Maharashtra Political News Updates, 07 August 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील निवडणुकांसंदर्भात दिल्लीतही काही घडामोडी समोर येत आहेत. शरद पवारांची आज दिल्लीत राहुल गांधींसमवेत बैठक होणार असून त्यात राज्यातील निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात एकीकडे अनेक भागांत पावसामुळे पाण्याला उधाण आलेलं असताना दुसरीकडे राजकीय तर्क-वितर्कांनाही उधाण आलं आहे.

Live Updates

Marathi News Live Today, 07 August 2024: विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा...

23:09 (IST) 7 Aug 2024
माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापुरात ५.४० लाख महिला पात्र

सोलापूर : महायुती शासनाने अलीकडे जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत सहा लाख १५ हजार महिलांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यात चार लाख अर्ज ‘ऑफलाईन’ पद्धतीने भरण्यात आले होते. हे सर्व अर्ज प्रशासनाने स्वतःची यंत्रणा सक्रिय ठेवून ‘ऑनलाईन’वर भरून घेतले. पाच लाख ४० हजार अर्ज योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत.

याबाबतची माहिती देताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, उर्वरीत अर्जांची छाननी करून त्यातील त्रुटी दूर केल्या जातील आणि एकही पात्र महिला योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. यात प्रशासनाची संवेदनशीलता दिसेल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर महिलांकडून आवश्यक दाखले मिळवून देण्यापासून ‘ऑनलाईन’ अर्ज भरून घेण्यापर्यंत अंगणवाडी सेविकांपासून ते इतर मनुष्यबळ झपाट्याने कामाला लागले. ‘ऑनलाईन’ अर्ज भरून घेताना संगणकीय व इतर तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे ‘ऑफलाईन’ अर्ज भरून घेण्यात आले. हे अर्ज भरून घेताना अर्जदार महिलांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याचीही काळजी घेतली. यात काही नेट कॅफेचालकांवर फौजदारी कारवाईही झाली. अखेर सर्व चार लाख ‘ऑफलाईन’ अर्ज ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरून घेतल्यामुळे त्याचे चांगले दृश्य परिणाम लगेच दिसून आले. त्यामुळेच आतापर्यंत पाच लाख ४० हजार महिलांचे अर्ज पात्र ठरले असून या सर्व पात्र अर्जदार महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये अर्थसाह्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

21:03 (IST) 7 Aug 2024
फलक कोणाचा… शिवसेनेचा! शिवसेनेच्या दोन गटांत आता फलकावरून वादावादी, प्रभादेवीत सरवणकर आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले

शिवसेनेचे दोन गट पडल्यापासून शिवसेनेचे चिन्ह, शाखा यांवरून दोन गटांत झालेली वादावादी आता फलक कोणाचा इथपर्यंत आली आहे.

सविस्तर वाचा...

20:33 (IST) 7 Aug 2024
रत्नागिरी: 'महामुंबईकर' नामक कंपनीने राजापूरवासीयांना लावला लाखो रुपयांना चुना, चौघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

राजापूर: रत्नागिरीकरांना आरजू कंपनीने कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार ताजा असताना ’महामुंबईकर नामक' कंपनीने अनेकांना लाखो रुपयांना चुना लावल्याचा प्रकार पुढे आला आहे. या कंपनीकडून राजापूरातही अनेकांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याची बाब पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

'महामुंबईकर' नामक कंपनीच्या नावावर चौघांनी फसवणूक केल्याची तक्रार राजापूर पोलीसांत दाखल करण्यात आली आहे. या चार जणांनी मिळून सुमारे साडेआठ लाख रूपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीवरून पुढे आले असून या प्रकरणी पोलीसांनी तपास सुरू केल्याची माहिती राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली. या ’महामुंबईकर' नामक या कंपनीने शहरानजीक पुर्नवसन वसाहतीमध्ये आपले कार्यालय सुरू करून पैसे जमा करण्यासाठी काही प्रतिनिधींची नियुक्ती करून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करून अनेकांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन या विरोधात तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी केले आहे.

