Maharashtra Live News Updates Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यातील देहू येथे येणार आहेत. त्यानंतर दक्षिण मुंबईतील राजभवन आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथे होणाऱ्या कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक पोलीस विभागाने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. मंगळवारी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील काही भागांत प्रवेश बंदी केली आहे. तर, काही पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेतील पराभव आणि भाजपने सहावा उमेदवार मागे घेतल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी, असा शिवसेना आणि राष्ट्रवादीत सूर असताना काँग्रेस दोन जागा लढण्यावर ठाम राहिल्याने निवडणूक अटळ ठरली आहे. त्यामुळे पुन्हा आमदारांचा ‘भाव’ वाढणार आहे. दहाव्या जागेसाठी आता भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

16:44 (IST) 14 Jun 2022
चालकांची ‘आरटीओ’कडून तपासणी मोहीम; २० मोटार वाहन निरीक्षक तपासणीसाठी रस्त्यावर

गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवलीत मनमानी करून प्रवासी भाडेवाढ करणे, प्रवाशांशी हुज्जत घालून वाढीव भाडे आकारणे, मोटार वाहन कायद्याचे सर्व नियम धुडकावून रिक्षा प्रवासी वाहतूक करणे असे प्रकार कल्याण, डोंबिवली परिसरात रिक्षा चालकांकडून सुरू आहेत.

सविस्तर वाचा

16:43 (IST) 14 Jun 2022
ठाणे :गांजा विक्री; गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या महिला ताब्यात

मुंब्रा येथील बाह्यवळण मार्गाजवळ गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कीन मेमन आणि एका अल्पवयीन मुलीला मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो ५० ग्रॅम गांजा आणि १ हजार १०० गोळ्या जप्त केल्या आहेत.

सविस्तर वाचा

16:42 (IST) 14 Jun 2022
दिल्लीच्या रामलीला मैदानावर गाजणार नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा मुद्दा प्रथमच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाच्या नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या बैठकीत दि. बा. पाटील यांचे विमानतळाला नाव देण्याबरोबरच समाजाच्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर पावसाळ्यानंतर दोन लाख समाजबांधवांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सविस्तर वाचा

16:41 (IST) 14 Jun 2022
भिवंडीतील समाजमाध्यमांवर पोलिसांची करडी नजर; व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनना नोटीसा

प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्याविरोधात संपूर्ण देशभरात मुस्लिम संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तिच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर भिवंडीतील दोन तरुणांनी भूमिका घेतली होती.

सविस्तर वाचा

16:40 (IST) 14 Jun 2022
डोंबिवलीत टोपीवरून उलगडला खुनाचा गुन्हा ;बावनचाळ रेल्वे मैदानात झाला होता बिगारी कामगाराचा खून

डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळील बावनचाळ भागात रेल्वे मैदानात एका अज्ञात व्यक्तिचा मृतदेह सोमवारी पोलिसांना आढळून आला होता. या मृत अज्ञात इसमाच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे.

सविस्तर वाचा

16:38 (IST) 14 Jun 2022
ठाणे पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण ;सातवा वेतन आयोग लागू करण्यासंबंधीचा प्रस्ताव वादात

महापालिकेच्या लेखा परिक्षक विभागाने सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा काही कनिष्ठ अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी जास्त करण्याबरोबरच काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

16:37 (IST) 14 Jun 2022
ठाणे : जिल्ह्यात राबविली जाणार बालकामगार शोधमोहीम ;बालकामगारांची माहिती देण्यासाठी प्रशासनाकडून संपर्क क्रमांक जाहीर

जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरु असलेले बालमजुरीचे प्रकार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आठ दिवसीय बालकामगार शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडून उल्हासनगर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या शहरांमध्ये अनेक ठिकाणी कार्यरत असलेले बालकामगारांचा शोध घेऊन त्यांची तेथून सुटका करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

16:36 (IST) 14 Jun 2022
ज्येष्ठ महिलेला धक्काबुकी ९० हजारांचे दागिने हिसकावले : नारायण पेठेतील घटना; चोरट्यांचा शोध सुरू

ज्येष्ठ महिलेला धक्काबुक्की करुन चोरट्यांनी तिच्याकडील ९० हजारांचे सोन्याचे दागिने हिसकावल्याची घटना नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर घडली.याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला शनिवार पेठेत राहायला आहेत. पीएमपी बसने नूमवि शिशू शाळेजवळील थांब्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या उतरल्या.

