Maharashtra Live News Updates Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यातील देहू येथे येणार आहेत. त्यानंतर दक्षिण मुंबईतील राजभवन आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथे होणाऱ्या कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक पोलीस विभागाने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. मंगळवारी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील काही भागांत प्रवेश बंदी केली आहे. तर, काही पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राज्यसभेतील पराभव आणि भाजपने सहावा उमेदवार मागे घेतल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी, असा शिवसेना आणि राष्ट्रवादीत सूर असताना काँग्रेस दोन जागा लढण्यावर ठाम राहिल्याने निवडणूक अटळ ठरली आहे. त्यामुळे पुन्हा आमदारांचा ‘भाव’ वाढणार आहे. दहाव्या जागेसाठी आता भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
आय लव्ह यू म्हणायचे आणि नंतर लफडी करायची ही राजकीय पक्षांची सवयच आहे. भाजपा – शिवसेना युतीच्या काळातही अशी खेचाखेची सुरू होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पुणे दौऱ्यावर आले होते. आज सकाळी त्यांनी देहू याठिकाणी तुकोबारायांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदींनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. पण अजित पवारांना व्यासपीठावरून भाषण संधी दिली गेली नाही. यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. सविस्तर बातमी
राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात २ हजार ९५६ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१५,४१८ झाली आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण १८२६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. वाचा सविस्तर बातमी…
राज्यसभा निवडणुकीचा अनुभव ताजा असल्याने विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी डोळे मिटून गप्प बसणार नाही. सुधारणा करून विधान परिषदेत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी केले. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर बातमी
“शरद पवार हे जनसामान्यांमध्ये असणारे आणि जनसामान्यांमध्ये रमणारे नेते आहेत. त्यांना अशाप्रकारची जबाबदारी देऊन त्यांना कितपत पटेल हे माहित नाही. शेवटी याबाबतचा निर्णय शरद पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बुलढाणा-अजिंठा मार्गावर घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.बुलढाणा-अजिंठा मार्गावरील मढ फाट्याजवळ असलेल्या महानुभाव आश्रमासमोर हा अपघात घडला. गिट्टी घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
उपाहारगृहाच्या मागील वर्षाचे मुल्यांकन टाळण्यासाठी तसेच नवे वस्तू आणि सेवा कराचे खाते काढून देण्यासाठी २० लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वस्तू आणि सेवा कर विभागाचा साहाय्यक राज्यकर आयुक्त धनंजय शिरसाठ याला मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.तक्रारदार यांचे घोडबंदर येथील कापुरबावडी भागात उपाहारगृह आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसाने आता विदर्भाकडे वाटचाल सुरू केले आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही भागांत मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भाच्या काही भागात सध्या पूर्वमोसमी पाऊस होत आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्याता कायम आहे.
नागपूरच्या विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे व त्यांचे पती डॉ. सुरेश चवरे यांनी एका अनाथ मुलीचे पालकत्व स्वीकारून तिचे स्वत:च्या मुलीप्रमाणे पालनपोषण केले. १० जूनला तिचा विवाह समारंभ पार पडला. त्यावेळी चवरे दाम्पत्य गहिवरले होते. चंद्रपूरच्या मूल येथे शेतमजुरी करणारे बाबुराव नन्नावरे हे पत्नी निर्मला व मुलगी नम्रताला घेऊन कामाच्या शोधात कुही येथे आले.
जिल्ह्यात व्यापक स्तरावर उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १९ जून रोजी राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा घेण्यात आली. यावेळी ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खडकी बाजारात खरेदी करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ६५ हजारांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना घडली.याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि तिची आई खडकीतील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.
पद्मावतीतील तळजाई वसाहत परिसरात टोळक्याने दहशत माजविली. टोळक्याने मोटारीची तोडफोड केली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून १२ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साहिल दळवी, साहिल कांबळे, किरण कांबळे, प्रणव कांबळे, साहिल ढावरे, नागेश ढावरे, रोहन देवकुळे, ओंकार कसबे, कृष्णा खिलारे, अमर जाधव, अण्णा कांबळे (सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये २७ शालेय वस्तुंचे वाटप सन २००७ पासून करण्यात येत असून दरवर्षी हे साहित्य विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाते.महापालिकेच्या शाळा या १३ जूनपासून सुरू होत आहेत. परंतु अद्यापही शाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या शालेय वस्तू पोहोचलेल्या नाहीत.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे पार पडला. कार्यक्रम दोन वाजता सुरू होणार असला तरी देहूकरांनी साडेदहा वाजल्यापासून सभास्थानाकडे धाव घेतल्याचं पहायला मिळालं. येथे क्लिक करुन पाहा सर्व फोटो.
