शांतीराम बोरकर यांच्या नावावर चक्क २०२२-२०२३ मध्ये पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ४४ हजार ५३० रुपयाचे ‘व्हाउचर’ काढण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा..

16:45 (IST) 4 May 2023
डोंबिवलीतील ३७ जणांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ३५ लाखांची फसवणूक

डोंबिवली: आकर्षक परताव्याचे आमीष दाखवून एका भुरट्या टोळीने ऑनलाईन गुंतवणूक माध्यमातून डोंबिवली शहर परिसरातील ३७ जणांची एकूण ३५ लाख रुपयांची वर्षभराच्या कालावधीत फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा...

16:39 (IST) 4 May 2023
वज्रमूठ सभांचे फेरनियोजन; नाना पटोले म्हणाले, “मोदी सरकारकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव”

नागपूर : राज्यात मागील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे सभांचे वेळापत्रक बदलण्याचा विचार झालेला आहे. वज्रमूठ सभा रद्द केलेल्या नाहीत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते यांच्याबरोबर या विषयावर चर्चा झालेली आहे, लवकरच या सभांचे फेरनियोजन केले जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ते प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलत होते.

सविस्तर वाचा..

15:37 (IST) 4 May 2023
गोंदिया : भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातून केवळ एक माजी खासदार व एक माजी आमदाराचीच वर्णी

गोंदिया : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातून फक्त माजी खासदार व माजी आमदार यांचीच वर्णी लागली आहे. त्यांच्या जोडीला इतर म्हणून माजी जि.प.अध्यक्ष व माजी जि.प. उपाध्यक्ष अशा एकूण सातजणांची निवड झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.

सविस्तर वाचा..

15:05 (IST) 4 May 2023
पुणे: ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलऐवजी खोक्यात साबणाच्या वड्या; फसवणूक करणारे ठाण्यातील चोरटे गजाआड

ऑनलाइन मोबाइल संच खरेदी व्यवहारात मागवण्यात आलेले मोबाइल संचांऐवजी खोक्यात साबणाच्या वड्या भ‌रुन फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील चोरट्यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

सविस्तर वाचा

14:57 (IST) 4 May 2023
भाजपच्या राजकीय कुरघोडीमुळे नवीन महामंडळाचा घाट ?

मुंबई : पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास राजकीय झालरही असून रस्ते विकास विभागाचा ताबा या माध्यमातून भाजपच्या मंत्र्यांकडे येणार आहे. रस्तेविकास महामंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित असून राजकीय कुरघोडी करण्यासाठी नवीन महामंडळ हे भाजप नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागांमधील पायाभूत सुविधांच्या कामांची कंत्राटे देण्याचा अधिकार भाजपच्या मंत्र्यांकडे जाणार आहे.

सविस्तर वाचा..

14:28 (IST) 4 May 2023
प्रवाशांचा संताप, नागपूर विमानतळावर पहाटे काय घडले?

नागपूर : दिवाळखोरीत निघालेल्या गो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांना नागपूर विमानतळावर प्रवाशांच्या रोषाला जावे लागले. पुण्यासाठी विमान नियोजित वेळेत निघाले नाही, त्यामुळे प्रवासी संतापले. प्रवाशांचा संताप पाहून गो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांनी एअरलाइन्सच्या काउंटरमध्ये स्वत:ला बंद करून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी हे चित्र होते.

सविस्तर वाचा..

14:21 (IST) 4 May 2023
कल्याणमध्ये उद्वाहनाच्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

कल्याण- येथील पश्चिमेतील गांधारे भागातील एका सोसायटीच्या उद्वाहनाच्या खड्डयात पडून एका तेरा वर्षाच्या मुलाचा बुधवारी मृत्यू झाला. मयत मुलगा याच भागातील एका लाॅन्ड्रीवाल्याचा मुलगा होता.हिमांशु कनोजा (१३) असे मयत मुलाचे नाव आहे.

