Today’s Marathi Batmya, 30 November 2022 : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरे-शिंदे गटातील पक्षचिन्हावरील वादावर येत्या १२ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. दुसरीकडे आगामी पालिका, विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होण्याची दाट शक्यता आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. यासह अन्य महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.
Mumbai Live News, 30 November 2022 : वाचा राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तुलना केली होती. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. आनंद परांजपे म्हणाले की, सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपचे नेते करीत आहेत.
मुरबाड जवळील बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या ९९ वारसांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या सेवेत शासन आदेशानुसार नियुक्त्या देण्यात आल्या. अनेक वर्ष हा प्रकल्पग्रस्तांचा विषय प्रलंबित होता. प्रकल्पग्रस्तांनी हक्काची नोकरी मिळण्यासाठी अनेक वर्ष शासन पातळीवर लढा दिला होता. अखेर त्या लढ्याला यश आले आहे.
मानखुर्दच्या मंडाला परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने दोन दिवसांपूर्वी घरात गळफास लावून आत्महत्या केली. संगीता यादव असे या तरुणीचे नाव असून याप्रकरणी मानखुर्द पोलीस अधिक तपास करीत आहेत.
प्रवाशांना कल्पना न देताच मध्य रेल्वेने बुधवारी वातानुकूलित लोकलच्या १४ फेऱ्या अचानक रद्द केल्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी स्थानकात आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. मध्य रेल्वेवर दररोज ५६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होतात. कमी फेऱ्या असल्याने वातानुकूलित लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना नियोजित वेळेवर स्थानकात पोहोचावे लागते.
शहरात बेकायदा गुटखा विक्री सुरू असून गुटखा विक्री आणि साठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. याबाबत मनसेकडून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.
रखडलेले निकाल असो किंवा विस्कळीत झालेले परीक्षांचे वेळापत्रक.. मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या द्वितीय सत्र ‘एटीकेटी’ची परीक्षा येत्या २ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
जळगाव येथील घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने कायमस्वरूपी जामीन मंजूर केला आहे.वाढते वय आणि प्रकृती अस्वस्थ्यामुळे जैन यांना आधीच न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.
गेली अनेक वर्षे रंगभूमीवर प्रभावीपणे आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे आता ‘काळी राणी’ या नव्या नाटकासह आपल्या नाट्यकारकीर्दीचे शतक साजरे करीत आहेत. विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेले ‘काळी राणी’ हे शंभरावे नाटक असून हे नाटक ११ डिसेंबर रोजी रंगभूमीवर येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमावर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदल करण्याची भूमिका घेतली आहे. अभ्यासकांनी या अभ्यासक्रमाविषयी सूचना केल्यास विद्यापीठ अधिकार मंडळाद्वारे विचार करून सुयोग्य बदल करण्यात येतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले.
देशात २०१४ मध्ये आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेत वेगवेगळ्या मतदारसंघातील आणि जिल्ह्याजिल्ह्यांमधील राजकीय गणिते पूर्णपणे बदललेली पाहायला मिळाली. ठाणे जिल्ह्यावर गेली अनेक वर्षे शिवसेनेचा वरचष्मा राहिला असला तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जातीच्या राजकारणाचे डावही अधूनमधून टाकले जात. बातमी वाचा सविस्तर...
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील बंडखोरीवरही भाष्य केले. आम्ही टीका करणाऱ्यांना आमच्या कामातून उत्तर देऊ. जनतेच्या जे मनात होते तेच आम्ही केलेले आहे. ज्यांनी ३७० कलम हटवले, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम केले त्यांच्याशी आम्ही युती केली असेही शिंदे म्हणाले. वाचा सविस्तर
ठाणे रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक १० (अ) वर एका प्रवासी महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिपक शाहू (२०) याला अटक केली आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित राहिले. राज्यपाल कोश्यारी यांच्या शिवरायांवरील वक्तव्यानंतर उदयनराजे नाराज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान उदयनराजेंच्या अनुपस्थितीवर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. वाचा सविस्तर
आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. वाचा सविस्तर बातमी...
राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आलं आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी...
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या कार्यक्रमात भाषण करताना लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाची थेट तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं विधान लोढा यांनी केलं आहे.
भंडारा : रात्रीची वेळ, किर्र अंधार. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र तिजारे व पृथ्वीराज राठोड कर्मचाऱ्यांसह रात्रगस्तीवर. अचानक वाघोबा समोर आले अन्…पवनी तालुक्यातील कन्हाळगाव, सावरला परिसरात वाघाचा मुक्तसंचार असल्याची भीती परिसरातील नागरिकांकडून सातत्याने व्यक्त करण्यात येत होती. सावरला परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असून उमरेड-करांडला अभयारण्यालगत आहे. बातमी वाचा सविस्तर...
भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास असमर्थता दाखविणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्या नाममात्र दराने ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली असतानाच, दुसरीकडे थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गंत एकरकमी कर भरणाऱ्यांना व्याजात १०० आणि ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
परभणी : सध्या गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत, मात्र रासपचे नेते महादेव जानकर व भारतीय जनता पक्ष यांच्यात पडत चाललेल्या अंतराच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता गंगाखेड विधानसभा मतदारसंघातही स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य संतोष मुरकुटे यांनी नुकतेच गंगाखेड येथे केलेले शक्तिप्रदर्शन म्हणजे भाजपच्या आगामी रणनीतीची पायाभरणी असल्याचे मानले जात आहे. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : ‘एसटी’च्या चालक-वाहकांच्या अंतिम पात्रता परीक्षेत उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा ‘व्हिडीओ’ पुढे आल्यावर महामंडळाने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले.दरम्यान, येथे पात्र ठरवलेल्या अनेक उमेदवारांना बस योग्यरित्या चालवताही येत नसल्याने काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन येथे चुकीच्या हातात एसटीचे ‘स्टेअरिंग’ही दिल्याचे पुढे येत आहे. बातमी वाचा सविस्तर...
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली प्रभागसंख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याबाबतच्या कायद्याला आव्हान देणारी याचिका ही कुहेतूने केलेली आहे. तसेच ही याचिका न्यायालयासह सरकारी यंत्रणांच्या वेळेचा अपव्यय करणारी असल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला असून ती फेटाळण्याची मागणी केली आहे.त्याचप्रमाणे जोपर्यंत जनगणना होत नाही, तोपर्यंत प्रभागांचे सीमांकन करण्याचा अधिकार वापरला जाऊ शकत नाही.
नागपूर: सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रशासकीय बाब आहे. दर तीन वर्षांनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. सत्ताबदल झाला तरी मर्जीतील अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात नेण्याचा प्रघात आहे. बातमी वाचा सविस्तर...
मध्य उपनगरीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांमुळे प्रथम श्रेणीच्या तिकीट आणि पासधारक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशीच परिस्थिती वातानुकूलित लोकल प्रवाशांचीही आहे. मध्य रेल्वेतील तिकीट तपासनीसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवून फुकट्या प्रवाशांची धरपकड केली.
श्रद्धा वालकरचा खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबची पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली आहे. यावेळी आफताबने आपण श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आफताबने यावेळी आपण आधीपासूनच श्रद्धाच्या खूनाचा कट रचल्याची माहिती दिली आहे. आफताबच्या या कबुलीमुळे तपासाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण याआधी आफताबने भांडणानंतर तसंच नशेत असताना श्रद्धाचा खून केल्याचा दावा करण्यात आला होता.
मुंबईतील घरविक्रीत ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये काहीशी वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबईत आठ हजार ६२७ घरांची विक्री झाली असून घरविक्रीतून राज्य सरकारला ६६१ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये घरविक्रीत चढ-उतार होत होता. यादरम्यान आठ ते १२ हजारांदरम्यान घरविक्री झाली होती. केवळ मार्चमधील घरविक्रीचा अपवाद होता.
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये आगीच्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबांतील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेत तीन लोक जखमी झाले आहेत. हे कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत या कुटुंबीयांनी जीव गमावला आहे.
समलैंगिक विवाहाला संरक्षण देणारे विधेयक मंगळवारी अमेरिकेच्या सिनेटमध्ये पारित करण्यात आले. यामुळे समलैंगिक विवाहाला अमेरिकन संघराज्याची मान्यता मिळाली आहे. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला २०१५ मध्ये कायदेशीर मान्यता दिली होती. ही मान्यता रद्द करण्यात येण्याची चिंता भेडसावत असतानाच अमेरिकेच्या संसदेने समलैंगिक विवाहाला कायदेशीर संरक्षण दिले आहे.
उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला असून १५ लोक जखमी झाले आहेत. बहराइचच्या टप्पे सिपाह भागात ही दुर्घटना घडली आहे. बुधवारी सकाळी हा अपघात झाला आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपूर विधानभवन परिसरातील शिवसेना पक्ष कार्यालयावरून विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. सध्यातरी प्रशासनाने या कार्यालयावर पडदा टाकून तात्पुरता मार्ग काढला आहे. बातमी वाचा सविस्तर...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे आंतरवासिता विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ‘रॅगिंग’ घेतल्याचा धक्कादायक प्रकार एका चित्रफीतीतून पुढे आला आहे. ‘सेन्ट्रल रॅगिंग समिती’कडून मेडिकल प्रशासनाला तक्रार येताच येथील सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. बातमी वाचा सविस्तर...