20:30 (IST) 7 Aug 2024
मुंबई: रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांकडून ५७ कोटी रुपये दंड वसूल

वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते जुलै या कालावधीत तिकीट तपासणी करून ५७ कोटी रुपये दंड वसूल केला.

सविस्तर वाचा...

20:21 (IST) 7 Aug 2024
२० हजार संगणक परिचालकांची सेवा संपुष्टात, नवीन नियुक्तीबाबत साशंकता, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

राज्य सरकारने ‘सीएससी-एसपीव्ही’ या संस्थेच्या माध्यमातून तब्बल २० हजार युवकांना संगणक परिचालक म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्त केले होते.

सविस्तर वाचा...

20:06 (IST) 7 Aug 2024
नागपूरकरांसाठी रानभाज्यांची पर्वणी

नागपूर: जिल्ह्यातील जैवविविधता व राजभाज्या याचे आकर्षण निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. रानभाज्या या केवळ आहार आणि चवीशीच निगडीत नसून अनेक औषधी गुणतत्वे त्यामध्ये दडलेली असते. पिढ्यांपिढया पासून याच्या सेवनाला आपण अधिक महत्व देतो. सिमेंटच्या जंगलात आता मोकळी जागा नावालाच उरली आहे.

सविस्तर वाचा

19:54 (IST) 7 Aug 2024
कराडला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

कराड : संततधार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कराड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाने केली आहे. या वेळी कृषिभूषण शंकरराव खोत, कृषिभूषण सुधीर चिवटे, प्रगतशील शेतकरी रवींद्र पाटील, दत्तात्रय लावंड, तुळशीराम शिर्के यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

अशोकराव थोरात म्हणाले, कराड तालुक्यामध्ये गेले तीन आठवडे प्रचंड पाऊस झाला आहे. सरासरीच्या दीडपट ते दुप्पट पाऊस झाल्याने तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये, भाजीपाला, फळभाज्या इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिपावसाने जमिनीची धूप झाली असून, मोठ्या प्रमाणात जमिनीतील अन्नद्रव्ये वाहून गेली आहेत. शेतीचे पाणंदरस्ते खराब झाले असून, दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे शेतीमालाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

19:51 (IST) 7 Aug 2024
माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापुरात ५.४० लाख महिला पात्र

सोलापूर : महायुती शासनाने अलीकडे जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत सहा लाख १५ हजार महिलांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यात चार लाख अर्ज ‘ऑफलाईन’ पद्धतीने भरण्यात आले होते. हे सर्व अर्ज प्रशासनाने स्वतःची यंत्रणा सक्रिय ठेवून ‘ऑनलाईन’वर भरून घेतले. पाच लाख ४० हजार अर्ज योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत. याबाबतची माहिती देताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, उर्वरीत अर्जांची छाननी करून त्यातील त्रुटी दूर केल्या जातील आणि एकही पात्र महिला योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. यात प्रशासनाची संवेदनशीलता दिसेल, असे त्यांनी सांगितले.

19:39 (IST) 7 Aug 2024
वादग्रस्त भूसंपादनावरून मनपा आयुक्त लक्ष्य; नाशिक महापालिकेत घोषणाबाजी, ठिय्या; भाजप आमदार, पालकमंत्र्यांवर दुर्लक्षाचा आरोप

नाशिक - महानगरपालिका प्रशासनाकडून भूसंपादनात काही बांधकाम व्यावसायिकांचे भले होत असून शेतकऱ्यांचे भूसंपादन नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत भाजपचे माजी स्थायी सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महापालिकेत धडक देत आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला.

सविस्तर वाचा

19:26 (IST) 7 Aug 2024
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारणार, जिल्हा विकास नियोजन समितीचा निधी मंजूर

मुंबई : बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. जिल्हा विकास नियोजन समितीने या राष्ट्रध्वजासाठी निधी दिला आहे. या राष्ट्रध्वज उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करून त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या राष्ट्रध्वजाजवळ रोज सकाळी ७.३० वाजता राष्ट्रगीत होणार आहे.

