Marathi Batmya Today: शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे पक्षाच्या नव्या अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांपासून अजित पवारांसह राष्ट्रवादीतला मोठा गट भाजपाबरोबर जाणार असल्याचेही दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार निर्णय मागे घेणार की ठाम राहणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Mumbai News Update Today: शरद पवारांचा राजीनामा ते सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदाची चर्चा! सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
शरद पवारांनी समिती स्थापन करून त्यांनी पुढचा निर्णय घ्यावा असं सांगितलं. हे पूर्णपणे लोकशाही पद्धतीचं आहे. ही समिती उद्या बैठक घेऊन त्यासंदर्भात निर्णय घेईल – जयंत पाटील
पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या विधानावरची चर्चा कुठल्याही पक्षाशी नाही. अशी चर्चा करणं राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रकार ठरेल – जयंत पाटील
निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार अद्याप ठाम आहेत. पण त्यांनी विधानसभा निवडणुकांपर्यंत अध्यक्षपदी कायम राहावं – जयंत पाटील
‘मराठी पाऊल पडते पुढे’ या आगामी मराठी चित्रपटाचे नवोदित लेखक – दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. मृत्युसमयी ते ४६ वर्षांचे होते. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या त्यांचा पहिल्या दिग्दर्शित आणि लिखित चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होत असून चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच स्वप्नील यांचे निधन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (२ मे) पार पडला. ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीत शरद पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवसेनेबद्दल मोदींना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा होती, असं शरद पवारांनी पुस्तकात नमूद केलं आहे. यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात १२ दिवसांपासून कुस्तीगीर दिल्लीतील जंतरमंतर मैदानात आंदोलनाला बसले आहेत. त्यातच बुधवारी (३ मे) रात्री कुस्तीगीर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटीची घटना घडली आहे. आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीगीरांशी गैरवर्तन केल्याचा आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘मद्यप्राशन करून पोलिसांनी शिव्या दिल्या. तसेच भावाचे डोके फोडले,’ असा आरोप कुस्तीगीर विनेश फोगाटने केला आहे. या वेळी विनेश फोगाटला अश्रू अनावर झाले.
राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) केली. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला. अशातच शरद पवार यांच्या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी फोन करत चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला याबाबत माहिती दिली आहे.
फडणवीस म्हणतात, “काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मतं कमी करण्यासाठी, काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत…!”
वर्धा : वन्य जीवप्रेमी बुद्ध पौर्णिमेची आतुरतेने वाट बघत असतात. कारण या दिवशी दरवर्षी वन खात्यातर्फे वन्यजीव गणना होत असते. पण अवकाळी व मुसळधार पाऊस, चिखलमय वाटा, झाडांची पडझड या कारणास्तव ही गणना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पात कचऱ्याचे चांगल्या पध्दतीने वर्गीकरण करण्यासाठी २५० मेट्रिक टन क्षमतेचा नवीन संच उभारण्यात आला आहे. त्याद्वारे सुक्या कचऱ्याचे तीन, चार प्रकारात वर्गीकरण होते. त्यापासून उच्च प्रतिचे आरडीएफ तयार करणे दृष्टीपथास येईल.
वर्धा : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातून १७ नेत्यांची वर्णी लागली असून राजेश बकाने यांची गच्छंती झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. चिटणीस म्हणून वर्धा जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्ष सरीता विजय गाखरे यांना संधी देण्यात आली आहे.
गोंदिया : गेल्या दोन महिन्यांपासून हावडा-मुंबई मार्गावरील पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही समस्या अशीच राहणार असल्याचे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे. याचे कारणही रेल्वे विभागाने दिले आहे.
चंद्रपूर : राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व काँग्रेसचे राजुराचे आमदार सुभाष धोटे एकाच मंचावर एकत्र आले आणि गप्पांच्या मैफिलीत रंगले. हा दुर्मिळ योग बल्लारपूर येथे जुळून आला.
चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाची जंबो कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. या कार्यकारिणीत चंद्रपूर जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे.
वर्धा : प्राणवायूचा मोठा स्रोत म्हणून वृक्षवल्ली मानवाचा आधार ठरतो. वाढत्या शहरीकरणामुळे त्यांच्यावर संक्रांत येत आहे. वर्धेतही अशीच संक्रांत सत्तर वर्षे जुन्या झाडांवर आली होती. रस्ता रुंदीकरणात आड येणाऱ्या या झाडांची तोड पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करून थांबविली.
सेवानिवृत्तीच्या दिवशी मशिन खरेदीचा आदेश दिल्याप्रकरणी महापालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निवृत्तीवेतनातील दहा टक्के रक्कम पुढील पाच वर्षांसाठी कपात करण्याचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला.
विमाननगर भागात मसाज पार्लरमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून सहा तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या व्यवस्थापकासह चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांच्या सुखाचे स्वप्न पाहिले आणि मागासवर्गीयांसाठी संधी निर्माण करून दिल्या. मात्र आपल्या संविधानाच्या वाटचालीत गेल्या अनेक वर्षांत काही समूहांमधील लाखोंना संधी मिळाली, तर काही जातसमूहांतील लाखोंपैकी एकाला संधी मिळू शकली.
मेट्रो स्थानकांच्या संरचनात्मक लेखापरीक्षणाचा (स्ट्रक्चरल ऑडिट) घोळ आणखी वाढला आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल महामेट्रोकडे सादर केल्याचा दावा केला आहे. याचवेळी महामेट्रोने अहवाल अजून मिळालाच नसल्याचे म्हटले आहे.
नागपूर : यंदाच्या वर्षातील पहिले चक्रीवादळ मे महिन्यात येण्याची शक्यता असून सहा मे रोजी ते धडकण्याची शक्यता आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाच्या तयारीच्या हालचाली वाढल्या आहेत.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन नेल्यानंतर त्याची स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करावी लागते. यासाठी आरटीओकडून वाहनाच्या प्रकारानुसार करही आकारला जातो. परंतु, सध्या आरटीओकडून खासगी वाहनांना व्यावसायिक दराने कर आकारणी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.
रईस जाकीर शेख (वय २१, रा. बोपोडी), रोहित रणवीरसिंग चिडार (वय २१, रा.जयजवान नगर येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या गुंडांना विमानतळ पोलिसांनी अटक केली.रोहित नागेश कोळी (वय २२, रा. लोहगाव), सोमनाथ दीपक गायकवाड (वय २१, रा. विमाननगर) अशी अटक करण्यात आलेल्या सराइतांची नावे आहेत.
मूळ भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांची बुधवारी जागतिक बँकेचे आगामी अध्यक्ष म्हणून नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या जागतिक वित्तीय संस्थेची धुरा सांभाळणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन नागरिक असतील.
या सगळ्या राजकीय घडामोडींचा राष्ट्रवादी काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही. उलट पक्ष अजून वाढेल, मजबूत होईल – अनिल देशमुख
अध्यक्षपदासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील अशा कोणत्याही नावाची चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवार सोडून कुणाचंही नाव नाही. आमचा तोच आग्रस राहील – अनिल देशमुख
अजित पवार वारंवार सांगतायत की मी कुठेही जाणार नाही. अजित पवारांविषयीच्या या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. पवार कुटुंबात एक नातं आहे. पण राजकारण वेगळं असतं. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही – संजय राऊत
धारावी येथे घरगुती वादातून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याचा आणि त्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत दोघेही गंभीर भाजले असून त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संजय राऊत म्हणतात, “सुप्रिया सुळे दिल्लीत चांगलं काम करत आहेत. पण संसदेतली कामगिरी आणि राष्ट्रीय पक्षाचं प्रमुखपद…!”
“अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय?”
महाराष्ट् न्यूज लाइव्ह
Mumbai Live News Update Today: शरद पवारांचा राजीनामा ते सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदाची चर्चा! सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!