Mumbai News Today: गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर आमदार अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर निर्णय घेतील. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत.
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर
नागपूर: राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होत असून आजपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ऑगस्टमध्ये रुसून बसलेला मान्सून सप्टेंबरमध्ये पुन्हा परतला. सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमीपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.
चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन कायम आहे. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीनंतर जवळपास दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर उपोषण मंडपात दाखल झाले.
नागपूर : राज्य सरकारने सव्वाशे कोटी रुपये खर्च करून शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन केंद्र उभारले, त्याचे थाटात उद्घाटनही केले. पण ते कोणी चालवावे याबाबतचा निर्णय होत नसल्याने हे केंद्र बंद पडले आहे.
डोंबिवली- शहराच्या पूर्व, पश्चिमेत मुख्य वर्दळीच्या सर्व रस्त्यांवर गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या कमानी विविध राजकीय पक्षांनी रस्त्याच्या दुतर्फा लावल्या आहेत. या कमानींचा रस्ते वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यामुळे शहरात दररोज सकाळ, संध्याकाळ कोंडी दिसू लागली आहे.
नवी मुंबई: हिंदू आणि मुस्लिम समाजाचे सण एकाच दिवशी असेल तर सर्वाधिक ताण दबाव असतो ते पोलिसांवर. कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता शांतता व सुव्यवस्था राखण्याची जवाबदारी पोलिसांवर असते.
नवी मुंबई: मुंबई महानगराला कृषी मालाच पुरवठा करण्याऱ्या सर्वात मोठा बाजारपेठा पुनर्विकासाच्या उंबरठ्यावर आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत, तहसीलदार, भूसंपादन अधिकाऱ्यांची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत सक्तीने भूसंपादनाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय आणि सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल.
“आज सुनावणीची पहिली तारीख होती. सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी चालू झाली. व्हीप न पाळल्यामुळे अपात्रतेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आमच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला की सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेच्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात. प्रभूंनी याचिका केली होती की सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी. अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांचे कागदपत्र एकमेकांना द्यावेत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल. तेव्हा ठरेल की नेमकी सुनावणी कशा पद्धतीने होईल. कागदपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे”, असं शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी यावेळी सांगितलं.
गोंदिया : केंद्र शासनाने पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा साकारून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील काही शाळांमध्ये परसबागा तयार करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करण्यात येणार आहे.
धुळे: महापालिकेतून जन्म-मृत्युचे दाखले मोफत मिळण्याच्या विषयाला बुधवारी महासभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यामुळे आता हे दाखले मोफत मिळणार आहेत.
भिमाले यांनी १९९८ साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
आज सुनावणीची पहिली तारीख होती. सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी चालू झाली. व्हीप न पाळल्यामुळे अपात्रतेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आमच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला की सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेच्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात. प्रभूंनी याचिका केली होती की सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी. अधअयक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांचे कागदपत्र एकमेकांना द्यावेत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल. तेव्हा ठरेल की नेमकी सुनावणी कशा पद्धतीने होईल. कागदपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे – अनिल सिंह, शिंदे गटाचे वकील
वाशीम: जिल्हयात एकुण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबिन पिकांची पेरणी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे पिके फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना अनेक ठिकाणी पिकावर पिवळा मोझ्यक व कारपा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सणासुदीच्या काळामध्ये दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात व्यावसायिकांकडून नफेखोरी करण्यासाठी खवा, पनीर आदी पदार्थांमध्ये भेसळीच्या प्रमाणात देखील वाढ होत असते. हे भेसळयुक्त पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
सततच्या कत्तलीमुळे कोपर, डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरातील खाडी किनारची जैवविविधता नष्ट झाली आहे.
मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र सरसकट देण्यात येऊ नये आणि ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार सोडावा म्हणून कुणबी आणि ओबीसी समाजातर्फे नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे. सविस्तर वाचा…
मुंबई: सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सोने लपवलेला पुडा आरोपींच्या साथीदाराने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळ परिसरात फेकला होता. तो स्वीकारण्यासाठी दोघे जण आले असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांना पकडले.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष पुण्यात दाखल झाले.
तेव्हा दोघांनी गुप्तांगात सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुल लपविल्याचे उघडकीस आले. कॅप्सुलमधील ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली.
मनमाड: बळीराजासोबत वर्षभर शेतात राबणार्या सर्जा-राजाचा पोळा सण गुरुवारी साजरा होत आहे. मात्र यंदा असलेली दुष्काळी परिस्थिती, काही दिवसांपूर्वी असलेला लम्पी आजार आणि महागाईच्या सावटामुळे पोळा सणाच्या उत्साहावर सावट आहे. खरेदीलाही फारसा उत्साह दिसून आलेला नाही.
विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटातील आमदारांना सुनावणीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यानुसार सुनावणी सुरू झाली असून शिंदे गटाकडून असीम सरोदे अध्यक्षांसमोर बाजू मांडत आहेत.
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आपण कुणाची फसवणूक करू शकत नाही. सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. आपण असं काम करू की मराठा समाजाचं गेलेलं आरक्षण, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिडे ही सरकारची ठाम भूमिका आहे. काही लोक आपपसांत तेढ निर्माण करू इच्छित आहेत. इतर समाजांनीही समजून घेण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाचा इतर समाजांशी कोणताही वाद नाही. एकदा बोलून हा विषय संपणार नाहीये. वारंवार भेटीगाठी कराव्या लागतील. कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मी ठरवलं होतं, मुख्यमंत्री असलो तरी प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचं म्हणजे भेटायचं. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, अन्य राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सैन्यदलाचे प्रमुख, सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, विविध सरकारी यंत्रणांचे प्रमुख यांना राज्य अतिथीचा दर्जा दिला जातो.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं उपोषण आज (१४ सप्टेंबर) १७ व्या दिवशी सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात येऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर शिंदेंच्या हस्ते फळांचा रस घेत जरांगेंनी उपोषण सोडलं. यानंतर उपस्थितांसमोर बोलताना मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.
पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या पाच कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीच्या भट्टीत अमली पदार्थ जाळण्यात आले.
नागपूर: सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. आता सायबर गुन्हेगारांनी ‘रेकॉर्डेड कॉल’वरून एका व्यावसायिकाची फसवणूक केली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो २ बचे काम करीत आहे.
नाशिक: गंगापूर आणि मुकणे धरणातील पाणी उचलणाऱ्या केंद्रातील वीज व्यवस्थेशी संबंधित देखभाल व दुरुस्तीचे काम शनिवारी केले जाणार आहे.
Maharashtra Live News Today: शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची आजपासून सुनावणी