मुंबईत आणखी एका ठिकाणी उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. यासाठी लागणारी आवश्यक परवानगी मिळवण्यात आली असून राष्ट्रध्वज उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी या राष्ट्रध्वज उभारणीसाठी प्रस्ताव दिला होता.

19:25 (IST) 7 Aug 2024
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी तारखांवर तारखा, ऐन गणेशोत्सवात राज्यव्यापी आंदोलन होणार

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ऐन गणेशोत्सवात एसटी संघटना राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

सविस्तर वाचा...

19:24 (IST) 7 Aug 2024
घोट गावात १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

पनवेल ः तळोजा औद्योगिक वसाहतीलगत असणा-या घोट गावामध्ये पोलीसांनी टाकलेल्या धाडीत एका खोलीत तब्बल १० लाख २७ हजार रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. मागील अनेक महिन्यानंतर पोलीसांनी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला.नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी पोलीसांनी नशामुक्त नवी मुंबई ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर गुन्हे अन्वेषण युनिट क्रमांक २ च्या पथकाला घोट गावातील रामु पाटील यांच्या खोलीमध्ये संशयास्पद वस्तूची साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली होती.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक उमेश गवळी यांच्या पथकाने या परिसरात टेहळणी केल्यानंतर त्यांनाही संशयास्पद हालचाली दिसल्या. मंगळवारी रात्री बारा वाजता पोलीसांनी रामु पाटील यांच्या चाळीमध्ये धाड घातल्यानंतर एका खोलीत फीनेस्ट, पारस,  मुसाफीर, सुप्रीम वरानसी आशिक, पुकार, कैश गोल्ड या पानमसाच्यासह टोबॅकोची पुडी, एम फोन न्यु पॅक रॉयल जाफरानी जर्दा, राज कोल्हापूरी, पुकार च्युविंग तंबाखू, व्ही.सी. ५ च्युविंग टोबॅकोच्या पुड्या सापडल्या. या प्रकरणी पोलीसांनी तळोजा फेस १ येथील हिना हाईट या इमारतीमध्ये राहणा-या २५ वर्षीय मोहम्मद आबीद मोहम्मद खालीद याला अटक केली आहे. काही दिवसांपासून मोहम्मद रामु यांची खोली भाड्याने घेऊन त्यामध्ये अवैध व्यवसाय करत असल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे.

19:14 (IST) 7 Aug 2024
कर्जत : एकाच महाविद्यालयाचे एकाच वेळी ११ विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण

कर्जत: एप्रिलमध्ये झालेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील विविध विषयाचे अकरा विद्यार्थी एकाच वेळी सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये अतुल बाबर (अर्थशास्त्र), तेजस सरोदे, निखिल बांदल (प्राणीशास्त्र), अक्षय खाळगे, माधुरी पानसरे (रसायनशास्त्र), मनीषा उकिरडे (वनस्पतीशास्त्र), उमेश निंबाळकर, ऐश्वर्या नलवडे (गणित), अदिती अगावणे, सहदेव कानगुडे (भौतिकशास्त्र), श्रुती शहा भौतिकशास्त्र हे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. महाविद्यालयामध्ये नेट - सेट परीक्षा तयारी करून घेण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाचे मार्गदर्शन वर्ग घेतले जातात.

19:05 (IST) 7 Aug 2024
कोल्हापूर: 'गुरुदत्त शुगर्स'च्या छावणीत जनावरे, पुरग्रस्तांना आधार

कोल्हापूर : जिल्ह्यात पुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांचे स्थलांतर झाले आहे. अशा कठीण काळात टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर तालुक्यातील पंधराहून अधिक गावांतील सुमारे १०५० पूरग्रस्तांसह ४०० जनावरांची छावणी सुरू करण्यात आली आहे.

शिरोळ तालुक्याला २००५ पासून सातत्याने महापुराचा फटका बसत आहे. अशा प्रत्येक आपत्तीच्या काळात गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून घाटगे यांनी माणुसकीच्या भावनेतून छावणी सुरू करून मदत करीत असतात. यावर्षी येथे एक हजाराहून अधिक पूरग्रस्तांनी कुटुंब, जनावरांसह छावणीचा आधार घेतला आहे. शासनाच्या मदतीविना स्वखर्चाने पूरग्रस्तांची छावणी सुरू करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याची कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांची भूमिका कौतुकास्पद ठरली आहे.