Photos: बाटल्यांचा खच, Keychains ला बंदी अन् झाडांवरील पिशव्या… देहूत मोदींच्या कार्यक्रमातील सुरक्षा नियमांमुळे वारकऱ्यांची धावपळhttps://t.co/khz8Wf2Pir
— LoksattaLive (@LoksattaLive) June 14, 2022
पाहा कार्यक्रमस्थळावरील फोटो#PMModi #Modi #Dehu #tobacco #bags #pune
अज्ञात वाहनाच्या धडकेने सोमवारी एक नीलगाय ठार झाली होती. हा अपघात ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या महामार्गावर घडल्याचे सांगितले जात होते. परंतु, हा अपघात अमरावती-अकोला महामार्गावर बोरगाव मंजूजवळ घडल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
समृद्धी महामार्गावर लोकार्पणापूर्वीच धोकादायक वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हा महामार्ग जीवघेणा ठरत आहे. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेल्या दोन अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला. येथे वाचा सविस्तर वृत्त.
राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावे घेऊन दगाफटका केल्याचा आरोप केला, त्यावर राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेत काहीच तथ्य नाही. संजय राऊत आणि अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नुकतीच भेट झाली. राऊत यांच्याबाबत आमची कुठलीही नाराजी नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. येथे वाचा सविस्तर वृत्त.
चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका शेतमजूराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, १४ जून रोजी सकाळी उघडकीस आली. देविदास कामडी (४८) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
नागपूर शहर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाने नागपूर आणि बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हुसेन यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
१८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नागपूरच्या अश्वघोष कला अकादमीच्या ‘थेंब-थेंब श्वास’ या नाटकाला निर्मितीचे द्वितीय आणि इतर सहा असे एकूण सात पुरस्कार मिळाले. येथे वाचा सविस्तर वृत्त.
आज देहू याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तुकाराम महाराज मंदिराच्या विश्वस्तांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. पण यावेळी अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सविस्तर बातमी
सर्वत्र वटपौर्णिमेचा सण साजरा होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पतीच्या निधनानंतर वैधव्य आलेल्या महिलांसोबत वटपौर्णिमेची पूजा केली. यावेळी त्यांनी उखाणाही घेतला. सुप्रिया सुळेंच्या या अनोख्या वटपौर्णिमेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यानिमित्ताने त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवल्याचंही बोललं जात आहे.
सुप्रिया सुळेंनी विधवांसोबत साजरी केली वटपौर्णिमा; उखाणा ऐकताच महिलांकडून टाळ्यांचा गजर
— LoksattaLive (@LoksattaLive) June 14, 2022
परंपरेला फाटा देत सुप्रिया सुळेंनी अमरावतीत विधवा महिलांसोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा पाडलाhttps://t.co/mC77Zebplr @NCPspeaks @supriya_sule #VatPurnima #Vatpoornima
बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये २७ शालेय वस्तुंचे वाटप सन २००७ पासून करण्यात येत असून दरवर्षी हे साहित्य विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाते.महापालिकेच्या शाळा या १३ जूनपासून सुरू होत आहेत. परंतु अद्यापही शाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या शालेय वस्तू पोहोचलेल्या नाहीत.
'पुणे तिथे काय उणे' असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. वटपौर्णिमा असल्याने जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटवृक्षाला सात फेरे मारतात. परंतु महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे पुरुषांनी चक्क वटवृक्षाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून प्रार्थना केली आहे. दोन वर्षांपासून हा उपक्रम करोनामुळे खंडित झाला होता. तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सविस्तर बातमी
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणावर भर देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ‘मिशन हर घर दस्तक’ मोहिमेचा दुसरा टप्पा १ जुलैपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत सुट्टीच्या दिवशी रेल्वे स्थानकांजवळ लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली तर तत्काळ मदत व बचावकार्य करता यावे यासाठी भारतीय सेनेच्या कलिना कॅम्पमधील नायब सुभेदार संजीव एस यांच्यासह तीन सुभेदारांनी मंगळवारी शहराचा पाहाणी दौरा करून सखल भागांची माहिती घेतली.
गेल्या अनेक दशकांपासून जे जंगल आणि जमिनी स्थानिक ग्रामस्थ राखत आहेत. त्यांना एकाएकी काढता येणार नाही. कसत असलेली जमीन राखण्याचा आणि त्यावर हक्का सांगण्याचा अधिकार स्थानिकांना आहे, असे सांगत मुरबाड तालुक्यातील मासले ग्रामस्थांनी कोयना प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठी जागा देण्यास पुन्हा एकदा विरोध केला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने वस्तू आणि सेवाकर कार्यालयातील (जीएसटी) अधिकाऱ्याची आठ लाख दोन हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एका महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बहुप्रतिक्षित कल्याण बदलापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच येथील फॉरेस्ट नाका चौकाचे रूंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होत असतानाच या चौकात कडेला अतिक्रमणांना सुरूवात झाली आहे. काटई कर्जत राज्यमार्गावरही हीच परिस्थिती आहे. भर चौकत आणि रस्त्याला हॉटेल, फळे, रस आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.
रडतखडत सुरू असलेल्या आणि प्रवाशांना दररोज वाहन कोंडीने बेजार करत असलेल्या शीळफाटा रस्त्यावर ठेकेदाराने झाडांचे रोपण करून सुशोभिकरणाचा देखावा उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. झाडे लावताना रस्ता दुभाजकाच्या तळाशी डांबर, सिमेंटचे लगदे टाकून त्यावर लाल माती लोटण्याचा प्रयत्न चालविला आहे.
राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व घडामोडी तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकता.