Mumbai News Today: गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर आमदार अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर निर्णय घेतील. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत.
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर
पुणे : जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात यासह समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (१४ सप्टेंबर) शहराच्या बाणेर, पाषाण, बालेवाडी, बोपोडी, औंध, सुतारवाडी, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी आणि सूस या भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.
नागपूर : मराठा आरक्षणबाबत जी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. ते ४० वर्ष सरकार चालवणाऱ्यांना जमले नाही. फडणवीस यांनी न्याय देण्याचा प्रयत्न तरी केला. त्यामुळे शरद पवार यांनी आरक्षणावर बोलू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो. आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे. गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.
वर्धा : आज पोळ्याची ग्रामीण भागात धुमधाम असतानाच गुंजखेडा गावात मात्र शोककळा पसरली आहे.देवळी तालुक्यातील या गावात दुर्घटना घडली. येथील राजू पुंडलिकराव राऊत हे मुलगा चंद्रकांत सोबत याच परिसरात असलेल्या एका तलावावर बैलजोड़ी धुण्यास गेले होते.
नागपूर : ‘डायमंड एक्चेंज’ नावे सुरु असलेल्या ‘ऑनलाइन गेमिंग’ अॅपच्या माध्यमातून कोट्यवधीची फसवणूक प्रकरणात आरोपी सोंटू जैनवर कारवाईचा फास आवळत चालला आहे. त्यामुळे सोंटू आणि त्याचे नातेवाईक गुन्ह्यातून बाहेर येण्यासाठी धडपड करीत आहेत.
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षे उत्सव साजरा करण्यासाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. आगामी वर्षांसाठी त्यांना आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांना ५ वर्षांकरिता परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1702258576859832680
“नावात काय आहे? असे शेक्सपियर म्हणून गेला. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता…!”
तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या काळात मुलांचे मैदानी खेळ कमी झाले आहे. त्यामुळे मुलांच्या जीवनात क्रीडांगणात खेळाचे महत्व ओळखुन तसेच राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडू निर्माण व्हावे यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने “खेलो चांदा” या नाविन्यपूर्ण उपक्रमातून १५ तालुक्यात ७५ क्रिडांगण निर्माणाची योजना आहे.
महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या पांढुर्णा येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी (कर) जांब नदीपात्रात ऐतिहासिक ‘गोटमार यात्रा’ भरते. यात्रेत अक्षरशः दगडफेकीचा खेळ खेळला जातो. नदीच्या मधोमध एक पळसाची फांदी रोवली जाते. सविस्तर वाचा…
विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी आणि तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणारी मारबत आणि बडग्याची मिरवणूक उद्या शुक्रवारी सकाळी निघणार आहे. सविस्तर वाचा…
चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा तसेच ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा आणि बल्लारपूर विधानसभा मतदार संघात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी तेली समाजाला उमेदवारी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी दिला आहे.
विषारी पदार्थ सिम्बाने खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यानंतर अय्यंगार यांनी तातडीने याप्रकरणी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली.
सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देऊ नका. कुणबी दाखले देण्याची मागणी ९६ कुळी मराठ्यांची नाही - नारायण राणे
तान्हा पोळा तसेच मारबत महोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर शहरात १५ सप्टेंबरला मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत.
मी एवढंच सांगू इच्छितो की विधानसभेचे नियम व संविधानात दिलेली प्रक्रिया यांचं पालन करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. पुढची सुनावणी नेमकी कधी होणार, यावषयी आम्ही निर्णय घेऊन दोन्ही गटांना कळवलं जाईल - राहुल नार्वेकर
नागपूर: राज्य सरकारने बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या तलाठी भरतीमध्येही सातत्याने गैरप्रकार उघडकीस येत आहेत.
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियंता दिन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने रात्री उशिरा येणाऱ्या उपनगरीय गाड्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान ३२ विशेष बससेवा सुरू केल्या आहेत.