19:01 (IST) 7 Aug 2024
Video: मुलांना पाठीवर बसवून पालकांचा जीवघेण्या पुलावरून…

पूर असतानाच अशी स्थिती नसते तर, पूर नसला तरीही जवळपास गुडघ्याभर पाण्यातून दररोज वाट काढावी लागते.

सविस्तर वाचा...

18:50 (IST) 7 Aug 2024
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी घडामोड; बाजार समितीच्या सभापतींचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव बुधवारी मंजूर करण्यात आला.बाजार समितीतील १८ संचालकांपैकी १० संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.सभापतीसह सात संचालकांनी सभात्याग केला. एक संचालक गैरहजर होता. स्वाक्षरीचे अधिकार संचालक प्रशांत काळभोर यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब तावरे यांनी दिली.

सविस्तर वाचा

18:46 (IST) 7 Aug 2024
नाशिक: भाऊबंदकीच्या वादातून हत्या - संशयित ताब्यात

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातून एका ५० वर्षाच्या व्यक्तीची हत्या झाली. बुधवारी सकाळी १० वाजता हा प्रकार घडला. इगतपुरी पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी मदन गोईकणे (गिरणारे, ता. इगतपुरी) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

संशयित महेंद्र गोईकणे याच्याशी बुधवारी सकाळी मदन यांचा वाद झाला. वाद वाढत गेल्याने धारदार शस्त्राचे वार करण्यात आले. त्यातच मदन यांचा मृत्यू झाला. संशयित महेंद्र गोईकणेने धारदार शस्त्राने हत्या केल्याची तक्रार मयत मदन यांची पत्नी सिंधुबाई गोईकणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी संशयित महेंद्र गोईकणे याला ताब्यात घेतले आहे.

18:44 (IST) 7 Aug 2024
कोल्हापूर : अंशतः अनुदानित शाळांना अनुदान देण्याची शिक्षकांची मागणी; मतदानावर बहिष्काराचा इशारा

कोल्हापूर : पावसाची भुरभुर सुरू असताना अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी बुधवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढला. शासनाने अनुदान सत्वर द्यावे अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. राज्यातील अंशतः अनुदानित, शाळांसाठी वाढीव टप्प्याचे अनुदान देण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही वारंवार याचा पुनरुच्चार केला आहे. मात्र, याचा अध्यादेश अद्यापही निघाला नसल्याने महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने अंशतः अनुदानित १२५० हून अधिक शिक्षकांनी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून धरणे, मुंडण, भजन, घंटानाद, थाळीनाद आंदोलन सुरू केले आहे.

तर आज महामोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कृती समितीने मागणी केली. माजी खासदार निवेदिता माने, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार भगवान साळुंखे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पाटील, बी. जी. बोराडे यांनी मोर्चात सहभागी शिक्षकांना पाठिंबा दिला.

18:36 (IST) 7 Aug 2024
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुन्हा राज्यव्यापी आंदोलन

शक्तिपीठ महामार्ग रद्द न करता तो केवळ स्थगित केला असल्याने हा महामार्ग संपूर्णत: रद्द करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात होत आहे.

सविस्तर वाचा...

18:33 (IST) 7 Aug 2024
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत; 'हे' आहे कारण

पिंपरी : निघोजे बंधाऱ्यावरून उचलल्या जाणाऱ्या अशुद्ध जलउपसा केंद्रावरील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी,  देहू - आळंदी रस्ता बोऱ्हाडेवाडी, चक्रपाणी वसाहत, अक्षयनगर तसेच इंद्रायणीनगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात बुधवारी (७ ऑगस्ट) रात्री होणारा आणि  गुरुवारी (८ ऑगस्ट) सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

सविस्तर वाचा

17:59 (IST) 7 Aug 2024
सांगली: आटपाडीमध्ये डाळिंबाला प्रतिकिलो तब्बल ५५१ रुपयांचा सर्वोच्च दर

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात बुधवारी दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो तब्बल ५५१ रुपयांचा सर्वोच्च दर मिळाला.