सविस्तर वाचा

16:35 (IST) 14 Jun 2022
विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी आरोग्यविभागाचे प्रयत्न; शाळा स्तरावर पुन्हा लसीकरण सत्र सुरु करणार

करोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाच, दुसरीकडे आज पासून सर्वत्र ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापकांकडूनही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच शालेय लाभार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागानेही प्रयत्न सुरु केले आहे.

सविस्तर वाचा

16:33 (IST) 14 Jun 2022
टाटा कंपनीत नोकरी देतो सांगून डोंबिवलीतील तरुणीची फसवणूक

डोंबिवली- टाटा कंपनीत आपणास नोकरी लागेल यासाठी देण्यात येणाऱ्या मुलाखतीपूर्वी आपणास अनामत रक्कम भरावी लागेल, असे डोंबिवलीतील एका तरूणीला सांगून तिची मुलाखत, नोकरी नाहीच, पण तिची फसवणूक करणाऱ्या एका इसमा विरुध्द टिळकनगर पोलिसांनी या तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला आहे.

सविस्तर वाचा

15:52 (IST) 14 Jun 2022
दौरा मोदींचा अन् चर्चा अजित पवारांची; विमानतळावरील ‘तो’ फोटो चर्चेत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात व्हायरल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात अजित पवारांच्या हाती असाच राहिला तर राज्यातील राजकीय चित्र बदलू शकते, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

सविस्तर बातमी

14:19 (IST) 14 Jun 2022
पंतप्रधान मोदींचा देहू दौरा : काळे कपडे घालून येणाऱ्यांना सभास्थळी नो एन्ट्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. वायुसेनेच्या विमानानं ते नुकतेच पुणे विमानतळावर आले असून थोड्याच वेळात ते देहूत दाखल होणार आहेत. याठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मोदींची सभा देखील होणार आहे. या सभेला वारकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना व्हीआयपी पास देण्यात आला आहे. संबंधित पास असणाऱ्या नागरिकांनाच सभेच्या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे. सविस्तर बातमी

14:03 (IST) 14 Jun 2022
वडील शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरुन चर्चा रंगलेली असताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली होती. विरोधकांकडून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं आहे. त्या अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

सविस्तर बातमी

13:36 (IST) 14 Jun 2022
राष्ट्रवादी काँग्रेस संजय राऊतांवर नाराज? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या…

महाविकास आघाडीकडे बहुमत असतानाही राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पक्षाचे मंत्री व वरिष्ठ नेते यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या पक्षाचे मंत्री व नेत्यांच्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान या बैठकीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांविरोधात नाराजी जाहीर करण्यात आल्याचंही समजत आहे. यावर बैठकीत सहभागी असलेल्या सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. त्या अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळेंना संजय राऊतांवरील नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “राष्ट्रवादी अजिबात संजय राऊत यांच्यावर नाराज नाही. कालच संजय राऊत आणि देवेंद्र भुयार भेटले. खूप छान फोटो निघाले”.

सविस्तर बातमी

13:23 (IST) 14 Jun 2022
नोकरदारांच्या दुचाकी चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; डोंबिवली, कल्याणमधील नोकरदार हैराण

लोकल गर्दीला कंटाळलेल्या, करोना काळात वाहतुकीचे साधन नसल्याने हक्काचे वाहन असावे म्हणून अनेक नोकरदारांनी दुचाकी वाहने खरेदी केली आहेत. कल्याण, डोंबिवलीमधून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकीचा वापर अनेक नोकरदार करतात. गेल्या काही दिवसांपासून या नोकरदारांच्या घराच्या ठिकाणी ठेवलेल्या दुचाकी चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे.

सविस्तर बातमी

13:21 (IST) 14 Jun 2022
नोकरदारांच्या दुचाकी चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; डोंबिवली, कल्याणमधील नोकरदार हैराण

लोकल गर्दीला कंटाळलेल्या, करोना काळात वाहतुकीचे साधन नसल्याने हक्काचे वाहन असावे म्हणून अनेक नोकरदारांनी दुचाकी वाहने खरेदी केली आहेत. कल्याण, डोंबिवलीमधून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकीचा वापर अनेक नोकरदार करतात.

