Mumbai News Today: गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर आमदार अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर निर्णय घेतील. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर

11:01 (IST) 14 Sep 2023
Maharashtra Political News Live: मनोज जरांगेंचं उपोषण मागे

मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं आहे.

10:54 (IST) 14 Sep 2023
Maharashtra Political News Live: मुख्यमंत्र्यांनी ओरिजिनल व्हिडीओ दाखवावा – सुषमा अंधारे

जर तो व्हिडीओ एडिटेड असेल, तर मुख्यमंत्र्यांनी ओरिजिनल व्हिडीओ दाखवण्याची जबाबदारी घ्यावी – सुषमा अंधारे

10:52 (IST) 14 Sep 2023
Maharashtra Political News Live: एकनाथ शिंदे आंदोलनस्थळी दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलनस्थळी दाखल झाले असून त्यांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू झाली आहे.

10:51 (IST) 14 Sep 2023
शहराच्या काही भागात आज बंद; जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त

मराठा क्रांती मोर्चाकडून सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.

सविस्तर वाचा…

10:49 (IST) 14 Sep 2023
Maharashtra Political News Live: शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी दोन्ही गटांमधल्या आमदारांना नोटीस देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटानं शिंदे गटातल्या आमदारांविरोधात अपात्रतेची मागणी केली असून शिंदे गटानं तशीच मागणी उद्धव ठाकरे गटातील आमदारांबाबत केली आहे.

10:48 (IST) 14 Sep 2023
पाच हजारांवरील देयक ऑनलाईनच अदा करण्याच्या सक्तीमुळे महावितरण आर्थिक कोंडीत!.. प्रकरण काय पहा..

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या लघुदाब व कृषी वर्गातील ग्राहक वगळता इतर सर्व ग्राहकांना पाच हजारांहून जास्तीचे वीज देयक १ ऑगस्टपासून ऑनलाईनच भरण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे पाच हजारांहून जास्तीचे देयक भरणाऱ्या ग्राहकांची थकबाकी वाढून महावितरण आर्थिक कोंडीत सापडत आहे. सविस्तर वाचा…

10:47 (IST) 14 Sep 2023
शंकरबाबा पापळकरांच्या मानस कन्येचे ‘एमपीएससी’त यश…कचरा पेटित सापडलेल्या मुलीचा…

जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरापेटीत सापडलेल्या व जन्मत: अंध असलेल्या ‘माला’ला ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी वझ्झर येथील अनाथ आश्रमात वाढवून बाप म्हणून स्वत:चे नाव दिले. सविस्तर वाचा…

10:47 (IST) 14 Sep 2023
वाघाने जिल्हा सोडला पण डरकाळ्या सुरूच; शाळा ओस तर वन कर्मचारी त्रस्त

एखाद्या भयपटात असावे असे वातावरण समुद्रपुर तालुक्यातील ताडगाव पंचक्रोशीत सध्या आहे. या गावाच्या एक किलोमीटर परिघात एका शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ आपली दहशत पसरवून आहे. सविस्तर वाचा…

10:47 (IST) 14 Sep 2023
Maharashtra Political News Live: नितेश राणेंचा नवा दावा!

सनातन धर्माविषयी बोलल्यामुळे डीएमके नेत्यांचं इंडिया आघाडीच्या बैठकीत कौतुक करण्यात आलं – नितेश राणे

10:46 (IST) 14 Sep 2023
अमरावती: फुकट्या प्रवाशांमुळे मध्‍य रेल्‍वेला एका महिन्‍यात १६.८८ कोटींचे उत्पन्न

फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्‍यासाठी रेल्‍वेकडून सातत्‍याने मोहीम राबवली जात आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्‍बल १६.८८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. आगामी काळातही रेल्वेकडून ही मोहीम सुरूच राहणार आहे. सविस्तर वाचा…

10:45 (IST) 14 Sep 2023
चंद्रपूर : ४१ हजारांची लाच घेतांना दोन सरपंचासह एका उपसरपंच जाळ्यात

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामाकामासाठी साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदाराकडून ४१ हजारांची लाच घेणाऱ्या दोन सरपंचासह एका उपसरपंचास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. सविस्तर वाचा…

10:45 (IST) 14 Sep 2023
जवानांवर हल्ले होताना पंतप्रधान रोड शो करत होते – संजय राऊत

सरकार म्हणतं जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. पण आजही तिथे दहशतवाद्यांचे तळ आहेत. पाकिस्तानमधून लोक घुसखोरी करून आपल्या जवानांवर हल्ले करत आहेत. पण आमचे पंतप्रधान दिल्लीत उत्सव साजरा करत होते. कालही पंतप्रधान रोड शो करत होते. ही बाब देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नाही. जम्मू-काश्मीरमध्ये तुम्ही निवडणुका घेत नाही आहात. तुम्ही ३७० हटवलं आहे, तर मग निवडणुका घेऊन लोकांच्या समोर जा ना – संजय राऊत

10:32 (IST) 14 Sep 2023

वर्धा: एखाद्या भयपटात असावे असे वातावरण समुद्रपुर तालुक्यातील ताडगाव पंचक्रोशीत सध्या आहे. या गावाच्या एक किलोमीटर परिघात एका शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ आपली दहशत पसरवून आहे.

सविस्तर वाचा…

10:31 (IST) 14 Sep 2023
सीबीआयकडून साक्ष, पुरावे सादर करण्याचे काम पूर्ण – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणात पुढील टप्प्यात आरोपींचे जबाब नोंदविले जाणार आहेत. त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येणार आहेत.

सविस्तर वाचा…

10:27 (IST) 14 Sep 2023
Maharashtra Political News Live: मनसेचं भाजपावर टीकास्र!

परदेशी पाहुण्यांनी कदाचित तुम्ही दाखवलेला 'भारत' पाहिला असेल पण माणुसकीने तुम्ही झाकलेला 'भारत'ही पाहिलाय ! https://twitter.com/mnsadhikrut/status/1702147907561177185

10:17 (IST) 14 Sep 2023
११० वर्षांची म्हातारी ‘निधना’नंतरही तीन दिवस जगली!

सर्व कुटुंबीय, नातेवाईक शोकसागरात बुडाले होते. त्याचवेळी त्यांच्यात हालचाली जाणवल्या. त्यामुळे कुटुंबीयांना सुखद धक्का बसला.

सविस्तर वाचा…

10:13 (IST) 14 Sep 2023
पेण मधून १५ हजार गणेशमूर्तींची परदेशवारी; व्यावसायिकांमध्ये उत्साह, मोठी दरवाढही नाही

गणेश मूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिध्द असणाऱ्या पेण मधून १५ हजार गणेशमुर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत.

सविस्तर वाचा…

10:12 (IST) 14 Sep 2023

10:10 (IST) 14 Sep 2023
Maharashtra Political News Live: आम्हाला दहावं परिशिष्ट लागूच होत नाही – शिरसाट

आमच्यावर अपात्रतेची टांगती तलवार नाहीचे. आम्हाला दहावं परिशिष्ट लागूच होत नाही. त्यामुळेच आमची बाजू भक्कम आहे. आत्ता होणाऱ्या सुनावणीत आमची बाजू आम्ही भक्कमपणे मांडू – संजय शिरसाट

10:10 (IST) 14 Sep 2023
“आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, एवढं…”; मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीआधी मनोज जरांगेंचं वक्तव्य

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज (१४ सप्टेंबर) १७ वा दिवस आहे. मात्र, अद्याप मराठा आंदोलकांच्या मागणीवर अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईहून जालन्याला निघाले आहेत. ते जालन्यात मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

सविस्तर वाचा…

10:10 (IST) 14 Sep 2023
Maharashtra Political News Live: शिरसाट म्हणतात, आमची बाजू भक्कम!

आम्ही उठाव केला. त्याला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे. आत्ता होणाऱ्या सुनावणीत आमची बाजू भक्कम आहे. आम्ही उठाव करताना पक्ष बदललेला नाही, आम्ही वेगळा गट स्थापन केला नाही. आम्ही इतर कोणत्या पक्षात विलीन झालेलो नाही. आम्ही शिवसेना म्हणून राहिलो. त्यामुळे आम्हाला कोणती इतर नोटीस लागूच होत नाही. तेव्हा बजावण्यात आलेला व्हीप बेकायदेशीर होता. तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी दिलेली ४८ तासांची मुदतही अवैधच होती. ही बाजू आम्ही भक्कमपणे मांडलेली आहे – संजय शिरसाट

10:09 (IST) 14 Sep 2023
“आरक्षण म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नव्हे, हजारो वर्षे…”; छगन भुजबळ यांचे वक्तव्य चर्चेत

राज्याचे अन्न व नागरी पुवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजातील विविध समाज घटकांवर बोलताना आरक्षण म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नव्हे, असं मत व्यक्त केलं. तसेच बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आपली पूर्वीपासूनची मागणी अजूनही कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते बुधवारी (१३ सप्टेंबर) ‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलत होते.

सविस्तर वाचा…

10:06 (IST) 14 Sep 2023
Maharashtra Political News Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमध्ये दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमध्ये दाखल झाले असून ते हेलिकॉप्टरने जालन्याला जाणार आहेत. तिथून पुढे रस्तेमार्गे ते सरवली गावात जिथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, तिथे जाणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

Maharashtra Live News Today: शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची आजपासून सुनावणी