सविस्तर वाचा...

17:48 (IST) 7 Aug 2024
यवतमाळ : सावधान! हवाबंद डब्यातील मिठाईत बुरशी, हल्दीराम स्टोअरला…

या प्रकरणी अन्न व औषध विभागाकडे तक्रार करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ पावले उचलत यवतमाळ येथील हल्दीराम स्टोअरला कारणे दाखवा नोटीस बजावली.

सविस्तर वाचा...

17:46 (IST) 7 Aug 2024
शाळेसमोरील मार्ग, की ‘यममार्ग’? नागपूरच्या अजनी रेल्वे मेन्स शाळेसमोरील वळण विद्यार्थ्यांसाठी धोकादायक…

नागपूर : अजनीतील रेल्वे मेन्स प्राथमिक आणि माध्यमिक शाळेसमोर असलेल्या धोकादायक वळणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजनी रेल्वे पुलावरून भरधाव येणारी वाहने अचानक वळण घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही जीव टांगणीला लागलेला असतो.

वाचा सविस्तर...

17:45 (IST) 7 Aug 2024
“आमदारांच्या गाड्या फोडणे हा राज्यात दंगल घडवण्याचाच कट…” प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

बुलढाणा : राज्यातील दोन आमदारांच्या गाड्या फोडणे हा राज्यात दंगल घडविण्याचा प्रयत्न होता, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला आहे.

वाचा सविस्तर...

17:38 (IST) 7 Aug 2024
वर्धा : वैद्यकीय महाविद्यालयाचा तिढा; भांडणे हिंगणघाटात, कृपादृष्टी मात्र आर्वीत, काय झाले नेमके?

आर्वी मतदारसंघात आरोग्य सेवा वृद्धिंगत व्हावी म्हणून प्रयत्न सूरू आहेत. वर्धा, अमरावती व नागपूर या तीन जिल्ह्याचे मध्यबिंदू म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव हे येते.

सविस्तर वाचा...

17:22 (IST) 7 Aug 2024
ठरलं! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६५ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा ‘येथे’ होणार…

राज्य शासनाने निधी मंजूर केल्याने ऐतिहासिक दीक्षाभूमीचा कायापालट होणार आहे.

सविस्तर वाचा...

17:12 (IST) 7 Aug 2024
नागपूर: सिमेंटची परराज्यातील वाहनांवर मालवाहतूक केल्यास… ट्रान्सपोर्ट व्यवसायिक म्हणतात..

पूर्व विदर्भातील ट्रान्सपोर्ट चालकांनी कोट्यावधींचे कर्ज घेऊन सिमेंटसह इतर माल वाहतूकीसाठी जड वाहने मोठ्या संख्येने खरेदी केली.

सविस्तर वाचा...

17:02 (IST) 7 Aug 2024
विद्यार्थ्यांची थट्टा, पोषक आहार म्हणून देणार पाच ग्रॅम मोड आलेले कडधान्य

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात आता आठवड्यातून चार दिवस मोड आलेले कडधान्य दिले जाणार आहे.

सविस्तर वाचा...

17:02 (IST) 7 Aug 2024
राज ठाकरेंना जाब विचारणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना जाब विचारीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकरा मराठा आंदोलकांवर येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा....

16:12 (IST) 7 Aug 2024
Raj Thackeray Latest News: वरळीत मनसे उमेदवाराची घोषणा

कोण कुठल्या मतदारसंघात उभं आहे याच्याशी मला देणंघेणं नाही. वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असेल. - राज ठाकरे</p>

https://x.com/mnsadhikrut/status/1821088083229422010

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra News Today in Marathi

लोकसभा निवडणूक २०२४

Marathi News Live Today, 07 August 2024: महाराष्ट्रातील सर्व घडामोडींची बित्तंबातमी!