Mumbai Maharashtra News Updates: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही बाजूंचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भुजबळांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी त्यांच्या ‘घरवापसी’वर जोरदार तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

Live Updates

Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा!

21:06 (IST) 19 Jun 2024
वारसा सांगणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तितांजली दिली - एकनाथ शिंदे

शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये वरळीच्या एनआयसी येथे शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही. वारसा सांगणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला उद्धव ठाकरे यांनी तितांजली दिली. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं.

https://youtube.com/live/wMs8nZMwOO0?feature=share

20:32 (IST) 19 Jun 2024
मोजक्याच दुष्काळी भागांना ‘संजीवनी’, ‘पोकरा’ प्रकल्पांतर्गत साडेचार हजार कोटींपैकी ६० टक्के रक्कम तीन जिल्ह्यांतच खर्च

पुणे : राज्यातील १६ जिल्ह्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) खर्च झालेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम केवळ तीन जिल्ह्यांत खर्च झाली आहे. इतर १३ जिल्ह्यांत प्रकल्पाची अल्प अंमलबजावणी झालेली असताना, यंदा याचा पुढचा टप्पा राबविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.

सविस्तर वाचा...

20:29 (IST) 19 Jun 2024
शिवसेना संपवण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांनबरोबर आम्ही जाणार नाही- उद्धव ठाकरे

शिवसेना संपवण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांनबरोबर आम्ही जाणार नाही. लोकसभेत भाजपाला तडाखा बसला आहे. एनडीएच सरकार पडलं पाहिजे. आमच्यात आत्मविश्वास आहे. तर मोदींमध्ये अहंकार आहेत. आम्हाल मुस्लीम मतं पडली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

20:23 (IST) 19 Jun 2024
संजय राऊतांचा भाजपाचा ह्ल्लाबोल!

मोदी-शाह शिवसेना संपवायला निघाले होते. भगवान शंकराने जसं हलाहल पचवलं तशाच प्रकारे शिवसेना उभी राहिली आहे. कितीही रेडे कापा आम्हाला फरक पडत नाही. आज डोम सभागृहात डोमकावळ्यांचं संमेलन सुरु आहे. आपला उद्या हिरक महोत्सव होईल. त्यांनी कशीबशी अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. बाळासाहेब ठाकरेंना वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. संघर्षातून आणि विचारांमधून ही शिवसेना उभी केली आहे. गुजरातचे हौशे, नवशे गवशे आले तरीही वार करुन ते शिवसेना संपवू शकत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली.

https://www.youtube.com/live/1re0CKxdYP4

20:19 (IST) 19 Jun 2024
“बऱ्याच वर्षांपासून गृहखातं असल्याने, त्यांचा अन्…”; फडणवीसांच नाव न घेता भास्कर जाधवांची खोचक टीका!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज काही लोक स्ट्राईक रेटच्या गोष्टी करत आहे. त्यांच्याकडून काहीही आकडे सांगितले जात आहेत. बऱ्याच वर्षांपासून गृहखातं असल्याने त्यांचा आणि आकडे लावण्याचा जवळचा संबंध आहे, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ठाकरे गटाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली.

सविस्तर वाचा -

20:06 (IST) 19 Jun 2024
मुंबई : जे. जे. रुग्णालयातील रुग्ण कक्ष होणार अद्ययावत, पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

मुंबई : खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर जे. जे. रुग्णालयातील सर्व रुग्ण कक्ष अद्ययावत करण्यात येणार आहेत. अद्ययावत कक्षांची उभारणी पुढील वर्षापर्यंत करण्यात येणार असून त्यामुळे रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

19:46 (IST) 19 Jun 2024
पुणे : जमीन व्यवहारात निवृत्त मुख्याध्यापिकेची दोन कोटींची फसवणूक; दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा

पुणे : आजारपणाचा फायदा घेत सहा जणांनी निवृत्त मुख्याध्यापिकेची धायरी येथील जमीन कमी किमतीत विकून दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी महिलेला धमकावून दहा लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा...

19:27 (IST) 19 Jun 2024
उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात दाखल

वर्धापन दिनाच्या मेळ्याव्यासाठी उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात दाखल झाले आहेत.

19:26 (IST) 19 Jun 2024
सासूचा खून करून पोलीस ठाण्यात हजर झालेल्या जावयास जन्मठेप

आरोपी मोहम्मद शरीफ याचा समरीन हकीम पीरजादे या तरूणीबरोबर १४ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता.

सविस्तर वाचा...

19:24 (IST) 19 Jun 2024
मुंबईत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी दहिसर येथील रहिवाशाची तीन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सविस्तर वाचा...

19:22 (IST) 19 Jun 2024
Mumbai Maharashtra News Live Updates: मुंबईत राजकीय घमासान, शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे!

शिवसेनेच्या ५८व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईत आज मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकारी जमा झाले आहेत. दुसरीकडे वरळीच्या एनआयसी येथे शिंदे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठीही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

19:11 (IST) 19 Jun 2024
सैनिकाच्या संघर्षाची कहाणी जगासमोर आल्याचा विलक्षण आनंद! ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचे नायक मुरलीकांत पेटकर यांची भावना

पिंपरी : पाकिस्तानच्या सीमेवर शत्रूशी लढताना माझ्या डोक्यावर, पाठीवर नऊ गोळ्या लागल्या. दोन वर्षे कोमात होतो. मृत्यूशी झुंज जिंकली, पण वयाच्या २१ व्या वर्षी आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. त्यावर मात करत हार न मानता देशासाठी पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. या संघर्षाची कहाणी ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आल्याने विलक्षण आनंद झाल्याची भावना मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा...

19:11 (IST) 19 Jun 2024
ठाण्यात शुक्रवार आणि शनिवारी पाणी नाही, महापालिकेच्या पाणी योजनेतील दुरुस्ती कामांमुळे पाणीपुरवठा बंद

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

सविस्तर वाचा...

19:01 (IST) 19 Jun 2024
अण्णासाहेब पाटील महामंडळातील नोकरकपात म्हणजे षडयंत्र - पृथ्वीराज पाटील

सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे षङयंत्र नेमके कुणी रचले, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बुधवारी केली. या प्रकरणात मराठा तरुणांवर सूड उगवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याशी आज पृथ्वीराज पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. महामंडळात झालेल्या नोकर कपातीबद्दल तीव्र शब्दांत संताप आणि नाराजी व्यक्त केली. नरेंद्र पाटील यांनी मराठा तरुणांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.

श्री. पाटील म्हणाले, मराठा समाजातील मागास घटक संकटांनी पिचलेला आहे. मराठा आरक्षण प्रश्‍नात सरकार सातत्याने वेळकाढूपणा करत आहे. नोकऱ्या नाहीत, उद्योग करावा तर बँका कर्ज देत नाहीत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून विकासात मदतीची अपेक्षा आहे. सरकारने हे महामंडळ अधिक मजबूत करणे अपेक्षित आहे. असे असताना त्यात नोकर कपात करून महामंडळाला विकलांग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तब्बल ६१ कर्मचाऱ्यांची कपात करणे धक्कादायक होते.

18:58 (IST) 19 Jun 2024
मंत्रीपुत्राने स्वीकारले दोन अनाथ मुलांचे पालकत्व

पत्नीच्या निधनानंतर मुलगी कार्तिकी व मुलगा राज यांचे संगोपन ते करीत असतानाच त्यांना कर्करोग झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

सविस्तर वाचा...

18:52 (IST) 19 Jun 2024
मुंबई महापालिका मुख्यालयातही बॉम्बची धमकी, रुग्णालयांना बॉम्बची धमकी देणाऱ्या ई-मेल आयडीवरून धमकी

मुंबई : मुंबईतील रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये बॉम्बची धमकी दिल्याची घटना ताजी असताना मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातही बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ई-मेल मंगळवारी महापालिका मुख्यालयाला प्राप्त झाला.

सविस्तर वाचा...

18:52 (IST) 19 Jun 2024
पत्राचाळ योजनेतील ३०६ घरांच्या किमतीत वाढ? सात ते दहा लाखांनी वाढ प्रस्तावित; विजेत्यांवरील आर्थिक भार वाढणार

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या पत्राचाळ योजनेतील ३०६ विजेत्यांना मागील आठ वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. मात्र, घरे ताब्यात येण्याआधीच त्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

18:51 (IST) 19 Jun 2024
मुंबई : ग्रीनलाइट लेझर शस्त्रक्रियेने ७० वर्षांच्या वृद्धाला मिळाले नवजीवन!

मुंबई : एच एन रिलायन्स हॉस्पिटल फाउंडेशन मध्ये मूत्रमार्गामध्ये ब्लॉकेज असलेल्या ७० वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले. या रुग्णावर जानेवारीमध्ये हृदयविकाराची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांच्या मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला होता.

सविस्तर वाचा...

18:50 (IST) 19 Jun 2024
शक्तिपीठ महामार्गाचा फेरविचार करण्याची आ. गाडगीळांची मागणी

आ. गाडगीळ यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन देत सविस्तर चर्चा केली.

सविस्तर वाचा...

18:50 (IST) 19 Jun 2024
लोणावळ्यात कायमस्वरुपी दिवसा जड वाहनांना बंदी; मुंबई-पुणे महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने

लोणावळा : लोणावळा शहरात होणारी कोंडी विचारात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जाणारी जड वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. लोणावळा शहरात दिवसा जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा...

18:49 (IST) 19 Jun 2024
मुंबई : अकरावीसाठी वाणिज्य शाखेला पसंती, प्रवेशाची सर्वसाधारण यादी जाहीर; ९० टक्क्यांवरील १७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. या यादीनुसार अकरावी प्रवेशासाठी २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ८१२ इतकी आहे.

सविस्तर वाचा...

18:39 (IST) 19 Jun 2024
सेवानिवृत्तीचे वय वाढीचा विषय काय, विद्यार्थी संघटनांचा या निर्णयाला विरोध का? जाणून घ्या…

केंद्र सरकार व २५ राज्यांप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

18:30 (IST) 19 Jun 2024
शिक्षण अकरावी पास, व्यवसाय ‘डॉक्टरकी’…..मुदतबाह्य इंजेक्शन लावून….

आरोग्य विभागाने घेतलेल्या झाडाझडतीमध्ये त्या युवकाकडे मुदतबाह्य औषध साठा देखील आढळून आला.

सविस्तर वाचा...

18:11 (IST) 19 Jun 2024
सांगलीत ८४ हजारांचा गांजा जप्त, एकाला अटक

सांगली : सांगलीवाडी जकात नाक्याजवळील मंगल कार्यालयाजवळ एका तरूणाला गांजा विक्रीच्या प्रयत्नात असताना सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून ८४ हजाराचा ४ किलो ३९८ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.

एक तरूण गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी सांगलीवाडी जकात नाक्याजवळ एका मंगल कार्यालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या अरिहंत राजगोंडा पाटील (वय३२ रा. कोथळी) याला संशयावरून ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत गांजा आढळून आला.

17:54 (IST) 19 Jun 2024
सांगली: मृत्यूनंतर दहा जणांना दिले नवे आयुष्य

आई-वडिलांनी औषधोपचार केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा आजार बळावला.

सविस्तर वाचा...

17:44 (IST) 19 Jun 2024
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; ६ जुलै रोजी साताऱ्यात पाच दिवस मुक्काम

लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून आळंदीतून सुरू होणार आहे.

सविस्तर वाचा...

16:52 (IST) 19 Jun 2024
सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांवर वित्त विभागाचा अन्याय, मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही…

नागपूर: राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. त्याची विविध कारणे समोर आली आहेत. त्यात राज्यातील मागासवर्गीय, अल्पसंख्यांक व मराठा समाजाची सत्ताधारी पक्षावर नाराजी असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. असे असले तरी अनेक शासकीय कर्मचाऱ्यांची नाराजी सरकारने ओढवून घेतल्याचाही बोलले जाते.

सविस्तर वाचा...

16:36 (IST) 19 Jun 2024
जळगाव : कमळगाव आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने १०० पेक्षा जास्त जणांना विषबाधा

जळगाव : आठवडे बाजार म्हणजे ग्रामस्थांच्यादृष्टीने जणूकाही जत्राच. चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे भरलेल्या आठवडे बाजारात चांदसणी, पिंप्री, मितावली यांसह आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांसह महिलांनी गर्दी केली होती. बाजारात ग्रामस्थांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. काही ग्रामस्थांना पाणीपुरी इतकी आवडली की त्यांनी ती घरीही नेली. पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मात्र पुढे काही वेगळेच घडले.

वाचा सविस्तर...

16:13 (IST) 19 Jun 2024
नागपुरातील हिट अँड रन प्रकरणात हलगर्जीपणा, ठाणेदार तडकाफडकी निलंबित

नागपूर : दिघोरी टोल नाक्याजवळ झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात दोघांचे बळी गेले तर ७ जण गंभीर जखमी झाले होते. एवढ्या गंभीर प्रकरणात हलगर्जीपणा करणे वोठाडा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला चांगले भोवले.

सविस्तर वाचा...

Maharashtra Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News Live: छगन भुजबळ खरंच पुन्हा स्वगृही अर्थात ठाकरे गटात परतणार?