सविस्तर वाचा

13:53 (IST) 4 May 2023
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे कार्यमुक्त; बाजार समिती निवडणुकीत भाजपासोबतची युती भोवली

चंद्रपूर : पक्षादेश झुगारत चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाशी उघड युती करून निवडणूक लढणारे आणि खासदार बाळू धानोरकर गटाचा पराभव केल्याच्या आनंदात ढोलताशा व गुलालाची उधळण करत भाजपा जिल्हाध्यक्षांसोबत डान्स करणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत देवतळे यांनी पक्ष विरोधी कारवाई केली म्हणून त्यांना पद गमवावे लागले आहे.

सविस्तर वाचा..

13:44 (IST) 4 May 2023
दोन आमदार, एक खासदार असूनही भाजपा कार्यकारिणीत गडचिरोलीचा टक्का नगण्य

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाने नुकतीच जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये गडचिरोलीतील केवळ आठजणांची वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार असूनही शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याला अधिक झुकते माफ देण्यात आल्याने गडचिरोलीतील नेत्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.

सविस्तर वाचा..

13:38 (IST) 4 May 2023
५० लाखांच्या महारेरा वसुलीसाठी दीड कोटींच्या सदनिकेचा लिलाव

मुंबई: महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) जारी केलेल्या वसुली आदेशाच्या (वॅारंट) पार्श्वभूमीवर पनवेलपाठोपाठ पुण्यातही विकासकाच्या मालकीच्या सदनिकेचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

13:26 (IST) 4 May 2023
मुंबई: कोनमधील घरांचा ताबा पुन्हा लांबणीवर? आठ इमारतींच्या दुरुस्तीच्या निविदेला प्रतिसाद नाही

मुंबई : पनवेलमधील कोन परिसरातील गिरणी कामगारांच्या २,४१७ घरांची दुरुस्ती पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. कोनमधील ११ इमारतींच्या दुरुस्तीसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा मागविल्या होत्या. मात्र यापैकी ८ इमारतींच्या निविदेला प्रतिसादच मिळालेला नाही.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 4 May 2023
सांगली: विट्याजवळ अपघातात चार जण ठार

सांगली: विट्याजवळ नेवरी रस्त्यावर गुरुवारी सकाळी खासगी प्रवासी बस आणि मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह चार जण ठार झाले.

सविस्तर वाचा...

13:01 (IST) 4 May 2023
अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार सोलापुरात!

उद्या, अर्थात ५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवड समिती बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी ६ मे रोजी शरद पवार सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे न घेतल्यास, हा अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरचा शरद पवारांचा पहिला दौरा असेल.

12:55 (IST) 4 May 2023
वर्धा : लग्न मुहूर्तांचा खोळंबा संपला; मे-जूनमध्ये मुहूर्तच-मुहूर्त, पालकांची लगबग सुरू

वर्धा : पाळल्या जात नसला तरी लग्नासाठी मुहूर्त पाहूनच बँड वाजतो. मार्च व एप्रिल महिन्यात लग्नासाठी मोजकेच मुहूर्त होते. त्यामुळे वर-वधू पित्यांनी मे व जून महिन्यावर भिस्त ठेवली होती. आता असे अनेक असल्याने बँड, मंगलकार्यालय, कॅटरिंग व अन्य व्यावसायिकांची चंगळ आहे.

सविस्तर वाचा..

12:46 (IST) 4 May 2023
‘वाघ बघायला ताडोबात जा’, फिल्मफेअर सोहळ्यात अभिनेता सलमान खान व आयुष्यमान खुराणा यांनी सिनेसृष्टीतील कलावंतांना दिले ताडोबा सफारीचे निमंत्रण

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक दोन नाही तर ११५ टायगर अर्थात पट्टेदार वाघ आहेत, ३०० पेक्षा अधिक बिबट, हरण, चितळ, नीलगाय, अस्वल तथा विविध वन्यप्राणी आहेत. तर चला ताडोबा सफारी करा, असे आवाहन सिनेसृष्टीतील टायगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता सलमान खान तथा अभिनेता आयुष्यमान खुराणा यांनी सिनेसृष्टीतील सर्व कलावंतांना केले.