आरोपींच्या विरोधात वाकड, पिंपरी पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, पळवून नेणे, डांबून ठेवणे, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा करणे असे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
शहरातील रस्ते खड्डेमुक्त ठेवणे, रस्ते दुरुस्तीच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन सुधारणा करण्यासाठी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
"नावात काय आहे?" असे शेक्सपियर म्हणून गेला.. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा‘तच सर्व काही आहे असे वाटते! फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो.. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून ७५ वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या India ह्या नावाने ओळखावे ही गोष्ट बरी नाही. पण मग.. "भारत" नाव बदलासाठी आग्रही असणारे लोक ‘मुंबई‘च्या नाव बदला संदर्भात इतके उदासीन कसे? बघा हे फोटो! ‘क्रिएटिव्हिटीच्या‘ नावाखाली कितीही गरज पडत असेल, तरी आपल्या शहराच्या जुन्या नावाचे फलक गावभर लावणे आणि TOI सारख्या नामांकित जबाबदार वृत्तपत्राने आपली ओळख बदलून काही पैशांसाठी लाचारीने हे जुने नाव मिरवणे, हे सुद्धा अजिबात बरे नाही! अहो ‘बॉम्बे‘ आणि ‘बम्बई‘चे ‘मुंबई‘ करण्यासाठी कित्येक लोकांनी किती परिश्रम केले.. हे आपण विसरलो का? राजकीय दस्तावेजांमधून अधिकृतरित्या जरी जुने नाव हद्दपार झाले असले, तरीही अमराठी आगंतुकांच्या वाणीवरून आणि मनावरून हे नाव पुसून टाकण्याचा लढा आजही चालू आहे. असो.. अजून मी ही वेब सिरीज पाहिलेली नाही. बघतोच! आणि मुंबई ऐवजी ‘बंबई‘ वापरण्याची इतकी काय क्रिएटिव्ह गरज होती हेही बघतो.. पटलं तर ठीक आहे.. अन्यथा खळ्ळ खटॅक्क!!
https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1702198007435829724
जेव्हा कुंपणच शेत खाते... APC स्कीमअंतर्गत अन्नप्रक्रिया विभागानं प्रकल्प मंजूर केला. त्याची लाभार्थी महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित यांची कंपनी रेवा तापी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ठरली आहे - सचिन सावंत, काँग्रेस नेते
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही. मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल - देवेंद्र फडणवीस
भंडारा : महाविकास आघाडीचे तत्त्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडात शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला. त्यात भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे.
महिला डबा महिला प्रवाशांनी खचाखच भरलेला असतो. अशा गर्दीतून वाट काढत पुरुष फेरीवाले वस्तू विक्री करत डब्यातून फिरतात.
त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बुलढाणा : ऐन पोळ्याच्या दिवशी झालेल्या वाहन अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यात चोघे शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.आज गुरुवारी ( दि. १४) चिखली खामगाव मार्गावरील अंत्रज फाट्या जवळील सिंदी नाक्याजवळ ही दुर्घटना घडली.
डोंबिवली- येथील पश्चिमेतील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञाला आणि त्याच्या सहकाऱ्याला जुनी डोंबिवलीतील एका वीज ग्राहक आणि त्याच्या भावाने शिवीगाळ करत बुधवारी मारहाण केली. या दोन्ही भावांच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात महावितरण कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षांसाठी तयारी करत आहेत.सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे बाह्यस्रोतामार्फत कंत्राटीकरण करत आहे.
वर्धा : महानगरात ८ लाख रूपये खर्च पडणारी हृदयावरील ‘मिनीमल इनवॅसिव्ह कार्डियाक’ ही शस्त्रक्रिया अद्ययावत समजल्या जाते.परंपरागत बायपास हृदयशस्त्रक्रियेत मोठा चिरा देणे किंवा छातीच्या बरगड्या बाजूला सारणे अथवा विभाजीत करणे आदी पद्धतींचा अवलंब होतो.
Maharashtra Live News Today: शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची आजपासून सुनावणी