Maharashtra Breaking News Today, 19 October 2023: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनची बाजू घ्यायला हवी होती असं म्हटलं. ज्याचे पडसाद आता भाजपाकडून उमटत आहेत. भाजपाच्या नेत्यांकडून शरद पवारांवर कडाडून टीका केली जाते आहे. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर ठाकरे गट हे विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. पुण्यात आयकर विभागाने नीळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तर तिकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुढचं आंदोलन झालं तर ते सरकारला झेपणार नाही असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Mumbai Maharashtra News in Marathi|शरद पवारांविरोधात भाजपा आक्रमक तसंच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी

19:24 (IST) 19 Oct 2023
पुनर्परीक्षार्थींसाठी विशेष फेरीला सुरुवात- अकरावी प्रवेश प्रक्रिया

नाशिक: इयत्ता ११ वी लांबलेली प्रवेश प्रक्रिया अजूनही चालुच असून इयत्ता १० वीच्या पुनर्परीक्षार्थींना प्रवेश घेण्यासाठी विशेष फेरी शिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली असून गुरूवारपासून या फेरीला सुरुवात झाली आहे. ही फेरी २५ ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार आहे.

सविस्तर वाचा…

19:08 (IST) 19 Oct 2023
शहापूर: अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून सामुहिक अत्याचार

शहापूर: शहापूर येथील अघई भागात एका १५ वर्षीय मुलीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील महिन्याभरापासून तिच्यावर अत्याचार सुरू होते.

सविस्तर वाचा…

17:16 (IST) 19 Oct 2023
झोपु योजनेतील प्रत्येक सदनिका आधार कार्डाशी जोडणार!

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घुसखोरी टाळण्यासाठी अखेर राज्य शासनाने या योजनेत वितरीत केलेली प्रत्येक सदनिका आधार कार्डाशी जोडण्याचे ठरविले आहे. पात्रता निश्चित करण्याची पद्धतही आधार कार्डाशी संलग्न असल्यामुळे यापुढे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना आळा बसेल, असा विश्वास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा

16:40 (IST) 19 Oct 2023
एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; मुक्ताईनगरच्या तहसीलदारांकडून अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व कुटुंबियांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

सविस्तर वाचा…

16:23 (IST) 19 Oct 2023
सिडकोला शासनाच्या गरजेपोटीच्या घरे नियमित करण्याच्या आदेशाचा विसर; साडेबाराच्या भूखंड पात्रतेतून बांधकामे कमी करण्याची प्रक्रिया वेगात

उरण: २५ फेब्रुवारी २०२२ ला राज्य सरकारने सिडको हद्दीतील ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या उरणच्या द्रोणागिरी नोड मधील शेतकऱ्यांच्या वारसांच्या साडेबारा टक्के भूखंडाच्या पात्रतेतून गावठाण हद्द, २५० मीटरच्या परिघासह साडेबाराच्या रेखांकनांतील घरांचे बांधकाम अहवाल सिडकोच्या सर्व्हेक्षण विभागाकडून तयार करण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा…

16:23 (IST) 19 Oct 2023
Samruddhi Highway: देशातील सर्वाधिक रुंद आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार; समृद्धी महामार्गाच्या १४ व्या पॅकेजचे काम पूर्ण

मुंबई ते नागपूरदरम्यानचा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये पार व्हावा तसेच उत्कृष्ट वाहतूक सेवेमुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे.

सविस्तर वाचा

16:03 (IST) 19 Oct 2023
जुन्या ५७ रेल्वे डब्यांचे अद्ययावत मालगाडीत रूपांतर

मध्य रेल्वेवरील माटुंगा, परळ रेल्वे कारखान्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत जुन्या ५७ आयसीएफ डब्यांचे रुपांत चार अपघात निवारण ट्रेन डब्यांत आणि अद्ययावत मालगाडीमध्ये (ऑटोमोबाईल कॅरियर) करण्यात आले.

सविस्तर वाचा

15:55 (IST) 19 Oct 2023
नाशिक: अमली पदार्थ खरेदी-विक्रीविषयी १० गुन्हे दाखल; शहरात कारवाईला वेग

नाशिक: शहर परिसरातील अमली पदार्थांची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखा कारवाई करत असून आतापर्यंत अमली पदार्थ खरेदी आणि विक्रीसंदर्भात १० गुन्हे दाखल असून कोटपा कायद्यातंर्गत ३५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

15:55 (IST) 19 Oct 2023
मोठी बातमी! रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला उच्च न्यायालयात दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीचा बारामती ॲग्रो औद्योगिक प्रकल्प ७२ तासांत बंद करण्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (एमपीसीबी) निर्णय अवाजवी असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने गुरुवारी केली. तसेच, प्रकल्प बंदीची नोटीस रद्दबातल ठरवली.

सविस्तर वाचा

15:25 (IST) 19 Oct 2023
वर्धा : ऑनलाईन कामे करणार नाही म्हणत ठिय्या आंदोलन सुरू

वर्धा : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील चार हजार गट प्रवर्तक तसेच ७० हजार आशा सेविका १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना कंत्राटी कामगारांचा दर्जा द्या, अशी मुख्य मागणी आहे. त्यांच्यावर ऑनलाईन कामांसाठी दबाव आणला जातो. तो त्वरित थांबवावा. अशी कामे आशा वर्कर करणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करीत या कर्मचाऱ्यांचे आजपासून ठिय्या आंदोलन सुरू झाले.

