Maharashtra Live News Updates Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यातील देहू येथे येणार आहेत. त्यानंतर दक्षिण मुंबईतील राजभवन आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथे होणाऱ्या कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक पोलीस विभागाने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. मंगळवारी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील काही भागांत प्रवेश बंदी केली आहे. तर, काही पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेतील पराभव आणि भाजपने सहावा उमेदवार मागे घेतल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी, असा शिवसेना आणि राष्ट्रवादीत सूर असताना काँग्रेस दोन जागा लढण्यावर ठाम राहिल्याने निवडणूक अटळ ठरली आहे. त्यामुळे पुन्हा आमदारांचा ‘भाव’ वाढणार आहे. दहाव्या जागेसाठी आता भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

11:12 (IST) 14 Jun 2022
येत्या दीड वर्षात मिळणार १० लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींनी दिल्या सूचना

रोजगाराच्या मुद्द्यावर अनेकदा प्रश्नांना सामोरे जाणारे मोदी सरकार आता या संकटावर मात करण्यासाठी योजना तयार करत आहे. येत्या दीड वर्षात सुमारे १० लाख पद भरती करण्यात यावी, असे निर्देश खुद्द पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. या लोकांना सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये काम मिळणार आहे. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये १० लाख पदांची भरती करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर…

10:58 (IST) 14 Jun 2022
महाराष्ट्र एटीएसकडून जम्मू येथील एका संशयित दहशतवाद्याला अटक

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने जुनैद मोहम्मद याला पैसे पाठवल्याप्रकरणी जम्मू काश्मीर येथून युसूफ नावाच्या एका संशयिताला अटक केलं आहे. महाराष्ट्र एटीएसने अटक केलेला हा चौथा संशयित दहशतवादी आहे. जुनैदला आज पुण्यामध्ये न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. काश्मिरमधील दहशतवादी संघटनांनी जुनैद मोहम्मद याला पैसे पुरवल्याचा संशय महाराष्ट्र एटीएसला आहे. याच प्रकरणात युसूफ याला अटक करण्यात आली आहे.

10:38 (IST) 14 Jun 2022
विश्लेषण : डॉ. प्रकाश आमटेंना निदान झालेला ल्युकेमिया आजार काय आहे?

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश आमटे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वाचा सविस्तर…

10:03 (IST) 14 Jun 2022
दोन जागांवर निवडणूक लढवण्यास बंदी, निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

राजीव कुमार यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्षांबाबतचे नियम यामध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. आयोगाने तसा प्रस्ताव केंद्रीय कायदा मंत्रालयाला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावामध्ये एक्झिट पोल तसेच ओपिनिय पोलवर बंदी, दोन जागांवर निवडणूक लढवण्यास बंदी, पक्षाची नोंदणी रद्द करण्याविषयीच्या नियमांत बदल अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे. वाचा सविस्तर

10:02 (IST) 14 Jun 2022
राहुल गांधी यांची आज ईडीकडून पुन्हा चौकशी

काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने दहा तास चौकशी केली. त्यांतर आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांना ईडीसमोह हजर राहण्यास सांगण्यात आले असून त्यांची आजदेखील चौकशी केली जाणार आहे. सोमवारी राहुल गांधी ईडीसमोह हजर होताना काँग्रेसने मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे आजदेखील काँग्रेसचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

09:57 (IST) 14 Jun 2022
जगभरातील मुस्लिमांची माफी मागा म्हणत हॅकरकडून ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक!

जगभराच्या मुस्लिमांची माफी मागा म्हणत एका हॅकर टीम ने थेट ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस दल खडबडून जागे झाले आहे. या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या हॅकर्सचा शोध सुरू केलेला आहे. 'वन बॅट सायबर टीम- इंडोनेशियन डिफेसर' असा या हॅकर टीमचा उल्लेख आहे.

वाचा सविस्तर

09:52 (IST) 14 Jun 2022
Gold- Silver Price Today: आज एक तोळे सोन्याची किंमत किती? जाणून घ्या

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. १० ग्रॅम २२ कॅरेट आणि १० ग्रॅम २४ कॅरेटची महाराष्ट्रातील आजची किंमत जाणून घ्या. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

09:50 (IST) 14 Jun 2022
Petrol Diesel Price Today: १४ जूनला पेट्रोल आणि डिझेलची एक लिटर किंमत किती? जाणून घ्या

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

09:43 (IST) 14 Jun 2022
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी घेणार का? शरद पवारांनी केलं स्पष्ट

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली. यादरम्यान शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता शरद पवारांनी आपण या स्पर्धेत नाही असं स्पष्ट केलं आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1536560720535777280

09:42 (IST) 14 Jun 2022
पंतप्रधान आज देहूमध्ये

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे येत आहेत. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. समारंभात संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल. दोन वाजून १० मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी आणि भाविकांशी ते संवाद साधणार आहेत.

09:41 (IST) 14 Jun 2022
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेचा टोला

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या आधी राज्यातील अनेक शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याने विरोधक त्यांना लक्ष्य करत असताना मनसेनेही टोला लगावला आहे. ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो अशा शुभेच्छा मनसेने दिल्या आहेत.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1536550878534324225

09:40 (IST) 14 Jun 2022
पोलिसांकडून पी चिदंबरम यांना धक्काबुक्की, हाड मोडलं

काँग्रेसचे मुखपत्र ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ‘यंग इंडियन’ कंपनीचे प्रमुख समभागधारक राहुल गांधी यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने दहा तास चौकशी केली. त्यापूर्वी, काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ईडी चौकशीविरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये पी चिदंबरम यांचाही समावेश होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत पी चिदंबरम यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून हाड मोडलं आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1536542888171290625

राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व घडामोडी तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकता.