Today’s Marathi Batmya, 30 November 2022 : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरे-शिंदे गटातील पक्षचिन्हावरील वादावर येत्या १२ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. दुसरीकडे आगामी पालिका, विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होण्याची दाट शक्यता आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. यासह अन्य महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.
Mumbai Live News, 30 November 2022 : वाचा राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
औरंगाबाद: राजकीय पक्ष कोणताही असो तेथे होयबांची गर्दी असतेच. त्यात अभ्यासूपणे कायद्याच्या आधारे शहर विकासाचं बोलणारा, आपला मुद्दा महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगरपंचायत अधिनियमांच्या आधारे मांडत महापालिकेतील अनागोंदीला किमान शिस्त लागावी यासाठी काम करणारा नेता अशी औरंगाबाद येथील समीर राजूरकर यांची ओळख. बातमी वाचा सविस्तर…
शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे एकदम बदलली. भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गट विस्ताराचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. काही संघटना, पक्षाचे नेते त्याची भेट घेऊ लागले. बातमी वाचा सविस्तर…
वारजे भागातील एका हाॅटेलमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या असून १३ जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वारजे भागातील चांदणी बार अँड रेस्टाॅरंटचे व्यवस्थापक डॅनी अमृत बहाद्दुर सुब्बा (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे पोलिसांनी प्रसाद गजानन ढमाले, शिवराज चव्हाण, बाबू दासराज, स्वराज भोसले, ओंकार कांगणे, ओंकार फाटक, श्रवण पवार यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : गायरान जमिनीवरील गरिबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाने चर्चेअंती घेतला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मंत्रीमंडळ बैठकीत मांडून मंजूर केला. बातमी वाचा सविस्तर…
सोलापूर : सोलापूर विमानसेवेच्या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन चिघळले आहे. विमानसेवेसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या चिमणीचा कथित अडथळा ठरत असल्यामुळे चिमणी पाडून टाकण्याचा विषयही प्रलंबित आहे. बातमी वाचा सविस्तर…
मुंबई विभागीय पासपोर्ट कार्यालय (आरपीओ) येत्या शनिवारी, ३ डिसेंबर रोजी खुले राहणार असून त्या दिवशी वेळ निश्चित करण्यासाठी बुधवारपासून (३० नोव्हेंबर) अर्ज करता येईल. आरपीओ मुंबईची सर्व कार्यालये पासपोर्ट अर्जांच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शनिवार, ०३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५.३० या वेळेत खुली ठेवण्यात येणार आहेत. या दिवसासाठी नव्याने भेटीची वेळ निश्चित करता येईल.
शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले.शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं स्पष्ट होत आहे. यावर वस्तुस्थिती समोर यावी म्हणून जाहीर चर्चा करावी, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यांच्या या आव्हानावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.
इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे अध्यक्ष नदाव लापिड यांनी केलेल्या एका विधानामुळे ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत असून, वाद निर्माण झाला आहे. लापिड यांनी ‘काश्मीर फाइल्स हा चित्रपट अत्यंत बटबटीत आणि प्रचारपट आहे,’ अशा शब्दांत टीका केली आहे. यानंतर फक्त बॉलिवूडच नव्हे तर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही लापिड यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली होती. दरम्यान भाजपा नेत्याने यावरुन त्यांना टोला लगावला आहे.
इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे अध्यक्ष नदाव लापिड यांनी केलेल्या एका विधानामुळे ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत असून, वाद निर्माण झाला आहे. लापिड यांनी ‘काश्मीर फाइल्स हा चित्रपट अत्यंत बटबटीत आणि प्रचारपट आहे,’ अशा शब्दांत टीका केली आहे. यानंतर फक्त बॉलिवूडच नव्हे तर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही लापिड यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली होती. दरम्यान भाजपा नेत्याने यावरुन त्यांना टोला लगावला आहे. वाचा सविस्तर