सविस्तर वाचा..

12:40 (IST) 4 May 2023
यवतमाळ: बसस्थानक की चोरट्यांचा अड्डा?; नवरीचे तीन लाखांचे दागिने लंपास

यवतमाळ: लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने चोरांचे फावत आहे. बुधवारी सायंकाळी चोरट्यांनी लग्नात नवरी मुलीस देण्यासाठी आणलेले तीन लाखांचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली.

सविस्तर वाचा...

12:40 (IST) 4 May 2023
बजरंग दलावर बंदी घालायला तुमच्या बापाचं राज्य आहे का? - देवेंद्र फडणवीस

बदरंग दलावर बंदी घालायची भाषा कुणी करत असेल, तर बजरंगाची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. बजरंग दलावर बंदी घालायची तुमच्या बापाचं राज्य आहे का? - देवेंद्र फडणवीसांचं बेळगावातील प्रचारसभेत काँग्रेसवर टीकास्र

12:28 (IST) 4 May 2023
बुलढाणा : मालमोटारीची दुचाकीला धडक; चालक ठार, दुचाकीने क्षणात पेट घेतला अन्..

बुलढाणा : भरधाव मालमोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीने क्षणार्धात पेट घेतला. खामगाव चिखली मार्गावरील लोखंडा फाट्याजवळ बुधवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.

सविस्तर वाचा..

12:26 (IST) 4 May 2023
डोंबिवलीत देवीचापाडा येथे स्मार्ट सिटीचा दिवा बंद असल्याने रस्ता अंधारात; तीन महिन्यांपासून दिव्याची लुकलुक

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकात कल्याण डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मंद प्रकाशाचे पथदिवे लावले आहेत. या दिव्यांमधील एक दिवा मागील तीन महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे लुकलुक करत आहे. त्यामुळे मुख्य वर्दळीचा रस्ता अंधारात आहे.

सविस्तर वाचा

12:23 (IST) 4 May 2023
विदर्भात फडणवीस समर्थकांना झुकते माप, वादग्रस्त मुन्ना यादवांची नियुक्ती

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत विदर्भ व विशेषत: नागपूरला झुकते माप देण्यात आले आहे. पक्षाचे विदर्भातील ज्येष्ठ नेते चैनसूख संचेती यांना उपाध्यक्ष करून पक्षाने जुन्या नेत्यांची दखल घेतली. तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देऊन नव्या-जुन्यांचा मिलाफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सविस्तर वाचा...

12:17 (IST) 4 May 2023
शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्तानं लिहिला संदेश!

शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्तानं लिहिला संदेश! राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गुरुज्योत सिंग म्हणाले, हे मी पक्षासाठी नाही, तर देशासाठी करत आहे.

12:15 (IST) 4 May 2023
पुण्यात बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्ती कर विभागाचे छापे

पुणे : शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्ती कर विभागाने गुरुवारी छापे घातले. प्राप्ती कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केली.

सविस्तर वाचा

12:14 (IST) 4 May 2023
जिल्हा बँक वाचविण्यासाठी शुक्रवारी मेळावा; थकीत कर्ज वसुलीसाठी मार्गदर्शन

नाशिक: कधीकाळी राज्यात नावाजलेल्या आणि अलीकडेच वाढत्या अनुत्पादक मालमत्तेच्या (एनपीए) प्रमाणामुळे अडचणीत आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर थकीत कर्जाच्या वसुलीचे मोठे आव्हान आहे.

सविस्तर वाचा...

11:57 (IST) 4 May 2023
मविआवर काय परिणाम होईल? - जयंत पाटील

या घडामोडींचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही पक्ष म्हणून महाविकास आघाडीमध्ये आहोतच. महाविकास आघाडीला तडा जाईल असं मला वाटत नाही - जयंत पाटील

Maharashtra Live Blog

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Mumbai Live News Update Today: शरद पवारांचा राजीनामा ते सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदाची चर्चा! सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!