सविस्तर वाचा…

15:17 (IST) 19 Oct 2023
खडकवासला धरणाची सुरक्षा रामभरोसे; जलाशयात जैव वैद्यकीय कचरा?

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या जलाशयात बुधवारी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन करणाऱ्या खासगी कंपनीची खोकी आणि बाटल्या आढळून आल्या. हा प्रकार धरणाची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षारक्षकाला लक्षात आल्यानंतर तातडीने स्थानिक पोलीस, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली.

वाचा सविस्तर…

15:16 (IST) 19 Oct 2023
राज्यभरात ऑक्टोबर हिटमुळे काहिली… जाणून घ्या राज्यभरातील तापमानाची स्थिती

पुणे : राज्यभरात ऑक्टोबर हिटच्या झळांनी अंगाची काहिली होत आहे. बुधवारी मुंबईला उष्णतेच्या झळांचा फटका बसला. सातांक्रुजमध्ये सर्वाधिक ३६.४ अंश सेल्शिअसची नोंद झाली आहे. विदर्भात कमाल तापमान सरासरी ३५ अंश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३४ अंश सेल्सिअसवर गेले होते. २५ ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा सविस्तर…

15:13 (IST) 19 Oct 2023
गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजाराची लाच स्वीकारताना सहायक फौजदार जाळ्यात

पिंपरी : गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडे ६० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पिंपळेसौदागर पोलीस चौकी येथे करण्यात आली.

वाचा सविस्तर…

15:07 (IST) 19 Oct 2023
शिरपूर तालुक्यात इतर पिकांमध्ये गांजा शेती; एक कोटीपेक्षा अधिकचा माल जप्त

दोन ठिकाणी छापे घालून एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 19 Oct 2023
इमारत बांधकामाच्या ठिकाणी अचानक कोसळली क्रेन; एक गंभीर जखमी

आज सकाळी बाराच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर दहा येथे इमारत बांधकाम ठिकाणी क्रेन कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. मात्र उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नाही.

सविस्तर वाचा

15:05 (IST) 19 Oct 2023
बुलडाणा : तलाठी अहिर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पटवारी संघाचे धरणे

बुलडाणा : तालुक्यातील कोलवडचे तलाठी नितीन अहिर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघ नागपूरच्यावतीने आज येथे धरणे आंदोलन करण्यात आले. बुलढाणा तहसील कार्यालयासमोर आयोजित आंदोलनात कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले.

सविस्तर वाचा…

14:13 (IST) 19 Oct 2023
नागपूरला फडणवीस, संघाचा बालेकिल्ला मानत नाही, सुषमा अंधारेंनी स्पष्ट केले महाप्रबोधन यात्रेमागील खरे कारण

नागपूर : नागपूर काही फडणवीस किंवा भाजपाचा बालेकिल्ला नाही. नागपूरला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही बालेकिल्ला मानत नाही. नागपूर हे दीक्षाभूमीचे केंद्र आहे, ऊर्जाभूमीचे केंद्र आहे. त्यामुळे महाप्रबोधन यात्रेचे उद्घाटन करण्यासाठी नागपूर शहराची निवड करण्यात आली, असे स्पष्ट उत्तर सुषमा अंधारे यांनी दिले.

सविस्तर वाचा…

13:58 (IST) 19 Oct 2023
नागपूर : लाचखोर पोलीस हवालदारासह वेतन अधीक्षकाला अटक

नागपूर : सदर पोलीस ठाण्यातील एका लाचखोर पोलीस हवालदारासह वेतन व भविष्य निर्वाह निधी (माध्यमिक) कार्यालयाच्या अधीक्षकाला लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 19 Oct 2023
वर्धा : माजी जिल्हा परिषद अध्यक्षांची पाऊण कोटीने फसवणूक, गुन्हा दाखल

वर्धा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सेलू तालुक्यात दबदबा राखून असलेले वजनदार राजकीय नेते विजय जयस्वाल यांनाच गंडा घातल्या गेला आहे. त्यांची पवनसुत ट्रेडिंग कंपनी आहे.

सविस्तर वाचा…

13:43 (IST) 19 Oct 2023
नागपूर : दिवाळीत ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट थांबवण्यासाठी एसटी सज्ज, असे आहे नियोजन

नागपूर : दिवाळीत मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. त्याचा फायदा घेत ट्रॅव्हल्स कंपन्या अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे आकारून प्रवाशांची लूट करतात. हा प्रकार थांबवण्यासाठी एसटीने नागपूर-पुणे आणि इतरही मार्गासाठी विशेष नियोजन केले आहे.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 19 Oct 2023
बुलढाणा : हजारावर नंदादीपमुळे उजळले गुगुळादेवीचे मंदिर, देऊळगाव राजाचे अध्यात्मिक वैभव

बुलढाणा : ऐतिहासिक देऊळगाव राजा नजीकच्या गुगुळा देवीचे पुरातन मंदिर नवरात्र निमित्त नंदादीपांच्या झगमगाटाने उजळून निघाले आहे. गिरोली खुर्द जवळ गुगुळा देवीचे पुरातन मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले मंदिर कमीअधिक ३०० वर्ष जुने असल्याच्या खुणा दिसतात. बाजूलाच फुलविलेल्या सरस्वती उद्यानमधील सुगंधी फुलांचे ताटवे, धबधबा, लहान मुलांसाठी असलेली खेळणी यामुळे भक्तांसह लहान बालकांचेही हे आवडते ठिकाण आहे.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 19 Oct 2023
‘‘ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारल्याने ‘ते’ मला धमकावत आहेत!”, सुषमा अंधारेंचा रोख नेमका कुणाकडे?

नागपूर : ससून रुग्णालयातून पसार झालेला, अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत, तर सत्ताधाऱ्यांकडून ते परतवून लावले जात आहेत. अशातच नागपुरात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी दिलेली प्रतिक्रिया नव्या राजकीय वादाला तोंड फोडणारी ठरण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा…

13:40 (IST) 19 Oct 2023
उरूळी देवाची, फुरसुंगी पुणे महापालिकेच्या हद्दीतच राहणार… राज्य शासनाच्या या आदेशाने संभ्रम

पुणे: उरूळी देवाची आणि फुरसुंगी या समाविष्ट गावातील विकासकामे सुरू ठेवावीत. महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधकाम परवानग्या द्याव्यात, अशी सूचना राज्य शासनाने महापालिकेला केली आहे.

सविस्तर वाचा…

13:36 (IST) 19 Oct 2023
मातोश्री’च्या निकटवर्तीय मीना कांबळी नाराज का झाल्या ?

साधारण सत्तरचे दशक उतरणीला लागले होते. शिवासेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले अनेक तरूण – तरूणी शिवसेनेच्या छत्राखाली एकवटत होते. त्यापैकीच एक मीना कांबळी. सविस्तर वाचा…

13:00 (IST) 19 Oct 2023
भाजपच्या बालेकिल्ल्यात आज अंधारेंची तोफ धडधडणार

नागपूर: आपल्या घणाघाती भाषणामुळे शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करणा-या व विरोधकांची तोंडे बंद करणा-या शिवसेना उपनेत्या (उध्दव ठाकरे गट) सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा गुरूवारी नागपुरात दाखल झाली असून सायंकाळी ६ वा. त्यांची जाहीर सभा आहे.

सविस्तर वाचा…

12:45 (IST) 19 Oct 2023
जळगावात महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाच घेताना जाळ्यात

जळगाव: घराचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची लाच स्वीकारताना शहरातील महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

सविस्तर वाचा…

12:36 (IST) 19 Oct 2023
गोंदिया :किडनी घ्या अन् शाळा दत्तक द्या, माजी विद्यार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

राज्य शासनाच्या शाळा दत्तक देण्याच्या योजनेच्या निर्णयाला संपूर्ण राज्यातून विरोध होत आहे.  या योजनेमुळे गोर-गरिबांच्या मुलाचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा

12:27 (IST) 19 Oct 2023
मीरा बोरवणकर यांचा ग्रह तसा झाला असावा-पृथ्वीराज चव्हाण

मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे की राजकीय दबाव होता म्हटलं आहे. मात्र मला पाहिजे असा निर्णय दिला होता. त्यांना जे पद हवं होतं तर ते देता येणार नाही असं सांगितलं होतं. दुसरं पद रिक्त आहे हे त्यांना सांगितलं गेलं होतं ते त्यांनी स्वीकारलं. जमीन हस्तांतराला विरोध केल्याने हे झालं असं त्यांचं म्हणणं आहे. मला त्याबाबत काही कल्पना नाही. मीरा बोरवणकर यांचा काहीतरी ग्रह झाला असावा असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

12:27 (IST) 19 Oct 2023
“जयंत पाटील आमच्याच संपर्कात,” मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “शरद पवारांकडे कोणीही…”

अजित पवार गटाचा कोणताही आमदार शरद पवारांकडे जाणार नाही आणि कोणी त्यांच्या संपर्कात नाही. मात्र, जयंत पाटील आमच्याकडे येऊ शकतात, कारण ते आमच्या संपर्कात आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्माराव आत्राम यांनी शरद पवार गटाला दिले.

सविस्तर वाचा

12:26 (IST) 19 Oct 2023
धुळ्यात गुन्हेगारास बंदुकीसह अटक

धुळे: तीन गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने शहराजवळील मोहाडी गावातून अटक केली. त्याच्याकडून गावठी बंदूक व काडतूस जप्त करण्यात आले.

सविस्तर वाचा…

इस्रायल हमास युद्धाबाबत शरद पवार यांनी नुकतीच त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. (AP Photo)

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनची बाजू घ्यायला हवी होती असं म्हटलं. ज्याचे पडसाद आता भाजपाकडून उमटत आहेत. भाजपाच्या नेत्यांकडून शरद पवारांवर कडाडून टीका केली जाते आहे.