सविस्तर वाचा

13:18 (IST) 14 Jun 2022
वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमधून बाळा नांदगावकरांनी दिली राज ठाकरेंच्या शस्त्रक्रीयेसंदर्भात महत्वाची माहिती; म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज प्रकृतीच्या कारणांमुळे वाढदिवसाच्यानिमित्ताने कोणाचीही भेट घेणार नसल्याने अनेकजण त्यांना सोशल मीडियावरुनच शुभेच्छा देत आहेत. मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनीसुद्धा सोशल नेटवर्किंगवरुन भावनिक पोस्ट करत राज यांना शुभेच्छा देताना भेटीचा हा दुरावा लवकर संपावा अशी इच्छा व्यक्त केलीय. याचबरोबर राज ठाकरेंवर होणाऱ्या शस्त्रक्रीयेच्या तारखेसंदर्भातही नांदगावकर यांनी या पोस्टमध्ये माहिती दिलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त.

13:17 (IST) 14 Jun 2022
भिवंडीतील समाजमाध्यमांवर पोलिसांची करडी नजर; व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनना नोटीसा

प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्याविरोधात संपूर्ण देशभरात मुस्लिम संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तिच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर भिवंडीतील दोन तरुणांनी भूमिका घेतली होती.

सविस्तर वाचा

13:04 (IST) 14 Jun 2022
‘अग्निपथ योजने’ची संरक्षण मंत्र्याकडून घोषणा; तरुणांना मिळणार तिन्ही सैन्य दलात सेवेची संधी

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली होती. वाचा सविस्तर…

12:33 (IST) 14 Jun 2022
बृजभूषण सिंह यांच्याकडून आदित्य ठाकरेंचे अयोध्या दौऱ्यावर स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले आहे. बृजभूषण सिंह यांनी विरोध केल्यानंतर राज ठाकरेंना आपला दौरा रद्द करावा लागला होता. मात्र आता राज ठाकरे यांचे पुतणे आणि शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ब्रृजभूषण सिंह यांनी त्यांच्या भेटीचे स्वागत केले आहे. वाचा सविस्तर…

12:31 (IST) 14 Jun 2022
Photos: अभ्यंगस्थान करणारे फडणवीस, पतंग उडवणारे मोदी अन् आकडे फेकणारे गडकरी…

राज ठाकरे यांचा आज ५४ वा वाढदिवस. राज हे त्यांच्या राजकारणाबरोबर व्यंगचित्रांसाठीही ओळखले जातात. राज हे सोशल नेटवर्किंगवर सक्रीय झाल्यापासून अनेकदा व्यंगचित्रांच्या माध्यमातून विरोधकांवर टिका करताना दिसतात. मागील काही काळापासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या राज यांनी युतीचं सरकार असताना फडणवीस, भाजपा, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावरही व्यंगचित्रांमधून टीका केलीय. येथे पाहा राज यांची गाजलेली ४५ व्यंगचित्रे.

12:30 (IST) 14 Jun 2022
Raj Thackeray Birthday: यंदा वाढदिवसानिमित्त कोणालाही भेटणार नाही असं म्हणणारे राज मध्यरात्रीनंतर गॅलरीत आले अन्…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. मात्र यंदा राज ठाकरे वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना भेटणार नाहीत. राज यांनी १२ जून रोजीच यासंदर्भातील माहिती आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून दिली होती. राज ठाकरे यांनी प्रकृतीसंदर्भातील कारण देत काही दिवसांमध्ये माझी शस्त्रक्रीया असून आपल्याला कोणताही धोका पत्करण्याची इच्छा नसल्याचं सांगत राज यांनी यंदा कोणालाही वाढदिवसाच्या दिवशी भेटायला जमणार नाही असं सांगितलं. येथे वाचा सविस्तर वृत्त.

12:29 (IST) 14 Jun 2022
Photos: अमोल मिटकरींनी पूर्ण केली वडिलांची शेवटची इच्छा; फोटो पोस्ट करत म्हणाले, “माझ्या बाबांच्या अंतिम इच्छेनुसार…”

सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या वडिलांशी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. येथे पाहा विशेष फोटो.

12:28 (IST) 14 Jun 2022
‘देशात बुलडोझर; लडाखमध्ये शेपूट’: चीनने केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर कधी फिरणार?; शिवसेनेचा सवाल

शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सहारणपूर हिंसाचारातील कथित आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवल्यानंतर रविवारी प्रयागराज येथील आणखी एका संशयित आरोपीचे घर मोठय़ा पोलीस बंदोबस्तात बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईवरुन देशभरामधून टीकेचा सूर उमटत असतानाच आज शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाला लक्ष्य केलं आहे. ‘देशात बुलडोझर; लडाखमध्ये शेपूट’ असं या सरकारचं धोरण असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.

12:23 (IST) 14 Jun 2022
विश्लेषण: भारतीय वेबसाईट्स हॅक करणारे ‘ड्रॅगन फोर्स मलेशिया’ कोण आहेत? महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका का बसतोय?

ड्रॅगन फोर्स मलेशिया (Dragon Force Malaysia) या हॅकर्स ग्रुपने जगभरातील हॅकर्सला भारत सरकारच्या मालकीच्या माहिती तंत्रज्ञान इन्फ्रास्ट्रक्चरवर सायबर हल्ले करण्याचं आवाहन केलं आहे. १० जून रोजी हॅकर्सच्या ग्रुपने ट्विटरवरुन भारतीय वेबसाईट्सवर सायबर हल्ले करण्याच्या मोहिमेला ‘स्पेशल ऑप्रेशन’ असं म्हणतं, सायबर हल्ले करण्याची घोषणा केली. पण हे हॅकर्स नेमके आहेत कोण?, मागील चार पाच दिवसांमध्ये नेमकं काय काय घडलंय? याबद्दल सायबर सुरक्षा तज्ज्ञ काय सांगतात? येथे क्लिक करुन वाचा याच साऱ्या गोष्टींबद्दल

12:04 (IST) 14 Jun 2022
लष्कर-ए-तोयबा’शी संबंध असल्याच्या संशयावरुन काश्मीरमधून तरुणाला अटक

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काश्मीरमधून एकास अटक केली. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी एटीएसने या प्रकरणी पुण्यातील दापोडीतील एका तरुणासह तिघांना अटक केली होती.

सविस्तर बातमी

11:59 (IST) 14 Jun 2022
उद्धव ठाकरे आणि मोदी आज एकाच मंचावर; संजय राऊत म्हणाले “आमच्या नात्यात राजकीय भांडण…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राजभवानातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर असणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपा आणि शिवेसना आमने-सामने असताना मोदी आणि ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याने सर्वाचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी लता मंगेशकर यांच्या नावाने नरेंद्र मोदींना पुरस्कार देण्यात आलेल्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरही भाष्य केलं.

सविस्तर बातमी

11:36 (IST) 14 Jun 2022
पोलीस कर्मचाऱ्याने रोखताच काँग्रेस नेत्याने काढला पळ

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने दहा तास चौकशी केली. त्यापूर्वी, काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यादरम्यान युवा काँग्रेसचे प्रमुख श्रीनिवास बी व्ही दिल्ली पोलिसांनी रोखल्यानंतर पळून गेल्याचा व्हिडीओ भाजपा नेत्यांकडून सोशल मीडियावर शेअर करत ट्रोल करण्यात आलं. यानंतर त्यांनी आपल्या ट्विटरला आणखी एक व्हिडीओ शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी

11:17 (IST) 14 Jun 2022
जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंग्जमुळे येथे सध्या तणावाचे वातवरण आहे. असे असताना आता श्रीनगरमधील बेमिना भागात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार येत्या ३० जूनपासून सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. मात्र श्रीनगरमधील बेमिना भागात पोलिसांनी त्यांना ठार ठार केले. हे दहशतवादी लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. वाचा सविस्तर

11:16 (IST) 14 Jun 2022
राजभवानतील क्रांतिकारक गॅलरीच्या निर्मिती प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज ते मुंबईतील राजभवन परिसरात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या दालनाचे उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटन समारंभाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या संग्रहालयाच्या निर्मित प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाचा सविस्तर

राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व घडामोडी तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकता.