Maharashtra Breaking News Today, 19 October 2023: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनची बाजू घ्यायला हवी होती असं म्हटलं. ज्याचे पडसाद आता भाजपाकडून उमटत आहेत. भाजपाच्या नेत्यांकडून शरद पवारांवर कडाडून टीका केली जाते आहे. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर ठाकरे गट हे विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. पुण्यात आयकर विभागाने नीळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तर तिकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुढचं आंदोलन झालं तर ते सरकारला झेपणार नाही असं म्हटलं आहे.
Mumbai Maharashtra News in Marathi|शरद पवारांविरोधात भाजपा आक्रमक तसंच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी
ठाणे: नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे अस्वस्थ असलेल्या शहरातील हॉटेल मालकांनी मंगळवारी रात्री उशिरा ठाण्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याकडून या कारवाईतून अभय मिळावे यासाठी साकडे घातले.
पावसाळा ओसरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने टप्प्याटप्प्याने मुंबईमधील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पुन्हा हाती घेण्याचा निर्णय घेतला असून वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेल्या १६७ रस्त्यांच्या सिमेट काँक्रिटीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, झव्हेरी बाजार येथील लहान-मोठ्या रस्त्यांवर दिसणाऱ्या हातगाड्या येत्या काळात बाद होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीस कारभीभूत ठरणाऱ्या हातगाड्याऐवजी चालकांना बॅटरीवर चालणाऱ्या ढकलगाडी देता येतील का याची चाचपणी सुरू असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
डोंबिवली: राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत कायद्याचे शिक्षण देणारे विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. ६० विद्यार्थ्यांची क्षमता असणारे हे कल्याण, डोंबिवली परिसरातील पहिले विधी महाविद्यालय आहे.
पुणे : ससून रूग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला चेन्नईत मुंबई पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने शनिवारपर्यंत (२१ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, ललितची पोलीस कोठडी संपताच त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहे. पुणे पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अंधेरी पश्चिम परिसरात विकसित केलेल्या क्रीडा संकुलातील क्रिकेटच्या मैदानात कोणतीही परवानगी न घेता खेळपट्टी विकसित केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या दुय्यम अभियंत्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
बुलढाणा: शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांचे विश्वासू तथा घाटाखालील जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांच्याविरुद्ध स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा उगारला ! असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठून दाणे यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच कार्यवाही न केल्यास आम्ही ‘पक्षाचे काम बंद’ करणार असा इशाराही त्यांनी दिला.
कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, डोंबिवली, अंबरनाथ रेल्वे स्थानकांतील प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अंबरनाथमधून मंगळवारी अटक केली. या चोरट्यांकडून १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
नवी मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी अचानक आ. मंदा म्हात्रे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
डोंबिवली येथील पश्चिमेतील देवीचापाडा भागातील काळुबाई मंदिराजवळील पालिकेच्या विकास आराखड्यातील १५ मीटर रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे रखडलेले काम नव्याने सुरू करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या दिवा-वसई रेल्वे मार्गावरील भिवंडी जवळील खारबाव-कामण रेल्वे मार्गावरील एक रेल्वे फाटक बंद करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यासाठी रेल्वे मार्गावर एक उड्डाण पूल बांधला जात आहे.
‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख प्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. पदाला न्याय देता येत नसल्याने आपण राजीनामा देत आहोत.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनची बाजू घ्यायला हवी होती असं म्हटलं. ज्याचे पडसाद आता भाजपाकडून उमटत आहेत. भाजपाच्या नेत्यांकडून शरद पवारांवर कडाडून टीका केली जाते आहे.